Monday, 27 July 2020

वाचा :- भारतातील पहिले

🚦 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ

➖ कोची

🚦देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ

➖ बदलापूर

🚦राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ

➖ पुणे

🚦देशातील पहिले वाय-फाय गाव

➖ पाचगाव (महाराष्ट्र)

🚦जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले  ई-लर्निंग' तालुके

➖ भूम - परंडा

🚦देशातील  पहिले  वायफाय रेल्वे स्टेशन

➖ बेगलरु

🚦देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ

➖ अंदल (प. बंगाल)

🚦देशातील पहिले सॅटेलाईट शहर

➖ पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*

🚦देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर

➖ कोहिमा

🚦डीजीटल लॉकर सुरु करणारी  देशातील पहिली नगरपालिका

➖ राहुरी

🚦विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात  सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी

➖ अहमदाबाद

🚦मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने  तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव

➖हरिसाल

🚦मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका

➖ इस्लामपूर

🚦भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर

➖चंदीगड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप.

🔰भूशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण केले.

🔰ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा चमू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी संयुक्तपणे या अॅपची रचना केली आहे.

🔰तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी तयार केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापर करू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.

🔴मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः

🔰वर्तमान हवामान - 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.

🔰नाऊकास्ट - IMDच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातल्या घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल दर तीन तासांनी इशारा देणे. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.

🔰शहरासाठीचा अंदाज - भारतातल्या सुमारे 450 शहरांमध्ये गेल्या 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज उपलब्ध आहे.

🔰इशारा - नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल-गंभीर परिस्थिती, नारिंगी- सावधगिरी व पिवळा- सूचना) इशारा दिला जाऊ शकतो.रडार उत्पादने - दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.

कलाम यांचे स्फूर्तिदायक विचार


१) आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

२) देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

३) तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

४) जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

५) यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

६) यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

७) स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

८) एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

९) आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

१०) स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

११) संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

१२) य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

भारत अमेरिकेकडून लवकरच विकत घेणार सर्वात घातक प्रीडेटर बी ड्रोन, P-8I ची खरेदी प्रक्रिया सुरु

🔰भारताने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली पोसी़डॉन P-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचबरोबर शस्त्रसज्ज प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही योजना आहे. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल बरोबरच्या शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराला गती दिली आहे.

🔰भारताकडून सध्या मोठया प्रमाणावर P-8I विमानांचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

🔰नौदलाच्या ताफ्यात आठ P-8I विमाने आहेत. जानेवारी २००९ मध्ये बोईंगबरोबर यासाठी २.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. जुलै २०१६ मध्ये आणखी चार P-8I विमानांसाठी १.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला. ती विमाने या डिसेंबरपासून मिळायला सुरुवात होतील. आता आणखी सहा P-8I विमानांसाठी अमेरिकेला लेटर ऑफ रिक्वेस्ट पाठवण्यात आली आहे. हा व्यवहार १.८ अब्ज डॉलरचा आहे.

🔰त्याशिवाय भारत अमेरिकेकडून आणखी ३० प्रीडेटर बी ड्रोन खरेदी करणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी प्रत्येकी १० विमाने खरेदी करण्याची योजना आहे. जवळपास ३.५ अब्ज डॉलर्सचा हा मोठा आर्थिक व्यवहार असल्याने अजून यासंबंधी करारावर स्वाक्षरी झालेली नाही. ही मानवरहीत उड्डाण करु शकणारी सर्वात घातक विमाने आहेत. हजारो फूट उंचीवरुन लक्ष्यावर ते अत्यंत अचूकतेने प्रहार करतात.

काही महत्त्वाचे एकक

🌷 एककाचे नाव - वापर

🌷नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

1 नॉटिकल मैल=6076 फुट

🌷 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक

1 फॅदम=6 फुट

🌷 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर

🌷 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

🌷 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक

1 बार=10 डाईन्स दाब/चौ

🌷 पौंड :- वजन मोजण्याचे एकक

2000 पौंड=1 टन

🌷 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक

1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

🌷 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

🌷 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक

1 मायक्रोन=0.001 मिमी

🌷 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक

1 हँड=4 इंच

🌷 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक

1 गाठ=500 पौंड

🌷 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

🌷 वॅट :- शक्तीचे एकक

1 हॉर्सपॉवर=746 वॅट

🌷 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.

