Wednesday, 12 August 2020

कार्बन सायकल



🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃


कार्बन सायकल डायग्राम. काळ्या संख्या कोट्यवधी टन मध्ये दर्शविते की विविध जलाशयांमध्ये किती कार्बन साठवला जातो ("जीटीसी" कार्बन गिगाटन्स आणि 2004 च्या आकडेवारीचा संदर्भ देतो).

खोल निळे संख्या प्रत्येक वर्षी जलाशयांमध्ये किती कार्बन चालवते हे दर्शवितात.

या चित्रात वर्णन केल्यानुसार औदासिन्यामध्ये carbon 70 दशलक्ष जीटीसी कार्बोनेट रॉक आणि किरोजेन नाही.

कार्बन सायकल biogeochemical चक्र ज्या कार्बन मध्ये biosphere , Mridamondl , geosphere , hydrosphere आणि पृथ्वी च्या वातावरण बदलू आहे. हे पृथ्वीच्या सर्वात महत्वाच्या चक्रांपैकी एक आहे आणि जैवमंडळासह त्याच्या सर्व जीवांसह [ उद्धरण आवश्यक ] कार्बनचे पुनर्चक्रण आणि पुनर्वापर करण्याची परवानगी देते .

सुरुवातीस कार्बन सायकल जोसेफ प्रिस्ले आणि अँटॉइन लाव्होइझियर यांनी शोधून काढला आणि हम्फ्रे डेव्हि द्वारा प्रस्तावित केले गेले. [१] आता सामान्यत: विनिमय मार्गांनी जोडलेले मुख्य पाच कार्बन साठ्यांपैकी एक म्हणून मानले जाते .

रबेला




🌺रबेला , ज्याला जर्मन गोवर किंवा तीन दिवस गोवर देखील म्हणतात , [5] रुबेला व्हायरसमुळे होणारी एक संक्रमण आहे .

🌺अर्धा लोक हा संसर्गग्रस्त आहेत याची त्यांना जाणीव नसतानाही हा रोग सौम्य असतो. पुरळ उठण्याच्या दोन आठवड्यांनंतर सुरू होते आणि तीन दिवस टिकते.

🌺ह सहसा चेहर्‍यावर सुरू होते आणि उर्वरित शरीरावर पसरते. [1] पुरळ कधी कधी आहे खाजून आणि या तेजस्वी म्हणून नाही गोवर .

🌺सजलेल्या लिम्फ नोड्स सामान्य आहेत आणि काही आठवडे टिकू शकतात. [१] ताप, घसा खवखवणे आणि थकवा देखील येऊ शकतो.

 🌺परौढांमध्ये सांध्यातील वेदना सामान्य आहे. [1] गुंतागुंत मध्ये रक्तस्त्राव समस्या, अंडकोष सूज आणि नसा जळजळ असू शकते .

🌺लवकर गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास जन्मजात रुबेला सिंड्रोम (सीआरएस) किंवा गर्भपात झालेल्या मुलास जन्म होऊ शकतो .

🌺 सीआरएसच्या लक्षणांमध्ये डोळ्यांसह मोतीबिंदू , कान , बहिरेपणा , हृदय आणि मेंदूसारख्या समस्यांचा समावेश आहे .

🌺 गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यानंतर समस्या क्वचितच आढळतात.

वक्र आरसा





🔷गोलाकार उत्तल मिररमधील प्रतिबिंब. छायाचित्रकार वरच्या उजव्या प्रतिबिंबित पाहिले आहे

🔷एक वक्र आरसा एक वक्र प्रतिबिंबित पृष्ठभाग एक आरसा आहे. पृष्ठभाग एकतर बहिर्गोल (बाहेरील फुगवटा) किंवा अवतल (अंतर्भागात रीसेस केलेले) असू शकते .

🔷 बहुतेक वक्र आरशांमध्ये पृष्ठभाग असतात ज्या गोलाच्या भागाप्रमाणे आकार घेत असतात, परंतु इतर आकार कधीकधी ऑप्टिकल उपकरणांमध्ये वापरतात.

🔷 सर्वात सामान्य नॉन गोलाकार प्रकार आहेत दृष्टांतासारखा reflectors जसे, ऑप्टिकल साधने आढळले दुर्बिणीला परावर्तित गोलाकार मिरर प्रणाली पासून, स्फेरिकल सारखे, प्रतिमा दूर वस्तू करणे आवश्यक आहे की दृष्टीकोनातून , ग्रस्त गोलीय विपथन .

