Saturday, 11 July 2020

राज्यसेवा अभ्यासक्रमात खालील प्रमाणे बदल झाला आहे

● सामान्य अध्ययन १ मध्ये रिमोट सेन्सिंग या टाँपिक मध्ये काही अधिक उपघटक समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन २ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

● सामान्य अध्ययन ४ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या विभागातील संगणक व माहिती तंत्रज्ञान या उपघटकात काही नविन मुद्दे समाविष्ट केले आहेत.

● सामान्य अध्ययन १ मधील रिमोट सेन्सिंग च्या अभ्यासाचा फायदा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये होईल.

● जैव तंत्रज्ञान चा अभ्यासक्रम असा सुटसुटीत करुन देण्यात आला आहे. याचा टु द पाँईट अभ्यास करण्यासाठी नक्कीच  फायदा होईल..

● सामान्य अध्ययन २ या पेपर मध्ये हा नविन उपघटक समाविष्ट करण्यात आला आहे..

● सामान्य अध्ययन १ मधील निवडक समाजसुधारक यामध्ये काही नव्याने समाजसुधारक समाविष्ट केले आहेत..

● या राष्ट्रीय चळवळी मधीलमहत्त्वाच्या व्यक्ती वर प्रश्न येतच होते. आता त्यांची नावे स्पेसिफिक नमुद करण्यात आली आहेत..

● सामान्य अध्ययन १ मधील मानवी भूगोल मध्ये काही संकल्पना अँड करण्यात आल्या आहेत..

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.

🌺🌺लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.🌺🌺

🔰“सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत अधिक भर पडली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी आम्ही परीक्षा रद्द करण्याची आमची भूमिका मांडली,” असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

🔰काही दिवसांपूर्वी राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर यूजीसीनं सप्टेंबर अखेरिस परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या संपूर्ण विषयावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी झालेल्या चर्चेबद्दल आणि त्यांची मतं काय होती याबाबतही माहिती दिली.

🔰“सप्टेंबरल महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. ६ एप्रिल रोजी आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन केली. सहा कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होतं.

🔰त्यानंतर २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या गाडईलाईन्स आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा, तसंच करोनाची परिस्थिती पाहून तिथल्या शासनानं आणि विद्यापीठांनी गाईडलाईन्स ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं,” असं सामंत यावेळी म्हणाले.

भारतात उद्योगस्नेही वातावरण

🔰भारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.

🔰ते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.

🔰आम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📕भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय आहे?

(A) आत्रेय
(B) अधिरीत
(C) शेषनाग✅✅
(D) अभिरथ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण आहे?

(A) बेगम राना
(B) शाहीदा बादशाह
(C) शाहिदा मलिक
(D) निगार जोहर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 कोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?

(A) टेस्ला✅✅
(B) टोयोटा मोटर कॉर्पोरेशन
(C) जनरल मोटर्स
(D) होंडा मोटर कंपनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📙 कोण प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय ठरला?

(A) लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू✅✅
(B) कॅप्टन श्रीराम सिंग शेखावत
(C) कॅप्टन गोपाल नारायण देवांग
(D) मेजर जनरल मोहम्मद अमीन नाईक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणत्या संस्थेनी CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग डिस्कवरी हॅकथॉन’ स्पर्धा आयोजित केली?

(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)✅✅
(C) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
(D) भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)


• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले
– SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.

• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे 
- इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).

• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय
- सत्यरूप सिद्धांत.

• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली
- IIT दिल्ली.

• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती
- "क्लायमेट अँड वॉटर".

•  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’  नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित  केले जाणार आहे.
- गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.

• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे
- लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.

• COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे.
- “ऑपरेशन नमस्ते”.

• नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य
- उत्तर मॅकेडोनिया.

• ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला
- जागतिक आरोग्य संघटना.

• संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.

• आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.

• वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला
– 50 लक्ष रुपये.

• केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे.
- 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन)

• भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे
- “CoWin-20” अॅप.

• ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

• .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

✏आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

✏गुजरात -भिल्ल

✏झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

✏त्रिपुरा - चकमा, लुसाई

✏उत्तरांचल - भुतिया

✏केरळ - मोपला, उरली

✏छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

✏नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

✏आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

✏पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

✏महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

✏मेघालय - गारो, खासी, जैतिया

✏सिक्कीम - लेपचा

✏तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

प्रश्न मंजुषा

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २

♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3

देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

महाराष्ट्र विधान परिषद

📚  (Maharashtra Legislative Council)

महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत.

• महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेशआणि तेलंगणाया 6 घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत.

• बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.

• राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही.

• कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात.

• विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).

काही समानार्थी म्हणी


🌷आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
🌷आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
🌷कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
🌷साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
🌷कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
🌷काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
🌷करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
🌷खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
🌷खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
🌷आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
🌷गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
🌷काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
🌷घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
🌷चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
🌷जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
🌷पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
🌷नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
🌷नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
🌷बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
🌷पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
🌷वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
🌷वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण

महत्वाचे दिन...


0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

पक्षांतर बंदी कायदा

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्क्ष/सभापती यांना आहे. पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

भारत वार्षिक पर्जन्यमान

अती कमी पर्जन्य [४० सेमी पेक्षा कमी ]

प्रदेश

कच्छचे रन,
पश्चिम राजस्थान,
नैऋत्य पंजाब,
पश्चिम हरयाणा,
कश्मीर का उत्तरेकडील भाग

कमी पर्जन्य [४० ते ६० सेमी पर्जन्य ]

प्रदेश –

पूर्व राजस्थान,
पश्चिम गुजरात,
पश्चिम पंजाब,
पूर्व हरियाणा,
दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश

मध्यम पर्जन्य [६० ते १०० सेमी ]

प्रदेश

भारताचा बहुतांश भाग
जम्मू कश्मीर चा नैऋत्य भाग,
उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग,
मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा काही भाग,
महाराष्ट्र,
कर्नाटक,
आंध्रा प्रदेश,
तामिळनाडू चा भाग

१०० ते १५० पर्जन्य प्रदेश

– उत्तर प्रदेश के पूर्व भाग,
बिहार, 
पश्चिम बंगाल,
मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
झारखंड,
उडीसा.