Tuesday, 18 August 2020

राष्ट्रगीताबद्दल माहिती



१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.

७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

चद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी



◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931

 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.

◾️ तयांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते HSRA चे प्रमुख होते.

◾️सघटना:- कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा

◾️1921 मध्ये म. गांधींच्या असहकार आंदोलनात 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता.

◾️तयासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले

◾️सायमन कमिनला विरोधादरम्यान लाठीहल्यात लाला लजपतराय यांचे निधन

◾️बदला म्हणुन लाहोर चा SP जेम्स स्कॉट ला मारण्याचा कट रचला

◾️या कटात भगतसिंग, जय गोपाल, राजगुरु, आझात होते

◾️जम्स स्कॉट एेवजी सॉंडर्स हा
 अधिकारी मारला गेला

◾️वशांतर करुन राजकोट मार्गे इलाहाबाद येथे दाखल झाले

◾️27 फेब 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला.
शेवटी स्वत:वर गोळी मारुन घेतली

चालू घडामोडी

1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
▪️उत्तराखंड

2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
▪️मबई-कोलकाता

3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️उदयपूर-दिल्ली

4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल

5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
▪️पोलादाचा

6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
▪️कागदाचा

7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
▪️खत प्रकल्प

8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
▪️भाक्रा

9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
▪️तांदुळ

10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
▪️गहु

• संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या 'अर्थ अँथम' लिहिणारे भारतीय कवी - अभय कुमार.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती दिपंकर दत्त.

• 'सयाजीराव गायकवाड III: द महाराजा ऑफ बरोडा' पुस्तकाचे लेखक - उमा बालसुब्रमण्यम.

• केंद्र सरकारने .............. ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना केली - गांधीनगर, गुजरात (स्थापना: 27 एप्रिल 2020).

• नवे दक्षता आयुक्त - सुरेश एन. पटेल.

• सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे नवीन अध्यक्ष - राजीव कुमार.

• अमेरिका देशाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले कर्नाटकचे माजी फलंदाज - जे अरुण कुमार

• ..............या राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जगनन्ना विद्या दिवेन’ योजना लागू केली - आंध्रप्रदेश.

• ...............या देशाचे नौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव आयोजित करणार आहे – अमेरिका.

• बौद्धिक संपदा फ्रेमवर्क संदर्भात सुधारणांच्या अभावासाठी .............या देशाने भारताला 'प्रियोरिटी वॉच लिस्ट'मध्ये ठेवले – अमेरिका.

• NASA संस्थेच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला अधिकृतपणे “इंजेन्यूटी” नाव देण्यात आले आहे जे ..............या 17 वर्षीय भारतीय मुलगीने सुचविले - वनिझा रुपाणी.

• ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान............. वे आहे. - 53 वा.

• ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना - “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर”.

• 18 ते 20 ऑक्टोबर या काळात .................या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार आहे – द हेग, नेदरलँड.

• ..................हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे - चीन.

• फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय - निलय मिताश.

• फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेली एकमेव भारतीय  महिला - सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).

• जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय - सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).

• शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना............ या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला - हिमाचल प्रदेश.


• भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमाधारकांद्वारे दिले जाऊ शकणारे विमा मध्यस्थांसाठी मानक व्यवसायिक नुकसानभरपाई धोरणाचा आराखड़ा तयार करण्यासाठी................ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - यज्ञप्रिया भारत.

• 4 एप्रिल 2020 रोजी कोविड19 विषयक नॉन अलाइन्ड मुव्हमेंट (NAM) यांची आभासी परिषद.............. यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली - अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव.

• 4 एप्रिल 2020 रोजी आभासी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित करणारे देश – ब्रिटन आणि इतर आठ देश.

• केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते .............या व्यासपीठावर “द सरस कलेक्शन” उपक्रम आरंभ करण्यात आला - गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM).

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास 100 टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य........... हे होय  - महाराष्ट्र.
चालू घडामोडी (जून २०२०):-
.............................................................................

• चर्चित पुस्तके :-
• ‘ए नागा स्टोरी’ - एडवर्ड लोथा.
• “#मी टू’ - करण पुरी.

