Tuesday, 16 June 2020

आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम.


◾️या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे.

◾️जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

◾️मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते.

◾️विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.

◾️भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे.

◾️भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

◾️२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि👍 रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.


 

मुद्रा (चलन).


🅾चलन पैसे किंवा पैशाचे स्वरूप आहे जे रोजच्या जीवनात खरेदी आणि विक्री करते. यात नाणी व कागदी नोट्स दोन्ही आहेत. एखाद्या देशात सामान्यतः वापरलेले चलन त्या देशाच्या सरकारी यंत्रणेद्वारे तयार केले जाते. 

🧩उदाहरणार्थ,:- भारतीय रुपया आणि पैसा विनिमय.

🅾आम्ही करतो त्या आधारे आपण चलनाबद्दल बोलू शकतो. सामान्यत: आम्ही चलनाच्या कामांमध्ये विनिमय करण्याचे माध्यम, मूल्याचे मोजमाप आणि पैसे जमा करणे आणि डिफर्ड पेमेंट्सचे मूल्य इ. समाविष्ट करतो. विविध अर्थशास्त्रज्ञांनी चलन काय करते त्या आधारावर परिभाषित केले आहे. 

🅾चलनमध्ये सामान्य स्वीकृतीची मालमत्ता असणे फार महत्वाचे आहे, जर एखाद्या वस्तूमध्ये सामान्य स्वीकृतीचे वैशिष्ट्य नसते तर त्या वस्तूला चलन म्हटले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे चलन म्हणजे कोणतीही वस्तू जी नियमन, मूल्य मोजणे, संपत्ती साठवणे आणि सर्वसाधारणपणे कर्जे भरण्याचे माध्यम म्हणून स्वीकारली जाऊ शकते.

कागदी चलन.

🅾कागदी चलन हे नियंत्रित चलनव्यवस्थेखाली काढले जाते. मध्यवर्ती बॅंक कागदी नोटा प्रचारात आणते व कागदी चलनाला आधार म्हणून चलनाला काही टक्के भाग सुवर्णाच्या स्वरूपात आपल्या खजिन्यात ठेवते. प्रातिनिधिक कागदी चलन असले, तर जेवढ्या कागदी नोटा असतील तेवढ्याच किमतीचे सोने आधार म्हणून ठेवावे लागते. कागदी चलनाचे रूपांतर सुवर्णात करता येते.

🅾प्रमाणित निधिपद्धती असेल, तर एकूण कागदी चलनाच्या काही विशिष्ट प्रमाणात सुवर्णनिधी ठेवावा लागतो. वेळोवेळी कायद्याने हे प्रमाण ठराविले जाते. मर्यादित विश्वासनिधि-पद्धती अस्तित्वात असेल, तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चलनास सोन्याचा आधार द्यावा लागत नाही. मात्र त्या मर्यादेपेक्षा अधिक कागदी चलन काढावयाचे असेल, तर तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बॅंकेत वा सरकारी तिजोरीत ठेवावे लागते.

🅾आज बहुतेक देशांनी अपरिवर्तनीय कागदी चलनपद्धतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीत कागदी चलनाचे धातूत रूपांतर करून मिळत नाही. लोकांचा सरकारवर जो विश्वास असतो, त्या आधारावर ही पद्धती टिकून राहते. चलननिर्मितीवर योग्य ते नियंत्रण ठेवले, तर किमती स्थिर राहतात व चलनव्यवहार सुरळीतपणे पार पडू शकतात .

चलनवाढीचे परिणाम.

1) अर्थव्यवस्थेत परिणाम
1) उद्योग - चलनवाढीचा काळ म्हणजे सुगीचा काळ
ii) गुंतवणूक - वाढते (देशी+परकीय गुंतवणूकीला चालना)
i) रोजगार निर्मीती - वाढते (बेरोजगारी कमी होते)
iv) करवसूली - बाढते
v) बचत - कमी होते (गुंतवणूकीत वाढ झाल्याने)
vi) व्याजदर - वाढते

खर्चदाबजन्य/पुरवठा कमी करणारी कारणे.

1. कृषी उत्पादनातील चढ-उतार
2. अपुरी औद्योगिक वाट
3. औद्योगिक कलह
4. नैसर्गिक संकटे
5. निर्यातीत वाढ
6. अपुन्या पायाभूत सुविधा
7. सट्टेबाजी व साठेबाजी
8. घटत्या फलाचा सिद्धांत

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

लोह ( Iron)

✅18 मिली ग्रॅम ( लेश मूलद्रव्ये)

✅मांस, मासे, अंडी, घेवडा, पालक, मेथी, खजूर, मनुके, हळद, तीळ, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, सुका मेवा, यकृत, सागरी पदार्थ, सोयाबीन, गुल शेंगदाणे

✍कार्य :

✅प्रथिने विकराच्या निर्मिती साठी

✅सर्वात जास्त उपयोग तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिन साठी

✅75 टक्के लोह रक्तात असते

✅90 टक्के लोहाचा पुनर्वापर होतो

✅रक्तात हिमोग्लोबिन तर स्नायुत मायोग्लोबिन मधील  लोह ऑक्सिजन च्या साह्याने वहनाचे कार्य करते

✅लोहामुळे रोगप्रतिकारक्षमता व ऊर्जानिर्मिती नियंतत्रित केली जाते

✍अभाव : ऍनिमिया

✅पांडुरोग रक्तक्षय असे म्हणतात

✅रक्तातील तांबड्या पेशी किंवा लोहाचे प्रमाण कमी होणे

✅हिमोग्लोबिन च्या कार्यात अडथळ निर्माण होतो

✅थकवा, थाप, लागणे, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा पांढरी पडणे

✅घोट्याना सूज येणे

✅गरोदर स्त्रियांत लोहाची कमतरता दूर होण्यासाठी त्यांना दररोज 60 मी ग्रॅम लोह आणि 500 मी ग्रॅम फॉलिक आम्लाचा पुरवठा करणे आवश्यक असते

✅दिवसात दोन वेळा फेरॉन सल्फेटच्या गोळ्या देऊन लोह अभावाचा उपचार करता येतो

✍अतिसेवन :

✅लोहाआधिक्य यामुळे पातळी वाढून हिमोक्रोमॅटोसीस हा अनुवांशिक विकार होतो

✅ यकृत, ह्रदय, अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यवर परिणाम होतो1

✅ यकृताचा सिरॉसिस ,मधुमेह, सांधेदुखी परिणाम दिसून येतात

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...