🌷 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक

1 दस्ता=24 कागद,

1 रिम=20 दस्ते

🌷 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

1 एकर = 43560 चौ.फुट

🌷 मैल :-अंतर मोजण्याचे एकक

1 मैल=1609.35 मीटर

🌷 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

जलनिस्सारण प्रारूपाचे प्रकार

१) जाळीदार जलनिस्सारण प्रारूप (trellised)
-प्रादेशिक उतारानुसार प्रधान अनुवर्ती(consequent) जलप्रवाह आणि तिच्या उपनद्या यांचे जाळे आणि भूशास्त्रीय रचनेशी समायोजन करणाऱ्या जलनिस्सारण आकारास जाळीदार प्रारूप असे म्हणतात
-ज्या क्षेत्रामध्ये साधी वळी रचना असून समांतरपणे अपणती कटक आणि आलटून पालटून समांतर अभिनेती दरया असतात त्या प्रदेशात जाळीदार जलनिस्सारण प्रारूप विकसित होतात
-जाळीदार  आणि आयताकृती प्रारूपामध्ये थोडाफार सारखेपणा असला तरीही जाळीदार प्रारूपामध्ये हे प्रवाह यामधील अंतर कमी असते तर आयताकृती प्रारूपामध्ये प्रवाहातील अंतर विस्तारित असते
-असे प्रारूप cuesta टॉपोग्राफी असणाऱ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतात
-उदाहरण म्हणजे दामोदर आणि कॉलोराडो नदीचे जलप्रवाह

२) वृक्षाकार जलनिस्सारण प्रारूप (dendritic)
-प्रधान प्रवाहाची महत्ता आणि उपनद्या यांच्या विविध सूरचनेचे  जाळे एखाद्या या वृक्षाच्या शाखा ,मूळ आणि उपमुळे सारखे दृश्यमान होते तेव्हा त्यास वृक्षकार प्रारूप असे म्हणतात
-उदाहरण म्हणजे भारतातील महानदी, गोदावरी, कृष्णा ,कावेरी आणि आणि भीमा नद्यांचे खोरे

३) आयताकृती जलनिस्सारण प्रारूप (rectangular)
-खडकांचे जोड किंवा संधी असणाऱ्या प्रदेशात प्रधान जलप्रवास उपनद्या काटकोनात मिळतात याला आयताकृती जलनिस्सारण प्रारुप असे म्हणतात
-असे प्रारूप karst टॉपोग्राफी प्रदेशात पाहायला मिळतात

४) केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप (radial)
-मध्य भागाच्या उंचवट्याच्या प्रदेशांमधून सर्व दिशांना अपक्षरण होणाऱ्या प्रवाहांना केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-श्रीलंका या देशाच्या मध्यभागातून हे प्रारूप उठून दिसते
-भारतामध्ये अमरकंटक  टेकड्या, झारखंडमधील हजारीबाग पठार आणि राजस्थान मधील अबू पर्वत ही या प्रारूपाची आदर्श उदाहरणे आहेत

५) केंद्रभीगामी जलनिस्सारण प्रारूप (centripetal)
- सभोवतालच्या उंचवट्याच्या प्रदेशापासून उगम पावणारे प्रवाह मध्यभागाच्या सखल प्रदेशातील गर्तीका सरोवराकडे केंद्रभिमुख होतात याला केंद्रभिगामी प्रारूप असे म्हणतात
-याचे आदर्श उदाहरण नेपाळमधील काठमांडू दरी आहे

६) कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप(annular)
-घुमटाकार पर्वतामध्ये आलटून-पालटून कठीण आणि मृदू खडकाची वर्तुळाकार रचना असल्यावर प्रधान अनुवर्ती प्रवाहाच्या उपनद्या वर्तुळाकार विकसित होतात याला कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-याचे उत्तम उदाहरण बिहारमधील सोनपेठ घुमटाकार प्रदेश आहे

७) कंटकिय किंवा काटेरी जलनिस्सारण प्रारूप(barbed)
-प्रधान जलप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या उपनद्या मुळे निर्माण होणाऱ्या जाळ्यात कंटकीय जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-अशा प्रकारचे प्रारूप सर्वसाधारणपणे नदीचौर्यामुळे(river capture) विकसित होते

८) पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप (pinnate)
-समांतर घटकाच्या तीव्र बाजूंनी उपनद्यांचा उगम पावून दरीमधील अनुलंब प्रधान अनुवर्ती प्रवाहास लघुकोनात मिळतात याला पिसाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-ऊर्ध्व शोन आणि नर्मदा नद्यांमध्ये पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप निर्माण झाले आहे