• रशिया सरकारने नव्या घटनात्मक दुरुस्तीने रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ..............या वर्षापर्यंत देशाचे नेतृत्व करणार आहे  – वर्ष 2036.

• ................... हा देश 2023 साली पहिला पर्यटक अंतराळात पाठवणार आहे - रशिया.


• सांख्यिकी दिन 2020 निमित्त, सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी............. यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. :- - सी. रंगराजन (RBIचे माजी गव्हर्नर).

• आगामी 2020-21 हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुख पंच समितीत समावेश झालेले सर्वात तरुण व्यक्ती............... ही आहे. - नितीन मेनन (36 वर्षीय)

• राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे .............या राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवला  - मध्यप्रदेश.

• ...............या राज्य सरकारने 'प्लॅटिना' नावाचा कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी-कम-ट्रायल प्रकल्प सुरू केला, जो जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे - महाराष्ट्र.
http://t.me/PoliceBhartiKatta

• ..................हे मंत्रालय 28 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत ‘संकल्प पर्व’ कार्यक्रम राबवित आहे, ज्यांच्या अंतर्गत वड, पिंपळ, आवळा, अशोक आणि बेल ही पाच झाडे लावण्यात येणार आहे - सांस्कृतिक मंत्रालय.

• .................या राज्य सरकारने ‘विशेष सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे - उत्तरप्रदेश.

• ...................हे राज्य सरकार 1 जुलैपासून ‘आदर्श पोलीस स्टेशन’ योजना लागू करणार आहे - छत्तीसगड.

• .................या राज्य सरकारने गर्भवती व स्तनपानावर असलेल्या महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना’ जाहीर केली आहे. - त्रिपुरा.

• 25-26 जून 2020 रोजी CII संस्थेनी .................या राज्यात आभासी ‘संरक्षण परिषद 2020’ आयोजित केली - गुजरात.

• नीती आयोगाची वर्तन बदल मोहीम - ‘नॅव्हिगेटिंग द न्यू नॉर्मल’.

• केंद्रीय पंचायतराज मंत्रालय द्वारे स्थापित, विविध ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी ‘ई-पंचायत पुरस्कार 2020’ याचा विजेता असलेले राज्य  - हिमाचल प्रदेश.

• स्टार्टअप जिनोम संस्थेच्या ‘द ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2020’ याच्यानुसार, जागतिक स्तरावरील यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी जगातल्या सर्वाधिक अनुकूल शहरांच्या यादीत प्रथम 40 मध्ये स्थान मिळविणारी दोन भारतीय शहरे - बंगळुरू (26 वा) आणि दिल्ली (36 वा).

• इंडियन रेड क्रॉस सोसायटीद्वारे विकसित केलेले........... हे नवीन मोबाइल अॅप आहे. - ‘ईबल्डसर्विसेस’

• 2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी सर्वात लहान राज्ये ......... ही आहेत छोटी - नागालँड आणि त्रिपुरा.(2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी 50 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली राज्ये - गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर  2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश - दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव.)

• समलिंगी समुदायासाठी नोएडाच्या सेक्टर 50 मेट्रो स्टेशनला समर्पित केल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC) त्याचे नाव................ हे ठेवले - "रेनबो" स्टेशन.

•  ‘ज्युरी कमिटी स्पेशल अवॉर्ड’ श्रेणीत ‘संसद रत्न पुरस्कार 2020’ पुरस्काराने गौरविण्यात आलेला........... हा सर्वात तरुण खासदार – के. राम मोहन नायडू (श्रीकाकुलम खासदार).

• महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव - संजय कुमार (अजोय मेहता यांच्या जागी)

• २०२०  चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार.............. यांना जाहीर झाला आहे  जिंकणारे - डॉ. तात्याराव लहाने (वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ).

भारतदर्शन : सिक्कीम



🔰16 मे हा सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

🔰1975 साली याच दिवशी सिक्कीम भारतीय संघराज्याचे 22 वे राज्य बनले.

🔰 जगातील तिसरे व भारतातील सर्वोच्च शिखर कांचनजुंगा याच राज्यात आहे.

