Monday, 28 September 2020

Online Test Series

करायोजेनिक इंजिन - criogenic engine.


🅾️राज्यसेवा मुख्य परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात मागील वर्षात येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आधी बघू व त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन या अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित उदाहरण बघू.


🧩भस्थिर उपग्रह....


🅾️भस्थिर म्हणजेच जिओन्सिक्रोनस उपग्रह हे पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर स्थित असतात व ते पृथ्वीच्या गतीनुसार पृथ्वीसोबत फिरत असतात. हे भूस्थिर उपग्रह आपल्या नावाप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत एकाच स्थानावर स्थिर असतात. भारताने याच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. क्रायोजेनिक इंजिनाच्या माध्यमातून आता भारताने उपग्रह प्रक्षेपणात आपला झेंडा पृथ्वीबाहेर फडकवला आहे. यामुळे भारत क्रायोजेनिक क्लबचा सदस्य झाला.


🧩करायोजेनिक इंजिन


🅾️जीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते. भौतिकशास्त्रात अत्याधिक कमी तापमान निर्माण करणे व त्याचा वापर करणे यास क्रायोजनिक्स म्हणतात. जीएसएलव्हीच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला सुमारे ८०० सेकंदापर्यंत ढकलत नेहण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन म्हणून उणे २५३ सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशीत आहे. त्यामुळेच त्याला 'क्रायोजेनिक इंजिन' म्हणतात.


🧩करायोजेनिक क्लब..


🅾️जगातील फारच मोजक्या देशांकडे क्रायोजेनिक इंजिनासारखे यान आहे. भारताने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवून अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स व चीन या देशांच्या पंक्तीमध्ये आपला समावेश पक्का केला.


🧩चांगले इंधन


🅾️हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे चांगले इंधन वापरण्यात येत असल्यामुळे यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही खूपच चांगली ऊर्जा असते. त्यामुळे रॉकेट उड्डान अति वेगाने करणे शक्य होते. भारताच्या इंजिनाचे नाव CE-२० असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने त्याचे उत्पादन केले आहे. त्याची चाचणी 'इस्रो'चे ज्वलन सुविधा केंद्र महेंद्रगिरी येथे केली जाते.


🧩फायदे....


🅾️करायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक बचत होणार आहे. पूर्वी भारताचे उपग्रह युरोपीय अंतराळ संस्थेच्या 'एरिअन' या प्रक्षेपकांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जात होते. भारताचा आता तो खर्च वाचणार आहे. क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचे प्रक्षेपण करणेही आता सोपे होणार आहे. मार्क-३सारखी भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम साकारणे शक्य होणार आहे. ही मानवी मोहिम २०२० ते २०२५ सालापर्यंत शक्य आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताचे जी-सॅट ६, जीएसएलव्ही-डी-५ने यशस्वी प्रक्षेपण करून दाखवले.


🧩करायोजेनिक पुढची आव्हाने...


🅾️एखाद्या प्रयोगशाळेत क्रायोजेनिक इंजिनासाठी लागणारे कमी तापमान तयार करणे आणि द्रवरूप वायूत साठवणे शक्य असले तरी उपग्रहात त्याचा वापर करणे अवघड जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंना वेगवेगळ्या टाक्यामध्ये साठवून नंतर त्यांना एका पाइपद्वारे विशिष्ट कम्बशन चेंबरमध्ये आणणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.


🅾️वदिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


🅾️भशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


🅾️ खडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


🅾️बट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


🅾️ समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


 🅾️सयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


 🅾️आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


🅾️ खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


🅾️ समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.


 🅾️उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

आवर्तसारणीत 4 नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश.


🅾️आवर्तसारणीत (Periodic Table) चार नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही नव्‍याने समावेश करण्‍यात आलेली चारही मूलद्रव्‍ये कृ्त्रिम असून, आवर्तसारणीतील सातव्‍या ओळीत त्‍यांना स्‍थान देण्‍यात आले आहे. याद्वारे सारणीतील सातवी ओळ पूर्ण झाली आहे. यापूर्वी 2011 या वर्षी 114 आणि 116व्‍या क्रमाकांचे मूलद्रव्‍य नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आले होते.


