नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२८ जुलै २०२०
फकीरांचे बंड
कालखंड :- इ.स. 1776 ते 1800
नेतृत्व :- मजनुन शहा, चिराग अली.
मुख्य ठिकाण :- उत्तर बंगाल, नेपाळमधील तराईचा प्रदेश
🖍 बंगालमधील मजनुन शहा नावाच्या फकीराने बंगालमधील फकीरांना एकत्रित करुन इंग्रजांच्या गोदामावर तसेच पोलिस ठाण्यांवर छापे मारण्यास सुरूवात केली व आपले केंद्र नेपाळच्या तराई भागात ठेवले.
🖍 मजनुन शहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा चिराग अलीने उत्तर बंगालमध्येब्रिटिशांविरुध्द लढा सुरूच ठेवला.
🖍 इंग्रजांनी शेतकऱ्यांना जादा सारा लावून त्यांची पिळवणूक केल्यामुळे महसूल अधिकारी, पोलीस यांच्याशी त्यांच्या नेहमी चकमकी चालत असे.
🖍 या इंग्रजांविरोधी लढ्यात राजपूत देखील सामील असे व भवानी पाठक, देवी चौधुराणी हे त्यांचे सहकारी होत.
सन्याशांचे बंड
कालखंड :- इ.स. 1763 ते 1800
🖍 इंग्रजांनी भारतात अापली सत्ता प्रथम बंगालमध्ये स्थापन केल्यामुळे इंग्रजांविरोधी उठाव देखील प्रथम बंगाल व नंतर बिहार, ओरीसा या भागात झाले.
🖍 बंगालमधील सन्याशी हे गिरी संप्रदायाचे असून मूळ शंकराचाऱ्यांचे अनुयायी व लढावू वृत्तीचे लोक होते.
🖍 मी कासीमच्या वतीने बक्सारच्या लढाईत जवळपास 5000 सन्याशी इंग्रजांविरुध्द लढले होते.
🖍 हे लोक जमिनदारांच्या शेतीवर हल्ला करुन पिके लुटून नेणे तसेच सावकरांच्या घरांवर हल्ले करुन लुटमार करणे हे मुख्य काम करीत असे.
🖍 1763 पासून हे लोक इंग्रजांच्या ठाण्यांवर व व्यापारी केंद्रावरही हल्ले करुन पळून जात असत व सुमारे 1800 पर्यंत हा लढा चालला.
🖍 सन्याशांच्या या विध्वंसक हल्ल्यांमुळे इंग्रज अधिकारी देखील त्रस्त झाले होते.
🖍 बकीमचंद्र चॅटर्जींच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत या लढ्याचे चित्रण पहावयास मिळते.
महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच
१. भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल
२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?
१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन
३. अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर, बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?
१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅
५. जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल। १. पहिल्या अणु चाचणीचा जनक
ब. आँटो हाँन। २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी
क. एन्रिको फर्मी। ३. किरणोत्सारितेचा शोध
ड. ओपेनहायमर। ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध
१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३
६. भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?
१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर
७. राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?
१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून
८. जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?
१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर
९. भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?
१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९
१०. योग्य विधान निवडा :
१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.
११. जोड्या लावा :
अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर। १. बँगलोर
ब. इस्रो सँटलाईट सेंटर। २. अहमदाबाद
क. सतिष धवन स्पेस सेंटर। ३. थुंबा
ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर। ४. श्रीहरीकोटा
१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१
१२. पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?
१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज
१३. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?
१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे
१४. पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स
१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क
१५. 'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.
1) नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण....... या पर्वतावर वसले आहे.
1) सहयाद्री
2) अरवली
3) सातपुडा✔️✔️
4) गावीलगड
2) देशातील 12 ज्योतीर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे?
1) 4
2) 5✔️✔️
3) 6
4) 7
3) राज्यात कोणत्या ठिकाणी उपगृह दळणवळण केंद्र आहे ?
1) आर्वी ✔️✔️
2) कोकण
3) विदर्भ
4) मराठवाडा
4) खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही?
1) वेरुळ
2) घृष्णेश्वर
3) पाणचक्की
4) लोणार✔️✔️
5). दौलताबाद किल्ल्याचे पुर्वीचे नाव काय ?
1) देवगिरी✔️✔️
2) अजिंठा
3) वैरुळ
4) खुलताबाद
चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे
● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: पॅट्रिक पिचेट
● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?
: स्वदेस
● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?
: व्ही. एन. दत्त
● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?
: उदय कोटक
● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?
: केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)
● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?
: अंटार्क्टिका
● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?
: भुटान
● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?
: आयुष मंत्रालय
● 2020 सालाचे 'ख्रिस्तोफ मेरीयूक्स पारितोषिक' कोणत्या शास्त्रज्ञाला देण्यात आले?
: कुरैशा अब्दुल करीम
● ‘स्पंदन मोहीम’ कोणत्या राज्याच्या पोलीसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे?
: छत्तीसगड
● ‘नगर वन’ योजनेच्या अंतर्गत किती शहरी वने उभारण्यात येणार आहे?
