Wednesday, 2 September 2020

जाणून घ्या मांजरीबद्दल 'या' खास गोष्टी



जसा कुत्रा त्याच्या वफादारीसाठी आपल्याला आवडतो तसंच मांजरदेखील अनेकांना आवडते. विशेषत: महिला वर्गाला आणि लहान मुलांना आपली ‘मनी माऊ’ खूप प्रिय असते.

● मांजर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे.

● साधारणपणे एका मांजराचं वय हे 12 ते 18 वर्षापर्यंत असतं.

● माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात परंतु मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात.

● जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली जाते.

● जगातील पहिली पाळीव मांजर 9500 वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.

● ‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.

● हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते.

● एक मांजर दिवसाला साधारणपणे 16 तास झोपते. म्हणजे नऊ वर्षांची मांजर तिच्या आयुष्याचे फक्त ३ वर्ष जागी असते.

● मांजर फक्त माणसांना बघूनच म्यॅव करते. दुसऱ्या मांजराला बघून फक्त गुरगुरणे किंवा हिंसात्मक आवाज काढते.

● प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर त्याचा रीतसर दफनविधी करण्याची प्रथा होती.

● युरोप आणि उत्तर अमेरिका भागात काळी मांजर अशुभ मानली जाते तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया भागात काळी मांजर चांगल्या नशिबाचं लक्षण समजली जाते.

● मांजर 1 ते 9 पिल्लांना जन्म देऊ शकते. आजतागायत सर्वात जास्त 19 पिल्लांना जन्म देण्याचा रेकॉर्ड आहे.

● मराठीत पुरुष मांजराला बोका म्हणतात आणि मांजरीला (स्त्री) भाटी म्हणतात.

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● यंदाची (2020) आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय होती?

उत्तर : “योग फॉर हेल्थ-योग अ‍ॅट होम”

● नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अटल नवसंशोधन अभियान (AIM) सोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?

उत्तर : कोल इंडिया लिमिटेड (CIL)

● अंटार्क्टिकामध्ये प्रथमच अंड्याचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्मला काय नाव देण्यात आले आहे?

उत्तर : ‘द थिंग’

● यंदाची (2020) जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना काय होती?

उत्तर : हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज

● जागतिक बँकेनी बांगलादेशला 1.05 अब्ज डॉलर एवढी रक्कम कोणत्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी मंजूर केली?

उत्तर : प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड डिजिटल आनत्रेप्रेनेऊरशिप

● ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’  दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते?

उत्तर : रिंग ऑफ फायर

● ‘BMW इंडिया’ या कंपनीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : विक्रम पवाह (1 ऑगस्ट 2020 पासून)

● अन्नसुरक्षेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमासोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?

उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर : सबमरीन (समुद्र तळाशी टाकलेली केबल) ऑप्टिकल फायबर

● ‘इंदिरा वन मितान योजना’ कोणत्या राज्याने लागू केली?

उत्तर : छत्तीसगड

● ‘सुरक्षा’ नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?

उत्तर : हत्ती

● IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केली जाते?

उत्तर : कॅनडा

● कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था येते?

उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्रालय

● भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ कोणत्या विमानतळाने विकसित केले?

उत्तर : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

● मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर कोणाची नेमणूक झाली?

उत्तर : पतंजली झा

● RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

उत्तर : जी. के. पिल्लई

● ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020’ स्पर्धा कोणत्या संस्थेनी जिंकली?

उत्तर  : डिफेन्स इन्सिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

● बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये एका रोबोटिक्स प्रयोगशाळेची स्थापना कोणती कंपनी करणार आहे?

उत्तर  : नोकिया

● “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” कोणत्या राज्यात आहे?

उत्तर  : मिझोरम (जिल्हा, एझवाल)

● बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशाल भृगुवंशीच्या चरित्रावर आधारित ‘विशेष: कोड टू विन’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?

उत्तर : निरुपमा यादव

● भारतीय रसायन संशोधन मंडळातर्फे ‘कास्य पदक 2021’ हा सन्मान कोणाला देण्यात आला?

उत्तर : श्रीहरी पब्बराजा

● संयुक्त राष्ट्रसंघ प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे जागतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर  : प्रवीण परदेशी

● पहिली ‘किसान रेल’ कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावली?

उत्तर  : देवळाली (महाराष्ट्र) आणि दानापूर (बिहार).

● भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर  : गिरीश चंद्र मुर्मू

● “देखो अपना देश” या संकल्पनेखाली वैविध्यपूर्ण वेबिनार मालिका कोणती संस्था आयोजित करीत आहे?

उत्तर : केंद्रीय पर्यटन मंत्रालय

● ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी कोणता संघ साजरा करीत आहे?

