Wednesday, 22 July 2020

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

हल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे एक आव्हान बनले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच सुयोग्य नियोजन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता.    

1. *वेळापत्रक बनवा* : अभ्यासाचा Syllabus, जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच वेळापत्रक बनवावे. त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

2 *नोट्स तयार करा* : तयारी करताना जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्या. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही.

3. *शिस्त पाळा* : आपण जे ठरवलंय ते त्याचा पद्धतीने होत आहे कि नाही? हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावा. याने नक्कीच फायदा होईल.

4. *प्रलोभनांना बळी नको* : सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) तसेच वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर रहा. याने तुमचा वेळ वाचेल.

5. *मॉर्क टेस्ट सोडवून बघा* : मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. ऑफलाईन टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. यामुळे सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल व परीक्षेची भीती नाहीशी होईल.

MPSC ची तयारी : जागतिकीकरणाचा परिणाम

📌आजघडीला बहुतांश सामाजिक समस्या कमी अधिक प्रमाणात जागतिकीकरणाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकलेल्या नाहीत. त्यामुळे जागतिकीकरण हा सामाजिक मुद्दा म्हणून समजून घेताना संकल्पना आणि तिचा व्यवहार, त्यात गुंतलेले विविध प्रवाह, तसेच त्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे.

📌संपूर्ण जग एका मोठय़ा बाजारपेठेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. वस्तू आणि सेवा तसेच भांडवल आणि श्रम यांच्या व्यापारावरील र्निबध उठवून जागतिक पातळीवर व्यापार खुला करण्याची प्रक्रिया यात सामावलेली आहे. खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया १९ व्या शतकापासून सुरू झाली. भांडवलशाहीची वाढ, उपलब्ध सागरी दळणवळण, टेलिग्रामपासून ते २० व्या शतकातील उपलब्ध हवाई मार्ग, दूरध्वनी, संगणक, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार आणि गुंतवणुकीवरील र्निबध सैल होण्यातून ही प्रक्रिया सुरू झाली.

📌२० व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वाधात माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सेवांचा उदय आणि पुढे जागतिक पातळीवर व्यापार खुला झाल्याने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला.

📌फ्रान्सिस फुकुयामा यांनी जागतिकीकरणाला ‘मानवी शासनाचे उदारमतवादी लोकशाहीचे अंतिम प्रारूप’ असे संबोधले. थॉमस फ्रीडमनच्या मते, जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. अँथनी गिडन्स म्हणतो त्याप्रमाणे, जागतिकीकरण म्हणजे जगभरात सामाजिक संबंधांचे सघनीकरण घडून येणे होय.

📌जागतिकीकरणाच्या समर्थकांच्या मते, अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊन विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशात मोठी भांडवल गुंतवणूक करीत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रवाह मागास राष्ट्रांकडे जाताना दिसतो आहे. जागतिकीकरणाच्या धोरणातून दक्षिणपूर्व आशियायी देश आणि ब्राझील यांनी विकास संपादन केला. याउलट जागतिकीकरणांतर्गत उदारीकरण, खासगीकरण, तंत्रज्ञानात्मक क्रांती, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीयीकरण, राष्ट्र राज्याचा ऱ्हास, कल्याणकारी राज्याचा ऱ्हास, बाजारपेठांचे सार्वभौमत्व, बहुसांस्कृतिकवाद असेही प्रवाह सुरू झाले.

📌‘जे स्थानिक आहे ते जागतिक आहे आणि जे जागतिक ते स्थानिक आहे’ या प्रक्रियेला रॉबर्टसन ‘विशिष्टतेचे सार्वत्रिकीकरण’आणि ‘सार्वत्रिकतेचे विशिष्टीकरण’ या रूपाने ओळखतो. संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनून आजघडीला ‘विचार जागतिक आणि कृती राष्ट्रीय’ असाच नारा बळावत असल्याचे दिसते. ग्लोबल आणि लोकल यातून ग्लोकल बनले आहे. त्यामुळे अरेनाज यांनी यास ‘हायब्रीडायझेशन’असे संबोधले. सांस्कृतिक आक्रमण आणि मागास राष्ट्रांचे आर्थिक सार्वभौमत्व पायदळी तुडवण्यामुळे जागतिकीकरणास नववसाहतवादाचे नवे रूपदेखील मानण्यात येते.

