Sunday, 6 September 2020

इद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव.



🔰भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.

🔴ठळक बाबी....

🔰“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

🔰सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.

🔰2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

🔴रशिया देश....

🔰रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे.

🔰मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे.

चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे .


🔰विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्र त्याचे चांगले उदहारण आहे.

🔰पढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे. चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा पेंटागॉनने अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

🔰लडाखमध्ये सुरु असलेला ताजा संघर्ष तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेंटागॉनच्या या अहवालाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.

नागरी सेवा क्षमता वृद्धीसाठी भारत सरकारचे “मिशन कर्मयोगी”.



🔰2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली. जगभरातल्या उत्तम संस्था आणि पद्धतींबाबत शैक्षणिक स्त्रोतांचा स्वीकार करून कार्यक्रमाची काळजीपूर्वक रचना केली गेली आहे.

🔰हा निर्णय भारत सरकारच्या नव्या “मिशन कर्मयोगी” या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आला आहे. भविष्यासाठी भारतीय नागरी सेवकाला अधिक सर्जनशील, रचनात्मक अधिक क्रियाशील, व्यावसायिक, प्रगतीशील, ऊर्जावान, सक्षम,पारदर्शक आणि तंत्रज्ञान सक्षम बनवणे हे ‘मिशन कर्मयोगी’चे उद्दिष्ट आहे. विशिष्ट भूमिका-क्षमतानी सुसज्ज नागरी सेवक उच्च गुणवत्ता मानकांच्या प्रभावी सेवा सुनिश्चित करू शकणार.

🔴NPCSCB कार्यक्रमात पुढील चार संस्थात्मक चौकटीचा समावेश आहे -

🔰पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद
क्षमता विकास आयोग.डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन.प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान मंचासाठी विशेष प्रयोजन कंपनी (SPV).कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय मंडळ .कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे.

🔰‘नियम आधारित’ कडून ‘भूमिका आधारित’ मनुष्यबळ व्यवस्थापन परिवर्तनाला सहकार्य करणे.

🔰नागरी सेवकांना कामाचे वाटप त्यांच्या पदाच्या गरजेनुसार त्यांच्या क्षमतेशी जोडणे.‘ऑफ साइट’ शिक्षण पद्धतीला पूरक ‘ऑन साइट’ शिक्षण पद्धतीवर भर देणे.शिक्षण सामग्री, संस्था आणि कार्मिक सहित सामायिक प्रशिक्षण पायाभूत संरचना असलेली परिसंस्था निर्माण करणे.

🔰नागरी सेवेशी संबंधित सर्व पदांना भूमिका, कार्ये, आणि क्षमता (FRAC) यासंबंधी दृष्टिकोनानुसार अद्ययावत करणे आणि प्रत्येक सरकारी संस्थेत निवडक FRACसाठी प्रासंगिक शिक्षण सामुग्रीची निर्मिती करणे आणि पुरवणे.

🔰सर्व नागरी सेवकांना आत्मप्रेरित आणि आदेशित शिक्षण पद्धतीमध्ये त्यांचे वर्तन, कार्य आणि कार्यक्षेत्र संबंधित क्षमता निरंतर विकसित आणि मजबूत करण्याची संधी उपलब्ध करून देणे.

🔰परत्येक कर्मचाऱ्यासाठी वार्षिक वित्तीय योगदानाच्या माध्यमातून शिकण्याच्या सामायिक आणि समान परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपापल्या स्त्रोतांमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभाग आणि त्यांच्या संघटनांना सक्षम बनवणे.

🔰सार्वजनिक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे,  स्टार्टअप आणि व्यक्तिगत तज्ञांसह शिक्षण संबंधी सर्वोत्तम सामुग्रीच्या विकासाला प्रोत्साहन देणे आणि भागीदारी करणे.

🔰कषमता विकास, आशय निर्मिती, वापरकर्त्यांचा प्रतिसाद आणि क्षमतेनुसार तसेच धोरणात्मक सुधारणांसाठी क्षेत्रांची निवड करण्याबाबत iGOT-कर्मयोगी द्वारे पुरवण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करणे.

🔴कार्यक्रमाची वैशिष्ट्ये..

🔰आय गॉट कर्मयोगी (iGOT Karmayogi) नावाचा एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण मंच स्थापित केला जाणार आहे.