🔷 मिरर्स विकृत करीत आहेकरमणुकीसाठी वापरले जाते. त्यांच्याकडे बहिर्गोल आणि अवतल प्रदेश आहेत जे मुद्दाम विकृत प्रतिमा तयार करतात.

🔷जव्हा वस्तू विशिष्ट अंतरावर ठेवली जाते तेव्हा ते अत्यधिक वर्धित किंवा अत्यंत कमी प्रतिमा देखील प्रदान करतात.

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे



1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

3. बल = वस्तुमान * त्वरण

4. गतिज ऊर्जा = 1/2mv2

5. स्थितीज ऊर्जा = mgh

6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार

14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ

15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)

16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2

17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ

18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ

19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट

20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता

21. ओहमचा नियम = I = V / R

22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल

23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार

शास्त्रीय उपकरणे व वापर



• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
-----------------------------------------------

परथिने ( Proteins )



प्रथिने हे अमिनोअम्लाच्या (amino acid ) शृंखलेने बनलेले असतात त्या श्रृंखलाना बहुवारिके ( polymers ) म्हणतात. त्यांच्यामध्ये बहुतकरुण C , H , O व N व सल्फर अणू असतात.

आपल्या शरीरात एकूण 21 अमिनो आम्ल असतात परंतु त्यापैकी फक्त 20 अमीनो आम्ले वेगवेगळे प्रथिने तयार करण्या साठी लागतात.

जर एखाद्या पदार्थात प्रथिने आहे हे दर्शवायचे असेल तर त्यावर कॉपर सल्फेट व कॉस्टिक सोडयाचे थेंब टाकले असता जांभळा रंग तयार होईल.

 शरीरातील सर्व विकरे ( enzymes ) हे प्रथीनां पासून बनता.

शरीराच्या एकूण उर्जेच्या 10 ते 12 % ऊर्जा आपणास प्रथिनापासून मिळते.

1gm प्राथिना पासून 4 cal ऊर्जा मिळते.

 प्रथिनांच्या अभावाने 5 वर्षा खालील मुलांमध्ये कुपोषण विकार जडतो. उदा. सुकटी , सुजवटी

पशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला?



जपानचे योशिनोरी ओसुमी हे संशोधनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी त्यांनी पेशींच्या स्वभक्षणावर संशोधनासाठी १९८८ मध्ये वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. मानवी शरीरात लायसोसोम नावाचा जो भाग असतो त्यातील ऑरगॅनेलीत प्रथिनांचा ऱ्हास कसा होतो, याचा शोध घेताना त्यांनी यिस्टच्या पेशींचा अभ्यास केला. मानवी शरीरातील पेशींचा मृत्यू व नवीन पेशी निर्माण होणे या प्रक्रियेत बिघाड झाला तर अनेक रोग होतात.

पेशींची आत्महत्या किंवा स्वनाश होतो पण यातही खराब पेशीतील काही भाग काढून ते लायसोसोमकडे फेरवापरासाठी पाठवले जातात. यिस्टच्या पेशी इतक्या लहान असतात की सूक्ष्मदर्शकातूनही ही प्रक्रिया उलगडणे शक्य नव्हते त्यामुळे ओसुमी यांनी नवीन युक्ती करताना यिस्टमधील व्हॅकुलीच्या प्रथिन ऱ्हासाची प्रक्रिया प्रथम बिघडवली व त्याचा परिणाम पेशींचे स्वभक्षण म्हणजे ऑटोफॅगीवर काय होतो ते तपासले. यिस्टच्या पेशीत उत्परिवर्तन करून त्यांच्यातील ऑटोफॅगी प्रक्रिया थांबवून परिणाम तपासले. त्यानंतर व्हॅक्युओलीत ऱ्हास न झालेल्या प्रथिनांची म्हणजे व्हेसिकलची गर्दी झाली. या प्रक्रियेशी संबंधित जनुकेही त्यांनी शोधून काढली. त्याबाबतचा शोधनिबंध १९९२ मध्ये प्रसिद्ध झाला. १९५० मध्ये पेशींमधील ऑर्गनेलीचा शोध लागला होता. त्यात प्रथिने, कबरेदके व मेद यांना पचवणारी विकरे शोधली गेली होती. पेशीतील हे कार्य करणारा भाग म्हणजे लायसोसोम व तेथे पेशी नष्ट केल्या जातात किंवा ज्यात शक्य असेल तिथे दुरुस्त केल्या जातात. लायसोसोमच्या शोधासाठी बेल्जियमचे ख्रिस्तीयन द डय़ुव यांना १९७४ मध्ये वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

