Saturday, 3 October 2020
दाजीपूर अभयारण्य
दाजीपूर एक छोटस, इवलस नाव परंतु या दाजीपूरात रम्य, दाट कीर्द झाङी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले कि, या आरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते.हे या गावाचे वैशिष्ट.
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव गेल्या कांही दिवसापासुन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात गवारेडा हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपुर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे.
या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण,सांबर,चितळ यांचे कळप ही दिसतील,कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील.
जंगलात साळींदर,अस्वले,साप,नाग यांची ही रेलचेल सुरूच असते.महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याक़डे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे.त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणुन रूपांतर केले आहे.पर्यटकांसाठी तंबु निवास सुविधा केली आहे.भोजन उपहार गृहे याचीही स्वंतंत्र व्यवस्था आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात.तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही स्वंतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.
राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा गगनगिरी महाराज मठ याचा भाग असुन ३७२ स्क्वेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :
1. ग्रहाचे नाव - बूध
सूर्यापासुन चे अंतर - 5.79
परिवलन काळ - 59
परिभ्रमन काळ - 88 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.
2. ग्रहाचे नाव - शुक्र
सूर्यापासुन चे अंतर - 10.82
परिवलन काळ - 243 दिवस
परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
3. ग्रहाचे नाव - पृथ्वी
सूर्यापासुन चे अंतर - 14.96
परिवलन काळ - 23.56 तास
परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
4. ग्रहाचे नाव - मंगळ
सूर्यापासुन चे अंतर - 22.9
परिवलन काळ - 24.37 तास
परिभ्रमन काळ - 687
इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.
5. ग्रहाचे नाव - गुरु
सूर्यापासुन चे अंतर - 77.86
परिवलन काळ - 9.50 तास
परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.
6. ग्रहाचे नाव - शनि
सूर्यापासुन चे अंतर - 142.6
परिवलन काळ - 10.14 तास
परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.
7. ग्रहाचे नाव - युरेनस
सूर्यापासुन चे अंतर - 268.8
परिवलन काळ - 16.10 तास
परिभ्रमन काळ - 84 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
8. ग्रहाचे नाव - नेपच्यून
सूर्यापासुन चे अंतर - 449.8
परिवलन काळ - 16 तास
परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
1. नाशिक जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक
क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा.
सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.
जिल्हा विशेष -
हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.
प्रमुख स्थळे
नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे.
त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे.
मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता.
सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान.
नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे.
भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर.
देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.
गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण.
सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात.
सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध.
दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध.
निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक
महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक
चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक
नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते.
नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.
नाशिक जिल्ह्यात वाहणार्या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे.
भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे.
2. धुळे जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे
क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.
सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले.
प्रमुख स्थळे
धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत.
शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे.
दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे.
3. नंदुरबार जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार
क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).
सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात.
सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला.
या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
प्रमुख स्थळे
नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे.
प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात.
धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण.
भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली.
नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय.
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे.
महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)
4. जळगाव जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव
क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी
लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड.
सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.
प्रमुख स्थळे -
जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.
भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे.
चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते.
जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.
चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे.
पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे.
पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे.
महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत.
पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे.
यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे.
चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
5. अहमदनगर जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर
क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता.
सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात.
शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला.
साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.
या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.
प्रमुख स्थळे
अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे.
अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे.
प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.
नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली.
राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे.
शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.
राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे.
शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान
सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते.
भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.
महाराष्ट्र जिल्हे निर्मिती
1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)
3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)
7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)
कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?
देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात.
1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.
गाल्फ प्रवाह
काय आहे गल्फा प्रवाह
📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*
📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.
📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.
📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो
📌अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.
📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.
*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*
📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.
📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.
📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.
📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.
📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.
भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.
🚍 मबई 〰️ आग्रा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.
🚍 मबई 〰️ चन्नई.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.
🚍 नहावासेवा 〰️ पळस्पे.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.
🚍 धळे 〰️ कोलकत्ता.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.
🚍 वाराणसी 〰️ कन्याकुमारी.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.
🚍 मबई 〰️ दिल्ली .
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.
🚍 पणे 〰️ विजयवाडा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.
🚍 सोलापूर 〰️चित्रदुर्ग.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.
🚍 निझामाबाद〰️ जगदाळपूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.
🚍 पणवेल 〰️ मगळूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.
🚍 पणे 〰️ नाशिक .
भारतीय रेल्वे विभाग :
*विभाग - केंद्र - स्थापना*
1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण
●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे
●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण
●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव
●›› गडचिरोली जिल्हा : दिना
●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह
●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा
●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,
●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.
●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण
●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण
●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)
●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी
●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण
●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप
●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी
●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा
●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)
●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण
●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.
अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.
ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते.
क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे.
१. फक्त अ योग्य
२. फक्त ब योग्य
३. फक्त क योग्य
४. वरील सर्व योग्य
उत्तर : ४. वरील सर्व योग्य
२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.
अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे.
ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.
१. विधान : अ योग्य
२. विधान : ब योग्य
३. वरील दोन्ही विधान योग्य
४. वरील दोन्ही विधान अयोग्य
उत्तर : १. विधान : अ योग्य
[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]
३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.
अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे.
ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात.
क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.
१. फक्त अ व ब योग्य
२. फक्त ब व क योग्य
३. फक्त अ व क योग्य
४. वरील सर्व विधान योग्य
उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य
४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.
अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.
ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.
क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.
१. फक्त अ योग्य
२. फक्त ब योग्य
३. फक्त ब व क योग्य
४. फक्त अ व क योग्य
उत्तर : ३. फक्त ब व क योग्य
[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]
५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.
१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.
३. वरील दोन्ही योग्य
४. वरील दोन्ही अयोग्य
उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य
६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?
१. सहाव्या
२. सातव्या
३. आठव्या
४. नवव्या
उत्तर : ३. आठव्या
७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.
अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.
ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे.
क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.
ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.
१. फक्त अ व ब अयोग्य
२. फक्त ब व क अयोग्य
३. फक्त अ व ड अयोग्य
४. फक्त क व ड अयोग्य
उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य
[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे.
क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]
८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.
१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.
२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.
३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.
४. वरील सर्व योग्य
उत्तर : ४. वरील सर्व योग्य
समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,