केरळ, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयसीसचे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र अहवाल

💠केरळ आणि कर्नाटकमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात देण्यात आला आहे. तसंच भारतीय उपखंडात अल कायदा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. तसंच या क्षेत्रात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचे १५० ते २०० दहशतवादी असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

💠'अॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम'चा २६ वा अहवाल प्रकाशित करण्यात आला. भारतीय उपखंडात अल-कायदा (क्यूआयएस) तालिबानच्या मदतीनं निमरूज, हेलमंद आणि कंधारमधून आपल्या कारवाया करत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. "या संघटनेत भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमधील १०० ते १५० दहशतवादी आहेत. क्यूआयएसचा म्होरक्या हा ओसामा महमूद आहे. त्यानं आसिम उमर याची जागा घेतली आहे. तसंच तो आसिम उमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीही कट रचत आहे," असंही अहवालात नमूद केलं आहे.

💠"१० मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या आयएसआयएलचे (हिंद विलय) १८० ते २०० सदस्य आहेत, असं एका सभासद देशाकडून सांगण्यात आलं. केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएलच्या दहशतवाद्यांची मोठी संख्या आहे," असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीसनं भारतात नवा प्रांत स्थापित करण्याचा दावा केला होता. तसंच काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही संघटनेनं ही घोषणा केली होती.

💠यापूर्वी या दशतवादी संघटनेनं आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव 'विलायह ऑफ हिंद' असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता. यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचं लक्ष्य होतं.

तंबाखुजन्य उत्पादनाच्या पाकिटांवर आरोग्यविषयक नवीन वैधानिक चेतावणी इशारा


✨भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने तंबाखुजन्यउत्पादनाच्या पाकिटांवर आरोग्यविषयक नवीन वैधानिक चेतावणी इशारा 23 जुलै 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला. 

✨यासाठी सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादनाच्या (पॅकिंग आणि लेबलिंग) नियमामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

✨यानुसार 2008 च्या नियमांमध्ये जीएसआर 248 (ई) मध्ये  21 जुलै, 2020 अनुसार बदल करण्यात येणार आहेत. 

✨या बदलानुसार 1 डिसेंबर, 2020 पासून नवीन नियम लागू करण्यात येणारआहेत. 

✨19 भाषांमध्ये पाकिटावर छापण्यासाठी इशारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

✨नवीन केलेल्या नियमाविषयी माहिती खालील प्रमाणे  -

✨सिगरेट आणि कोणत्याही तंबाखूजन्य उत्पादनाची निर्मिती करणारे, पुरवठादार, आयात करणारे किंवा या मालाच्या वितरकांनी नवीन निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसारपॅकिंग केले जात आहे की नाही, आणि निश्चित केलेल्या नियमानुसार वैधानिकआरोग्य चेतावणी दिली जात आहे की नाही, हे तपासावे.

✨या नियमांचे उल्लंघन करणा-या  संबंधितांवर दंडात्मक गुन्हा नोंदवून तुरूंगवास आणिदंडाची शिक्षा देण्याची तरतूद कलम 20- सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन(व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांच्यावरील निर्बंध) कायदा, 2003 मध्ये आहे.

✨या उत्पादनांच्याबाबतीत ‘‘पॅकेज’’च्या व्याख्येमध्ये अधिनियम आणि त्यातल्यानियमांच्या अनुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या देण्‍यात येणा-याआरोग्यविषयक वैधानिक ईशारा 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच छापता येणार आहे. 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम कंपनीसाठी वीजेवर चालणारे स्वयंचलित जहाज तयार करणार.

🌸नॉर्वेतील किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्वात मोठ्या नोर्जेस ग्रूपेन ए.एस.ए. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. या कंपनीचे कंत्राट कोचीन शिपयार्डने मिळवले आहे.

🌸कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय जहाजबांधकाने नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. संस्थेसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाज / बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे.

🔶ठळक बाबी...

🌸हे जगातील पहिले विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज असणार, ज्याची लांबी 67 मीटर असून त्याची 1846 kWh एवढी बॅटरी क्षमता असणार आहे.
कार्यरत झाल्यावर जगातील व्यापारी जहाज क्षेत्रात ही स्वयंचलित जहाजे शून्य कार्बन उत्सर्जनासहीत एक नवा मापदंड तयार करतील.

