Saturday, 8 August 2020

सर्व स्पर्धा परीक्षा IMP इतिहास प्रश्न


०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

A. लतिका घोष ✔
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी

०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह

०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग ✔
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब

०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?

A. १८४९
B. १८५१
C. १८५३ ✔
D. १८५४

०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?

A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर ✔

०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही ✔
D. वरीलपैकी एकही नाही

०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड ✔
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब

०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔
D. भारत कौन्सिल कायदा १८९२

१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

A. सहदरण आय्यपन
B. नारायण गुरु ✔
C. हृदयनाथ कुंजरू
D. टी.एम. नायर

१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

A. कथा
B. कादंबरी
C. काव्य
D. नाटक ✔

१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
D. वरील एकही नाही ✔

१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?

A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔

१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?

A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔
D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.

१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ?

A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔
B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
D. अखिल भारतीय किसान सभा

१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.

अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद
ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती
क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ
ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर

         अ)  ब)  क)  ड)
   A.   ४   ३    १    २
   B.   ४   ३    २    १ ✔
   C.   १   २   ३    ४
   D.   २   १   ४    ३

१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?

A. जी.बी.वालंगकर
B. ज्योतिबा फुले
C. वरील दोघांचाही ✔
D. वरील कोणाचाही नाही

१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ?

A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D. वरीलपैकी एकही नाही

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
: राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
: सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
: तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
: मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक बँक

● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
: सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
: आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
: पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
: 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
: पंजाब

आजच्याच दिवशी कलकत्त्यातील टाऊन हॉल येथून स्वदेशी आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली होती...

🔸7 जुलै 1905 रोजी सिमला येथून लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली.

🔸19 जुलै- सरकारने अधिकृतरीत्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🔸20 जुलै-बंगालचे विभाजन दोन भागात करण्यात आले.

🔸7 ऑगस्ट-फाळणी अंमलात येण्याच्या आधीच देशभरात वंगभंग व स्वदेशी चळवळ सुरू.

🔸16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली व बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.

🔸बंगाल प्रांताच्या विभाजनाची जबाबदारी ही पूर्णत: कर्झनची असली तरी मूळ कल्पना मात्र त्याची नव्हती.

👉सदरील फाळणीची योजना ही विल्यम वार्ड कल्पनेनुसार बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रयू फ्रेजर (फाळणीच्या योजनेचा जनक) याने आखली होती...

🔸फाळणीचे कारण काय दर्शविले- प्रशासकीय सीमांचे पुननिर्धारण...

🔸 फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुसऱ्या आयर्लंडमध्ये होईल असा इशारा निसंदिग्ध शब्दात कृष्णकुमार मित्रा यांनी 'संजीवनी' मधून दिला.

🔸ही स्वदेशी चळवळ प्रामुख्याने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आली.

🔸जमीनदार,शेतकरी,कामगार,स्त्रिया,विद्यार्थी हा वर्ग या चळवळीत सहभागी झाला परंतु या चळवळीची उणीव म्हणजे यात मुस्लिम गटाचा विशेष करून मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही.

वंगभंग आंदोलन-
🔸16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून पाळला.स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.

🔸बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील 'वंदे मातरम' हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा वर बहिष्कार टाकला.

🔸डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांनी 'बंगाल केमिकल्स' हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

🔸या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी,कृष्णकुमार मित्रा (संजीवनी वृत्तपत्राचे संपादक),आनंद मोहन बोस,गुरुदास बॅनर्जी,रवींद्रनाथ टागोर यांनी केले.

🔸महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेनेही या चळवळीत साथ दिली.
🔸1905 च्या बनारस अधिवेशनात (अध्यक्ष-गोखले) बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध.

🔸1906 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असल्याचे सांगत स्वराज,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यास मंजुरी दिली.
अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी 'चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा' असा संदेश दिला.

👉बंगालची फाळणी रद्द करण्या संबंधीचा ठराव ढाक्याचा नवाब ख्वाजा आतिकुल्ला यांच्याकडून मांडला गेला.

🔸लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुञी कार्यक्रम भारतीयांना दिला.

🔸पुढे वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 (लक्षात ठेवायला सोप्प 😊 12-12-11) रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty)

◾️देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

🔰 निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

◾️दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.

