Tuesday, 25 August 2020

मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी.

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.

🔰सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.

🔰आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🔰अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.

स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या व्यक्तीने “कोड ग्लेडिएटर्स 2020” हा पुरस्कार जिंकला?
उत्तर :- हिमांशू सिंग

Q2) कोणत्या बँकेनी 'गिग-ए-अपोर्च्युनिटीज' उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक

Q3) कोणत्या विषयाखाली ‘ASEAN-इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टँक’ (AINTT) याची सहावी गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली?
उत्तर :- ASEAN-भारत: कोविड नंतरच्या काळात भागीदारीचे बळकटीकरण

Q4) कोणता देश ‘सप्लाय चेन रेझिलन्स’ उपक्रम राबविण्यासाठी भारत आणि जापान सोबत भागीदारी करणार आहे?
उत्तर :-  ऑस्ट्रेलिया

Q5) कोणत्या मंत्रालयाने जव्हेरींसाठी हॉलमार्किंग केंद्रांच्या अधिकृत मान्यता आणि नूतनीकरणाची ऑनलाइन प्रणाली कार्यरत केली आहे?
उत्तर :-  ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय

Q6) कोणती अंदमान व निकोबार बेटांवर हाय-स्पीड 4G सेवा देणारी पहिली खासगी दूरसंचार कंपनी ठरली?
उत्तर :- एअरटेल

Q7) कोणत्या संस्थेत शिव नादर विद्यापीठाच्या भागीदारीने पर्यावरणपूरक लिथियम-सल्फर (Li-S) बॅटरीच्या उत्पादनासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले गेले?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

Q8) कोणत्या व्यक्तीची भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर :-  अश्वनी भाटिया

Q9) कोणत्या खेळाडूने धनुर्विद्या या क्रिडा शाखेसाठी ‘अर्जुन पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर :-  अतनू दास

Q10) कोणत्या व्यक्तीला ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ या संस्थेतर्फे ‘2020 लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :-  शंतनू नारायण, आनंद महिंद्रा

महात्मा गांधी खेडा येथे १९१८

गांधीजीना पहिलेयश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.

पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.

हे लक्षात ठेवा :- देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.

तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी

🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.

9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे.

8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर.

7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे.

6️⃣ मेघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे.

5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.

4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.

3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे.

2️⃣ दुसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.

1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.

भारतातील जंगलाविषयी माहिती

▪︎         भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे. 

▪︎         भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

● आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -

▪︎         भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो. 

● क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -

▪︎         क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे. 

● सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -

▪︎         हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Important information


📚 कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?
- लॉर्ड बेंटींक

📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?
- मद्रास

📚 मुलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?
- लॉर्ड मेकॉले

📚 रेलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

📚 इंग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?
- सुरत

📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?
- लैंड होल्डर्स सोसायटी.

📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?
- नारायण मेघाजी लोखंडे

◾️ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर

◾️महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी

◾️महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड

◾️महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा

◾️महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे
– पिपल्स वॉर ग्रुप

◾️औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली

◾️मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली – जेरॉल्ड अंजिअर

◾️रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे
– जळगांव, धुळे, नंदुरबार

◾️कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो
– प्रतिरोध

◾️पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत
– विदर्भ

◾️समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री

🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

अमेरिकेत प्लाझ्मा थेरेपीद्वारे होणार करोनावर उपचार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा


जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला असून त्या ठिकाणी मृतांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेनं आता प्लाझ्मा थेरेपीद्वारे रुग्णांवर उपाचार करणार असल्याची घोषणा केली. करोनाबाधितांच्या उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेच्या एफडीएनंदेखील आपात्कालिन परिस्थितीत करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याद्वारे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत करोनाबाधितांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.
अमेरिकेचे आरोग्यमंत्री अॅलेक्स अझार आणि एफडीचे आयुक्त स्टिफन हेन यांनी ही घोषणा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्लाझ्मा थेरेपीनं करण्यात येणारे उपचार सुरक्षित असल्याचं सांगितलं. करोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेऊन तो करोनाबाधितांना दिला जाणार आहे. त्यानंतर रुग्णांची बरे होण्याची शक्यता वाढणार असल्याचं हेन यांनी सांगितलं. कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीमुळे करोनामुळे होणारे मृत्यू ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळेल, असा दावा मेयो क्लिनिकच्या एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे.

*कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?*

या उपचार पद्धतीला अलीकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही प्रयोग- पाहणीच्या तत्त्वावर मान्यता दिली आहे. यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.
कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी पॅसिव्ह इम्युनिटी या जुन्या संकल्पनेनुसारच काम करते. उदाहरणार्थ काही आजारांच्या अ‍ॅण्टिबॉडीज घोडय़ामध्ये विकसित केल्या गेल्या आणि नंतर त्या माणसाला टोचण्यात आल्या. तर बीसीजी लस हे अ‍ॅक्टिव्ह इम्युनिटीचं उदाहरण आहे. ती शरीरात टोचून अपेक्षित प्रतिकारशक्ती वाढवली जाते. ग्युटन आणि हॉल यांच्या वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांतील उल्लेखानुसार कोणतेही अँटीजेन न टोचता माणसामध्ये तात्पुरती प्रतिकारशक्ती निर्माण करता येऊ शकते. अ‍ॅण्टिबॉडीज देणं, टी सेल कार्यरत करणं किंवा अन्य व्यक्तीच्या रक्तातून या दोन्ही घटकांचा पुरवठा करणं किंवा ज्या प्राण्याच्या शरीरात अ‍ॅण्टीजेन घातलेले आहेत त्याच्याकडून या गोष्टी मिळवणं यातून प्रतिकारशक्ती वाढवता येते. या अ‍ॅण्टिबॉडीज रुग्णाच्या शरीरात दोन ते तीन आठवडे टिकून राहू शकतात. त्या काळात त्या रुग्णाचे त्या रोगापासून संरक्षण होते. दुसऱ्या माणसाच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही आठवडे; तर प्राण्याच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही तास ते काही दिवस टिकून राहू शकतात. या प्रकाराच्या रक्तप्रदानाला पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. टी सेल्स या रक्तपेशींची प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका असते.

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-


१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६
______

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य
विधानमंडळ
राज्यांचा संघ
विधान परिषद
उत्तर : राज्यांचा संघ

2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली
अंदमान-निकोबार बेटे
पौंडेचेरी
दीव व दमण
उत्तर : अंदमान-निकोबार बेटे

3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान
अप्रत्यक्ष मतदान
प्रौढ मतदान
प्रौढ पुरुष मतदान
उत्तर : प्रौढ मतदान

4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का
आर्थोपोडा
इकायनोडमार्ट
नेमॅटोडा
उत्तर : मोलुस्का

5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

एकेरी बंध
दुहेरी बंध
तिहेरी बंध
यापैकी एकही नाही
उत्तर : एकेरी बंध

6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र
बुध
मंगळ
पृथ्वी
उत्तर : बुध

7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद
शोभा डे
अरुंधती राय
खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग
ठाणे
रत्नागिरी
रायगड
उत्तर : ठाणे

9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई
बंगलोर
कानपूर
हैदराबाद
उत्तर : बंगलोर

10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01
02
03
यापैकी एकही नाही
उत्तर : यापैकी एकही नाही

11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री
महाधीवक्ता
पंतप्रधान
महान्यायवादी
उत्तर : पंतप्रधान

12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J
980 J
98 J
9.8 J 
उत्तर : 980 J

13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय
केशव चंद्र सेन
देवेंद्रनाथ टागोर
ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर
वि.रा. शिंदे
महात्मा जोतिबा फुले
भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स
कुस्ती
क्रिकेट
स्विमींग
उत्तर : अॅथलेटिक्स

16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती
वाघ
सिंह
हरिण
उत्तर : हत्ती

17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21
25
30
35
उत्तर : 35

18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960
1 मे 1961
1 मे 1962
1 मे 1965
उत्तर : 1 मे 1962

19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78
238
250
288
उत्तर : 288

20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२
H२S
SO२
NH३
उत्तर : NH३

प्रश्न मंजुषा

Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

१) सर्व बरोबर
२) 1 व 2 बरोबर
३) 2 व 3 बरोबर 💐💐
४) सर्व चूक

Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस 'बारमाही न्यून रोजगार' किंवा 'व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी' असेही म्हटले जाते.

१) हंगामी बेरोजगारी
२) खुली बेरोजगारी
३) सुशिक्षित बेरोजगार
४) अदृश्य बेरोजगारी 💐💐

Q3)
समितीचे नाव                         विषय

A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक                  
                                    उद्योग बाबतच्या                  
                                  धोरणात सुधारणा

B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा                 
                                    दर्जा

C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक   परवाना धोरण             
                                     समिती

       A      B      C      D
१)    1      2      3       4
२)    2      1      4       3
३)    3      4      1       2
४)    4      1      2       3💐💐

Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _

१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
४) या पैकी नाही

       
Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

१) सर्व बरोबर
२) फक्त 2 बरोबर
३) फक्त 1 बरोबर 💐💐
४) फक्त 3 बरोबर

Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

१) जलद विकास
२) औद्योगिक विकास
३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
४) समतोल प्रादेशिक विकास

Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
३) माळेगाव (बारामती- पुणे)
४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे....)