🅾️जपान, रशिया आणि अमेरिकेच्‍या शास्‍त्रज्ञांनी या मूलद्रव्‍यांचा शोध लावला. आंतरराष्‍ट्रीय मूळ आणि उपयोजित रसायनशास्‍त्र संघटना (International Union of Pure and applied Chemistry - IUPAC) या संस्‍थेने 30 डिसेंबर 2015 रोजीच चारही मूलद्रव्‍यांची पडताळणी केली होती. सध्‍या या मूलद्रव्‍यांना त्‍यांच्‍या आवर्तसारणीतील क्रमांकानुसारच नावे देण्‍यात आली असून, त्‍यांचे येत्‍या काही दिवसांत नामकरण करण्‍यात येईल.


🅾️नव्‍याने शोधण्‍यात आलेल्‍या मूलद्रव्‍यांचे क्रमांक व सध्‍याची नावे पुढीलप्रमाणे:


1)    113 : युननट्रायम


2)    115 : युननपेंटियम


3)    117 : युननसेप्टियम


4)    118 : युननऑक्टियम


🅾️ही चारही मूलद्रव्‍ये नैसर्गिक स्थितीत अस्थिर असून, काही क्षणांतच त्‍यांचा र्‍हास होऊन त्‍यांचे इतर हलक्‍या मूलद्रव्‍यांमध्‍ये रूपांतर होते.


🧩आवर्तसारणी :-


🅾️आवर्तसारणी ही जगातील मूलद्रव्‍यांची (नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्‍ही) त्‍यांच्‍या अणुक्रमांकानुसार केलेली मांडणी आहे.


🅾️1869 मध्‍ये दिमित्री मँडेलिव (Dmitri Mendeleev) या शास्‍त्रज्ञाने सर्वप्रथम आवर्तसारणी तयार केली.


🅾️मलद्रव्‍याच्‍या आवर्तसारणीतील स्‍थानावरून त्‍यांचे रासायनिक गुणधर्म, इलेक्‍ट्रॉन संरचना यांविषयीही माहिती मिळू शकते.


आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य.


🅾️समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेत आता आमूलाग्र बदल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. 


🅾️भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.


🅾️ राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.


🔴 काय होणार?


🅾️ आतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि उदरनिर्वाहाची हमी म्हणून त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार आहे.


🅾️ सकन्या योजनेच्या धर्तीवर आंतरजातीय दाम्पत्याला जन्मलेल्या मुला-मुलींच्या नावार बँकेत एक लाख रुपये जमा केले जातील. त्यांना शिक्षणात आर्थिक सवलती देण्याचा विचार आहे.

* पती सवर्ण व पत्नी मागासवर्गीय असेल तर त्यांच्या मुलांना सवलती मिळत नाहीत. अशा दाम्पत्यांच्या अपत्यांनाही त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.


🅾️ तयाचबरोबर आता प्रोत्साहन म्हणून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या रकेमत आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व नव्या सवलतींचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

नियामक कायदा (1773) :-



कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.


▪️कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-


बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.


कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.


कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण - प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.


व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.


ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.


कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती  कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.


1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.


त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

भारतातली जागतिक वारसा स्थळे


👉 सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे यांची 1972 साली स्थापना झाली. 


👉 ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्वाची ठिकाणे असतात.


👉 भारतात एकूण 37 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 29 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे.


👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.


👇भारतातल्या UNESCO वारसा स्थळांची यादी👇


💥 सांस्कृतिक:-


1)आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2)अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3)नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4)बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5)चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

6)छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

7)एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

8)फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

9)चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

10)हंपीमधील मंदिरे, कर्नाटक

11)महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

12)पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

13)राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

14)अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

15)हुमायूनची कबर, दिल्ली

16)खजुराहो, मध्यप्रदेश

17)महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

18)भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, 19)कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

20)कुतुब मिनार, दिल्ली

21)राणी की वाव, पटना, गुजरात

22)लाल किल्ला, दिल्ली

23)दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

24)कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

25)ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

26)ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

27)जंतर मंतर, जयपूर

28)मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत.


💥 गरेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश:-


1)काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

2)मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

3)केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

4)सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

5)नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स 6)राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7)पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)


💥 मिश्र:-


1)खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान

2)सिक्किम

CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत


टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बागच्या आजी (दादी) म्हणजेच बिल्कीस यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.


सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय बिल्किस यादेखील आंदोलक म्हणून त्य़ा ठिकाणी होत्या. कोणी गोळीही चालवली तरी एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान, बिल्कीस यांना टाइम्सनं प्रभावशाली १०० जणांच्या यादीत स्थान दिलं आहे. टाइम्सच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे.

टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील १०० प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळ अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, टाइम मॅगझिननं मोदींबाबत मतही व्यक्त केलं आहे. "लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या ७ दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे," असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे.

मराठी व्याकरण

 🛑१. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?

👉 दवनागिरी!



🛑२. आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात?

👉 वर्ण!



🛑३. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

👉 ४८!



🛑४ वाक्य म्हणजे काय?

👉 विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा शब्दाचा समूह!



🛑५. मराठी भाषेत एकूण स्वर किती?

👉 १२!



🛑६. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता?

👉 ळ!



🛑७. स्वरांचे प्रकार किती?

👉 तीन!



🛑८. व्यंजनास काय म्हणतात?

👉 परवर्ण!



🛑९. औ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?

👉 सयुक्त!



🛑१०. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात?

👉 वर्ण!



🛑११. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिकाप्रमाने होतो?


A. पंत


B. पंडित


C. पंतग


D. पंजा


👉 पडित!



🛑१२. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘म’ या अनुनासिकाप्रमाने होत नाही?


A. अंबर


B. अंतर


C. अंगण


D. अंजन


👉 अबर!



🛑१३. भाषा म्हणजे काय?


A. बोलणे


B. विचार व्यक्त करण्याचे साधन


C. लिहिणे


D. संभाषणाची कला


👉 विचार व्यक्त करण्याचे साधन!



🛑१४. मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?


A. इंग्रजी-संस्कृत


B. कानडी-हिंदी


C. संस्कृत-प्राकृत


D. संस्कृत-मराठी


👉 सस्कृत-प्राकृत!



🛑१५. लिपी म्हणजे काय. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?


A. भाषा म्हणजे लिपी


B. बोलणे म्हणजे लिपी


C. आपण जी भाषा वापरती तिला लिपी म्हणतात


D. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात


👉 आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात!

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

 Q1) जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारताचा क्रमांक काय आहे?

------- 116


Q2) ‘ब्रू’ ही _ राज्यातल्या मूळ 21 अनुसूचित जमातींपैकी एक आहे.

------ त्रिपुरा


Q3) NASA संस्थेच्या अभ्यासानुसार, सूर्याच्या कितव्या नव्या चक्रकालाचा आरंभ झाला?

------- सौर चक्र 25


Q4) कोणत्या राज्यात ‘कोसी रेल मेगा पूल’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?

------- बिहार


Q5) कोणत्या संघटनेनी “भूमी अवनती क्षपण विषयक जागतिक उपक्रम” आणि “प्रवाळ प्रदेश कार्यक्रम” यांना सादर केले?

-------- जी-20


Q6) आफ्रिकेतल्या कोणत्या देशांमध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या कंपनीने त्याचे कामकाज बंद केले?

--------  सुदान


Q7) कोणत्या देशाने जागतिक ‘2020 स्मार्ट सिटी इंडेक्स’ याच्या यादीत पहिला क्रमांक पटकवला?

-------- सिंगापूर


Q8) कोणत्या बँकेसोबत टायटन कंपनीने संपर्क-विरहित पैसे देण्याच्या प्रक्रियेसाठी ‘टायटन पे’ घड्याळ तयार करण्यासाठी भागीदारी करार केला?

-------  भारतीय स्टेट बँक


Q9) 2020 साली ‘जागतिक रुग्ण सुरक्षा दिन’ची संकल्पना काय आहे?

--------- हेल्थ वर्कर सेफ्टी: ए प्रायोरिटी फॉर पेशंट सेफ्टी


Q10) भारतातील कोणत्या राज्यात शिशु मृत्यू दर सर्वाधिक आहे?

------- मध्यप्रदेश


Q1) हवामान आणीबाणी जाहीर करणार प्रथम देश कोणता?

------- UK ( दुसरा आयर्लंड )


Q2) " नॅशनल पीपल्स पार्टी "ला नुकताच राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला आहे, सध्या किती पक्षांना राष्ट्रीय पार्टी चा दर्जा प्राप्त आहे?

----- आठ


Q3) भारताचे नववे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे?