योशिनोरी ओशुमी हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे मायक्रोबायॉलॉजिस्ट असून त्यांचा जन्म १९४५ मध्ये जपानमधील फुकुओका येथे झाला. १९७४ मध्ये ते टोकियो विद्यापीठातून पीएच.डी. झाले. ते रसायनशास्त्राकडे वळले पण त्यात फार संधी नाही, असे समजल्याने ते रेणवीय जीवशास्त्राकडे वळले. त्यांना नोकरी नव्हती, मग त्यांनी एका विद्यापीठात उंदरातील बाह्य़पात्र फलनाचा अभ्यास केला. नंतर एकदम त्यांनी यिस्टच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या ज्या शोधाला नोबेल मिळाले. तो शोध त्यांनी वयाच्या ४३व्या वर्षी लावला होता. आता ते टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक आहेत. पेशींचा स्वनाश तसेच त्यांच्या काही भागांचा फेरवापर शरीरात कसा होतो हे त्यांनी यिस्टवरील संशोधनातून सिद्ध केले आहे. ऑटोफॅगी प्रक्रिया बिघडण्यास कारण ठरणारी जनुकेही त्यांनी शोधली, हे मोठे आव्हानात्मक काम होते. लायसोसोमवरील संशोधन त्यांनी निर्णायक पातळीवर नेले. ते वैद्यकशास्त्रात नोबेल मिळवणारे जपानचे सहावे संशोधक आहेत. आतापर्यंत जपानच्या २३ जणांना विविध शाखांत नोबेल मिळाले आहे.

महत्वाच्या संज्ञा




*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*

 लाल - क्युप्रस ऑक्साइड

निळा - कोबाल्ट ऑक्साइड

हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड

जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड

पिवळा - अॅटीमनी सल्फाइड

दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट

*समीश्रे - घटक*

 पितळ - तांबे+जस्त

ब्रांझ - तांबे+कथिल

अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम

जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल

गनमेटल - तांबे+जस्त+कथिल

ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम

मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम

स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन

नायक्रोम -    लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज

*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*

 मार्श गॅस - मिथेन           

 खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट

धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट

मीठ - सोडीयम क्लोराइड

व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट

ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट

ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट

जलकाच -    सोडीयम सिलिकेट

फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड

जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट

ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट

बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट

फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट

ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट

संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट

मोरचूद - कॉपर सल्फेट

रडार




रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग

💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```

💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे
आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने  परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```

💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```

💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात
या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```

💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```

💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते
आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```

मिठ ( NaCl )


उपयोग -
मिठाचा जर योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते.

१. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते.
२. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात.
३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते.
४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दुष्परिणाम -
१. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतडय़ातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते.
२. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वाग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतडय़ामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.

संगणकाविषयी माहिती भाग :



DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन
 
SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान
 
SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया
 
CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर
 
CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002
 
ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा
 
सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट
 
नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू
 
सी-डॅक चे मुख्यालय - पुणे
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई
 
'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद
 
संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80
 
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका
 
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक
 
रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन
 
नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा
 
डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन
 
बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर
 
ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत



💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

🌀 1. सत्व - अ

💢शास्त्रीय नांव - रेटीनॉल

💢उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

💢अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा

💢सत्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌀 2. सत्व - ब1

💢शास्त्रीय नांव - थायमिन

💢उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य

💢अभावी होणारे आजार - बेरीबेरी

💢सत्रोत - धन्य, यीस्ट, यकृत,

🌀 3. सत्व- ब2

💢शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन

💢उपयोग - चयापचय क्रियेकरिता

💢अभावी होणारे आजार - पेलाग्रा

💢सत्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🌀4. सत्व - ब3
💢शास्त्रीय नांव - नायसीन

💢उपयोग - त्वचा व केस

💢अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे

💢सत्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🌀5. सत्व - ब6
💢शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन

💢उपयोग - रक्त संवर्धनाकरिता

💢अभावी होणारे आजार - अॅनामिया

💢सत्रोत - यकृत व पालेभाज्या


🌀6. सत्व - ब10
💢शास्त्रीय नांव - फॉलीक

💢उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

💢अभावी होणारे आजार - अॅनामिया

💢सत्रोत - यकृत


🌀7. सत्व - क
💢शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड

💢उपयोग - दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता

💢अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे

💢सत्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


8. सत्व - ड
💢शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल

💢उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

💢अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

💢सत्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🌀9. सत्व - इ
💢शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल

💢उपयोग - योग्य प्रजननासाठी

💢अभावी होणारे आजार - वांझपणा

💢सत्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🌀10. सत्व- के

💢शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान

💢उपयोग - रक्त गोठण्यास मदत

💢अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही

💢सत्रोत - पालेभाज्या व कोबी

जळू (Leech, Hirudinea)



मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत.
पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या.
पाण्यात "जळू" असू शकतो

*जळू कसा दिसतो?*
अळई सारखा पण रंग काळा.
🐛
आकार 🍾 असा असतो.
Size - 5-6 सेंटीमीटर

*जळू काय करतो?*
नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section cha cut deto.
 त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो
1) Anesthetic = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.
2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.

नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).
जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.

ज्याला  जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.

*जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे=*
त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.

जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी =
1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.
2) Vinegar
3) साबणीचे पाणी
4) लिम्बू पाणी
5) Few carbonated कोल्ड ड्रिंक
6) Alcohol

*जळू पडल्यानंतर काय करावे=*
जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते.
हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.

जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी.
जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.

पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.

शक्ती




कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.

कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.

केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.

गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.

शक्ती (P) = कार्य/काल = w/t

शक्तीचे एकक=>

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

1 वॅट = 1 ज्युल/सेकंद

1 किलोवॅट = 1000 वॅट

औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.

1 अश्वशक्ती = 746 वॅट

व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.

1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.

1 Kwhr = 1 Kw × 1 hr

= 1000w × 3600 s

= 3.6 × 106 Joules

घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

तरास लेप्टोस्पायरोसिसचा:



    आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे.

संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी आणि अँटीबायोटिक्सच्या सहाय्याने, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण काही अंशी अटोक्यात आणण्यास यश आलं आहे. मात्र आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (Zoonotic म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे.

 लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणू (Bacteria) पासून तो होतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी (Mammals) जसे, उंदीर, मांजर, कुत्री, गाय, डुक्कर इत्यादीमध्ये ससंर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मूत्र (Urine) वाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायराचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधीत झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसंच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतून (Mucosa) देखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात.

सर्वाधिक धोका कोठे ?

लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेलं पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसंच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती (उदा. वेटिरिनरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील या आजाराचा धोका अधिक असतो.

आजाराची लक्षणं :
रूग्णास फ्ल्यू सदृष्य आजाराची लक्षणं दिसून येतात. जसं ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोक दुखी, स्नायूंचं दुखणं, डोळे लाल होणं इत्यादी. बरेच रूग्ण एखाद्या आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरं वाटल्यावर पुन्हा लक्षणं सुरू होतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि Multisystem Involvement मुळे रूग्ण दगावू शकतो.

या अवयवांना बाधा होऊ शकते :
 यकृत (Liver) : कावीळीची लक्षणं दिसतात मूत्रपिंड (Kidney) : मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामी होऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तात्पुरतं डायलेसीस करावं लागू शकतं. फुप्फुस : फुप्फुसाला बाधा झाल्यास, रूग्णास खोकला, छातीत दुखणं व खोकल्यातून रक्त येऊ शकते. श्वासोच्छश्वासाच्या त्रासासारखी गंभीर समस्या उद्भवून कृत्रिम श्वासोच्छश्वासाचे यंत्राची रूग्णास गरज भासू शकते. तसंच रक्तातील पेशी कमी होऊन अंगावर लाल ठिपके अथवा लाल-काळे चट्टे उमटू शकतात. नाकातोंडातून अथवा लघवीद्वारे रक्तस्त्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणं, लेप्टोस्पायरोसिस या विशिष्ट आजाराची नसल्यामुळे डेंग्यू किंवा कॉम्प्लिकेटेड मलेरिया, इत्यादी आजार असल्याची संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते.

निदान :
लेप्टोस्पायरोसिसच्या जिवाणूंविरूद्ध शरिरातील अँटिबॉडिज (Antibodies) ची चाचणी ELISA, MAT किंवा PCR टेस्टे द्वारे करून लेप्टोस्पायरोसिसचे निदान करता येते. * तसंच लिव्हर आणि किडणी या चाचण्या (lft, rft) सी.बी.सी, एक्स-रे या द्वारे निदान करण्यास मदत होऊ शकते.

उपचार :
सौम्य स्वरूपाचा आजार असल्यास बाह्य रूग्ण विभागातून गोळ्या-औषध घेणं आणि गुंतागुंतीच्या वरील नमूद केलेल्या लक्षणांबद्दल सतर्क राहाणं तसंच डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार करणं गरजेचं आहे.