: 200
● “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम चालविण्यासाठी कोणत्या संस्थेनी EESL सोबत भागीदारी केली आहे?
: USAID
● कोणत्या संस्थेनी नाविन्यपूर्णतेच्या संवर्धनासाठी अटल नाविन्यता अभियान (AIM) सोबत इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)
● पाण्यातून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेनी कमी खर्चीक कॅटालिस्ट विकसित केले?
: सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS)
● ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (PIDF) कोणत्या संस्थेनी तयार केला?
: भारतीय रिझर्व्ह बँक
● ‘आय कमीट’ मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे?
: वीज मंत्रालय
● ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा कोणत्या वनाला प्रदान करण्यात आला?
: ‘पोबा’ (आसाम)
● “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल कोणती कंपनी बांधणार आहे?
: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.)
● "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे कोणी अनावरण केले?
: पेमा खंडू, अरुणाचल मुख्यमंत्री
● कोणत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला?
: सायबर गुन्हे
● खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?
: हरसिमरत कौर बादल, केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री
● ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे.
: कतार
● ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून कोणत्या योजनेला ओळखले जाते?
: 'एअर बबल'
● दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
: श्रीपाद येसो नाईक
महाराष्ट्रातील घाट
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर
वाचा :- भारतातील पहिले
🚦 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ
➖ कोची
🚦देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ
➖ बदलापूर
🚦राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ
➖ पुणे
🚦देशातील पहिले वाय-फाय गाव
➖ पाचगाव (महाराष्ट्र)
🚦जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले ई-लर्निंग' तालुके
➖ भूम - परंडा
🚦देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन
➖ बेगलरु
🚦देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ
➖ अंदल (प. बंगाल)
🚦देशातील पहिले सॅटेलाईट शहर
➖ पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*
🚦देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर
➖ कोहिमा
🚦डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका
➖ राहुरी
🚦विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी
➖ अहमदाबाद
🚦मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव
➖हरिसाल
🚦मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका
➖ इस्लामपूर
🚦भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर
➖चंदीगड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप.
🔰भूशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण केले.
🔰ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा चमू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी संयुक्तपणे या अॅपची रचना केली आहे.
🔰तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी तयार केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापर करू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.
🔴मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः
🔰वर्तमान हवामान - 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.
🔰नाऊकास्ट - IMDच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातल्या घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल दर तीन तासांनी इशारा देणे. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.
🔰शहरासाठीचा अंदाज - भारतातल्या सुमारे 450 शहरांमध्ये गेल्या 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज उपलब्ध आहे.
🔰इशारा - नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल-गंभीर परिस्थिती, नारिंगी- सावधगिरी व पिवळा- सूचना) इशारा दिला जाऊ शकतो.रडार उत्पादने - दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.
कलाम यांचे स्फूर्तिदायक विचार
१) आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
२) देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
३) तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
४) जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
५) यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
६) यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.
७) स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
८) एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
९) आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.
१०) स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
११) संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
१२) य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
भारत अमेरिकेकडून लवकरच विकत घेणार सर्वात घातक प्रीडेटर बी ड्रोन, P-8I ची खरेदी प्रक्रिया सुरु
🔰भारताने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली पोसी़डॉन P-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचबरोबर शस्त्रसज्ज प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही योजना आहे. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल बरोबरच्या शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराला गती दिली आहे.
🔰भारताकडून सध्या मोठया प्रमाणावर P-8I विमानांचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
🔰नौदलाच्या ताफ्यात आठ P-8I विमाने आहेत. जानेवारी २००९ मध्ये बोईंगबरोबर यासाठी २.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. जुलै २०१६ मध्ये आणखी चार P-8I विमानांसाठी १.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला. ती विमाने या डिसेंबरपासून मिळायला सुरुवात होतील. आता आणखी सहा P-8I विमानांसाठी अमेरिकेला लेटर ऑफ रिक्वेस्ट पाठवण्यात आली आहे. हा व्यवहार १.८ अब्ज डॉलरचा आहे.
🔰त्याशिवाय भारत अमेरिकेकडून आणखी ३० प्रीडेटर बी ड्रोन खरेदी करणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी प्रत्येकी १० विमाने खरेदी करण्याची योजना आहे. जवळपास ३.५ अब्ज डॉलर्सचा हा मोठा आर्थिक व्यवहार असल्याने अजून यासंबंधी करारावर स्वाक्षरी झालेली नाही. ही मानवरहीत उड्डाण करु शकणारी सर्वात घातक विमाने आहेत. हजारो फूट उंचीवरुन लक्ष्यावर ते अत्यंत अचूकतेने प्रहार करतात.