📌जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र अथवा विभक्त समूहाचा भाग न राहता संपूर्ण समाजच थेट जागतिक व्यवहाराशी जोडला गेला आहे.

📌जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला दिसतो. कुटुंब व्यवस्था, विवाह, स्त्री-पुरुष संबंध, जाती, जनजाती, भाषा, इ. सामाजिक घटकांमध्ये सामाजिक—आर्थिक स्थित्यंतरे घडून येत आहेत. जागतिकीकरणामुळे लहान मुले, तरुण वर्ग आणि वृद्धांचे जीवनमान प्रभावित झालेले आहे. ग्राहकवादाच्या प्रभावातून नव समाज आकार घेत आहे.

📌माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे लोकांच्या जीवनाचा सांस्कृतिक आकृतिबंध बदलत असून अमेरिकन कपडे, चायनीज अन्न, फ्रेंच व्हिस्की, इंग्लिश पॉप संगीत याबाबी नित्य परिचयाच्या झालेल्या आहेत. जागतिकीकरणातून नव्या नागरी समाजाची निर्मिती होत आहे.

📌जागतिकीकरणाचा स्पष्ट आविष्कार बाजारपेठा, व्यापार, वस्तू आणि वित्तीय गुंतवणूक या क्षेत्रातील आर्थिक प्रक्रियांमध्ये दिसून येतो. आर्थिक धोरणे, कृषी, रोजगार, नैसर्गिक आणि मानवी संसाधने यावरही जागतिकीकरणाचा प्रभाव दिसून येतो.

📌जागतिकीकरणाची नैसर्गिक नाळ उदारीकरणाशी जोडली असल्याने जगभर भांडवलाचा प्रवाह व बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच कार्पोरेशन्स स्वत:चे जाळे विणत आहेत. त्यातून डिस्नेफिकेशन, मॅकडोनाल्डायझेशन आणि कोकाकोलोनायझेशन इ. शब्द आपल्या अंगवळणी पडत आहेत. थेट परकीय गुंतवणूक हे जगभरातील घटीत बनले आहे.

📌राष्ट्र राज्याच्या सीमा धूसर होऊन ‘राष्ट्रांचे सार्वभौमत्व’धोक्यात आलेले आहे. कल्याणकारी भूमिकेतून माघार घेऊन राज्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी, असा दबाव तयार होत आहे. राज्यसंस्था बिगर राजकीय अभिकर्त्यांच्या मदतीने राज्यकारभार चालवीत आहे. त्यातून प्रातिनिधिक लोकशाही राजकारणाचा अवकाश नागरी समाजाकडून गिळंकृत केला जात आहे.

📌जागतिकीकरणामुळे ‘राष्ट्रातीत नागरिकत्व’ निर्माण होत आहे. विल किमलिका यांच्या मते, आजघडीला ‘बहुसांस्कृतिक नागरिकत्व’ उदयाला येत आहे. पुढे ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर गोल्डस्मिथच्या शब्दात ‘जागतिक नागरिकत्व’ या संकल्पना मूर्त रूपात येऊ शकतील. या उलट जागतिकीकरणात सांस्कृतिक वैविध्य नष्ट होऊन एकछापी संस्कृती निर्माण होते असाही प्रतिवाद केला जातो.

📌सोविएत युनियनचे विघटन आणि आखातातील युद्ध, देशांतर्गत निर्माण झालेली राजकीय अस्थिरता तसेच अनिवासी भारतीयांची गुंतवणुकीमधून माघार यांच्या एकत्रित परिणामातून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठी देऊन खुले आर्थिक धोरण स्वीकारले. खासगी क्षेत्रावरील र्निबध काढून गुंतवणुकीचे मार्ग खुले केले. विदेशी गुंतवणुकीवरील बंधने हटवून भारतीय बाजारपेठ जागतिक बाजारपेठांशी जोडली गेली.

मोहनदास करमचंद गांधी.

 🅾(ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)

🅾हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

🅾अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

🅾रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.

🅾 सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

🅾त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या पाचवर येणार!

🅾केंद्र सरकारने बँकिंग उद्योगाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सध्याच्या १२ राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या आणखी कमी करण्याचे ठरविले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना प्रस्तावित केली असून त्यात काही बँकांचे खासगीकरणही अभिप्रेत आहे.