प्रतिबंध :
लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणं, साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करणं टाळणं, विशेषतः पायास जखम असल्यास. लेप्टोस्पायरोसिसची साथ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने Doxycycline 200 mg आठवड्यातून एक टॅबलेट घेतल्यास काही प्रमाणात संरक्षण मिळू शकेल.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी :



नैसर्गिक साधनस्त्रोत :

अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते.)

हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

 इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

 समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

 उतारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच नालाबंर्डिंग असे म्हणतात.

 २० ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

 वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्‍या वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

 डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.
 संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई ५० ली.

 पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

 पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

 २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

 वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

 अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

 विशिष्ठ व्स्तुमानाच्या पदार्थाचे तापमान १ C ने वाढविण्यास लागणार्‍या उष्णतेला त्या पदार्थाची उष्माधारकता म्हणतात.

 १ कि.ग्रॅ. पदार्थाचे तापमान १ C ने वाढविण्यास लागणार्‍या उष्णतेचा विशिष्ठ उष्मा असे म्हणतात.

 १ कि.ग्रॅ. पाण्याचे तापमान १ C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता १ कि.कॅलरी होय.

 १ ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान १ C ने वाढण्यास लागणारी उष्णता १ कॅलरी होय.

 वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते. भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला पायरोमीटर म्हणतात.

 आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

 अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

 सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

 समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला उती असे म्हणतात.

 उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.

 ठराविक काम एकत्रितपणे करणार्‍या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात.

 प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस अधिवास म्हणतात.

 एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.

 कालिका पासून होणार्‍या प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)

 पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.
 पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला परागण असे म्हणतात.

 अंड्यात वाढणार्‍या जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.

 सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.

 हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्‍या    रक्तवाहिन्यांना धमण्या म्हणतात.

 शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात.

 धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना केशिका म्हणतात.

 अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.

 अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.

 अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.

 मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला अणू म्हणतात.

 पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात-ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

 रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.

 २०Hz ते २०००० Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात.

 अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.

 २० C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे ३४० m/s असतो.

 प्रकाशाचा वेग सुमारे ३ × १० ^८ m/s एवढा आहे.

 अँबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात.

 काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.

 एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.

 आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.

 छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.

 स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.

 शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.

 प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.

 प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

 आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल

MPSC Science, [07.07.16 17:55]
(DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

 ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

 कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

 फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

 लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

 आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

 आपल्या मानेत असणार्‍या अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

 प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्‍या रासायनिक पदार्थांना संप्रेरके म्हणतात.

 जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

 किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

 आम्ल –    चवीला आंबट असतात. H हा मुख्य घटक असतो.

आम्लाच्या द्रावणात नीळा लिटमस लाल होतो.

आम्लारी -चवीला तुरट असतात. OH हा मुख्य घटक असतो.

आम्लारीच्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो.

दर्शके -एखादा पदार्थ आम्ल किंवा आम्लारी हे ओळखण्यासाठीवापरण्यात येणारे पदार्थ. उदा. लिटमस, हळद, मिथिलऑरेंज, फिनोल्फ्थॅलिन.     

निसर्गात आढळणारे दर्शक – लिटमस, हळद

लिटमस हा दर्शक लायकेन वनस्पतीपासून मिळवतात.

पाण्यात विरघळणारर्‍या आम्लरींना अल्कली म्हणतात.

 लिंबू, संत्री, मोसंबी, या फळात सायट्रिक अॅसिड असते.

 जेव्हा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत चुनकळी टाकतात. जर जमीन आम्लारीधर्मी असेल तर जमिनीत सेंद्रिय द्रव्ये मिसळतात.

 ४ C ला पाण्याची घनता महत्तम असते.

 जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

 लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.

रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.

 थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता   दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

 गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना थर्मोवेयर म्हणतात.

 उष्णतेचे सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ. 

उष्णतेचे दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.

 रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया रक्त पराधन होय.

 रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.

वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला डायलेसिस (व्याष्लेषण) म्हणतात.

 बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

 आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

 कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

 परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

 जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

 विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

 हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

 आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ - पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.   
                 
 – तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.

 – पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.

– जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.                           

– पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते.

 प्रथिने –    तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात.   
                                 
 - विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

 स्निग्ध पदार्थ -   तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.       
               
 -  स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

 पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 रेफ्रीजरेटरमध्ये 5℃ च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते.

 मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.

 चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेसंस्था असे दोन गट पडतात

MPSC Science, [07.07.16 17:55]
.

 मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.

 चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.

 चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.

 शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.

 चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

 काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.

 अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क, पाईनी, हृदोधिष्ठ.

 सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.

 पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना अल्कली म्हणतात.

 सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.

 उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.

 जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट (NaNO३) आणि सोडीयम सल्फेट (Na२SO४) ही उदासिन क्षारांची उदाहरण आहेत.

 दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.

सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी) :



शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.
____________________________________

बलॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो?



मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया.

▪️बलॅक बॉक्स म्हणजे काय?

एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.

▪️बलॅक बॉक्सची वैशिष्ट्ये:

नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.

▪️अपघाताचे कारण जाणण्यासाठी उपयुक्त

ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.

▪️बलॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश

विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात  नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं.

▪️बलॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?

ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅण्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्याने कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.

सशोधक व त्यांनी लावलेले शोध



क्र.      शोध                  संशोधक

1. सापेक्षता सिद्धांत :-- आईन्स्टाईन

2. गुरुत्वाकर्षण.      :-- न्यूटन

3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट :-- आईन्स्टाईन

4. किरणोत्सारिता हेन्री :-- बेक्वेरेल

5. क्ष-किरण विल्यम :-- रॉटजेन

6. डायनामाईट :-- अल्फ्रेड नोबेल

7. अणुबॉम्ब. :--  ऑटो हान

8. प्ंजा सिद्धांत :-- मॅक्स प्लॅक

9. विशिष्टगुरुत्व :-- आर्किमिडीज

10. लेसऱ  :-- टी.एच.मॅमन

11. रेडिअम :+-- मेरी क्युरी व पेरी क्यूरी

12. न्युट्रॉन :-- जेम्स चॅड्विक

13. इलेक्ट्रॉन :-- थॉम्पसन

14. प्रोटॉन :-- रुदरफोर्ड

15. ऑक्सीजन :-- लॅव्हासिए

16. नायट्रोजन :-- डॅनियल रुदरफोर्ड

17. कार्बनडाय ऑक्साइड :-- रॉन   हेलमॉड

18. हायड्रोजन :-- हेन्री कॅव्हेंडिश

19. विमान :-- राईट बंधू

20. रेडिओ :-- जी.मार्कोनी

21. टेलिव्हिजन :-- जॉन बेअर्ड

22. विजेचा दिवा :-- थाॅमस एडीसन

24. डायनामो :-- मायकेल फॅराडे

25. रिव्होल्व्हर :-- सॅम्युअल कोल्ट

भारतीय क्षेपणास्त्रे



1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.

2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.

3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)

5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)

6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)

7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.

8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.

9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.

10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.

11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.

12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

"विषाणु द्वारे होणारे रोग(Trick)"



TRICK-"रेखा हमे हिट करके पोएचे (पीछे) छोड़ गई"

रे-रेबीज
खा-खसरा

ह-हर्पीस
में-मेनिनजाईटिस

हि-हिपेटाइटीस
ट-ट्रेकोमा 

"करके-silent"

पो-पोलियो
ए-एड्स
चे-चेचक (बड़ी माता)

छो-छोटी माता
ड-डेंगू ज्वर (पित्त ज्वर)

ग-गलसोध (mumps)
ई-इन्फ्लुन्ज़ा (स्वाइन फ्लू N1H1)


शास्त्रीय उपकरणे व वापर




• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.


करायोजेनिक इंजिन - criogenic engine


राज्यसेवा मुख्य परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात मागील वर्षात येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आधी बघू व त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन या अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित उदाहरण बघू.

🛰भस्थिर उपग्रह

भूस्थिर म्हणजेच जिओन्सिक्रोनस उपग्रह हे पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर स्थित असतात व ते पृथ्वीच्या गतीनुसार पृथ्वीसोबत फिरत असतात. हे भूस्थिर उपग्रह आपल्या नावाप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत एकाच स्थानावर स्थिर असतात. भारताने याच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. क्रायोजेनिक इंजिनाच्या माध्यमातून आता भारताने उपग्रह प्रक्षेपणात आपला झेंडा पृथ्वीबाहेर फडकवला आहे. यामुळे भारत क्रायोजेनिक क्लबचा सदस्य झाला.


🚀करायोजेनिक इंजिन

जीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते. भौतिकशास्त्रात अत्याधिक कमी तापमान निर्माण करणे व त्याचा वापर करणे यास क्रायोजनिक्स म्हणतात. जीएसएलव्हीच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला सुमारे ८०० सेकंदापर्यंत ढकलत नेहण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन म्हणून उणे २५३ सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशीत आहे. त्यामुळेच त्याला 'क्रायोजेनिक इंजिन' म्हणतात.


