१९ सप्टेंबर २०२०

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे



●  अकलोली ठाणे


● उनकेश्वर


● उनपदेव


● उन्हेरे


● गणेशपुरी


● खेड (रत्नागिरी)


● तुरळ


● देवनवरी


● राजवाडी


● राजापूर


● वज्रेश्वरी


● सव


● सातिवली


● सुनपदेव


● पाली

चालु घडामोडी महत्त्वाचे प्रश्न


1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- सुनील अरोरा

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित चळवळ आणि वर्ष


    

  १. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना
  उत्तर -1885

  २. वंग-भंगआंदोलन (स्वदेशी चळवळ)
  उत्तर- 1905

  3.मुस्लिम लीगची स्थापना
  उत्तर- 1906

  4.कॉंग्रेसची फाळणी
  उत्तर- 1907

  5. होमरुल चळवळ
  उत्तर 1916

  6. लखनऊ करार
  उत्तर- डिसेंबर 1916

  7. मॉन्टग घोषणा
  उत्तर -20 ऑगस्ट 1917

  8. रोलेट कायदा
  उत्तर-१ मार्च १९१९

  9. जालियनवाला बाग हत्याकांड
  उत्तर -13 एप्रिल 1919

  10. खिलाफत आंदोलन
  उत्तर -१९१९

  ११. हंटर समितीचा अहवाल प्रसिद्ध
  उत्तर -18 मे 1920

  १२. कॉंग्रेसचे नागपूर अधिवेशन
  उत्तर - डिसेंबर 1920

  13. असहकार चळवळीस प्रारंभ
  उत्तर -1 ऑगस्ट 1920

  14. चौरी-चौरा घोटाळा
  उत्तर -5 फेब्रुवारी 1922

  १.. स्वराज्य पक्षाची स्थापना
  उत्तर- 1 जानेवारी 1923

  16. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
  उत्तर - ऑक्टोबर 1924

  17. सायमन कमिशनची नेमणूक
  उत्तर -8 नोव्हेंबर 1927

  18. सायमन कमिशनचा भारत दौरा
  उत्तर -3 फेब्रुवारी 1928

  19. नेहरू अहवाल
  उत्तर- ऑगस्ट 1928

  20. बार्डोली सत्याग्रह
  उत्तर - ऑक्टोबर 1928

  21. लाहोर पद्मंत्र प्रकरण
  उत्तर -8 एप्रिल 1929

  22. कॉंग्रेसचे लाहोर अधिवेशन
  उत्तरः डिसेंबर १९२९ @BHAVIADHIKARI2020

  23. स्वातंत्र्य दिनाची घोषणा
  उत्तर -2 जानेवारी 1930

  24. मीठ सत्याग्रह
  उत्तर -12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930

  25. सविनय कायदेभंग आंदोलन
  उत्तर -6 एप्रिल 1930

  26. प्रथम गोलमेज परिषद
  उत्तर-12 नोव्हेंबर 1930

  27. गांधी-इरविन करार
  उत्तर -8 मार्च 1931

  28. दुसरी गोलमेज परिषद
  उत्तर- 7 सप्टेंबर 1931

  २९. जातीय निवाडा
  उत्तर -16 ऑगस्ट 1932

  30. पूणे करार
  उत्तर - सप्टेंबर 1932

  31. तिसरी गोलमेज परिषद
  उत्तर-17 नोव्हेंबर 1932

  32. कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना
  उत्तर- मे 1934

  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
  उत्तर -१ मे १९३९

  34. मोक्ष (salvation day)दिन
  उत्तर -22 डिसेंबर 1939

  35. पाकिस्तानची मागणी
  उत्तर-24 मार्च 1940

  36. ऑगस्ट ऑफर
  उत्तर- 8 ऑगस्ट 1940

  37. क्रिप्स मिशन प्रस्ताव
  उत्तर- मार्च 1942

  38. भारत छोडो प्रस्ताव
  उत्तर -8 ऑगस्ट 1942

  39. शिमला परिषद
  उत्तर-25 जून 1945

  40. नौदल बंड
  उत्तर -19 फेब्रुवारी 1946

  41. पंतप्रधान एटलीची घोषणा
  उत्तर -15 मार्च 1946

  .२. कॅबिनेट मिशनचे आगमन
  उत्तर-24 मार्च 1946

  43. प्रत्यक्ष कृती दिवस
  उत्तर -16 ऑगस्ट 1946

  44. अंतरिम सरकारची स्थापना
  उत्तर -2 सप्टेंबर 1946

  45. माउंटबॅटन योजना
  उत्तर -3 जून 1947

  46. ​​स्वातंत्र्य प्राप्ती
  उत्तर -15 ऑगस्ट 1947

  प्रश्न: - स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
  उत्तरः लॉर्ड माउंटबॅटन.

  प्रश्नः भारताचा पहिला वायसराय कोण होता?
  उत्तर: - लॉर्ड कॅनिंग.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
  उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित.

  प्रश्नः भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
  उत्तर: - अप्सरा.