🅾वृत्तसंस्थेने सरकारी आणि बँकिंग सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार प्रस्तावित योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी मालकीच्या बँकांची संख्या केवळ पाचच राहील असे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. तथापि सध्याच्या १२ वरून पाच अशी ही संख्या खासगीकरणाच्या माध्यमातून कमी केली जाणार आहे. सरकारी मालकीच्या बँकांपैकी बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक या बँकांतील सरकारकडे असलेल्या बहुमताचा भागभांडवली हिस्सा विकण्याचा पर्यायाने या बँकांचे खासगीकरण प्रास्तावित आहे.

🅾एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तसंस्थेने दोन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या चार किंवा पाचवर आणण्याचे प्रास्तावित असल्याचे म्हटले आहे. करोना विषाणूबाधेमुळे स्थंभित झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारला अपेक्षित महसूल मिळू शकलेला नाही. याची भरपाई करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील भागभांडवल विकून निधी उभारण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.

🅾याआधी अनेक सरकारी समित्यांनी आणि भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी बँकांची संख्या कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. सरकारने या वित्तीय वर्षांच्या सुरुवातीला १० सरकारी बँकांचे चार बँकांत विलीनीकरण करून राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २२ वरून १२ वर आणली आहे. भविष्यात सरकारी बँकांचे विलीनीकरण शक्य नसल्याने भागभांडवल विकणे हाच पर्याय असल्याचा मतप्रवाह केंद्रीय अर्थ खात्यात बळावत असल्याचे दिसत आहे.
करोना विषाणूबाधेच्या संकटामुळे आर्थिक वर्षांच्या अखेरीस बँकांना वाढत्या अनुत्पादित मालमत्तेचा सामना करावा लागेल असे मानण्यात येते. परिणामी बँकांच्या पुनर्भाडवलीकरणाची आवश्यकता लक्षात घेता, सरकारपुढे वाढीव आर्थिक पेच निर्माण होईल. आधीच घटलेल्या महसुलामुळे बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठी तरतूद करणे सरकारला जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जाते.

🅾या तरतुदीपेक्षा बँकांतील भागभांडवल विकून खासगीकरण करण्यावर अर्थमंत्रालय अनुकूल असल्याचे दिसून येते. पुनर्भाडवलीकरणापेक्षा भागभांडवल विकून खासगीकरणाची योजना कितपत यशस्वी होईल याबद्दल बँकिंग वर्तुळात मात्र साशंकता व्यक्त होत आहे.

नरसिंघम समिती

🧶 1991 मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय प्रादेशिक सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

🧶नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्याचा सल्लाही नरसिंह समितीला देण्यात आला होता.

🛑१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

🧶आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

🧶१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

🧶२.या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

🧶 या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

🧶 या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

🧶 या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

🧶 नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

🧶 या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

🧶नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

🧶या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

🧶यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने.

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर 🅾
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 🅾
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन 🅾
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम 🅾
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य 🅾

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 🅾
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन 🅾
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 🅾
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान 🅾
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 🅾
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 🅾
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 🅾
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश 🅾
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 🅾
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस 🅾
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 🅾

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही 🅾

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे 🅾
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका 🅾
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे 🅾
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 🅾
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 🅾

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ 🅾

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO 🅾
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर 🅾
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी 🅾
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा 🅾
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP 🅾

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी 🅾
D. सातारा

30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी 🅾

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 🅾
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600
D. सन 1650

33. प्लासीची लढाई ______ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1
C. जून 1758
D. 31 मार्च 1751.

34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 🅾
C. सन 1803
D. सन 1818

35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 🅾
D. लॉर्ड कॉर्नवालीस

36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 🅾
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 🅾

38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 🅾
C. कराची
D. मुंबई

39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 🅾

40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 🅾

41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 🅾
D. त्रिपुरा

42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 🅾
C. गुजरात
D. आसाम

43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 🅾

44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 🅾
D. 26 जानेवारी

45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 🅾
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾

47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 🅾

49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 🅾
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 🅾
D. ब, क

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.🅾

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद🅾
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 🅾

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३🅾
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 🅾
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी🅾
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 🅾
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...