🔰 राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

वारे व त्यांचे प्रकार

🔥दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. 

🔥दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात

🔥भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. 

🔥कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

❗️ गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties)

🔥 ४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना ‘गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties) असे म्हणतात. 

❗️ खवळलेले पन्‍नास’ (Furious Fifties)

🔥५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना यां ‘खवळलेले
पन्‍नास’ (Furious Fifties) म्हणतात.

❗️किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)

🔥६०°दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना यां ‘किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)म्हणतात.

वातावरणाचे थर -


वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते...

👉 वातावरणाचे मुख्य थर (प्रकार)

🔸तपांबर -भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर.याची सरासरी जाडी ११ किमी.या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात.पाऊस,वारे,ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात...

🔸तापस्तधी-तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय.उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते...

🔸स्थितांबर-तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय.या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण नसतात व हवा शुष्क असते...

🔸स्थितस्तब्धी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.या थरातील तापमान स्थिर असते.या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो.हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो...

🔸मध्यांबर-स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय.या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते...

🔸मध्यस्तब्धी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तब्धी होय...

🔸दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय.या थरात उंचीनुसार तापमान वाढते...

🔸आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे.या थरात उंचीनुसार तापमान वाढते.या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात...

🔸बाह्यांबर - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांबर होय.भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे.या थरातील विविध वायूंचे अणू,रेणू,पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात..

चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)

🌻भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

☂१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती.

☂त्यासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.

☂त्यामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता.

☂अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.

☂या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.

☂शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.

☂त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला

पॅनकार्डच्या 10 अंकांमध्ये बरीच महत्वाची माहिती दडलेली आहे,जाणून घ्या त्याचा अर्थ


📌  _पॅनकार्डमध्ये जन्माच्या तारखेच्या खाली 10-अंकी पॅन लिहिलेले असते. त्याची सुरूवात इंग्रजीतील काही मोठ्या अक्षरे ने केली जाते._

🔅 *पहिल्या तीन अंकी:*
आयकर विभागानुसार कोणत्याही पॅनचे पहिले तीन अंक इंग्रजी वर्णमाला मालिका दाखवतात. या वर्णमाला मालिकेत एएए ते झेडझेडझेड अशी कोणतीही तीन-अक्षरी इंग्रजी मालिका असू शकतात. याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे.

🔅 *पॅनचे चौथे पत्रः पॅनच्या चौथ्या पत्रात*
आयकर भरणाऱ्याची स्थिती दर्शविली जाते. चौथ्या क्रमांकावर पी असेल तर हे पॅन क्रमांक एका व्यक्तीचे वैयक्तिक साधन असल्याचे दर्शवते.

▪️F दर्शविते की संख्या एका फर्मची आहे.
▪️सी कंपनी दाखवते -एआरई
ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन
▪️टी टी-टीआरईएसटी-बडी
ऑफ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल-
एल लोकलमधून
▪️जे कृत्रिम न्यायिक व्यक्ती-
जी सरकारकडून.

🔅 *पॅनचा पाचवा अंक –* पॅनचा पाचवा अंकही
एक इंग्रजी पत्र आहे.

हे पॅनकार्ड धारकाच्या *आडनावाचे* पहिले अक्षर दर्शविते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे आडनाव जाधव  असेल तर पॅनचा पाचवा अंक जे.

🔅 *सहाव्या ते नवव्या अंकांच्या*
आडनावाचे पहिले अक्षर त्यानंतर चार अंकी असते. या संख्या 00001 ते 9999 दरम्यान कोणतेही चार अंक असू शकतात. या आकडेवारी त्या काळात चालू असलेल्या आयकर विभागाची मालिका दाखवते.

🔅 *दहावा अंक*
पॅनकार्डचा दहावा अंकही  एक इंग्रजी पत्र आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार तो एक अक्षराचा चेक अंक असू शकतो. हे ए ते झेड दरम्यानचे कोणतेही पत्र असू शकते.

इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे



🖍 हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.

🖍 तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.

🖍  इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.

🖍  सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
🖍   शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.

🖍   पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.

🖍  या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.

🖍   उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.

🖍   आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.

🖍   या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील 
अभाव होता.

🖍   कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...