२४ जून २०२०

भूगोल : पर्वतांचे प्रकार

◆ सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय.

जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

★ वलित पर्वत :

◆ वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात.

★ विभंग-गट पर्वत :

◆  विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

★ घुमटी पर्वत :

◆ भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ ज्वालामुखी पर्वत :

◆ पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

★ अवशिष्ट पर्वत :

◆ कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.
===========================

★ महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :

जलाशय            नदी         स्थळ/जिल्हा

●जायकवाडी/नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

● भंडारदरा –    (प्रवरा)    अहमदनगर

● गंगापूर –       (गोदावरी)       नाशिक

● राधानगरी – (भोगावती)    कोल्हापूर

● शिवाजी सागर -- (कोयना)   सातारा

● उजनी –       (भीमा)         सोलापूर

● तोतलाडोह/ मेघदूत जलाशय (पेंच)   नागपूर

● यशवंत धरण –    (बोर)        वर्धा

● मोडकसागर –    (वैतरणा)     ठाणे

● खडकवासला –    (मुठा)        पुणे

● येलदरी –            (पूर्णा)        परभणी

● बाभळी प्रकल्प – (गोदावरी)   नांदेड
▂▂▂

Daily Practice Test


1) भारतातून मलेरियाचे - - - -  सालापर्यंत निर्मूलन करण्यासाठी ' मेरा इंडिया ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

( 1 ) 2025
( 2 ) 2022
( 3 ) 2050 👈
( 4 ) 2028

2) खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोक विशू हा सण नववर्षाचा दिवस म्हणून साजरा करतात ?

( 1 ) कर्नाटक
( 2 ) मणिपूर
( 3 ) नागालँड
( 4 ) केरळ 👈

3) महिलांच्या सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणत्या दूरसंचार कंपनीने माय सर्कल ' हे अॅप्लिकेशन सुरू केले आहे ?

( 1 ) रिलायन्स लिमिटेड
( 2 ) भारती एअरटेल 👈
( 3 ) बीएसएनएल
( 4 ) व्होडाफोन

4) एप्रिल 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकांचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आले ?

( अ ) युनियन बँक ऑफ इंडिया
( ब ) देना बैंक
( क ) इंपेरियल बँक
( ड ) विजया बैंक

( 1 ) अ , ब , ड
( 2 ) ब आणि ड 👈
( 3 ) ब , क , ड
( 4 ) अ आणि क

5) ' टाईम्स ' या नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2019 मधील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तींचा समावेश आहे ?

( अ ) अरुंधती काटजू
( ब ) मेनका गुरुस्वामी
( क ) नरेंद्र मोदी
( ड ) मुकेश अंबानी
( इ ) निर्मला सीतारामन

( 1 ) अ , ब , ड 👈
( 2 ) अ , ब , क , ड
( 3 ) क , ड , इ
( 4 ) वरीलपैकी सर्व.

6) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

विधान अ : भारतामध्ये प्रत्येकी 10189 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर उपलब्ध आहे.
विधान ब : प्रत्येकी 1000 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर असावा, अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर , अचूक
( 3 ) अ व ब दोन्ही बरोबर 👈
( 4 ) अ व ब दोन्ही चूक

7) ' वसुंधरा दिन ' - - - - - - - रोजी साजरा करण्यात येतो.

( 1 ) 26 जून
( 2 ) 12 मार्च
( 3 ) 22 एप्रिल 👈
( 4 ) 5 जून 

8) खालीलपैकी सत्य विधान / ने कोणते / ती ?

( अ ) वरुण ' हा भारत व रशियाच्या नौदलांदरम्यान घेण्यात येणारा युद्धसराव आहे.
( ब ) 2019 सालचा वरूण नौदल सराव मे महिन्यात गोवा येथे पार पडला.

( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब 👈
( 3 ) अ व ब दोन्ही
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.

9) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

( अ ) या संघटनेची स्थापना 1919 मध्ये पॅरिसच्या तहाद्वारे करण्यात आली.
( ब ) या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
( क ) या संघटनेला 1969 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
( ड ) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे . वरीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत ?

( 1 ) अ , ब , क
( 2 ) ब , क , ड 👈
( 3 ) अ , ब , ड
( 4 ) वरीलपैकी सर्व

10 ) खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( अ ) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ' वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द केली.
( ब ) एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर अचूक
( 3 ) दोन्ही बरोबर 👈
( 4 ) दोन्ही चूक

23 जून 1757 प्लासीची लढाई

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.

ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले.

पोखरणच्या प्राचीन कुंभार कलेचे KVIC कडून पुनरुज्जीवन

▪️राजस्थान राज्यातल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण या छोट्या गावातल्या प्रसिध्द कुंभार (मातीची भांडी तयार करणे) कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 20 जून 2020 रोजी 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण केले.

▪️इलेक्ट्रिक चाकांबरोबरच KVICने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले.

▪️भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला टेराकोटा उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे.

▪️पोखरणमधे 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके ही कुंभार कामात गुंतलेले आहेत.

▪️KVICने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत.

▪️या 80 कुंभाराना KVICने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत.

▪️कुल्हड पासून ते फुलदाणी, मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात.

▪️राजस्थान, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, हरयाणा, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, तामिळनाडू, ओडीशा, तेलंगणा, बिहार राज्यातल्या अनेक दुर्गम भागात KVICने कुंभार सशक्तीकरण योजना सुरु केली आहे.

▪️या योजनेच्या अंतर्गत KVIC माती मिश्रणासाठी यंत्र आणि भांडी तयार करण्यासाठी इतर साहित्य पुरवते.

विषाणूमुळे होणारे रोग

पोलिओ (Poliomycetis)

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf  V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

गालफुगी (Mums)

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस.

रुबेला (Rubella किंवा Gernman measles)

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.

गोवर (Measles)

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

कांजण्या (Chicken Pox)

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

देवी (Small Pox)

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

महाराष्ट्र

🔹 महाराष्ट्राची पूर्व - पश्चिम लांबी 800 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राची दक्षिण - उत्तर लांबी 700 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 03, 07, 713 चौ. कि. मी

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या 9.36%  आहे

🔹 महाराष्ट्रात 27 महानगर पालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 234 नगरपालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत

🔹 1 जानेवारी 1981 साली कुलाब जिल्ह्याचे नाव बदलून रायगड रायगड करण्यात आले.

🔹 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती

🔹 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो

🔹 महाराष्टाचा भारतात लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो

चलनवाढ व चलनघट.


🅾अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी  जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात.

🅾 याउलट  किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे  समजतात.

🅾चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना  होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता.

🅾परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण  रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास  किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य  चलनवाढ’ होय.

💠💠 चलनवाढीची कारणे.💠💠

🅾पैशातील उत्पन्नामुळे निर्माण होणारी वस्तूंची मागणी  आणि वस्तूंचा उपलब्ध पुरवठा यांच्या प्रक्रियेतून चलनवाढीचा दबाव  निर्माण होतो.

🅾 पैशाचा पुरवठा वाढल्यास व्यक्तिगत उत्पन्न वाढून वस्तूंची  मागणी वाढते. सरकारकडून तुटीचा अर्थभरणा, बॅंकांकडून पतपैशाचा  अतिरिक्त पुरवठा आणि उपभोगप्रवृत्ती वाढल्याने पैशाच्या भ्रमणवेगात  वाढ, या कारणांमुळे पैशाचा एकूण पुरवठा वाढतो.

🅾करांमध्ये सवलती मिळाल्या, राष्ट्रीय उत्पन्न वाढले व बचतप्रवृत्ती कमी झाली, तर खर्चासाठी उपलब्ध उत्पन्न वाढते. संचित बचती व हप्त्याने वस्तू मिळण्याच्या सोयीमुळे खर्चप्रवृत्ती वाढते.

🅾विदेशी मागणी वाढल्यास देशांतर्गत उपयोगासाठी वस्तूंचा साठा कमी होतो. उत्पादनवाढीलाही काही वेळ लागतो आणि अनेक अडचणी उद्‌भवतात. पूर्ण रोजगार असल्यास  अधिक अशक्य असते.

🅾या कारणांमुळे चलनवाढ संभवते शिवाय भविष्यकालीन परिस्थितीविषयीच्या अपेक्षाही भाववाढीला चालना देतात.

💠💠चलनवाढीचे सिद्धांत.💠💠

🅾मागणीसापेक्ष चलनवाढअतिरिक्त मागणीच्या दबावामुळे चलनवाढ उद्‌भवते, असे काही अर्थशास्त्रज्ञ प्रतिपादतात. पैशाचा पुरवठा वाढल्यास मागणी वाढून किंमती वाढतात.

