Sunday, 4 October 2020

हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0).


 केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 11 सप्टेंबर 2020 रोजी “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0 (क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क –CSCAF 2.0) तसेच ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान अश्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.


✔️ CSCAF 2.0 विषयी ठळक बाबी...


मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला ‘स्मार्ट शहर अभियान’ CSCAF 2.0 कार्यक्रम राबवित आहे.


CSCAFचा उद्देश - हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे तसेच त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे.


या आराखड्यात 28 निदर्शकांसह पाच मुख्य क्षेत्रे आहेत - ऊर्जा आणि हरित इमारती; नगरनियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता; दळणवळण आणि हवेची गुणवत्ता; जलव्यवस्थापन; आणि घनकचरा व्यवस्थापन.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.


‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान शहरी रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीचे आव्हान आहे. याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?


(A) बिजींग, चीन✅

(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड

(C) शांघाय, चीन

(D) टोकियो, जापान


2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.


(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) बांग्लादेश✅

(D) सौदी अरब



3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?


(A) वल्टरी बोटास

(B) सेबेस्टियन व्हेटेल

(C) मॅक्स वर्स्टपेन

(D) लेविस हॅमिल्टन ✅

 


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?


(A) चीन

(B) जापान

(C) तैवान ✅

(D) क्रोएशिया



5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?


(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅


(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

 

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा


(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे

 


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?


(A) रतन टाटा


(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅ 


(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय


(D) आनंद महिंद्रा



7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?


(A) आयआयटी मद्रास


(B) आयआयटी मुंबई

 

(C) आयआयटी कानपूर ✅ 


(D) आयआयएम अहमदाबाद




8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?


(A) नामदेव ढसाळ

(B) जे. व्ही. पवार

(C) अरुण कांबळे

(D) राजा ढाले ✅



9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?


(A) बँक ऑफ महाराष्ट्र

(B) पंजाब नॅशनल बँक

(C) भारतीय स्टेट बँक ✅

(D) कॅनरा बँक



10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?


(A) नवी दिल्ली ✅

(B) महाराष्ट्र

(C) पश्चिम बंगाल

(D) गोवा



11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?


(A) दिपक मिश्रा

(B) ए. के. सिक्री ✅

(C) मदन लोकुर

(D) टी. एस. ठाकुर



12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.


(A) BSNL

(B) एअरटेल

(C) रिलायन्स जियो ✅

(D) व्होडाफोन



13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?


(A) इंदिरा गोस्वामी

(B) माहीम बोरा

(C) पुरोबी बोर्मूदेय ✅

(D) यापैकी नाही



14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?


(A) आचार्य देवव्रत

(B) कलराज मिश्रा ✅

(C) केशरी नाथ त्रिपाठी

(D) कल्याण सिंग

महानगरपालिका


ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.

महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-


🔰 महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका 🔰


▪️--अकोला महानगरपालिका

▪️--अमरावती महानगरपालिका

▪️--अहमदनगर महानगरपालिका

▪️--उल्हासनगर महानगरपालिका

▪️--औरंगाबाद महानगरपालिका

▪️--कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

▪️--कोल्हापूर महानगरपालिका

▪️--चंद्रपूर महानगरपालिका

▪️--जळगाव महानगरपालिका

▪️--ठाणे महानगरपालिका

▪️--धुळे महानगरपालिका

▪️--नवी मुंबई महानगरपालिका

▪️--नागपूर महानगरपालिका

▪️--नांदेड-वाघला महानगरपालिका

▪️--नाशिक महानगरपालिका

▪️--पनवेल महानगरपालिका

▪️--परभणी महानगरपालिका

▪️--पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

▪️--पुणे महानगरपालिका

▪️--भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

▪️--मालेगाव महानगरपालिका

▪️--मीरा-भायंदर महानगरपालिका

▪️--बृहन्मुंबई महानगरपालिका

▪️--लातूर महानगरपालिका

▪️--वसई-विरार महानगरपालिका

▪️--सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

▪️--सोलापूर महानगरपालिका


कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत अव्वल:-


📚कोविड-19 महामारीविरुद्ध भारत अतिशय सक्षमतेने लढा देत आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी असून, हे स्थान देशाने कायम राखले आहे. 


📚रग्ण बरे होण्याच्या  आकड्याने आज 54 लाखांचा टप्पा (54,27,706) ओलांडला आहे. बरे झालेल्या रूग्णांचे जागतिक पातळीवरचे प्रमाण 21 टक्के आहे, तर  त्या एकूण रूग्णांमध्ये भारताचे हे प्रमाण 18.6 टक्के आहे.


📚इतर अनेक देशांच्या तुलनेत भारताचा कोविड मृत्यूदर कमी असून भारताने जागतिक क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे.


📚जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 2.97 टक्के आहे तर भारताची तुलनात्मक आकडेवारी 1.56 टक्के आहे.


📚जगामध्ये सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतामध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे 73 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर जगामध्ये सरासरी दर दशलक्ष लोकसंख्येमागे 130 जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.


📚भारतामध्ये मोठया संख्येने कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये 75,628 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

एका दिवसात जास्त संख्येने रूग्ण बरे होत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या हा दर 83.84 टक्के आहे.


