Friday, 14 August 2020

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कोकण किनारपट्टी

🅾महाराष्ट्र पच्छिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. तर पश्चिमेस अरबी पसरलेला आहे.

🅾 सह्यान्द्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात.

🧩कोकणची निर्मिती.

🅾महाराष्ट्रच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली.
तसेच मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली गेली असावी. म्हणजेच किनाऱ्याचे निमज्जन (खचणे) झालेले आहे.

🅾ज्वालामुखी क्रियेचे अवषेस गरम पाण्याच्या रूपाने आढळतात. उदा वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० कि मी उत्तरेस डहाणूपासून वेगुर्ल्यापर्यंत उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत त्याचा विस्तार आहे.

🅾सरासरी रुंदी ३० ते ६० कि मी आहे. उत्तरेस काही भागात किनारपट्टी ९० ते ९५ कि मी रुंद आहे. कोकणचे भोगोलिक क्षेत्रफळ सुमारे ३०३९४ चौ.कि.मी आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠कोकणची प्राकृतिक रचना.💠💠

🅾कोकणचा सर्वच भाग हा म्हणजे एक सलग भाग मैदान नाही. हा डोंगरदऱ्यानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.

🅾किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्यांद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे२५० मीटरपर्यंत वाढते.प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे.

🅾पश्चिमेस अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची फार कमी आहे.

🅾खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे. त्याला (वलाटी) असे म्हणतात. या प्रदेशाची उंची २७५ ते ३०० मीटरपर्यंत आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠खाडी.💠💠

🅾भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात.

🅾मुंबईच्या उत्तरेस दातिवरे व वसईची खाडी आहे. तर वसईच्या दक्षिणेस जयगडपर्यत धरमतर, राजकोट, बाणकोट, दाभोळ व जयगडच्या खाड्या आहेत.

🅾 दक्षिणेस विजयदुर्गची खाडी कार्लीची खाडी व कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे.

🅾कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावरील खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सागरी किल्ले .💠💠

🅾 वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, आणि सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले आहेत.

💠💠बंदरे 💠💠

🅾 महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई हे एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई ताण कमी करण्याच्या दृष्टीने न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

देश आणि देशांची चलने

🧩जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत

🅾अफगाणिस्तान - अफगाणी

🅾आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

🅾ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

🅾र्जॉडन - दिनार

🅾ऑस्ट्रिया - शिलींग

🅾इटली - लिरा

🅾बोटसवाना - रॅंड

🅾कुवेत - दिनार

🅾बंगलादेश - टका

🅾जपान - येन

🅾बेल्जियम - फ्रॅंक

🅾केनिया - शिलींग

🅾बुरुंडी - फ्रॅंक

🅾लिबिया - दिनार

🅾ब्रिटन - पौंड

🅾लेबनॉन - पौंड

🅾बर्मा - कॅट

🅾नेदरलॅंड - गिल्डर

🅾क्युबा - पेसो

🅾मेक्सिको - पेसो

🅾कॅनडा - डॉलर

🅾नेपाळ - रुपया

🅾सायप्रस - पौंड

🅾पाकिस्तान - रुपया

🅾चीन युआन

🅾न्यूझीलंड - डॉलर

🅾झेकोस्लाव्हिया - क्रोन

🅾पेरु - सोल

🅾डेन्मार्क - क्लोनर

🅾नायजेरिया - पौंड

🅾फिनलॅंड - मार्क

🅾फिलिपाईन्स - पेसो

🅾इथोपिया - बीर

🅾नॉर्वे - क्लोनर

🅾फ्रान्स - फ्रॅंक

🅾पोलंड - ज्लोटी

🅾घाना - न्युकेडी

🅾पनामा - बल्बोआ

🅾जर्मनी - मार्क

🅾पोर्तुगाल - एस्कुडो

🅾गियान - डॉलर

🅾रुमानिया - लेवू

🅾ग्रीस - ड्रॅक्मा

🅾सॅल्वेडॉर - कॉलन

🅾होंडुरा - लेंपिरा

🅾सौदी अरेबिया - रियाल

🅾भारत - रुपया

🅾सोमालिया - शिलींग

🅾युगोस्लाव्हिया - दिनार

🅾सिंगापुर - डॉलर

🅾आइसलॅंड - क्रोन

🅾स्पेन - पेसेटा

🅾इराक - दिनार

🅾साउथ आफ्रिका - रॅंड

🅾इंडोनेशिया - रुपिया

🅾श्रीलंका - रुपया

🅾इस्त्रायल - शेकेल

🅾सुदान - पौंड

🅾इराण - दिनार

🅾स्वित्झर्लंड - फ्रॅंक

🅾जमैका - डॉलर

🅾स्वीडन - क्रोन

🅾सिरिया - पौंड

🅾टांझानिया - शिलींग

🅾थायलंड - बाहत

🅾टुनीशीया - दिनार

🅾युगांडा - शिलींग

🅾यु.के. - पौंड

🅾त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

🅾टर्की - लिरा

🅾रशिया - रूबल

🅾अमेरीका - डॉलर

🅾युनायटेड अरब प्रजासत्ताक

🅾व्हिएतनाम - दौग

🅾झांबीया - क्वाच्छ

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

वाचा :- भारतातील पहिले

🅾 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ

🧩 कोची

🅾देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ

🧩बदलापूर

🅾राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ

🧩 पुणे

🅾देशातील पहिले वाय-फाय गाव

🧩 पाचगाव (महाराष्ट्र)

🅾जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले  ई-लर्निंग' तालुके

🧩 भूम - परंडा

🅾देशातील  पहिले  वायफाय रेल्वे स्टेशन

🧩 बेगलरु

🅾देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ

🧩 अंदल (प. बंगाल)

🅾देशातील पहिले सॅटेलाईट शहर

🧩 पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*

🅾देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर

🧩 कोहिमा

🅾डीजीटल लॉकर सुरु करणारी  देशातील पहिली नगरपालिका

🧩 राहुरी

🅾विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात  सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी

🧩 अहमदाबाद

🅾मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने  तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव

🧩हरिसाल

🅾मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका

🧩 इस्लामपूर

🅾भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर

🧩चंदीगड

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...