Saturday, 29 August 2020
सामान्य ज्ञान
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.
राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.
केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) - स्थापनाः 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय निवडणूक आयोग (ECI) - स्थापनाः 25 जानेवारी 1950; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय लेखानियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) याची स्थापना - भारतीय संविधानाच्या कलम 148 अन्वये.
केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची स्थापना - 12 ऑक्टोबर 2005.
केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याची स्थापना - 11 फेब्रुवारी 1964.
भारतात जाऊ नका; ट्रम्प सरकारचा नागरिकांना सल्ला
⚡️ भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध मागील काही काळापासून सुधारल्याचे दिसत आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतासंदर्भात कठोर पावले उचलत अमेरिकन नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.
💁♂️ अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अशाप्रकारच्या सूचना का दिल्या आहेत याबद्दलचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र अशाप्रकारच्या सूचना या दहशतवाद, एखाद्या प्रदेशात होणारे युद्ध, वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांच्या काळात दिल्या जातात.
👀 *रँकिंग* : अमेरिकेने प्रवासासंदर्भात भारताचे रँकिंग चार निश्चित केले आहे. हा सर्वात वाईट रँकिंग असल्याचे सांगितले जाते.
👎🏼 *यादी* : हे रँकिंग देत अमेरिकेने भारताचा समावेश युद्ध सुरु असणाऱ्या सीरिया, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, इराण, इराक आणि येमेनसारख्या देशांच्या यादीमध्ये केला आहे.
🙏 *सल्ला* : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
📍 *वाढ* : अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार कोरोनाबरोबरच भारतामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* :
सविस्तर पणे वाचा :- महासंगणक
✍️आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या विश्वातील शक्तिशाली महासंगणक DGX-2 भारतात आला आहे. जोधपूर स्थित आयआयटी मध्ये तो उपयोगात आणण्यात येणार आहे. यामुळे भारतात आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रशिक्षणासाठी बळ मिळणार आहे.
✍️आयआयटी जोधपूर मधील कॉम्प्युटर विभागाचे अध्यक्ष डॉ.गौरव यांनी सांगितले की, "आपल्या प्रकारातील हा जगातील सर्वात गतिमान आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) ऍप्लिकेशन्ससाठी सर्वात शक्तिशाली महासंगणक आहे, जो पहिल्यांदाच भारतात आला आहे.
✍️हा महासंगणक जोधपूर आयआयटी मधील एका विशेष प्रयोगशाळेत लावण्यात आला आहे.
✍️डॉ.हरित यांनी सांगितले की, जवळपास २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरच्या ताकतीचा अंदाज यावरूनच लावता येईल की यामध्ये १६ विशेष GPU कार्ड लावण्यात आले आहेत. त्या प्रत्येक कार्डची क्षमता ३२ GB आहे.
✍️याची रॅम ५१२ GB आहे. त्यांनी असे सांगितले की, साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ १५० ते २०० वॅट असते, मात्र या सुपर कॉम्प्युटरची क्षमता १०००० वॅट आहे.
✍️DGX-2 सुपर कॉम्प्युटर पहिल्यांदा देशात आला आहे. याची क्षमता पहिल्या व्हर्जनच्या जवळपास दुप्पट आहे.
✍️मोठ्या स्तरावर समजून घ्यायचे झाले तर DGX-1 ने जे काम करण्यास १५ दिवस लागत होते ते काम DGX-2 ने करण्यास केवळ दीड दिवस लागणार आहे. जवळपास १५० किलो वजन असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरची इंटर्नल स्टोरेज क्षमता ३० TB आहे.
✍️आयआयटी जोधपूर आणि अमेरिकेतील सुपर कॉम्पुटर कंपनी नवीडिया यांच्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात संशोधनासाठी दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे, त्या करारांतर्गत हा सुपर कॉम्प्युटर इथे आणण्यात आला आहे.
