२८ जून २०२०

आजची प्रश्नमंजुषा

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
____________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
____________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
____________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
____________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
____________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
____________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
____________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

संपूर्ण मराठी व्याकरण वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

________________________

1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

A. 1/2 सदस्य संख्या

B. 1/3 सदस्य संख्या✅

C. 1/4 सदस्य संख्या

D. 1/10 सदस्य संख्या.

________________________

2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

A. 30 दिवस

B. 60 दिवस

C. 90 दिवस✅

D. वरीलपैकी काहीही नाही.

________________________

3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

A. राज्य शासन

B. स्थायी समिती✅

C. जिल्हा परिषद

D. मुख्य कार्यकारी अधिकारी.

________________________

4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

A. सहाय्यक अधिकारी

B. सल्लागार समिती

C. कक्ष अधिकारी✅

D. मुख्य अधिकारी.

________________________

5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका
भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

A. सरपंच

B. गट विकास अधिकारी

C. मुख्य कार्यकारी अधिकारी

D. वरील सर्वांना.✅

________________________

6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

A. डॉ. बी.आर, आंबेडकर

B. वल्लभभाई पटेल✅

C. जवाहरलाल नेहरू

D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.

________________________

7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

A. (a) आणि (b)

B. (b), (c) आणि (d)

C. (a), (c) आणि (d)

D. (a), (b), (c) आणि (d). ✅

________________________

8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b), (c)

B. (b), (c), (d)

C. (a), (c), (d)

D. (a), (b), (c), (d). ✅

________________________

9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

A. संसद ठराव करून

B. संसद कायदा तयार करून✅

C. राष्ट्रपती आदेश पारित करून

D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.

________________________

10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते.

A. वित्त विधेयक

B. विनियोजन अधिनियम ✅

C. वित्तीय अधिनियम

D. संचित निधी अधिनियम.

आंतरराष्ट्रीय व्यापार.


🅾आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा प्रांत ओलांडून भांडवल , वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय . 

🅾बर्‍याच देशांमध्ये असा व्यापार सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) लक्षणीय वाटा दर्शवितो . आंतरराष्ट्रीय व्यापार संपूर्ण इतिहासात अस्तित्त्वात आहे (उदाहरणार्थ उत्तरापाठा , रेशीम रोड , अंबर रोड , आफ्रिकेसाठी भंगार , अटलांटिक गुलाम व्यापार , मीठ रस्ते ), त्याचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व अलिकडच्या शतकांत वाढत चालले आहे.

🅾देशांतर्गत व्यापाराच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे . जेव्हा चलन, सरकारी धोरणे, अर्थव्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, कायदे आणि बाजारपेठा व्यापतात तेव्हा दोन किंवा अधिक देशांमधील व्यापार व्यापतो.

🅾वेगवेगळ्या आर्थिक स्थितीतील देशांमधील व्यापाराच्या प्रक्रियेस चालना देण्यासाठी आणि न्याय्य ठरवण्यासाठी जागतिक व्यापार संघटना सारख्या काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था स्थापन केल्या गेल्या . या संघटना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सोयीसाठी आणि वाढीच्या दिशेने कार्य करतात. आंतरराज्यीय आणि अधिराजकीय संस्था आणि राष्ट्रीय सांख्यिकी संस्था यांची सांख्यिकी सेवा आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिकृत आकडेवारी प्रकाशित करते .

💠💠जागतिक व्यापार वैशिष्ट्य.💠💠

🅾एखाद्या देशातील एका पक्षाकडून दुसर्‍या देशातल्या पक्षाकडे हस्तांतरित किंवा विक्री केलेले उत्पादन हे मूळ देशातून निर्यात केले जाते आणि ते उत्पादन प्राप्त झालेल्या देशात आयात होते. देशाच्या चालू खात्यात पेमेंट्सच्या शिल्लकमध्ये आयात आणि निर्यात होते . 

🅾जागतिक स्तरावर व्यापार केल्याने ग्राहकांना आणि देशांना नवीन बाजारपेठांमध्ये आणि उत्पादनांच्या संपर्कात येण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे उत्पादन आढळू शकते: अन्न, कपडे, सुटे भाग, तेल, दागिने, वाइन, साठा, चलने आणि पाणी. सेवांचे व्यापार देखील केले जातातः पर्यटन, बँकिंग, सल्लामसलत आणि वाहतूक प्रगत तंत्रज्ञान ( वाहतुकीसह ), जागतिकीकरण , औद्योगिकीकरण , आउटसोर्सिंग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणालीवर मोठा परिणाम होतो.

💠💠जागतिक व्यापार संघटना.💠💠

🅾च्या दौऱ्यावर, दर आणि व्यापार सर्वसाधारण करार (GATT), 1947 मध्ये 23 देशांमध्ये एक बहुपक्षीय करार स्थापना करण्यात आली नंतर दुसरे महायुद्ध आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य-जसे की समर्पित इतर नवीन बहुपक्षीय संस्था वेक जागतिक बँक ( 1944 ची स्थापना केली) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (1944 किंवा 1945 ची स्थापना केली). 

🅾आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या नावाने व्यापारासाठी तुलना करता येणारी आंतरराष्ट्रीय संस्था अमेरिका म्हणून कधीही सुरू झाली नाही . आणि इतर सही स्थापना करार मंजुरी देणे नाही, आणि GATT त्यामुळे हळूहळू झाले वास्तविक आंतरराष्ट्रीय संस्था.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...