Friday, 25 September 2020
घाट
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर
महाराष्ट्र पोलीस दल विशेष
🅾️ महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
👉अनिल देशमुख
🅾️ पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
👉गहमंत्रालय
🅾️ पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
👉राज्यसूची
🅾️ राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?
👉 दक्षता
🅾️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
👉तलंगणा
🅾️ सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?
👉हदराबाद
🅾️ महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
👉सबोध जयस्वाल
🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
👉सदरक्षणाय खलनिग्रहणाय
🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
👉पोलीस महासंचालक
🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
👉 मबई
🅾️ सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
👉सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट
🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
👉पचकोणी तारा
🅾️ पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
👉21 ऑक्टोबर
🅾️ सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?
👉सट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स
🅾️ महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
👉पणे
🅾️ पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
👉शिपाई
🅾️ महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
👉काटोल, जि. नागपूर
🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?
👉हाताचा पंजा_
🅾️ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
👉पोलीस अधीक्षक
🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
👉गडद निळा
🅾️ शरी. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?
👉42 वे
🅾️ मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
👉परमबिरसिंह
🅾️ राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
👉राज्यशासन
🅾️ पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
👉 महानिरीक्षक
🅾️ FIR चा फुल फॉर्म काय ?
👉first information report
🅾️ महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत?
👉दवेन भारती
🅾️ गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
👉गहरक्षक दल , तुरुंग
🅾️ महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
👉पणे
🅾️ भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
👉कपी-बोट
🅾️ राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
👉1948
🅾️ भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?
👉जनरल बिपिन रावत_
🅾️ दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
👉राजनाथ सिंह
संसदेकडून अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 मंजूर:-
📚अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. कडधान्य , डाळी, तेलबिया खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यासारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्याची तरतूद या विधेयकात आहे.
📚तयापूर्वी हे विधेयक ग्राहक सेवा अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री दानवे रावसाहेब दादाराव यांनी लोकसभेत 14 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मांडले. या आधीच्या 5 जून 2020 चा अध्यादेशाची जागा या विधेयकाने घेतली. लोकसभेत 15 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मंजूर झाले.
📚आपल्या व्यावसायिक कामकाजात नियामक संस्थांचा अवाजवी हस्तक्षेप होईल ही खाजगी गुंतवणूकदारांची धास्ती दूर करणे हे अत्यावश्यक सेवा (सुधारणा)विधेयक 2020 चे उद्दिष्ट आहे.
धान्य उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि पुरवठा या बाबींमध्ये मोकळीक मिळाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि त्यामुळेच खाजगी क्षेत्र किंवा कृषिक्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.
📚शीतगृहे किंवा अन्नधान्य पुरवठ्याची सुधारित व्यवस्था या गोष्टींना चालना मिळण्यासाठी याची मदत होईल.
नियामक संस्थाचे नियंत्रण दूर करतानाच ग्राहकांचेही हित जपले जाईल याची व्यवस्था सरकारने केली आहे. युद्ध, दुष्काळ, अनावश्यक भाववाढ , निसर्गाचा प्रकोप अशा अनियमित परिस्थितीत धान्य पुरवठ्याबाबत नियंत्रण आणले जाईल. मात्र संबंधितांनी मूल्य साखळीत केलेली गुंतवणूक आणि निर्यातीसाठी नोंदवलेली मागणी ह्या गोष्टींना अशा प्रसंगी साठा करण्याच्या मर्यादेतून वगळले जाईल, जेणेकरून या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.
📚विधेयक मंजूर होण्यापूर्वी राज्यसभेत झालेल्या चर्चेत ग्राहक सेवा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे म्हणाले की शीतगृहांची सोय नसल्यामुळे होणारे कृषिमालाची नासाडी टाळण्यासाठी या सुधारणांची गरज होती. फक्त शेतकरीच नाही तर ग्राहक आणि उत्पादक यांच्यासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या कायद्यामुळे आपला देश स्वावलंबी होईल. कृषी क्षेत्रातील पुरवठासाखळी व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सुधारणा उपयोगी पडतील असं ते म्हणाले. ह्या सुधारणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि व्यापारासाठी आवश्यक सुविधा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल.
पार्श्वभूमी:
📚बरीच कृषी उत्पादने ही भारतात जास्त प्रमाणात घेतली जातात. असे झाले की शेतकऱ्यांना शीतगृहे आणि साठवणुकीच्या जागांचा अभाव यामुळे या मालाला चांगली किंमत मिळणे अशक्य होऊन बसते. या शिवाय आवश्यक सेवा कायद्यांमुळे त्यांना व्यापार करता येत नाही. यामुळे भरपूर पीक आले.
📚 विशेषतः नाशवंत माल असेल तर शेतकऱ्यांना मोठा तोटाही सहन करावा लागतो. ह्या कायद्यामुळे शीतगृहातील तसेच धान्य पुरवठा साखळीतील आधुनिकीकरणाला चालना मिळेल यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांनाही फायदा होऊन वस्तूच्या किमती स्थिर राहतील याची परिणीती स्पर्धात्मक वातावरण तयार होण्यात येईल आणि साठवण्याच्या जागा नसल्यामुळे होणारी कृषिमालाची नासाडीसुद्धा टाळता येईल.
Global invitation index क्रमवारीत भारताचा 48 वा क्रमांक
🔶 दक्षिण आशियाई विभागात भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे.
🔷 गल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान चार स्थानांनी उंचावले आहे.
🔷 जगभरातील 131 देशांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली.
🔴 इतर देश -
१) स्वित्झर्लंड
२) स्वीडन
३) अमेरिका
४) युनायटेड किंग्डम
५) नेदरलँड
🔶 २०१९ चा अहवाल 🔶
🔺भारत 52 व्या स्थानी होता.
🔻कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला.
🛑 भारत कल्पकता निर्देशांक 2019 (Indian Innovation Index) 🛑
📌 निती आयोगातर्फे प्रकाशित केला जातो.
📌 क्रमवारी -
🔷 मोठी राज्य १७ -
१) कर्नाटक
२) तामिळनाडू
३) महाराष्ट्र
४) तेलंगणा
५) हरियाणा
🔷 ईशान्य भारत व पर्वतीय राज्य 11 -
१) सिक्कीम
२) हिमाचल प्रदेश
३) उत्तराखंड
🔷 केंद्रशासित प्रदेश व लहान राज्य 8-
१) दिल्ली
२) चंदीगड
३) गोवा
४) पुद्दुचेरी
५) अंदमान व निकोबार
राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त.
🔰भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.
🔰राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली आहे.
🔴ठळक बाबी...
🔰राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.
🔰राजीव कुमार 24 वे निवडणूक आयुक्त आहेत.अशोक लवासा यांची आशियाई विकास बँक (मनिला, फिलीपीन्स) येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.
🔴भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी....
🔰भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
🔴घटनात्मक तरतुदी....
🔰कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
🔰कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.
कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.
🔰कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.
कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.
🔰कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.
🔴आयोगाची संरचना आणि जबाबदारी....
🔰आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
🔰निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.