वाचा :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या
🔶 जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ
🔶 मबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ
🔶 मबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ
🔶 आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
🔶 घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔶मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे
🔶 लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख
🔶 विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख
🔶 समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले
🔶 भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय
🔶 नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय
🔶आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय
🔶 भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय
🔶 हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद
🔶आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी
🔶 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे
🔶भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी
🔶 पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे
🔶नामदार : गोपाळ कृष्णा गोखले
🔶 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले
वाचा :- हंटर कमीशनचे भारतीय सदस्य
√ १८५४ च्या वुडच्या खलित्याने
सुचवलेल्या सुचनांची झालेली
अंमलबजावणी पाहणे आणि प्राथमिक
शिक्षणांसदर्भात सुधारणा
सुचविण्यासाठी १८८२ साली नेमण्यात
आलेल्या विल्यम हंटर साहेबांच्या
कमिशन मधे भारतीय मंडळींचा
सहभाग होता.
√ हि भारतीय मंडळी या कमिशनच्या
कामात सहभागी झाली आणि त्यांनी
महत्वपूर्ण योगदान दिले..
√१) के.टी.तेलंग
√२) सय्यद महमुद (सय्यद अहमद खान
यांच्या ऐवजी)
√३) आनंद मोहन बोस
√४) भुदेव सिंह मुखर्जी
√५) पी.रंगनाथ मुदलीयार
√६) हाजी गुलाम
√७) महाराज जितेंद्र मोहन टागोर
√ या कमीशन चे अध्यक्ष हंटर साहेब तर
सेक्रेटरी बी.एल.राईस होते.
√ हे कमीशन लाॕर्ड रिपन यांच्या काळात
आले होते..
भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी.
🔰जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
🔰सध्या करोना विषाणूचा कोणताही उपाय सापडलेला नाही. अनेक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. तक काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
🔴पहिली लस...
🔰“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.
परथमच, ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ शिक्षकाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
🔰आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना झालेल्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ (EMRS) याच्या शिक्षकाची प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांचे नाव आहे, कु. सुधा पाईनुली.
🔰क. सुधा पाईनुली या EMRS शाळा, कलसी (देहरादून, उत्तराखंड) येथे उप-प्राचार्य पदावर रुजू आहेत.
🔰यदा म्हणजेच 2020 या वर्षी एकूण 47 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये रुजू असलेल्या महाराष्ट्राचे सुनिल कुमार यांना हा सन्मान मिळाला आहे.
🔴पार्श्वभूमी....
🔰दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी देशात ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणार्या शिक्षकांच्या सन्मानार्थ पाळला जातो.
🔰भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली. पुरस्कार म्हणून पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख रक्कम दिली जाते.
🔰दरवर्षी या दिवशी देशाच्या विविध भागात उत्कृष्ट आणि अभिनव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याकरिता भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. हा सत्कार समारंभ विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो.
🔴एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना
...
🔰दशात ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ योजना 1997-98 साली लागू करण्यात आली. दुर्गम भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. भारत सरकारचे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय ही योजना राबवत आहे. सध्या देशात अश्या 462 शाळा आहेत आणि आणखी 288 शाळा उभारण्यास मंजुरी दिलेली आहे.
🔰50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुसूचीत जमाती (ST) लोकसंख्या आणि किमान 20,000 आदिवासी व्यक्ती रहिवासी असलेल्या देशातल्या प्रत्येक विभागांमध्ये एक ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ स्थापन करण्यास अलीकडेच सैद्धांतिक मंजुरी देण्यात आली आहे.
परधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण..
🔰देशातल्या सामाजिक-आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलत “प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) - वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” सादर करण्यात आली. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे.
🔰वित्तीय उत्पादन आणि सेवा माफक दरात सर्वांना उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करणे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग आणि व्यापकता वाढवणे, ही योजनेची उद्दिष्टे आहेत.
🔴ऑगस्ट 2020 पर्यंत योजनेच्या अंतर्गत झालेली कामगिरी...
🔰एकूण 40.35 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली. त्यापैकी ग्रामीण भागात 63.6 टक्के खाती उघडली गेली. महिलांच्या PMJDY खात्यांचे प्रमाण 55.1 टक्के आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.
🔰करियाशील PMJDY खाती यांच्या बाबतीत, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, PMJDY खात्यात दोन वर्षे व्यवहार झाला नाही. ऑगस्ट 20 मध्ये 40.05 कोटी PMJDY खात्यांपैकी 34.81 कोटी (86.3 टक्के) क्रियाशील आहेत.
🔰PMJDY अंतर्गत एकूण ठेवी 1.31 लक्ष कोटी रुपये इतक्या रकमेच्या आहेत.