  प्रश्न: - भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
  उत्तर: - प्रेमा माथूर.

  प्रश्न: - भारतीय वायुसेनेची प्रथम महिला पायलट?
  उत्तर: - हरिता कौर देओल.

  प्रश्न: - परमवीर चक्र प्राप्त करणारे भारतीय वायुसेनेचे पहिले अधिकारी?
  उत्तर: निर्मलजीत सेखो.

  प्रश्न: - भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा?
  उत्तर: - मीरा कुमार.

  प्रश्नः भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
  उत्तर: - सोमनाथ चटर्जी.

  प्रश्नः भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
  उत्तर: - सुकुमार सेन.

  प्रश्नः भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल.

  प्रश्नः भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - सरदार बलदेव सिंह.

  प्रश्न: - भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
  उत्तर: - आर.के. षणमुखम चेट्टी.

  प्रश्नः भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
  उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.

मराठी - वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे

मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे


7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


12)रामराम ठोकणे - निरोप घेणे


13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे



15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


16) वर्ज्य करणे - टाकणे


17) काडीमोड करणे - संबंध तोडणे


18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


19) अगतिक होणे - उपाय न चालणे


20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे


21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे


22) इडापिडा टळणे - संकट जाणे


23) उतराई होणे - उपकार फेडणे


24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे


25) लकडा लावणे - सारखी घाई करणे


26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


28)कागाळी करणे - तक्रार करणे


29) खांदा देणे - मदत करणे


30) खोबरे करणे - नाश करणे


31) गय करणे - क्षमा करणे


32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


34) जीव ओतणे - मन लावून काम करणे


35) सुपारी देणे - आमंत्रण देणे


36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


38) नामोहरम होणे - पराभूत होणे


39) पदर पसरणे - याचना करणे


40) पाणउतारा करणे - अपमान करणे


41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे


42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे


43) हिरमुसले होणे - नाराज होणे


44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे


45) विटून जाणे - त्रासणे


46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे


47) फडशा पाडणे - संपवणे


48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे


49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


50)धिंडवडे निघणे - फजिती होणे


61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


64)हातपाय गाळणे - धीर सोडणे


65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील


 काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे


67)झाकड पडणे - अंधार पडणे


68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे


69)टोपी उडवणे - टवाळी करणे


70)पाणी पाजणे - पराभव करणे


71)वहिवाट असणे - रीत असणे


72)छी थू होणे - नाचक्की होणे


73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे


74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे


75)दिवा विझणे - मरण येणे


76)मूठमाती देणे - शेवट करणे


77) सुगावा लागणे - अंदाज लागणे


78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे


79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे


80)कानाशी लागणे - चहाडी करणे


81)किटाळ करणे - आरोप होणे


82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे


83)हातावर तुरी देणे - फसविणे


84)बेगमी करणे - साठा करणे


85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक



आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली


✅ कोळसा ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.


✅ खनिज तेल ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.


✅ नसर्गिक वायू ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.


✅ रिफायनरी उत्पादने ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.


✅ खते ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.


✅ पोलाद ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.


✅ सिमेंट ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.


✅ वीज ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.


नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

91वी घटनादुरुस्ती 2003



मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.


1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)


2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)


3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)


4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)


5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही.  मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे


केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.


एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा  मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)


6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

महाराष्ट्र पोलीस भरती ⭕️मराठी म्हणी⭕️

1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग



1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53


2.मेकॉले समिती-1853


3.वुडचा खलिता-1854


4.हंटर समिती-1882-83


5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने  भारतीय विद्यापीठ कायदा 1904


6.सॅडलर समिती-1917-18


7.हारटोग समिती-1929


8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937


9.सार्जंट योजना-1944


10.राधाकृष्ण आयोग-1948


Trick :


 शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.

सामान्य ज्ञान


जागतिक आर्थिक मंच (WEF) - 

➖सथापना: सन 1971 (01 जानेवारी); 

➖मख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड.


ग्रुप ऑफ 20 (जी-20) याची 

➖ सथापना – सन 1999 (26 सप्टेंबर).


पश्चिम बंगाल राज्य - 

➖ सथापना: सन 1950 (26 जानेवारी); 

➖राजधानी: कोलकाता.


छत्तीसगड राज्य - 

➖ सथापना: सन 2000 (01 नोव्हेंबर); 

➖ राजधानी: रायपूर.


सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross domestic product -GDP) याची मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी.


भारतातले राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) याची 

➖ सथापना – सन 1993 (12 ऑक्टोबर).


भारतातले केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची 

➖ सथापना – सन 2005 (12 ऑक्टोबर) (माहितीचा अधिकार कायद्यान्वये).


भारतात माहितीचा अधिकार (RTI) कायदा या साली लागू करण्यात आला – सन 2005 (15 जून).


ब्रिटीश भारतातली प्रथम पदवीधर महिला - कामिनी रॉय (बंगाली कवीयत्री, समाजसेवक आणि स्त्रीवादी).

Online Test series

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...