काही महत्त्वाचे एकक
🌷 एककाचे नाव - वापर
🌷नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
1 नॉटिकल मैल=6076 फुट
🌷 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक
1 फॅदम=6 फुट
🌷 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर
🌷 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
🌷 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक
1 बार=10 डाईन्स दाब/चौ
🌷 पौंड :- वजन मोजण्याचे एकक
2000 पौंड=1 टन
🌷 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक
1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
🌷 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
🌷 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक
1 मायक्रोन=0.001 मिमी
🌷 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक
1 हँड=4 इंच
🌷 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक
1 गाठ=500 पौंड
🌷 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
🌷 वॅट :- शक्तीचे एकक
1 हॉर्सपॉवर=746 वॅट
🌷 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक
1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.
🌷 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक
1 दस्ता=24 कागद,
1 रिम=20 दस्ते
🌷 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
1 एकर = 43560 चौ.फुट
🌷 मैल :-अंतर मोजण्याचे एकक
1 मैल=1609.35 मीटर
🌷 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
जलनिस्सारण प्रारूपाचे प्रकार
१) जाळीदार जलनिस्सारण प्रारूप (trellised)
-प्रादेशिक उतारानुसार प्रधान अनुवर्ती(consequent) जलप्रवाह आणि तिच्या उपनद्या यांचे जाळे आणि भूशास्त्रीय रचनेशी समायोजन करणाऱ्या जलनिस्सारण आकारास जाळीदार प्रारूप असे म्हणतात
-ज्या क्षेत्रामध्ये साधी वळी रचना असून समांतरपणे अपणती कटक आणि आलटून पालटून समांतर अभिनेती दरया असतात त्या प्रदेशात जाळीदार जलनिस्सारण प्रारूप विकसित होतात
-जाळीदार आणि आयताकृती प्रारूपामध्ये थोडाफार सारखेपणा असला तरीही जाळीदार प्रारूपामध्ये हे प्रवाह यामधील अंतर कमी असते तर आयताकृती प्रारूपामध्ये प्रवाहातील अंतर विस्तारित असते
-असे प्रारूप cuesta टॉपोग्राफी असणाऱ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतात
-उदाहरण म्हणजे दामोदर आणि कॉलोराडो नदीचे जलप्रवाह
२) वृक्षाकार जलनिस्सारण प्रारूप (dendritic)
-प्रधान प्रवाहाची महत्ता आणि उपनद्या यांच्या विविध सूरचनेचे जाळे एखाद्या या वृक्षाच्या शाखा ,मूळ आणि उपमुळे सारखे दृश्यमान होते तेव्हा त्यास वृक्षकार प्रारूप असे म्हणतात
-उदाहरण म्हणजे भारतातील महानदी, गोदावरी, कृष्णा ,कावेरी आणि आणि भीमा नद्यांचे खोरे
३) आयताकृती जलनिस्सारण प्रारूप (rectangular)
-खडकांचे जोड किंवा संधी असणाऱ्या प्रदेशात प्रधान जलप्रवास उपनद्या काटकोनात मिळतात याला आयताकृती जलनिस्सारण प्रारुप असे म्हणतात
-असे प्रारूप karst टॉपोग्राफी प्रदेशात पाहायला मिळतात
४) केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप (radial)
-मध्य भागाच्या उंचवट्याच्या प्रदेशांमधून सर्व दिशांना अपक्षरण होणाऱ्या प्रवाहांना केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-श्रीलंका या देशाच्या मध्यभागातून हे प्रारूप उठून दिसते
-भारतामध्ये अमरकंटक टेकड्या, झारखंडमधील हजारीबाग पठार आणि राजस्थान मधील अबू पर्वत ही या प्रारूपाची आदर्श उदाहरणे आहेत
५) केंद्रभीगामी जलनिस्सारण प्रारूप (centripetal)
- सभोवतालच्या उंचवट्याच्या प्रदेशापासून उगम पावणारे प्रवाह मध्यभागाच्या सखल प्रदेशातील गर्तीका सरोवराकडे केंद्रभिमुख होतात याला केंद्रभिगामी प्रारूप असे म्हणतात
-याचे आदर्श उदाहरण नेपाळमधील काठमांडू दरी आहे
६) कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप(annular)
-घुमटाकार पर्वतामध्ये आलटून-पालटून कठीण आणि मृदू खडकाची वर्तुळाकार रचना असल्यावर प्रधान अनुवर्ती प्रवाहाच्या उपनद्या वर्तुळाकार विकसित होतात याला कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-याचे उत्तम उदाहरण बिहारमधील सोनपेठ घुमटाकार प्रदेश आहे
७) कंटकिय किंवा काटेरी जलनिस्सारण प्रारूप(barbed)
-प्रधान जलप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या उपनद्या मुळे निर्माण होणाऱ्या जाळ्यात कंटकीय जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-अशा प्रकारचे प्रारूप सर्वसाधारणपणे नदीचौर्यामुळे(river capture) विकसित होते
८) पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप (pinnate)
-समांतर घटकाच्या तीव्र बाजूंनी उपनद्यांचा उगम पावून दरीमधील अनुलंब प्रधान अनुवर्ती प्रवाहास लघुकोनात मिळतात याला पिसाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-ऊर्ध्व शोन आणि नर्मदा नद्यांमध्ये पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप निर्माण झाले आहे
Latest post
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...