Q8)

1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान 'सर्वोच्च वित्तसंस्था' असेच आहे

१) 1 व 3 बरोबर
२) सर्व बरोबर 💐💐
३) फक्त 3 बरोबर
४) 1 व 2 बरोबर

Q9) खालील योग्य विधान ओळख

1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

१) सर्व बरोबर 💐💐
२) 1 व 4 बरोबर
३) फक्त 1 व 2 बरोबर
४) सर्व चूक

Q10)

वित्त आयोग                        अध्यक्ष
A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
       A    B    C     D
१)   1     2     3    4
२)   4     2    3     1 
३)   4     3    2     1 ✅
४)   1     3    2     4

♻️ वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे ♻️

दक्षिण भारतातील गंगा कुठल्या नदीला म्हंटले जाते
१) गोदावरी ✅✅✅
२) कृष्णा
३) भीमा
४) नर्मदा

१)गोदावरीची एकूण लांबी १,४६५ km आहे.
२) महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी ८०० km आहे.
३) गोदावरी नदी महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते

अचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३ ✅✅✅
३) १,२,३
४) फक्त २
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे
गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते

कळसूबाई शिखरावर कुठली नदी उगम पावते
१) प्राणहिता
२) इंद्रावती
३) मांजरा
४) दारणा ✅✅✅

दारणा नदी गोदावरी ची उजवी उपनदी आहे

१)सातमाळा  डोंगरा वर शिवणा नदी उगम पावते
२) बालाघाट डोंगर रांगेत प्रवरा नदी उगम पावते
३) गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे

बिनचूक विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३
४) १,३ ✅✅✅✅
बालाघाट डोंगर रांगात सिंधफणा नदी उगम पावते

प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदरा जवळ उगम पावते

नेवासे शहर कुठल्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे.
१) मुळा मुठा
२) प्रवरा शिवणा
३) मुळा दारणा
४) प्रवरा मुळा ✅

खालीलपैकी कुठली नदी गोदावरी नदीला डाव्या तिरावरून येऊन भेटते
१) शिवना✅✅✅
२) प्रवरा
३) दारणा
४) बोर

शिवना नदी ही गोदावरी ला डाव्या तिरा कडून येऊन भेटते तर प्रवरा दारणा आणि बोर या नद्या उजवा तीरावरून गोदावरीला येऊन भेटतात

प्राणहिता नदी खालीलपैकी कुठल्या नद्या मिळून तयार झाली आहे.
१) वर्धा आणि वैनगंगा
२) वर्धा आणि पैनगंगा
३) वैनगंगा आणि पैनगंगा
४) वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा✅✅✅✅

खालीलपैकी कुठल्या नद्या भीमानदीच्या डाव्या उपनद्या आहेत
१)  सीना
२) माण
३) घोड
४) वेळ

१) १,२,३
२) २,३,४
३) १,३,४ ✅✅✅✅
४) वरीलपैकी सर्व

माण ही नदी भीमा नदीची उपनदी

१) कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.
२) कृष्णा नदीच्या नदी प्रवाहाची दिशा उत्तर - दक्षिण आहे
३) कऱ्हाड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो

चूक नसलेली विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३ ✅✅✅
३) १, 3

डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस कुठली नदी मिळते
१) दूधगंगा
२) तुळशी
३) पंचगंगा
४) येरळा ✅✅✅

कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त येरळा नदी येऊन मिळते

तापी नदी कुठल्या राज्यातून वाहते
१) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ✅✅✅✅
२) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड
३) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश
४) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक

खोल घळई मधून कुठली नदी वाहते
१) तापी ✅✅✅
२) गोदावरी
३) कृष्णा
४) भीमा

तापी नदीचे क्षेत्र खचदरी च्या भागात येते म्हणून ही नदी खोल घळई मधून वा

१) कोकणातील नद्या लांबिने खूप लहान असून मंद गतीने वाहतात
२)  कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे.
३) कोकणातील नद्या पञ्चीमवाहिनी नद्या आहेत
४) कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात.

बिनचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३
३)  १,३
४) १,४ ✅✅✅

कोकणातील नद्या लांबीने लहान असतात परंतु त्या वेगाने वाहतात
कोकणातील नद्या खाड्या तयार करतात

महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे
१) 65%
२) 81%
३) 70 %
४) 75% ✅✅✅

महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचे क्रम लावा
१) गोदावरी, तापी, भीमा, वैनगंगा
२) गोदावरी , भीमा , वैनगंगा ,तापी
३) गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा
४) गोदावरी, वैनगंगा, भीमा , तापी ✅✅✅

गोदावरी 668 km
वैनगंगा 495 km
भीमा 451 km
तापी 208 कम

नद्यांच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार नद्यांचा चढता क्रम ओळखा
१) भीमा, वर्धा, कृष्णा, गोदावरी
२) कृष्णा, वर्धा, भीमा, गोदावरी ✅✅✅✅
३) वर्धा, कृष्णा ,भीमा , गोदावरी
४) वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी

खालीलपैकी अचूक विधान ओळखा?
A)  सातमाळा अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.

B) गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झालेले आहे.
*पर्यायी* *उत्तरे*
1) अ आणि ब दोन्ही सत्य
2) अ आणि ब दोन्ही असत्य
3) हे सत्य असून बी असत्य आहे✅✅
4) हे असत्य असून बी सत्य आहे.
*स्पष्टीकरण* गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या रंगामुळे अलग झालेले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत?
1) गोदावरी,  मांजरा, तापी✅
2) गंगा गोदावरी कृष्णा
3) महानदी कावेरी तापी

खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
1)  गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे.
2) भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी आहे.
3) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किमी आहे.
4) तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे.