Wednesday, 15 July 2020

महत्त्वाचे सूत्रे

1. Work = force × distance
कार्य = बल × दूरी

2. Energy = force × distance
ऊर्जा = बल × दूरी

3. Speed = distance / time
गति = दूरी / समय

4. Velocity= displacement / time
वेग = विस्थापन / समय

5. Electric field = electrical force/charge
विद्युत क्षेत्र= वैद्युत बल/आवेश

6. Force = force/area
प्रतिबल=बल/क्षेत्रफल

7. Volume = length × width × height
आयतन = लंबाई × चौड़ाई × ऊंचाई

8. Mass density = mass/volume
द्रव्यमान घनत्व =द्रव्यमान/आयतन

9. Acceleration =velocity / time
त्वरण = वेग / समय

10. Power = work / time
शक्ति = कार्य / समय

11. Pressure = force / area
दाब =बल/क्षेत्रफल

11. Momentum = mass × velocity
संवेग = द्रव्यमान × वेग

13. Area (A) = Length × Width
क्षेत्रफल ( A ) = लम्बाई × चौड़ाई

14. Force (F) = Mass × Acceleration
बल ( F ) = द्रव्यमान × त्वरण

15. Pressure Energy = Pressure × Volume
दाब ऊर्जा = दाब × आयतन

16. Impulse = force × time
आवेग = बल × समय

17. Linear momentum = mass × velocity
रैखिक संवेग = द्रव्यमान × वेग

18. Kinetic energy = 1/2 mv²
गतिज ऊर्जा = 1/2 mv²

19. Mechanical energy = kinetic energy + potential energy
यांत्रिक ऊर्जा = गतिज ऊर्जा + स्थितिज ऊर्जा

20. Angular momentum = Inertial × Angular velocity
कोणीय संवेग = जड़त्वाघूर्ण × कोणीय वेग

भारत स्वातंत्र्याचा इतिहास.

🧩वाढते अराजक :

🅾त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले.

🅾 संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला.
 
🅾या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले.

🅾 कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या.त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले.
 बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले.

🅾 जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली.परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली.
 
🅾देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले.
 देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.

🧩हंगामी सरकारची स्थापना :

🅾अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल र्लॉड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले.
 पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वा खालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

🅾 सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.
 
🅾मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता.यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले.

🅾 देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला. 'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले.

🅾 त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनामुळे निधन

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.
नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले.

रशियन लस इतक्यात बाजारात उपलब्ध होणार नाही कारण…

◆ करोना व्हायरसला रोखू शकणारी लस विकसित करण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. १५० पेक्षा जास्त लसी चाचणीच्या वेगवेगळया स्टेजवर आहेत.

◆ यात भारतात विकसित झालेल्या दोन लसींच्या लवकरच मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

◆ रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरी ही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही.

◆ रविवारी प्रसिद्ध झालेल्या वेगवेळया वृत्तांमध्ये रशियाने करोनावर विकसित केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे म्हटले होते. ती लस बनवणाऱ्या सेचेनोव्ह विद्यापीठानेच तसा दावा केला होता.

◆ लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी ती फेज वनची चाचणी होती, ही माहिती बहुतांश बातम्यांमध्ये देण्यात आली नव्हती. या लसीच्या फेज २ च्या चाचण्या सोमवारपासून सुरु झाल्या आहेत.

◆ फेज ३ बद्दल काहीही स्पष्टता नाहीय. इंडियन एक्स्प्रेसने ही माहिती दिली आहे.

◆ अमेरिका, ब्रिटन, चीन आणि जर्मनी या देशांमध्ये करोनावर फक्त एकच कंपनी नाही, तर दोन ते तीन कंपन्यांकडून लस संशोधन सुरु आहे.

◆ रशियामधून मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली ही पहिली लस आहे.

◆ रशियन संरक्षण मंत्रालयासोबत मिळून गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने करोना व्हायरस विरोधात ही लस विकसित केली आहे.

◆ १८ जूनपासून या लसीच्या फेज वनच्या ट्रायल सुरु झाल्या. लस प्रयोगासाठी सैन्य दलातूनच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली.

◆ रशियाच्या TASS न्यूज एजन्सीच्या १० जुलैच्या वृत्तानुसार, फेज १ च्या क्लिनिकल ट्रायल १५ जुलै रोजी संपणार आहेत. १३ जुलैपासून फेज २ च्या ट्रायल सुरु होतील.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ फेज १ ची ट्रायल म्हणजे काय?

◆ फेज १ मध्ये स्वयंसेवकांच्या छोटया गटावर लसीची सुरक्षितता आणि साईड इफेक्ट किती झाले ते तपासण्यात आले. लस दिल्यानंतर एकाही स्वयंसेवकाने तक्रार केली नाही किंवा साईड इफेक्ट दिसले नाहीत असे संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने TASS न्यूज एजन्सीने म्हटले आहे.

★ फेज २ चा उद्देश काय?

◆ "सोमवार १३ जुलैपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लसीची परिणामकारकता आणि रोगप्रतिकार शक्ती कशा प्रकारे काम करते ते तपासले जाणार आहे"असे एजन्सीने म्हटले आहे. या टप्प्यात नागरिकांमधून निवडण्यात आलेल्या स्वयंसेवकांना सुद्धा लस देण्यात येईल.
करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी कितपत डोस पुरेसा आहे ते या टप्प्यातून समोर येईल.

★ तिसऱ्या फेजमध्ये काय होते?

◆ आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय कुठल्याही लसीला सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

◆ जगातील अनेक लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. त्या सुद्धा फेज १, २ मध्ये सुरक्षित ठरल्या आहेत.
तिसऱ्या फेजमध्ये हजारो स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येते. त्यात लसीमुळे करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला चालन मिळाली आहे का? ते संशोधक तपासून पाहतात. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महिने जातात.

◆ अन्य लसींच्या तुलनेत रशियाची लस अजून दुसऱ्या फेजमधून गेलेली नाही. हा टप्पा पार झाल्यानंतरच यशापयश ठरवता येईल.

◆ रशियाने विकसित केलेली ही लस फेज ३ ट्रायलमध्ये जाणार का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. कारण सध्याची इमर्जन्सीची स्थिती लक्षात घेता रशियन आरोग्य यंत्रणा त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात.

★ फेज ३ नंतर काय होणार?

◆ करोनावरील लस फेज ३ मध्ये यशस्वी ठरली तरी ती सर्वसामन्यांसाठी उपलब्ध व्हायला काही महिने जातील. कारण मध्ये अनेक प्रशासकीय परवानग्यांची गरज लागते.

◆ त्यामुळेच अनेक आघाडीचे वैज्ञानिक आणि WHO चे अधिकारी लस बाजारात यायला वर्ष ते दीडवर्ष लागेल असे सांगत आहेत.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणाचा गिनीज विश्व विक्रम कोणत्या देशाने स्थापित केला?
: भारत

● यंदाच्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’चे उद्दीष्ट  काय होते?
: महिला आणि मुलींच्या आरोग्याविषयी आणि हक्काविषयी जागृती करणे

● भारतीय तुकडीने कोणत्या संस्थेचा वार्षिक पर्यावरण पुरस्कारांचा पहिला पुरस्कार जिंकला?

: ‘लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची अंतरिम सेना’ (UNIFIL)

● ‘युरोपियन 2020 यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (USGBC) लीडरशिप अवॉर्ड’ कोणाला देण्यात आला आहे.
: आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC)

● जम्मू व काश्मीरमध्ये कोणाच्या हस्ते ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनेचे उद्घाटन झाले?
: जिल्हा विकास आयुक्त अनंतनाग के.के. सिधा

● कोणत्या बँकेनी MCLR 20 बेसिस पॉइंटने कमी केला?
: युनियन बँक ऑफ इंडिया

● भारत डायनॅमिक लिमिटेड (BDL) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांच्या दरम्यान कशा संदर्भात करार झाला?
: आकाश क्षेपणास्त्र

● ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत कोणता देश द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?
: भारत

संयुक्त रष्ट्रसंघाच्या अमृत महोत्सव


◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

👉संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरूमूर्ती हे आहेत.

👉 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असेल.

👉गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केलं होतं.

👉यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.

👉भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली होती.

🌷सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य🌷

1)अमेरिका,
2)युनायटेड किंगडम.
3)फ्रान्स,
4)रशिया आणि
5)चीन

🌷अस्थायी  सदस्य राष्ट्र सदस्याची संख्या१०🌷

👉यापूर्वीही भारत 7 वेळा सुरक्षा परिषदेचा   अस्थायी सदस्य राहिला  होता.
1)   १९५०-५१,
2)   १९६७-६८,
3)   १९७२-७३,
4)   १९७७-७८,
5)   १९८४-८५,
6)   १९९१-९२
7)   २०११-१२

________________________________

जिओ पुढील वर्षी आणणार 5G नेटवर्क

📱 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जिओ पुढच्या वर्षी '5G' नेटवर्क सुविधा लॉंच करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

📣 *अंबानी म्हणाले..:*

▪️ पुढील वर्षी भारतामध्ये 5G नेटवर्क लॉंच केले जाणार असून यासाठी आवश्यक असलेले परवाने देण्यासही सुरुवात झाली आहे.

▪️ पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा फक्त वापरच नाही तर जगाला हे तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

▪️ जिओचे तंत्रज्ञान पूर्णतः भारतीय असून हे शून्यातून उभे केलेले आहे. जिओवर आता शून्य कर्ज असून 'जिओ'त गुगलदेखील 33 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.

📡 दरम्यान, या सर्वसाधारण सभेच्यावेळी आकाश अंबानी यांनी 'JioTV+' चे लॉंचिंगही केले.

केंद्र सरकार देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक’ची स्थापना करणार



◆ केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक” यांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

◆ यासंदर्भातली घोषणा 10 जुलै 2020 रोजी “राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन” निमित्त करण्यात आली.

◆ “फिश क्रायोबँक” म्हणजे जिथे मत्स्य बीज (शुक्राणू) साठवून ठेवले जातात, ज्यामुळे मत्स्य उत्पादकांना निश्चित मत्स्यप्रजातीची उपलब्धता खात्रीशीरपणे होते.

★ ठळक बाबी

◆ हा उपक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालयामार्फत राबविला जाणार आहे.

◆ भारतात उभारण्यात येणारी अशी “फिश क्रायोबँक” ही जगातली पहिलीच असणार आहे.जॉइन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ फिश क्रायोबँकच्या स्थापनेसाठी नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसोर्स आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हे दोनही विभाग एकत्र काम करणार आहेत.

◆ भारत सरकारने वर्ष 2020-24 या कालावधीसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसह सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’चा हा एक भाग आहे.

◆ या उपक्रमामुळे प्रजातीच्या रक्षणासोबतच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात दूरगामी बदल होणार आणि उत्पादकता वाढविण्यात मदत मिळणार.

◆ मत्स्यव्यवसायक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आणि मत्स्यउत्पादकांच्या कल्याणासाठी एक मजबूत आराखडा तयार करुन गुणवत्ता व आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

सर सय्यद अहमद खान

जन्म:- १७ ऑक्टोबर १८१७ 
मृत्यू:- २७ मार्च  १८९८

◆ हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत.

◆ भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते.

◆ सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.

◆ सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.

◆ सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला.

◆ आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली.

◆ इ.स. १८७७ मध्ये त्यांची Imperial [मराठी शब्द सुचवा] विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.

◆ २७ मार्च , १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

◆ भारतीय राजकारणात सय्यद अहमद यांनी जमातवादाची सुरुवात केली.

◆ कॉंग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती.

◆ इंग्रज शासनाशी सहकार्य करण्यातच मुस्लीम समाजाचा उध्दार आहे अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ अगदी १८५७ च्या बंडात मुसलमानांनी भाग घेऊ नये असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले होते . तसेच कोणत्या मुसलमानांनी बंडात भाग घेतला , कोणी इंग्रजाना सहकार्य केले याचा तपशील इंग्रजाना पटवून देऊन त्यांना खुश केले.

◆ सर सय्यद अहमद यांच्या मते , या बंडात मुस्लिमांनी सामील होण्याचे कारण म्हणजे लष्करातल्या हिंदू मुसलमानाचे संयुक्त जीवन होय. या संयुक्त जीवनास त्यांचा विरोध होता.

◆ कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर हा अलगाववाद वाढीस लागला अगदी आय. सी. एस. च्या परीक्षा भारतात घेण्याच्या कॉंग्रेसच्या मागणीस त्यांनी विरोध दर्शविला .

◆ त्यांच्या मते भारतात या परीक्षा घेतल्यास फक्त हिंदुनाच त्याचा फायदा होईल. हिंदुशी एकजूट करण्यात मुसलमानाचा फायदा नाही असा त्यांचा पक्का ग्रह होता.

◆ सय्यद अहमद यांची भूमीका अधिक कडवी होण्यास अलीगड विद्यापीठाचे प्राचार्य थिओडोर बेक यांचाही मोठा वाट आहे.

◆ त्यांच्या प्रभावामुळे सय्यद अहमद कट्टर जातीयवादी बनले.व मुस्लीमांना व्याहारिक फायदे मिळवून देण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु झाले .

सांधे (Joints)

◆ सांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे.

◆ दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

● सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :

★ करवती (अचल) सांधा :

◆ यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.

★ बिजागरीचा सांधा : 

◆ या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.

★ उखळीचा सांधा: 

◆ खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.

★ सरकता सांधा : 

◆ यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ ध्वनीची निर्मिती (Production of sound)

◆ जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते, त्यास ‘कंपन’ (vibration) असे म्हणतात.

◆ कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल.

◆ कंपने ही दिसूही शकतात किंवा ती जाणवतात.

★ ध्वनीचे प्रसारण (Propagation of sound)

◆ ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

★ माध्यम म्हणजे काय ?

◆ ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम (Medium) म्हणतात. परत ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे कणरहीत असावे. (Particle medium)

★ ध्वनीच्या प्रसारणाची संकल्पना

◆ ज्या वेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा, ज्या जागी कंपने तयार होतात. तेथून ध्वनीचे प्रसारण होते.

◆ सर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलीत होतात. (हालचाल होते).जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हे विचलीत कण त्यांच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरचा विचलीत कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो.

◆ अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारील कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आप-आपल्या जागेवर येतो.

◆ म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वत: कण करतात. परंतु ते त्यांच्या मूळ जागेवर राहूनच.

◆ ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या (waves) स्वरुपात होते. म्हणजेच ज्या माध्यमात कण हे जितके जवळ असतात. तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते.

◆ आपणास माहिती आहे स्थायू मधील कण अगदीच जवळ-जवळ असतात, म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो.

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन मध्य स्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन (oscillation) तरंग प्रसरणाच्या रेषेला लंब असते.

◆ थोडक्यात सांगायचे तर, जे तरंग वर-खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग (Transverse Waves) म्हणतात.

★ अनुतरंग (Longitudinal waves)

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन (Oscillation) पुढे आणि मागे होते आणि त्यांचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते त्यांना “अनुतरंग” म्हणतात.
म्हणजेच पुढे-मागे होणारे आणि प्रसरण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणता येईल.

संघराज्य म्हणजे म्हणजे काय?

देशातील केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकारे यांच्यात संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा तिला संघराज्य म्हणून ओळखले जाते. सरकार प्रादेशिक अर्थाने लोकांच्या जवळ असेल तर ते लोकांच्या नियंत्रणात राहण्याची शक्यता जास्त असते या अपेक्षेतून ही व्यवस्था उदयाला येते.

म्हणून, देशभरात एकच एक सरकार निर्माण करण्याच्या ऐवजी सगळ्या देशासाठी काही किमान जबाबदार्‍या पार पाडणारे एक सरकार (देशाचे सरकार, संघ शासन किंवा केंद्र सरकार) आणि विविध भागांसाठी त्या-त्या प्रदेशाचा कारभार सांभाळणारे स्वतंत्र सरकार (घटकराज्याचे सरकार किंवा प्रांतिक सरकार) अशी व्यवस्था संघराज्यात सामान्यपणे केलेली असते.

या दोन्ही प्रकारच्या सरकारांना आपआपल्या कार्यक्षेत्रात पुरेसे स्वातंत्र्य असते आणि एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यावर संवैधानिक निर्बंध असतात. खेरीज, दोन्ही प्रकारच्या सरकारांना आपले स्वतःचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग असतात.  

अमेरिकेत 1789 मध्ये जेव्हा अशी व्यवस्था संविधानाने निर्माण केली तेव्हा मुळात तिथल्या भिन्न प्रदेशांचे स्वतंत्र अस्तित्व होते आणि त्यांनी एकापरीने वाटाघाटी आणि देवाणघेवाण करून अशी संघीय व्यवस्था निर्माण केली.

त्यामुळेच संघराज्य म्हणजे काय याविषयीच्या सैद्धांतिक मांडणीवर दीर्घकाळपर्यंत अमेरिकी प्रारूपाचा प्रभाव राहिला. गेल्या पाव शतकात मात्र हा प्रभाव ओसरून संघराज्याविषयी नवे विचार प्रचलित झालेले दिसतात.

यातला गमतीचा भाग म्हणजे संघराज्याचे सिद्धांत बदलण्यात भारतीय संघराज्याची रचना महत्त्वाची ठरली आहे; पण भारतातील राजकारणी, पत्रकार आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी हे मात्र अजूनही संघराज्याचे कालबाह्य झालेले सिद्धांत प्रमाण मानून भारतातील घडामोडींचे अन्वयार्थ लावत असतात!  

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...