२४ सप्टेंबर २०२०

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव..


💠भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.


🔴ठळक बाबी


💠“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.


💠सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.


💠2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.


🔴रशिया देश


💠रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे.


💠मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे.


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

 



🔶SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले?


*उत्तर* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय


🔶 यदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?


*उत्तर* : अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन


🔶 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?


*उत्तर* : मार्गारेट अ‍ॅटवुड


🔶“क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?


*उत्तर* : वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये  आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.) 


🔶2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?


*उत्तर* : विज्ञान व तंत्रज्ञान


🔶ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?


*उत्तर* : हिंदू कुश


🔶 ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?


*उत्तर* : गुजरात


🔶दरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?


*उत्तर* : वाणिज्य व उद्योग मंत्रालय

Online Test Series

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...