----- सुधीर भार्गव


Q4) भारत सरकारने मस्यव्यवसायसाठी किती कोटी ची गुंतवणूक केली आहे?

---- 20,500 कोटी


Q5) परेश रावल यांची निवड नुकतीच कोठे करण्यात आली आहे?

--- नॅशनल स्कूल ड्रामा चे अध्यक्ष


Q6) सशस्त्र दलांमध्ये पुरवठा व सेवांच्या देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशांशी संयुक्तपणे भारताने करार केला आहे?

-----  जपान


Q7) बांगलादेश या सरकारने बनावट बातम्याना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे?

-------- असोल चीन


Q8) आदित्य पुरी यांना  नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे?

------ युरोमनीने चा लाईफ टाइम आचिव्हमेंट 2020 पुरस्कार


Q9) नीती आयोगाच्या निर्यात सज्जतेच्या। 2020 च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?

------ गुजरात


Q10) रोहतांगो खिंडीतील बोगद्याला कोणत्या भारतीय पंतप्रधानाचे नाव देण्यात आले?

----- अटल बिहारी वाजपेयी



●‘SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले?


*उत्तर* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय


● यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?


*उत्तर* : अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन


● 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?


*उत्तर* : मार्गारेट अ‍ॅटवुड


● “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?


*उत्तर* : वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये  आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.) 


● 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?


*उत्तर* : विज्ञान व तंत्रज्ञान


● ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?


*उत्तर* : हिंदू कुश


● ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?


*उत्तर* : गुजरात


● दुरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?


*उत्तर* : वाणिज्य व उद्योग मंत्रालय



जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

जीनिव्हा


मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना काय म्हणतात?

 - नेफ्रॉन्स


जीवनसत्व ब-12 ला काय म्हणतात?

सायनोकोबॉलामीन


प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करतो

- लोह


आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते?

 हायड्रोजन


ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो?

- पांढरा


निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते?

-प्लिहा


मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

-1862


मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सध्या कोठे अस्तित्वात आहे?

- पणजी, नागपूर, औरंगाबाद


मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे प्रस्तावित आहे?

कोल्हापूर


दीपांकर दत्ता कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत?

- मुंबई उच्च न्यायालय


भारताचे बोधचिन्ह कुठल्या स्तंभावरील सिंहाची प्रतिकृती आहे?

-सारनाथ


भारतीय राज्यघटनेनुसार शोषणाविरुद्ध हक्क कोणत्या कलमांतर्गत दिलेले आहेत?- कलम 23 ते 24


देशात एकूण किती राज्ये आहेत?

29


कलम 36 ते 51 अंतर्गत कशाचे महत्त्व विशद केले

मार्गदर्शक तत्त्वे


भारतातील पहिली महिला वकील कोणती, ज्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली?

इंदू मल्होत्रा


सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण किती न्यायाधीश असतात?

-31


उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाला देतात?

राष्ट्रपती


राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला कोण देतो?

महाधिवक्ता

घटना आणि देशातील पहिले राज्य



● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन



- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने  कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.


-  वयाची ६८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बसू यांना यांना मूत्रपिंडाचाही आजार होता. 


- डॉ. बसू यांना २०१४ साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते.


-  ‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.


- २०१२ साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. 


- तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा होती.


- प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉ. बसू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना दर्शवली आहे .

---------------------------------------------------

राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०



-  प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.


◾️ वज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. 


- यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.


◾️डॉ. अमोल कु लकर्णी- 

- डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.


-  अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे. 


-  भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.

कुलकर्णी यांना जातो. 


- भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. 


- डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.


◾️डॉ. सूर्येदू दत्ता - 

डॉ. सूर्येदू दत्ता हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. भूवैज्ञानिक म्हूणन कार्यरत आहेत.



 ◾️डॉ. यू. के . आनंदवर्धन-

-  डॉ. यू. के . आनंदवर्धनन हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.


- डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. 


◾️डॉ. किंशूक दासगुप्ता- 

- भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात. 


- शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. 


-  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. 


- सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.


-  पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना.


🔰अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.


🔴ठळक बाबी...


🔰“पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.


🔰धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरने बँकिंग, मोबाईल अ‍ॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात.


🔰नशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापितअनुसरण करीत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एक डोसही ठरु शकतो पुरेसा.


🔰अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत.