PMJDY प्रती खाते सरासरी जमा 3,239 रुपये आहे. ऑगस्ट 15 पर्यंत प्रती खाते सरासरी जमा 2.5 पटीने वाढली आहे.
🔰PMJDY खातेधारकांना एकूण 29.75 कोटी रूपे कार्ड दिली गेली आहेत.जन-धन दर्शक ॲप हा देशात बँक शाखा, ATM, बँक मित्र, टपाल कार्यालये, यासारख्या बँकिंग टच पॉइंट अर्थात बँकेशी संबंधित सुविधा कुठे आहेत हे सांगणारा लोककेंद्री मंच आहे. GIS ॲपवर 8 लक्षाहून अधिक बँकिंग टच पॉइंट मॅप करण्यात आले आहेत.
🔰 5 किलोमीटरच्या परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणारी गावेही या ॲप द्वारे ओळखून, तिथे बँक शाखा उघडण्यासाठी संबंधित SLBC केंद्रांद्वारे विविध बँकांना देण्यात येतात. या प्रयत्नामुळे बँक सुविधा नसणाऱ्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.
🔰वित्त मंत्र्यांनी 26 मार्च 2020 रोजी केलेल्या घोषणेनुसार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत, प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY) महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने (एप्रिल 20 ते जून 20) या काळात दरमहा 500 रुपये जमा करण्यात आले. एप्रिल ते जून 20 या काळात PMJDY महिला खातेधारकांच्या खात्यात एकूण 30,705 कोटी रुपये जमा करण्यात आले.
🔰विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत 8 कोटी PMJDY महिला खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण लाभ मिळायची माहिती बँकांनी दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण विफल होण्याचे प्रमाण घटून एप्रिल 2019 मधल्या 5.23 लक्ष (0.20 टक्के) वरून जून 2020 मध्ये 1.1 लक्ष (0.04 टक्के) झाले.
🔰पढच्या काळात सूक्ष्म विमा योजनेच्या अंतर्गत PMJDY खातेधारकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 10 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMJJBY तर 25 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMSBY अंतर्गत आणण्यात येणार आहे. PMJDY खातेधारकांमध्ये देशभरात स्वीकृत पायाभूत ढाचा निर्माण करून त्याद्वारे रूपे सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
🔰तसेच फ्लेक्सी आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत गुंतवणूक आणि सूक्ष्म पत PMJDY खातेधारकांच्या आवाक्यात येण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.
आता पोलीस विभाग झाले १५९ वर्षाचे
▪️ परत्येक संकटाच्या वेळी सामान्य माणसाला सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे पोलीस , याच पोलीस आयोगाचे वय आता १५८ वर्ष पूर्ण झाले
💁♂ जाणून घ्या पोलीस आयोगाबद्दल बरच काही
◾️ दिल्लीवर पूर्ण ताबा मिळविल्यानंतर ब्रिटिशांनी प्रशासकीय सुधारणा सुरू केल्या.आणि १८६० मध्ये पोलीस आयोग स्थापन केला होता
◾️ आणि भारतीय पोलीस कायदा १८६१ बनवून पोलीस दलाची स्थापना केली.
🟢 दशातील पहिले पोलीस ठाणे* (ब्रिटिशकालीन ) - कोतवाली, सदर बाजार, सब्जीमंडी, मेहरोली आणि मुंडका ही देशातील पहिली पोलीस ठाणे आहे
👮♂ दशातील पहले पोलीस ठाणे
(स्वतंत्र भारत) - पंतप्रधान इंदिरा गांधीनी २७ आॅक्टोबर १९७३ रोजी देशातील पहिले पोलीस ठाणे केरळच्या कोझीकोडे येथे सुरू केले
⚫️ दशातील पहिला एफआयआर - 18 आॅक्टोबर 1861 रोजी दिल्लीत सब्जीमंडी पोलीस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल झाला होता
खरं तर FIR आपल्या सुविधेसाठी आहे पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे कारण FIR ची सुविधा ही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे....
सशांत सिंह राजपूतला मानाचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान.
🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे.
🎯 छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता सुशांतला मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. अद्याप या पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
🎯 दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरवात #1969 साली झाली.
🎯 परस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्या तर्फे दिला जातो. पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये यांचा समावेश असतो.
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...