१७ ऑगस्ट २०२०

विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?



मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात. त्यावर एक नजर...

1. *बीट* : याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी  मिळतात. याने शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते.

2. *पालक* : यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. याने शरीरातील हिमोग्लोबिन चांगलेच वाढू शकते.

3. *अंडी* : यामुळे शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.

4. *सुकामेवा* : सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळते.

5. *मासे* : कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळते.

6. *डाळिंब* : यामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.

ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी आहारात वरील पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवायला हवे.

महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तरे



▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?
उत्तर : नीती आयोग

▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?
उत्तर : झारखंड

▪️ 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

▪️ कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪️ कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?
उत्तर : अॅव्होन

▪️ कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला

▪️ IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अशोक मायकेल पिंटो

▪️ 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स

▪️ ‘शिवाजी इन साउथ ब्लॉक: द अनरिटन हिस्टरी ऑफ प्राउड पीपल’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : गिरीश कुबेर

▪️ कोण ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकित झालेले प्रथम भारतीय ठरले?
उत्तर : सानिया मिर्झा

▪️ ‘द रूम व्हेयर इट हॅपन्ड: ए व्हाइट हाऊस मेमोरी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : जॉन बोल्टन

▪️ ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेच्या अंतर्गत कोणते राज्य समाविष्ट करण्यात आले नाही?
उत्तर : छत्तीसगड

▪️ 2020 साली जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर

▪️ कोणती संस्था ‘भारतईमार्केट’ या नावाने ई-कॉमर्स बाजारपेठ तयार करणार आहे?
उत्तर : अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT)

▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नदीने तयार केलेल्या सीमा



              🔰  गोदावरी नदी 🔰

◾️ अहमदनगर-औरंगाबाद

◾️ जालना-बीड

◾️ बीड-परभणी

             🔰 भीमा नदी 🔰


◾️ पणे-सोलापूर

◾️ पणे-अहमदनगर

             🔰 कष्णा नदी 🔰

◾️सांगली-कोल्हापूर

             🔰 नीरा नदी 🔰

◾️पणे-सोलापूर

◾️पणे-सातारा

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय.



अलाहाबाद बैंक - कोलकाता

• बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

• केनरा बैंक - बैंगलोर

• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

• देना बैंक - मुंबई

• इंडियन बैंक - चेन्नई

• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

• सिंडिकेट बैंक - मणिपाल

• यूको बैंक - कोलकाता

• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

• विजया बैंक - बैंगलोर

• आंध्रा बैंक - हैदराबाद

• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ



🔸आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत देशातील अल्पभूधारक आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी 11 घोषणा केल्या.शेती क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचे साह्य़ केले जाणार आहे.

🔸तर शिवाय, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केली जाणार असून शेतीमालाच्या आंतरराज्यीय विक्रीलाही परवानगी देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा केला जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

🔸तसेच जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा हा कायदा केला गेला. आता शेतमालाला रास्त दर मिळण्यासाठी, या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

🔸हगाम सुरू होण्यापूर्वी शेतीमालाला किमान निश्चित दर देण्याची हमी मिळाली तर शेतीमालाच्या किमतीबाबत असलेली अनिश्चितता कमी होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठीही कायदा केला जाणार आहे.

🔸अन्नप्रक्रिया उद्योग, निर्यातदार, मोठे शेतीमाल विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यांना किमतीची हमी मिळाली तर शेतकऱ्याला उत्पन्नाची हमी मिळू शकेल.शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी शेतीमालाच्या आंतरराज्य विक्रीलाही परवानगी दिली जाणार असून त्यासाठी केंद्र कायदा करेल.

🔸शती हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असला तरी, आंतरराज्य हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने असा कायदा करण्यात अडचण येणार नाही.

🔸नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यावर फक्त त्याच्या जवळच्याच कृषिबाजारात शेतीमाल विकण्याचे बंधन राहणार नाही. शिवाय, ई-विक्रीलाही प्रोत्साहन दिले जाणार असून त्यांना फक्त आडत्यांनाच माल विकावा लागणार नाही.

वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले



संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.

अहवालातल्या ठळक बाबी

🔸गल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🔸जगले नष्ट होण्याचे प्रमाण कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले आहे. जंगले नष्ट होण्याचे प्रमाण वर्ष 1990 ते वर्ष 2000 या दशकात वार्षिक 7.8 दशलक्ष हेक्टर एवढे होते, तर हे प्रमाण वर्ष 2000 ते वर्ष 2010 या दशकात वार्षिक 5.2 दशलक्ष हेक्टर आणि वर्ष 2010 ते वर्ष 2020 या दशकात वार्षिक 4.7 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🔸जगातले एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर (bha) आहे, जे एकूण भूभागाच्या 31 टक्के आहे. हे क्षेत्र प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर इतके आहे.

🔸जगातल्या वनक्षेत्राचे सर्वात मोठे प्रमाण उष्णकटिबंधीय (45 टक्के) आहे आणि त्यानंतर बोरियल, समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय वनांचे प्रमाण आहे.

🔸जगातले 54 टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र केवळ रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन या पाच देशांमध्ये आहे.

🔸खडानुसार आकडेवारीनुसार, वर्ष 2010 ते वर्ष 2020 या कालावधीत आफ्रिकेमध्ये सर्वाधिक जंगलतोड झाली, ज्याचा दर वार्षिक 3.9 दशलक्ष हेक्टर एवढा होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण अमेरिकेचा (2.6 दशलक्ष हेक्टर) क्रमांक लागतो. या काळातच आशिय, ओशनिया आणि युरोप यात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले.

अम्फान चक्रीवादळ



◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

◾️दशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

◾️शनिवारी (१६ मे २०२०)
अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

◾️याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

◾️बगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

◾️काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल


◾️कद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता  आहे.

◾️रशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

◾️आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

◾️तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं.

◾️रशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.

◾️सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

पेशी


__________________________________
            🔰 आदिकेंद्रकी पेशी 🔰
__________________________________
◾️ सपष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात

◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात

◾️या पेशीतील केंद्रकांच्या मध्ये आवरण नसते व  पेशींच्या मध्ये एकच गुणसूत्रांची जोडी असते

◾️यामध्ये तंतुकणिका नसतात परंतु परंतु रायबोझोम चे कण असतात

📌 उदाहरण जिवाणू ,सायानोबॅक्टरिया ,मायक्रोप्लाजमा
__________________________________
.             🔰दृश्यकेंद्रकी पेशी 🔰
__________________________________
◾️या पेशींच्या मध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगके असतात त्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात

◾️दश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठे असतात यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र व केंद्र की द्रव असते

◾️या पेशी मध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असतात

◾️या पेशी अति विकसित असतात

📌उदाहरणत आमीबा , स्पायरोगायरा, वनस्पती , प्राणी
 
___________________________________

Current Affairs Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...