उत्तर : डेक्कन जिमखाना क्लब

● ‘ओमेगा सेंटौरी’ या गोल गुच्छच्या धातू-समृद्ध नमुन्यात हेलियमयुक्त-वर्धित शीत चमकदार तारे कोणत्या संस्थेला आढळून आले आहेत?

उत्तर : भारतीय खगोलभौतिकशास्त्र संस्था

● 15 ऑगस्ट ते 02 ऑक्टोबर 2020 या कालावधीत 'फिट इंडिया फ्रीडम रन' ही धावशर्यत कोणत्या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर : युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय

● ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ हा प्रकल्प कोणत्या देशातला सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे?

उत्तर : मालदीव

● ‘गृहनिर्माण किंमत निर्देशांक’ कोण जाहीर करते?

उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक

● नुकतेच निधन झालेले पी. के. मुथूसामी कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?

उत्तर : संगीत

● नुकतेच भारतीय तटरक्षक दलाच्या एका गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले. त्या जहाजाचे नाव काय आहे?

उत्तर : सार्थक

● ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला?

उत्तर : ओडिशा

● तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरूवात केली?

उत्तर : पश्चिम बंगाल

● वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी करार केला?

उत्तर : भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित (BEML)

● डिजिटल छायाचित्रकारितेचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर : रसेल किर्श

● स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने संरक्षण उत्पादन विभागाने कोणते डिजिटल व्यासपीठ तयार केले आहे?

उत्तर : “सृजन / SRIJAN” नामक एक ‘वन स्टॉप शॉप’

● महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?

उत्तर : आसाम

● लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन कोणत्या बँकेनी सादर केले?

उत्तर : HDFC (गृहनिर्माण विकास व वित्त निगम)

● ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कोणत्या राज्याने कार्यरत केला?

उत्तर : नागालँड


म्हणी व अर्थ





🔹चढेल तो पडेल------
उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही


🔹चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------
काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत


🔹चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------
जशास तसे या न्यायाने वागणे चांगले


🔹चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------
क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च


🔹चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच


🔹चालत्या गाडीला खीळ घालणे------
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे


🔹चिंती परा ते ये‌ई घरा------
दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते


🔹चोर तो चोर वर शिरजोर------
गुन्हा करुन वर मुजोरी


🔹चोर सोडून संन्याशाला फाशी------
खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे


🔹चोराच्या उलट्या बोंबा------
स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे


🔹चोराच्या मनात चांदणे------
वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे


🔹चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------
वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात


🔹चोराच्या हातची लंगोटी------
ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब


🔹चोराला सुटका आणि गावाला फटका------
चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे


🔹चोरावर मोर------
एकापेक्षा एक सवाई


🔹चोरीचा मामला हळू हळू बोंबला------
पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त.



🔰भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.

🔰राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली आहे.

🔴ठळक बाबी...

🔰राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.

🔰राजीव कुमार 24 वे निवडणूक आयुक्त आहेत.अशोक लवासा यांची आशियाई विकास बँक (मनिला, फिलीपीन्स) येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.

🔴भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी....

🔰भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

🔴घटनात्मक तरतुदी....

🔰कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.

🔰कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.
कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.

🔰कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.
कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.

🔰कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.

🔴आयोगाची संरचना आणि जबाबदारी....

🔰आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.

🔰निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

दशातली पहिली बंगळुरू-सोलापूर ‘रो-रो’ रेल्वेसेवा कार्यरत.



🔰मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

🔴ठळक बाबी...

🔰अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.

🔰रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि नैर्ऋत्य रेल्वे या तिन्ही विभागात कार्यरत केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यामध्ये ही सेवा पोचविली जाणार आहे.

🔰रल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असणार.

🔰चालक आणि एक व्यक्ती ट्रकसोबत प्रवास करू शकते. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकीटे खरेदी करावी लागणार आहेत.

🔰एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असणार. प्रत्येक ट्रक किंवा लॉरीतून 30 टन मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

🔰या योजनेच्या माध्यमातून सोयीस्कर, अडथळामुक्त, स्वस्त व पर्यावरणपूरक वाहतूक करता येणार आहे. सेवेच्या माध्यमातून कृषी, उद्योग, रसायन इत्यादि क्षेत्रांना लाभ मिळणार आहे.

बद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला ऐतिहासिक सहविजेतेपद.



🔰बुद्धिबळ विश्वात जगज्जेतेखालोखाल सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पध्रेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवाबरोबरच, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला मिळालेली विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ ही भारताच्या कामगिरीची निसंशय वैशिष्टय़े ठरली.

