Friday, 4 September 2020

दुसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939

◾️दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्मनी, इटली, आणि जपान ह्यांचा समावेश होता.

◾️दुसऱ्या महायुद्धाची बीजं ही पहिल्या युद्धात जर्मनीचा मानहानीकारक पराभवानंतर जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींमध्ये होती. त्यावर लॉर्ड केन्स ह्यांचं “ Consequences of peace ” हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

◾️पहिल्या महायुद्धाचं Theater हे युरोपात होतं तर दुसऱ्या महायुद्धाचं Theater हे जगभर पसरलं होतं.

◾️दुसरं महायुद्ध सुरू होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे राजपुत्र फर्डिनांड ची हत्या.

◾️नाझी जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 ला पोलंड वर केलेला हल्ला. त्याच बरोबर फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️जर्मनीचा इटली आणि जपान सोबत Molotov-Ribbentrop करार झाला होता आणि त्या अनुषंगाने इटली आणि जपान जर्मनीच्या मदतीसाठी युद्धात उतरले.

◾️1941 पर्यंत युरोपातला बऱ्याचशा भागावर जर्मनीचं प्रभूत्व आलं होतं.

◾️जर्मनीने 1941 साली सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेवर हल्ला चढवला आणि गल्लत झाली.

◾️सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंतचं अंतर जवळपास ८००० किलोमीटर आहे.

◾️त्यामुळे संपूर्ण रशिया जर्मनीच्या ताब्यात येणं जवळपास अशक्य होतं. पण हिटलर ला स्टालिनग्राड, लेनिनग्राड आणि मॉस्को वर ताबा मिळवणं पुरेसं होतं.

◾️त्यात पूर्व सीमेवर प्रचंड थंडी असल्यामुळे इंधन गोठू लागलं आणि जर्मनीचं सैन्य अडकून पडलं.

◾️ जर्मनी ज्या तेलाच्या विहीरींमधून इंधनाची सोय करणार होतं ते रशियाने उधळून लावलं.

◾️हे सगळं होईपर्यंत अमेरिका या महायुद्धापासून अलिप्त होती.

◾️पण डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अक्ष राष्ट्रांनीही अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️पण 1942 साली जपानचा Battle of Midway त पराभव झाला. त्यानंतर जर्मनी आणि इटली ह्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली.

◾️1944 साली फ्रांस च्या नॉर्मनडी च्या किनाऱ्यावरून दोस्त राष्ट्रांनी प्रति लढाई सुरू केली.

◾️1945 साली सोव्हिएत युनियनने बर्लिनवर ताबा मिळवला, ॲडॉल्फ हिटलर ने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.

◾️युरोपातलं महायुद्ध संपलं. पण जपान आणि अमेरिकेतली लढाई अजून सुरूच होती.

◾️जून 1945 मध्ये अमेरिकेने अणू बॉंब ची चाचणी यशस्वीरीत्या घेतली. 7 डिसेंबर 1939 साली जपानने पर्ल हार्बर वर जिथे अमेरिकेचा तळ होता तिथे हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्याची सूचना अमेरिकी अधिकारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन ला करतच होते.

◾️जपान हे युद्धमान राष्ट्र असल्याने जपान शरण येण्याची शक्यता नव्हती आणि सरतेशेवटी अमेरिकेने 6 ऑगस्ट 1939 ला जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि 9 ऑगस्ट, 1945 ला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला.

◾️2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने शरणांगती घेऊन दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

Latest post

महत्वाचे इतिहास प्रश्न

१. इबादत खाना का बांधण्यात आला?  अ. धर्मांवर चर्चा करणे ब. राज्याच्या चर्चेसाठी C. लोकांशी संवाद साधण्यासाठी D. यापैकी काहीही नाही  उत्तर: अ...