🅾 सरकारी खर्चात वाढ, नजीकच्या भविष्यकाळात उत्पन्न, नफा व किंमती वाढण्याची अपेक्षा असल्याने उपभोग व गुंतवणूक प्रवृत्तींत वाढ, व्याजाचे दर कमी झाल्याने गुंतवणुकीत वाढ इत्यादींमुळे खर्च वाढतो.

🅾परिणामी व्यक्तिगत उत्पन्न वाढते. यापैकी काही भाग कर व बचतरूपाने मागे राहतो आणि उरलेल्या भागामुळे पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीत चलनवाढ होते.

💠💠क्षेत्रीय चलनवाढ.💠💠

🅾मागणीचा दबाव वा व्ययप्रेरणा यांच्या अभावीही चलनवाढ होऊ शकते. एकूण मागणी कायम राहून मागणीचे स्वरूप मात्र बदलते आणि किंमती व वेतन कमी होऊ शकत नाहीत असे गृहीत धरल्यास, मागणी वाढलेल्या क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी साधनसामग्रीची मागणी वाढते.

🅾 त्यांच्या प्राप्तीसाठी जास्त किंमत द्यावी लागते. मागणी कमी झालेल्या क्षेत्रातील घटकांसाठीही त्यामुळे अधिक किंमत देणे भाग पडते. म्हणजे, मागणी वाढलेल्या क्षेत्रात प्रथम भाववाढ अनुभवास येते व त्यायोगे मागणी कमी झालेल्या क्षेत्रालाही ती व्यापून  जाते.

चलनवाढविरोधी धोरण
🧩 मुद्रानीती...

🅾मध्यवर्ती बॅंक महाग पैशाचे धोरण अनुसरते. त्यायोगे चलनसंकोच व पतनियंत्रणाचे मार्ग चोखाळले जातात.

🅾पर्यायी धोरण म्हणजे प्रचलित चलनव्यवस्था पूर्णतया रद्द करून नवीन चलनव्यवस्था निर्माण करणे.

🅾जर्मनी, रशिया, पोलंड, यूगोस्लाव्हिया वगैरे राष्ट्रांनी हे धोरण अंगीकारले होते.

चलनवाढीविरोधी धोरण.

🧩राजकोषीय नीती...

🅾सरकारचे अंदाजपत्रक वाढाव्याचे राखण्याच्या हेतूने सरकारी खर्चात योग्य ती कपात करून एकूण कररचना अधिक व्यापक व सखोल केली जाते.

🅾 स्वेच्छेच्या व सक्तीच्या बचत  योजना कार्यान्वित होतात. दीर्घमुदतीची कर्जे उभारली जातात. जरूर भासल्यास, चलनाचे अतिमूल्यनही केले जाते.

चलनवाढीविरोधी धोरण

🅾पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी उत्पादन साधनांचा पूर्ण उपयोग, भांडवल गुंतवणुकीस उत्तेजन, मक्तेदारीविरुद्ध उपाय, तांत्रिक सुधारणा, औद्योगिक शांतता यांकडे लक्ष दिले जाते.

🅾वेतनवाढीमुळे चलनवाढीला मदत होऊ नये म्हणून वेतन गोठविणे, वेतनाचा उत्पादनाशी संबंध जोडणे, वेतनवाढीची रक्कम कालांतराने देणे वगैरे उपाय योजतात. तसेच महत्त्वाच्या वस्तूंच्या कमाल  किंमती ठरवून त्यांच्या नियंत्रित वाटपाची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित  होते.

🅾चलनघटविरोधी धोरणाने मागणीला उत्तेजन मिळते. त्यासाठी स्वस्त पैशाचे धोरण अनुसरतात. मध्यम व गरीब वर्गांतील लोकांची खर्च प्रवृत्ती अधिक असल्याने त्यांच्याकडे अधिकतम पैसा राखावा लागतो.

🅾 म्हणून श्रीमंतांवर उद्‌गामी पद्धतीने कर-आकारणी, गरिबांना करांपासून सवलती व विविध प्रकारे आर्थिक साहाय्य, व्याजाच्या दरात घट, सरकारी क्षेत्रातील गुंतवणूक, सार्वजनिक हिताची कामे, तुटीचा अर्थभरणा इत्यादींचा अवलंब करून अर्थव्यवस्थेत आशादायक वातावरण निर्माण करावे लागते.
 

भारतातली चलनवाढीची कारणे.

🅾तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे

🅾ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो

🅾परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

🅾ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

🅾परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

🅾काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

🅾या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...