🌸विजेवर चालणारे जहाज बांधणीचा प्रकल्प हा नॉर्वेच्या सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ओस्लोजवळील समुद्रधुनीतून जाणारा सरकार पुरस्कृत कार्बन-उत्सर्जन रहित परिवहन प्रकल्प आहे.

🌸काँगसबर्ग (स्वयंचलित जहाजांसाठी तंत्रज्ञान पुरविणारी कंपनी) आणि विल्यमसेन (नौवहन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या मास्टरली एएस या पहिल्या तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ही जहाजे चालवली जातील.

सूचकांक 2020

🔶 विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक 2020
➡️ भारत :- 142
➡️ नॉर्वे :- 1

🔶 विश्व खुशहाली सूचकांक 2020
➡️ भारत :- 144
➡️ फिनलैंड :- 1

🔶 प्रत्यक्ष बिक्री उद्योग सूचकांक 2020
➡️ भारत :- 15
➡️ अमेरीका :- 1

🔶 वैश्विक विनिर्माण जोखिम सूचकांक 2020
➡️ भारत :- 3
➡️ चीन :- 1

🔶 वैश्विक रियल एस्टेट पारदर्शिता सूचकांक 2020
➡️ भारत :- 34
➡️ UK :- 1

🔶 पर्यावरण प्रदर्शन सूचकांक 2020
➡️ भारत :- 168
➡️ डेनमार्क :- 1

🔶 जलवायु जोखिम सूचकांक 2020
➡️ भारत :- 5
➡️ जापान :- 1

🔶 वैश्विक जलवायु परिवर्तन प्रदर्शन सूचकांक 2020
➡️ भारत :- 9
➡️ स्वीडन :- 1

🔶 FIFA रेंकिंग 2020
➡️ भारत :- 108
➡️ बेल्जियम

🔶 सतत विकास लक्ष्य सूचकांक 2020
➡️ भारत :- 117
➡️ स्वीडन :- 1

🔶 विश्व सैन्य खर्च रिपोर्ट 2020
➡️ भारत :- 3
➡️ अमेरीका :- 1

🔶 व्यापार सुगमता सूचकांक 2020
➡️ भारत :- 63
➡️ न्यूजीलैंड :- 1

🔶 वैश्विक प्रतिभा प्रतिस्पर्धात्मक सूचकांक 2020
➡️ भारत :- 72
➡️ स्विट्जरलैंड :- 1

🔶 विश्व प्रतिस्पर्धा सूचकांक 2020
➡️ भारत :- 43
➡️ सिंगापुर :- 1

🔶 अंतर्राष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2020
➡️ भारत :- 40
➡️ अमेरीका :- 1

🔶 स्थिरता सूचकांक 2020
➡️ भारत :- 77
➡️ ब्रूरडी :- 1

🔶 सोशल मोबिलिटी सूचकांक 2020
➡️ भारत :- 76
➡️ डेनमार्क :- 1

🔶 शिशु विकास सूचकांक 2020
➡️ भारत :- 131
➡️ नॉर्वे :- 1

🔶 ग्लोबल जेंडर गैप सूचकांक 2020
➡️ भारत :- 112
➡️ आइसलैंड :- 1

🔶 हेनले पासपोर्ट सूचकांक 2020
➡️ भारत :- 84
➡️ जापान :- 1

डॉ एे पी जे अब्दुल कमाल

◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.

◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम

◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.

◾️कार्यकाळ
25 जुलै  2002 – 25 जुलै 2007

◾️

◾️त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले

◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला

◾️इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला

◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.

◾️संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला

◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते

🚀 1985 : त्रिशूल,
🚀1988 : पृथ्वी,
🚀1989 : अग्नी,
🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात

◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. 

◾️तेथेच त्यांचे निधन झाले

◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

🧩बराक 8 :

🅾हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

🧩निर्भय :

🅾या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

🧩पिनाका अग्निबाण प्रणाली  :

🅾 अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

🧩आकाश:

🅾हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

🧩ब्राम्होस :

🅾 हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

🧩त्रिशुल:-

🅾या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

🧩नाग:

🅾हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

🧩सूर्या :

🅾हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

🧩सागरिका:

🅾हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

🧩शौर्य:

🅾हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

🧩धनुष:

🅾हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

🧩अग्नी:

🅾हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

🧩तेजस:

🅾हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

🧩सारथ:

🅾हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

🧩हॉक्स :

🅾हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

🧩 फाल्कन :

🅾 हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