🔰अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने तशी तयारीच केली आहे.


🔰अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी  सुरु झाली आहे.


🔰जॉन्सन अँड जॉन्सनने करोना विरोधात विकसित केलेल्या लशीच्या पहिल्या फेजच्या चाचणीचे निष्कर्ष आता समोर आले आहेत.


🔰परायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.


🔰जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

पराप्तिकर विभागाने 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' प्रणालीचा शुभारंभ केला.


🔰25 सप्‍टेंबर 2020 रोजी प्राप्तिकर विभागाने आज 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' (Faceless Income tax Appeals) प्रणालीचा शुभारंभ केला.


🔴परणालीची ठळक वैशिष्ट्ये


🔰या प्रणालीच्या अंतर्गत, प्राप्तिकरासंबंधीच्या सर्व अपीलांना चेहराविरहित वातावरणात चेहराविरहित पद्धतीने अंतिम स्वरूप देण्यात येणार. मात्र, गंभीर अफरातफरी, मोठ्या प्रमाणातली करचुकवेगिरी, संवेदनशील आणि तपासाबाबतची प्रकरणे, आंतरराष्ट्रीय कर आणि काळापैसा कायदा- याविषयीच्या प्रकरणांचा त्याला अपवाद असणार आहे.


🔰चहराविरहित अपील प्रणालीच्या अंतर्गत, माहिती विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोगातून प्रकरणांचे वितरण केले जाणार असून, यासाठी कार्यक्षेत्राचा व्यापक विचार केला जाणार आहे.

डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) अर्थात दस्तऐवज परिचय क्रमांकही दिला जाणार आहे.अपीलाच्या आदेशाचा मसुदा एका शहरात तयार होणार तर त्याचे पुनर्परीक्षण दुसऱ्या शहरात होणार. त्यामुळे वस्तुनिष्ठ, न्यायसंमत आणि उचित पद्धतीने आदेश तयार होणार.


🔰चहराविरहित अपील प्रणालीमुळे करदात्यांचा तर फायदा होणारच शिवाय, न्यायसंमत आणि उचित अपील आदेश निघाल्याने पुढच्या संभाव्य कायदेशीर कृतींचे प्रमाण कमी होणार. या नवीन प्रणालीमुळे प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायिता येण्यास मदत होणार आहे.


🔴इतर बाबी..


🔰दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकतेचा सन्मान' मंचाचा भाग म्हणून, 'चेहराविरहित मूल्यांकन आणि करदाते' सनदीचा शुभारंभ केला होता.


🔰गल्या काही वर्षात, प्राप्तिकर विभागाने करप्रक्रिया सुलभ होण्यासाठी व करदात्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष करांबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत. आता, चेहराविरहित अपीलाच्या अंतर्गत प्राप्तिकराच्या अपिलांविषयीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होणार असून, येथून पुढे अपील करणारी व्यक्ती आणि प्राप्तिकर विभाग यांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संपर्काची गरज पडणार नाही.


🔰या प्रक्रियेत अपीलाचे ई-वितरण, नोटिशी किंवा प्रश्नावली ई-पद्धतीने कळविणे, ई-पडताळणी / ई-चौकशी पासून ते ई-सुनावणी आणि शेवटी अपिलीय आदेश ई-पद्धतीने कळविणे या साऱ्या टप्प्यांचा समावेश आहे. करदाते अगर त्यांचे प्रतिनिधी यांचा प्राप्तिकर विभागाशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. करदात्यांना त्यांच्या घरी बसून माहिती भरता येणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि अन्य स्त्रोतांची बचत होऊ शकणार आहे.


🔴भारतातला प्राप्तिकर...


🔰भारतातला प्राप्तिकर हा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या केंद्रीय यादीतल्या ‘नोंद 82’ याद्वारे शासित आहे आणि केंद्र सरकारला ‘प्राप्तिकर अधिनियम-1961’ आणि ‘प्राप्तिकर नियम-1962’ अन्वये अकृषक उत्पन्नावर कर आकारण्याचे अधिकार दिले गेले आहेत. प्राप्तिकर विभाग हा केंद्र सरकारचा प्रमुख महसूल संकलक आहे.

सडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन


🔰सडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.


🔰बरिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.

नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते.


🔰त 14 वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता.


🔰काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.

प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले  होते.

Online Test Series

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...