Wednesday, 8 July 2020

फेसबुक सह ८९ अ‍ॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश

📌आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

📌 सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

📌याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

WHO मधून बाहेर पडल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांना कळवलं

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं होण्याच्या प्रक्रियेविषयी संयुक्त राष्ट्राला अधिकृतरित्या कळवलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका सर्वाधिक वार्षिक आर्थिक मदत करत आहे.

📌ट्रम्प यांनी यापूर्वी करोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलेल्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप करत बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तसंच त्यांना देण्यात येणारा निधीही रोखण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर मंगळवारी ट्रम्प यांनी याबाबत अधिकृतरित्या याबाबत नोटीस पाठवली आहे.

📌तथापि, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणं हे पुढील वर्षापर्यंत अमेरिकेला शक्य नाही. नव्या प्रशासनाद्वारे ते रद्द केलं जाऊ शकतं अथवा परिस्थितीही बदलू शकते. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत असलेल्या जो बिडन यांनीदेखील यासंदर्भात मोठी घोषणा केली होती.

📌राष्ट्राध्यक्षपदी आपण विराजमान झाल्यास पहिल्याच दिवशी हा निर्णय आपण मागे घेणार असे ते म्हणाले होते. यापूर्वी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत ते चीनच्या हातातील बाहुले असल्याचं म्हटलं होतं.

📌दरम्यान, ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेला तडा जाईल, असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

📌"जर नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या निवडणुकीत आपला विजय झाला तर जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सहभागी होऊ," असं बायडेन म्हणाले होते. "आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी मी पुन्हा अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेत सामिल करून घेईन आणि जागतिक मंचावर आपलं नेतृत्व पुन्हा आणेन," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

📌जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा होत राहाव्या असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जागितक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा होत नसल्याचं म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं होण्याच्या नियमांप्रमाणे अमेरिकेला त्यांच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण कारव्या लागणार आहेत.

📌दरवर्षी अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला ४५ कोटी डॉलर्सहून अधिक निधी दिला जातो. परंतु सध्या अमेरिकेला २० कोटी डॉलर्सची रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे. यामध्ये सध्याच्या आणि त्यापूर्वीच्या निधीचा समावेश आहे.

गांधी कुटुंबाच्या संस्थांना ‘पीएचएफआय’, बिल गेट्स फाऊंडेशनकडून मोठी देणगी


📌श्यामलाल यादव
राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) आणि राजीव गांधी विश्वस्त संस्था (आरजीसीटी) यांनी २००६-०७ ते २०१८-१९ या कालावधीत एकत्रितपणे ३२६.६८ कोटी इतका परदेशी निधी मिळाल्याचे जाहीर केले. त्यापैकी ३१६.२३ कोटी (९७ टक्के) रक्कम अमेरिकेतील रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्ट व बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन तसेच दिल्लीतील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) या संस्थांनी दिली होती.
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव

📌गांधी विश्वस्त संस्था यांनी गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रकटनानुसार, रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्टने एकूण १८७.८४ कोटी रूपये तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने ६८.७८ कोटी रुपये दिले होते. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने ५९.६१ कोटी रूपये या दोन संस्थांना दिले होते.

📌रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्ट या संस्थेची स्थापना २००७ मध्ये झाली असून, त्याच्या अध्यक्षा इंदू रावत उर्फ माता मंगला (भोलेजी महाराज उर्फ महिपाल सिंह रावत यांच्या पत्नी) आहेत. भोलेजी हे उत्तराखंडचे भाजप नेते व मंत्री सत्पाल महाराज यांचे लहान भाऊ आहेत. रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्टने २०११-१२ व २०१८-१९ दरम्यान देणग्या दिल्या होत्या.

📌बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने २०१२-१३ आणि २०१८-१९ दरम्यान या दोन संस्थांना देणग्या दिल्या होत्या. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान देणग्या दिल्या. या संस्थेचा एफसीआरए परवाना एप्रिल २०१७ मध्ये रद्द झाला.

📌इतर परदेशी देणगीदारांत चीनच्या दूतावासाचा समावेश असून त्यांनी २००६-०७ मध्ये या संस्थांना ९० लाख रुपये दिले होते. युरोपीय समुदायाने २००६-०७ मध्ये ३.८४ लाख देणगी दिली होती. जिनेव्हातील ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रुव्हड न्यूट्रीशन या संस्थेने २.१६ कोटी रूपये दिले होते. राजीव गांधी फाऊंडेशन व राजीव गांधी विश्वस्त संस्था यांना परदेशातून १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ७६.१२ कोटी रूपये मिळाले होते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत २५०.५६ कोटी रूपये मिळाले. या संस्थांनी २०१९-२० मधील देणग्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये

🅾प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

🧩अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

🅾हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

🅾हे एका वर्षासाठी असते.

🅾अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

🅾उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

🅾चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये💠💠

🅾अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

🅾उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.

🅾कालबद्ध उद्दिष्ट्ये सादर करणे. एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे.

🅾सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे.

🅾निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे.

🅾मागील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या खर्चाचा अंदाज करणे.

🅾उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे. उत्पन्न व खर्च यात कोणते बदल होत आहेत ते पाहणे.

🅾लोकांच्या प्रति असणारे आर्थिक इत्तरदायित्व स्पष्ट करणे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠शिलकीचे अंदाजपञक💠💠

🅾ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते असे अर्थसंकल्प.

🧩फायदे

आर्थिक शिस्त

आर्थिक कार्यक्षमता

खर्चाचे प्राधान्यक्रम

सरकारचा किमान हस्तक्षेप

भविष्यकालीन तरतूद

🧩तोटे

आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत

कालबाह्य संकल्पना

आर्थिक आपत्ती

कल्याणकारी राज्यसंकल्पनेशी विसंगत

आर्थिक विकासास पूरक नाही

अर्थसंकल्प साधन आहे, साध्य नाही

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠तुटीचे अंदाजपञक💠💠

🅾ज्या प्रकारच्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा कमी असते किंवा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असतो.

🧩फायदे

उत्पन्न व रोजगारात वाढ

मंदी विरोधी

बेरोजगारी घटविणे

आर्थिक विकास

उत्पादनास चालना

🧩तोटे

भाववाढीचा धोका

काळाबाजार

खर्चावर नियंञण नाही

उत्पादनरचना बिघडते

विषमता वाढते

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠संतुलित अंदाजपञक💠💠

🅾अशा अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न व खर्च समान असते.

🧩फायदे

खर्चावर नियंञण

चलनपुरवठा वाढत नाही

उत्पादनवाढीस उपयुक्त

कार्यक्षमता

अर्थसंकल्पिय परिणाम नाही

🧩तोटे

अर्थव्यवस्थेस उपयुक्त नाही

विकासाला पोषक नाही

मंदी वाढते

खर्चात अपव्यव

सामाजिक लाभ नाहीत

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...