🔰 राज्याचा सुमारे 35 टक्के भाग खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाने व्यापलेला आहे. वेलची उत्पादनात या राज्याचा जगात दुसरा क्रमांक आहे.

🔰 सपूर्ण सेंद्रिय शेती करणारे हे भारतातील पहिले व एकमेव राज्य आहे. प्लास्टिक बाटल्या व पॉलीस्टिरीन उत्पादनांवर पूर्ण बंदी घालणारे हे एकमेव राज्य आहे.

🔰स म्हणजे नवे व किम म्हणजे राजवाडा या दोन नावांचा संगम म्हणजे सिक्कीम.

🔰 तिबेटी भाषेत या राज्याला तांदूळ पिकवणारी दरी असे म्हटले जाते.

🔰लपचा लोक येथील मूळ रहिवासी. याशिवाय लिम्बू व मागर जनजातीचे लोक येथे राहतात.

🔰कमी लोकसंख्या व छोटे क्षेत्रफळ असूनही हे हिमालयाच्या कुशीतील राज्यांत सर्वात श्रीमंत राज्य आहे.

🔰ह राज्य वनसमृद्ध असल्याने लाल पांडा, तिबेटी कोल्हा, ठिपकेधारी बिबट्या, हिमालयीन मांजर हे प्राणी व सोनेरी गरूड, चमच्या, दयाळ हे पक्षी येथे आढळतात.

विविध आक्षेपांनंतरही रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन.



🔰जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

🔰“ही लसीच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच करोना विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासदेखील ही लस यशस्वी ठरली आहे,” असं रशियाच्या आरोग्य मंत्रालाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही लस एका व्यक्तीला दोन वेळा देण्यात येते आणि या विषाणूविरोधात दोन वर्षांपर्यंत रोग प्रतिकारक क्षमता विकसित करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यापूर्वी या लसीची ७६ स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

🔰या लसीचं उत्पादन लवकरच परदेशांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि फिलिपिन्समध्येही याची चाचणी सुरू होणार असल्याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे ही लस किती सुरक्षित आहे आणि प्रभावशाली आहे याची चाचणी करण्यात आली नसल्याचं ब्रिटनचे वृत्तपत्र डेलीमेलनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या लसीचे काही दुष्परिणामही दिसून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

🔰तम्ही तुमच्या करोना लसीचा ट्रायल डेटा प्रसिद्ध करा, जेणेकरुन तज्ज्ञांना परिणामकारकता तपासता येईल अशी WHO ने रशियाला यापूर्वी विनंती केली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार आतापर्यंत केवळ ३८ स्वयंसेवकांवरच या लसीची चाचणी करण्यात आली. लसीचा डोस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये १४४ प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसले. तसंच चाचणीच्या ४२ व्या दिवसापर्यंत ३१ स्वयंसेवकांमध्ये साईड इफेक्ट्स दिसत असल्याचा दावा डेली मेलनं केला आहे. तर दुसरीकडे रशियानं आपली लस सुरक्षित असल्याचं सांगत २० देशांकडून लसीची मागणीही आल्याचं म्हटलं आगे. तर रशियन वृत्तसंस्था फोटांकानं स्वयंसेवकांमध्ये दिसत असलेल्या साईड इफेक्ट्सची यादी मोठी असल्याचं म्हटलं आहे.

नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू



🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

🔰सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास एक हजार तर निर्मिती, वितरण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात आयुक्त महापालिका यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

🔰सार्वजनिक ठिकाणी खर्रा खाऊन थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थांची निर्मिती साठवण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.

🔴यांना आहेत कारवाईचे अधिकार

🔰तबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे व विक्री करणऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार.



🔰पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान देण्यात आला आहे. शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी गिलानी यांनी ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार देण्यात आला. गिलानी हे फुटीरतावादी नेते असून त्यानी अनेकदा काश्मीरमध्ये भारतविरोधी वक्तव्यही केली होती. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं आपला नवा नकाशा जारी केला होता. त्यात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचंही दाखवण्यात आलं होतं.