🔰एक ‘क्षमता विकास आयोग’ स्थापन करण्याचा देखील प्रस्ताव आहे,  जेणेकरून सहकार्यात्मक आणि सामायिक आधारावर क्षमता विकास परिसंस्था व्यवस्थापन आणि नियमन याबाबतीत एकसमान दृष्टिकोन सुनिश्चित करता येणार.

🔰ही आयोग वार्षिक क्षमता विकास योजनांना मंजुरी देण्यात ‘पीएम सार्वजनिक मनुष्यबळ परिषद’ला सहाय्य करणार. नागरी सेवा क्षमता विकास यासंबंधी सर्व केंद्रीय प्रशिक्षण संस्थावर देखरेख ठेवणार. सामायिक शिक्षण संसाधनांची निर्मिती करणार तसेच योजनाच्या अंमलबजावणीवर समन्वय आणि देखरेख ठेवणार.

🔰iGOT- कर्मयोगी मंच भारतात दोन कोटींहून अधिक अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक आणि अत्याधुनिक संरचना उपलब्ध करणार. हा प्लॅटफॉर्म शैक्षणिक सामुग्रीसाठी एक आकर्षक आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये काळजीपूर्वक संकलित केलेली माहिती आणि डिजिटल ई-शिक्षण सामग्री उपलब्ध केली जाणार.

🔰समारे 46 लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 2020-2021 या वर्षापासून 2024-25 या वर्षापर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत 510.86 कोटी रुपये खर्च केले जाणार.

केंद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली.


🔰कद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.

🔰यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे.
भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे.

🔰माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी  आणण्यात आली आहे.

🔰बन कऱण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अ‍ॅप्सचा चीनशी संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सामान्य ज्ञान



राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.

केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.

भारतातील रस्त्यासंबंधी



राष्ट्रीय महामार्गाचा विकास व देखभाल खालील यंत्रणांमार्फत होते
- उत्तर पूर्व व उत्तर सीमा भागात सीमा रस्ते संघटना (BRO): स्थापना 1960
- रस्त्यांचा धोरणात्मक विकास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI): स्थापना 1988
- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

- रस्त्यांसंबंधी महत्त्वाची योजना: नागपूर योजना (1943)
- National Highway Development Project (NHAI): राष्ट्रीय महामार्गाचा विकास करण्यासाठी 1998 मध्ये स्थापना
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY): गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी 20 डिसेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आली.
- प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP): शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी 14 जानेवारी 2004 रोजी सुरू करण्यात आली.
- केंद्रीय रस्ते निधी: रस्त्यांची उभारणी व देखभालीसाठी 2000 मध्ये निर्मिती
- भारत निर्माण योजना: 2005-06 मध्ये सुरू करण्यात आली. 

महाराष्ट्र - जलाशय व धरणे



1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

देश आणि देशांची चलने

*जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.*

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश



या सर्वेक्षणानुसार -

सर्वात जास्त लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री

1] ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (८२.९६ टक्के)
2] छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के)
3] केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८ टक्के)
4] आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के)
5] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (७६.५२ टक्के)

✅ सर्वात कमी लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री

1] हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के)
2] उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२ टक्के)
3] गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९ टक्के)

सत्यपाल मलिक: मेघालय राज्याचे नवे राज्यपाल




राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सत्यपाल मलिक यांची मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

या नियुक्तिपूर्वी सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल होते.

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यपालाच्या हाती असतो. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम राज्यपाल पाहतो. भारतीय संविधानातले कलम 153 यानुसार, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. भारताचे राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम 155 अन्वये राज्यपालांची नियुक्ती करतात.

रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ




20 ऑगस्‍ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्रायफेड संस्थेच्या “ट्रायफूड प्रकल्प”च्या प्रक्रिया केंद्रांचा आभासी शुभारंभ करण्यात आला.

ट्रायफूड प्रकल्पाचा उद्देश दोन्ही घटकांना त्याच्या इच्छित गुणवत्तेत रूपांतरित करणे हा आहे.

अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड संस्थेकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी
केली जाणार असून आदिवासीं वन मजुरांनी गोळा केलेल्या वन्य उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन आणि योग्य वापराद्वारे आदिवासींचे उत्पन्न वाढवणे हे ट्रायफूड प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

❣️

यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं



यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)

धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती

द्रोणाचार्य पुरस्कार

ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार

ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज

फुफ्फुसांचा कॅन्सर आणि सर्व काही जाणून घ्या



फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची लक्षणे, कारण आणि त्याला कसे रोखता येईल, याविषयी माहिती पाहुयात...