🚀करायोजेनिक क्लब

जगातील फारच मोजक्या देशांकडे क्रायोजेनिक इंजिनासारखे यान आहे. भारताने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवून अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स व चीन या देशांच्या पंक्तीमध्ये आपला समावेश पक्का केला.


⛽️चांगले इंधन

हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे चांगले इंधन वापरण्यात येत असल्यामुळे यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही खूपच चांगली ऊर्जा असते. त्यामुळे रॉकेट उड्डान अति वेगाने करणे शक्य होते. भारताच्या इंजिनाचे नाव CE-२० असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने त्याचे उत्पादन केले आहे. त्याची चाचणी 'इस्रो'चे ज्वलन सुविधा केंद्र महेंद्रगिरी येथे केली जाते.


🔹फायदे

क्रायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक बचत होणार आहे. पूर्वी भारताचे उपग्रह युरोपीय अंतराळ संस्थेच्या 'एरिअन' या प्रक्षेपकांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जात होते. भारताचा आता तो खर्च वाचणार आहे. क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचे प्रक्षेपण करणेही आता सोपे होणार आहे. मार्क-३सारखी भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम साकारणे शक्य होणार आहे. ही मानवी मोहिम २०२० ते २०२५ सालापर्यंत शक्य आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताचे जी-सॅट ६, जीएसएलव्ही-डी-५ने यशस्वी प्रक्षेपण करून दाखवले.


🚀करायोजेनिक पुढची आव्हाने

एखाद्या प्रयोगशाळेत क्रायोजेनिक इंजिनासाठी लागणारे कमी तापमान तयार करणे आणि द्रवरूप वायूत साठवणे शक्य असले तरी उपग्रहात त्याचा वापर करणे अवघड जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंना वेगवेगळ्या टाक्यामध्ये साठवून नंतर त्यांना एका पाइपद्वारे विशिष्ट कम्बशन चेंबरमध्ये आणणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-



१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
 वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
 वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६

मूलद्रव्ये व संज्ञा :


          अॅल्युमिनियम - A1

            बेरीअम - Ba

            कोबाल्ट - Co

            आयोडीन - I

           मॅग्नेशिअम - Mg

            मॅग्नीज - Mn

            निकेल - Ni

            फॉस्फरस - P

             रेडीअम - Ra

              सल्फर - S

              युरेनिअम - U

             झिंक - Zn

             चांदी - Ag

             सोने - Au

             तांबे - Cu

            लोखंड - Fe

             पारा - Hg

             शिसे - Pb

             कथिल - Sn

              टंगस्टन - W


ग्लोबल वॉर्मिंगचा वेग भविष्यात वाढणार

वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात जागतिक तापमानातही वाढ होत असल्याचे निरीक्षण एका अभ्यासातून मांडण्यात आले आहे. यासाठी ५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या तप्त वातावरणाची तुलना करण्यात आली आहे. काही नाही वाढणार, आजकाल लोकं एवढी झाडे लावतायेत की वातावरण सद्य परिस्थिती पेक्षा शुद्ध होईल.
सुमारे ४८ दशलक्ष ते ५६ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळाला 'अर्ली ओसीन' काळ म्हटले जात असून या कालावधीत जगभरात गेल्या ६६ दशलक्ष वर्षांतील सर्वाधिक तापमान होते, असे मानले जाते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या 'अर्ली ओसिन' कालावधीचा अभ्यास करून हे मत मांडले आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जसे वाढेल, त्यानुसार तापमानवाढीचा वेगही आतापेक्षा अधिक वाढणार आहे आणि ही नक्कीच आपल्यासाठी चांगली बातमी नाही, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी याआधी 'अर्ली ओसीन' या काळातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाशी याआधीही तुलना केली होती, मात्र तेव्हा त्यांना अशी चिंताजनक तापमानवाढ आढळली नव्हती. त्यांनी वातावरणअभ्यासाच्या तंत्रामध्ये बदल करून त्यात ढगांचे प्रमाण तपासण्याची पद्धत अवलंबल्यानंतर शास्त्रज्ञांना हा बदल आढळून आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणातील ढगांचे प्रकार आणि त्यांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि ढगांमुळे वातावरणावर उष्ण आणि शीत परिणाम होतात.