📚गल्या चोवीस तासांमध्ये बरे झालेल्या कोरोनारूग्णांपैकी 74.36 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रूग्ण असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधल्या रूग्णांचा समावेश आहे.


📚10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास 77 टक्के सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण म्हणजे  2.6 लाख रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

देशामध्ये आज सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.60 टक्के आहे.


📚सलग 12 व्या दिवशी भारतामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. देशात आज सक्रिय रूग्णांची संख्या 9,44,996 आहे.


📚गल्या 24 तासांमध्ये देशात 79,476 नव्या रूग्णांची नोंद झाली.

नव्या रूग्णांपैकी 78.2 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशातले आहेत.


📚महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 नवीन रूग्णांची नोंद झाली. मात्र हे प्रमाण आधीपेक्षा कमी आहे. नवीन रूग्णनोंदीमध्ये केरळ दुस-या स्थानावर असून या राज्यात 9,258 नवीन रूग्ण आढळले. तर तिस-या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये नवीन 8000 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.


📚24 तासांमध्ये 1,069 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्यांमध्ये 84.1 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले रूग्ण आहेत.

📚कालचा महाराष्ट्राचा मृत्यूदर 39.66 टक्के आहे. महाराष्ट्रात काल 424 जणांचा मृत्यू झाला, त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 125 जणांना प्राण गमवावे लागले.

अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा!



- रोहतंग, हिमाचल प्रदेश मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन  केले, तो समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.


-  मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.


- हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत होता. 


- पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे. 


- घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.


- अटलजींच्या मित्राचे स्वप्न पूर्ण

थोलांग, हिमाचल प्रदेश : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र अर्जुन गोपाल यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून बोगदा बांधल्यास सोयीचे होईल, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती. 


- गोपाल यांचे पुत्र अमर सिंह (वय ७५) यांनी सांगितले, की आमचे वडील १९९८ मध्ये दिल्लीत वाजपेयी यांना भेटले होते. त्या वेळी त्यांनी रोहतांग खिंडीतून बोगदा केल्यास लाहौल-स्पिती जिल्ह्य़ातील लोकांची सोय होईल अशी कल्पना मांडली. 


- त्यानंतर माझे वडील २००८ मध्ये निवर्तले, आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक 2019.



🅾️जारी करणारी संस्था - IMD इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट


🅾️निर्देशांक आवृत्ती - 3 री , 2017 साली सुरुवात


🧩निकष - 


1. तंत्रज्ञान विषयक सजगता

2. तंत्रज्ञानविषयक स्पर्धात्मकता

3. तंत्रज्ञानविषयक क्षमता


🧩जगातील प्रथम 5 देश...


1. अमेरिका

2. सिंगापूर

3. स्वीडन

4. डेन्मार्क

5. स्वित्झर्लंड


🧩भारताचा निर्देशांकात क्रमांक...


🅾️ 2018 मध्ये 48 व्या स्थानी

🅾️ 2019 मध्ये 44 व्या स्थानी

(4 स्थानांची प्रगती)


🅾️भारताचा शेजारी चीन - 30 व्या स्थानी (2018 मध्ये 22 व्या स्थानी)

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .


🅾️भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.


🅾️GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.


🅾️यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.


🅾️मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.


🅾️सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.


🅾️भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी


🅾️२०१९: ३६ व्या क्रमांकावर

🅾️२०१८: ४४ व्या क्रमांकावर

🅾️२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई


🧩जग क्रमवारी....


1.अमेरिका

2.यूके

3.स्वीडन

4.फ्रान्स

5.जर्मनी

6.आयर्लंड


🅾️भारतीय पेटंट कायदा, २००५

कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा

हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.


🅾️कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.


🅾️ततीय पक्षाला परवाना बंधनकारक

विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य.

महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2019



🅾️22 ऑक्टोंबर २०१९ रोजी जॉर्जटाउन इंस्टीट्यूट फॉर वुमेन, पीस अंड  सिक्योरिटी ने द पीस रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ओस्लो यांच्या सहकार्याने महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध केला.


🅾️ या निर्देशांकात १६७ देशांचा समावेश केला आहे


🅾️  हा निर्देशांक खालील तीन घटकावर आधारीत आहे.


१.समावेश - आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. 

२. न्याय - औपचारिक कायदा आणि अनौपचारिक भेदभाव

३.सुरक्षा - वैयक्तिक समुदाय आणि सामाजिक स्तर


🅾️ या निर्देशांकात नॉर्वेने प्रथम स्थान मिळविले. त्यानंतर स्वित्झर्लंड दुसर्यान, फिनलँड आणि डेन्मार्क संयुक्तपणे तिसर्या  स्थानावर आहे.


🅾️या निर्देशांकातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये येमेन (१६७) अफगाणिस्तान (१६६) आणि सिरिया (१६५) असा क्रम लागतो.


🅾️ या निर्देशांकात गिनिया आणि मोरोक्कोसह भारत संयुक्तपणे १३३ व्या क्रमांकावर आहे. 


🅾️भारताच्या शेजार्यांामध्ये नेपाळ ८४, चीन ७६, भूतान १११,बांगलादेश १२२ आणि पाकिस्तानचा १४४ वा क्रमांक लागतो.