धुम्रपान केल्याने या आजाराचा धोका अधिक आहे. मात्र ज्यांनी आयुष्यात कधीच ध्रुम्रपान केलेले नाही, अशांना देखील तो होऊ शकतो. विशेष म्हणजे याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाहीत. आजार अ‍ॅडव्हान्स स्टेजवर पोहचल्यावर याची माहिती मिळते.

📚 लक्षणे काय? :

वारंवार खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, घसा बसणे, छातीत कफ होणे, वजन कमी होणे, हाडे दुखणे आणि डोके दुखी.

📚 परमुख कारण :

● धुम्रपान हेच प्रामुख्याने या आजाराचे कारण आहे. मात्र या व्यतिरिक्त या आजाराचे आणखीही काही कारणे आहेत.
● जर तुम्ही अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी रेडिएशन थेरेपी केली असल्यास, या आजाराचा धोका उद्भवतो.
● रेडॉन गॅसच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होता.
● अर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल सारख्या एलिमेंटच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होतो.
● दरम्यान तुम्ही कोठे राहता? काय काम करता? हे देखील खूप महत्त्वाचे ठरते.
● धुम्रपान करणारे किंवा या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा आजार होऊ शकतो. मात्र या प्रकारात कॅन्सरचे कारण शोधता येत नाही.

❓ फफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रकार किती? : याला दोन भागात विभागण्यात आले आहे. 'स्मॉल सेल लंग कॅन्सर' आणि 'नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर'.

चालू घडामोडी सराव प्रश्न

● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?

उत्तर : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?

उत्तर : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?

उत्तर : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?

उत्तर : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?

उत्तर : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

उत्तर : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?

उत्तर : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?

उत्तर : 140 देश

● आयव्हरी कोस्ट देशाच्या पंतप्रधान पदावर कोणाची निवड झाली?

उत्तर : हमेद बाकायोको

● स्कोच पुरस्काराने कोणत्या मंत्रालयाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

● SIDBI संस्थेनी ‘MSME सक्षम’ नामक मंच तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली?

उत्तर : ट्रान्सयूनीयन सिबिल

● “विद्यार्थी विज्ञान मंथन, 2020-21” नामक उपक्रमाचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाने केला?

उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

● तीन राजधान्या असणारे कोणते राज्य देशातले पहिलेच राज्य ठरले?

उत्तर : आंध्रप्रदेश

● ‘फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रिक्स 2020’ ही शर्यत कोणी जिंकली?

उत्तर : लेविस हॅमिल्टन (87 वा विजय)

● अरब जगतातली पहिली अणुभट्टी कोणत्या देशात आहे?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात

● “2020 बीएल आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सव’ या स्पर्धेत कोणत्या व्यक्तीने द्वितीय क्रमांक मिळवला?

उत्तर : हरिकृष्ण पेंटाला

खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी कोणती बँक प्रथम बँक ठरली आहे?

उत्तर : ICICI बँक

● भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक कोणत्या देशासोबत घेतली?

उत्तर : उझबेकिस्तान

● ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?

उत्तर : बायर्न म्युनिच

● भारत सरकारने कोणत्या साली “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार” या नावाची पुरस्कार योजना जाहीर केली होती?

उत्तर : 2006 साली

● भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपचे नाव काय आहे?

उत्तर : माय IAF

● नीलकंठ भानू प्रकाश या युवकाने कोणत्या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’

● 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले?

उत्तर : अनिता कुंडू

● सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना कोणता देश तयार करीत आहे?

उत्तर : बांगलादेश


1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?
उत्तर :- सात

2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?
उत्तर :- संरक्षण मंत्रालय

3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?
उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक

4) प्रश्न :- कोणते अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?
उत्तर :-  उमंग

5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?
उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक

6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?
उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे

7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?
उत्तर :- रशिया

8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?
उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड

9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?
उत्तर :- मध्यप्रदेश

10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर :-  सोम प्रकाश

मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’



भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे.

🔴 ठळक बाबी...

नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.हा प्रकल्प जिरीबाम-तुपुल-इंफाळ BG लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.

🔴 भारतीय रेल्वे विषयी....

भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे.

ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.

भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली.

त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली.

📌 साहिब,
📌 सिंध आणि
📌सलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला.

'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला.

उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली.

अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) याची स्थापना झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

वर्तमानात व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत.

कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

पक्षांतरबंदी कायदा

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.

▪️पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.