ढगांचा वातावरणातील बदलावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला असता, भविष्यात वातावरणातील बदल वाढून तापमानवाढ होणार असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. भूगर्भशास्त्रीय पुराव्यानुसार 'अर्ली ओसीन' काळात कार्बन डायऑक्साइडची पातळी प्रती एक दशलक्षमागे एक हजार होती (पीपीएम), ही पातळी सध्याच्या स्थितीत ४१२ आहे. कार्बन उत्सर्जनावर निर्बंध न आणल्यास ही पातळी सन २१०० पर्यंत १०००वर पोहोचेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रमाणित एकके व मापनपद्धती

· लांबी, वस्तुमान, काळ या तीन भौतिक राशी मूलभूत राशी समजल्या जातात. या मूलभूत राशीच्या मापनाच्या दोन पद्धती आहेत.

· सुरूवातीस जगभर ब्रिटिश मापन पद्धती व मेट्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमणात केला जाई. त्यानंतर 1790 पासून फ्रान्समध्ये मेट्रिक पद्धतीस सुरुवात झाली.

· 1960 सालापासून मेट्रिक पद्धतीचा जगभर वापर करण्यास सुरुवात झाली. या पद्धतीलाच सिस्टिम इंटरनॅशनल (IS) असे नाव देण्यात आले.

1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

· लांबी - फूट

· वस्तुमान - पौंड

· काळ - सेकंद
2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

· लांबी - सेंटीमीटर

· वस्तुमान - ग्रॅम

· काळ - सेकंद
3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

· लांबी - मीटर

· वस्तुमान - किलोग्रॅम

· काळ - सेकंद
4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

· लांबी - मीटर

· वस्तुमान - किलोग्रॅम

· काळ - सेकंद

आकाशगंगा :

· सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

· चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

· प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

· चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

· एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

· एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

·

· प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

· प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

· बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

· बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

· पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

· पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

· 'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

· सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

· गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

· शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

· शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

· धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

· हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

· भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

· त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

· ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.

· GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

· टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

· आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

· जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

चुंबकत्व :

· 5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

· चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

· मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   

वातावरणीय दाब :

· पृथ्वीभोवती हवेचे एक जाड आवरण आहे. त्यालाच वातावरण असे म्हणतात.

· पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर हवेचा दाब असतो. त्याला 'वातावरणीय दाब' असे म्हणतात.

· पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणार्यार हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा वातावरणीय दाब म्हणतात.

· हवेचा दाब दर्शविणार्याव उपकरणाला साधा हवा दाबमापी म्हणतात.

· समुद्रसपाटीवर हवादाबमापीच्या नळीमधील पार्या ची उंची 760 मीमी. असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर हवेचा दाब 760 मीमी.

· समुद्रसपाटीवरील हवेचा दाब प्रमाणदाब मानला जातो. तो 1 वातावरणदाब म्हणून गणला जातो.

· 760 मी मी. पार्यारच्या स्तंभाच्या वजनावरून समुद्रसपाटीवरील हवेचा दाब 101400 N/m2 एवढा भरतो.

· समुद्रसपाटीवरून जसजसे वर जावे तसतसे त्या जागेवरील हवेच्या स्तंभाची उंची कमी होते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.

· खूप उंचावर गेले की हवेचा दाब कमी झाल्याने दोन दाबातील फरक वाढतो. त्यामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

· ढोबळमानाने पाहिल्यास समुद्रसपाटीवरील हवेत समान दाबाचे आडवे पट्टेच तयार झाल्याचे दिसून येते.

· समुद्रसपाटीवर विषुववृत्ताजवळचा प्रदेश हा कमी वातावरणीय दाबाचा पट्टा आहे.

· 300 उत्तर आणि 300 दक्षिण या अक्षवृत्ताजवळ अधिक दाबाचे, तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवाजवळ कमी दाबाचे पट्टे आहेत.

· उत्तर दक्षिण ध्रुवाजवळ अधिक दाबाचे प्रदेश आहेत.

· तापमान बदलाबरोबरच हवेचा दाबही कमी जास्त होतो. जमीन सूर्याच्या उष्णतेने तापली की तेथील हवा तापून प्रसरण पावते. ती वरवर जाते. आजूबाजूला पसरते. तेथे हवेचा दाब कमी होतो. याउलट रात्री जमीन थंड झाल्यावर हवेचा दाब पारत वाढतो.

· दुपारी जमीनीवरील हवेचा दाब पाण्यावरच्या हवेच्या दाबापेक्षा कमी होतो. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात.

· सूर्यास्तानंतर जमीन लवकर थंड होतो. त्यामानाने समुद्रावरील हवा उष्ण राहते. म्हणून रात्री जमीनीवरील हवेचा दाब अधिक होतो. त्यामुळे मतलई वारे जमीनिकडून समुद्राकडे वाहतात.