🔰अतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढय़ रशियाशी होता. पहिला सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. या सामन्यात कोनेरु हम्पीचा पराभव झाला, परंतु दिव्या देशमुख जेतेपदाच्या मार्गावर होती. मात्र दिव्या देशमुख तसेच निहाल सरीनची इंटरनेट जोडणी अचानक खंडित झाली आणि वेळेवर चाली पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जाहीर झाले. दुसऱ्या सामन्यात अशा प्रकारे भारत १.५-४.५ पराभूत झाला होता. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडे (फिडे) याविषयी अपील केले. ते ग्राह्य़ धरले गेले आणि फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी भारत व रशियाला सहविजेते घोषित केले.

🔰भारताचे हे पहिले ऑलिम्पियाड अजिंक्यपद. या स्पध्रेत भारताने गतविजेत्या चीनवर ४-२ अशी मात केली होती. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरलेल्या विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व समर्थपणे केले. विश्वनाथन आनंद, पेंटाल्या हरिकृष्ण असे मातब्बर संघात असूनही हा मान विदिथला मिळाला होता.

🔰यदा कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑनलाइन खेळवले गेले. त्यामुळे खुला गट व महिला गट अशी स्वतंत्र विभागणी नव्हती. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला. भारतात अनेक युवा बुद्धिबळपटू उदयाला येत असून या बदलाचा फायदा त्यामुळे भारताला झाला.

परधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण..



🔰दशातल्या सामाजिक-आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलत “प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) - वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” सादर करण्यात आली. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे.

🔰वित्तीय उत्पादन आणि सेवा माफक दरात सर्वांना उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करणे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग आणि व्यापकता वाढवणे, ही योजनेची उद्दिष्टे आहेत.

🔴ऑगस्ट 2020 पर्यंत योजनेच्या अंतर्गत झालेली कामगिरी...

🔰एकूण 40.35 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली. त्यापैकी ग्रामीण भागात 63.6 टक्के खाती उघडली गेली. महिलांच्या PMJDY खात्यांचे प्रमाण 55.1 टक्के आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.

🔰करियाशील PMJDY खाती यांच्या बाबतीत, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, PMJDY खात्यात दोन वर्षे व्यवहार झाला नाही. ऑगस्ट 20 मध्ये 40.05 कोटी PMJDY खात्यांपैकी 34.81 कोटी (86.3 टक्के) क्रियाशील आहेत.

🔰PMJDY अंतर्गत एकूण ठेवी 1.31 लक्ष कोटी रुपये इतक्या रकमेच्या आहेत.
PMJDY प्रती खाते सरासरी जमा 3,239 रुपये आहे. ऑगस्ट 15 पर्यंत प्रती खाते सरासरी जमा 2.5 पटीने वाढली आहे.

🔰PMJDY खातेधारकांना एकूण 29.75 कोटी रूपे कार्ड दिली गेली आहेत.जन-धन दर्शक ॲप हा देशात बँक शाखा, ATM, बँक मित्र, टपाल कार्यालये, यासारख्या बँकिंग टच पॉइंट अर्थात बँकेशी संबंधित सुविधा कुठे आहेत हे सांगणारा लोककेंद्री मंच आहे. GIS ॲपवर 8 लक्षाहून अधिक बँकिंग टच पॉइंट मॅप करण्यात आले आहेत.

🔰 5 किलोमीटरच्या परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणारी गावेही या ॲप द्वारे ओळखून, तिथे बँक शाखा उघडण्यासाठी संबंधित SLBC केंद्रांद्वारे विविध बँकांना देण्यात येतात. या प्रयत्नामुळे बँक सुविधा नसणाऱ्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

🔰वित्त मंत्र्यांनी 26 मार्च 2020 रोजी केलेल्या घोषणेनुसार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत, प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY) महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने (एप्रिल 20 ते जून 20) या काळात दरमहा 500 रुपये जमा करण्यात आले. एप्रिल ते जून 20 या काळात PMJDY महिला खातेधारकांच्या खात्यात एकूण 30,705 कोटी रुपये जमा करण्यात आले.

🔰विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत 8 कोटी PMJDY महिला खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण लाभ मिळायची माहिती बँकांनी दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण विफल होण्याचे प्रमाण घटून एप्रिल 2019 मधल्या 5.23 लक्ष (0.20 टक्के) वरून जून 2020 मध्ये 1.1 लक्ष (0.04 टक्के) झाले.

🔰पढच्या काळात सूक्ष्म विमा योजनेच्या अंतर्गत PMJDY खातेधारकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 10 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMJJBY तर 25 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMSBY अंतर्गत आणण्यात येणार आहे. PMJDY खातेधारकांमध्ये देशभरात स्वीकृत पायाभूत ढाचा निर्माण करून त्याद्वारे रूपे सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाणार आहे.


🔰तसेच फ्लेक्सी आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत गुंतवणूक आणि सूक्ष्म पत PMJDY खातेधारकांच्या आवाक्यात येण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.

महाराष्ट्र पोलिस भरती Online Test Series

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...