🔰सवातंत्रदिनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्यात आला. माजी हुर्रियत नेते गिलानी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ रिझवी यांनी हा पुरस्कार दिला. दरम्यान, या कार्यक्रमाला गिलानी हे उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी काही हुर्रियतच्या नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी गिलानी यांना सन्मानित करण्यात येईल, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं होतं.

🔰पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाद्वारे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. गिलानी यांनी काही दिवसांपूर्वीच हुर्रियतमधून आपला राजीनामा दिला होता. काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसेचा आरोप असलेल्या आरोपींमध्ये त्यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिसाचारानंतर टेरर फंडिंगचादेखील आरोप करण्यात आला होता. तर बऱ्याच कालावधीसाठी गिलानी यांना त्यांच्या घरात नजरकैदेतही ठेवण्यात आलं होतं.

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा.



🔰एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. पुणे महसूली विभागाच्या बाहेरच्या ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांना केंद्र बदलण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

🔰काही दिवसांपूर्वी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही परीक्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ही परीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, आता एमपीएसचीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.

🔰कद्र बदलणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्र निवडता येईल. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सुरक्षिततेचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केंद्र बदलण्याची परवानगी देण्याची मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधी करण्यात येत होती.

राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री.

🌺🌺🌺🌺

🔰आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

🔰“शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल.

🔰महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र



🔰डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, असे ‘राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्र’ प्रत्येकाला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.

🔰ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजना’ सुरू होत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘या योजनेनुसार प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र दिले जाईल.  सर्व आरोग्यसेवांसाठी त्याचा वापर करता येईल.’’ वैद्यकीय तपासणी अहवाल, डॉक्टरांनी दिलेली औषधे,  उपचार आदी माहिती ओळखपत्रात नोंदवलेली असेल. ही आरोग्य योजना  आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राबवली जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

🔰‘स्वावलंबी भारत’ अशी घोषणा करताना मोदी म्हणाले की, किती काळ आपण कच्चा माल निर्यात करून वस्तू आयात करत राहणार? हे दुष्टचक्र थांबवण्याची वेळ आली आहे. देशासाठी गरजेच्या वस्तू देशातच बनवल्या गेल्या पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्या जगभर निर्यातही केल्या पाहिजेत. ‘मेक इन इंडिया’तून ‘मेक फॉर वर्ल्ड’कडे वाटचाल करण्याचा निर्धार मोदी यांनी केला. करोनाच्या काळातही जगभरातून भारतात गुंतवणूक होत असून थेट परदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढली आहे. भारताकडे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता असल्याचे जगभरातील गुंतवणूकदारांना वाटते. स्थानिक उद्योगांना चालना देण्यातून स्वावलंबी भारत घडू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

🔰कसे असेल ओळखपत्र? राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्रावर व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहितीची साठवणूक असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना आपल्या प्रकृतीची नोंद डिजिटल स्वरूपात व्हावी अशी इच्छा आहे अशा प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र तयार करावे लागेल. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन  यासारख्या आरोग्य यंत्रणांशी हे ओळखपत्र जोडण्यात येईल. हे ओळखपत्र व्यक्तीची मूलभूत माहिती आणि मोबाइल क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून तयार केले जाईल. ओळखपत्रधारकाला आपल्या आरोग्याच्या सर्व नोंदी या ओळखपत्राशी जोडण्याची सोय असेल.

परमुख युद्ध सराव



गरुड़ : भारत-फ्रांस

गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया

वरुण : भारत- फ्रांस

हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन

जिमेक्स : भारत-जपान

धर्मा गार्डियन : भारत-जपान

कजिन संधि अभ्यास : भारत-
जापान तटरक्षकदल

सूर्य किरण : भारत-नेपाळ

सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल

लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल

कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी

इंद्रधनुष : भारत-ब्रिटन

मालाबार : भारत-अमेरिका-जपान

रेड फ्लैग : भारत-अमेरिका

कोप : भारत-अमेरिका

मित्र शक्ति : भारत-श्रीलंका

सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका इंद्र :
भारत-रशिया

नसीम अल बह्न : भारत-ओमान

सम्प्रीती : भारत- बांग्लादेश

औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल

नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय
सेना

एकूवेरिन : मालदीव-भारत

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...