Thursday, 11 June 2020

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

अमृत अभियानातील दहा पाणीपुरवठा प्रकल्पांचे ई -भूमिपूजन.


🅾मुंबई - राज्याच्या सकल उत्पन्नात शहरांचा मोठा वाटा आहे . शहरे ही ग्रोथ इंजिन असल्याने विविध योजनांच्या माध्यमातून शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे .

🅾 या योजनांच्या माध्यमातून पुढील तीन - चार वर्षांमध्ये शहरे निश्चितपणे बदललेली दिसतील , असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे व्यक्त केला . वर्षा निवासस्थानी अमृत अभियानातील 10 पाणीपुरवठा प्रकल्पांचे ई - भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले , त्या वेळी ते बोलत होते .

🅾या वेळी मुख्यमंत्री म्हणाले , राज्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे . राज्यातील 50 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते . शहरांकडे लोकांचा ओढा वाढत राहिल्यामुळे आणि शहरांचे विकासाचे नियोजन नसल्यामुळे शहरे बकाल झाली आहेत .

🅾 या शहरांचा नियोजनबद्ध विकास करताना पाणीपुरवठ्याच्या योजना , मलनिस्सारण , घनकचऱ्याचे व्यवस्थापन यालाही प्राधान्य दिले पाहिजे. शहरीकरण ही संधी आहे , असे समजून या संधीचे रूपांतर विकासात केले पाहिजे. शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .

🅾 यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी , अमृत ( अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ) या योजना राबविण्याचे ठरविले आहे . या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शहरांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे .

🅾 राज्याच्या अमृत योजनेचा 7500 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केला असून , केंद्र शासनाकडून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे . दोन वर्षांत अमृत योजनेच्या माध्यमातून राज्यात 2500 कोटींची कामे सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले .

🅾या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमृत योजनेअंतर्गत 2015 - 16 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या वसई विरार , अमरावती , मालेगाव, सोलापूर , उस्मानाबाद , पनवेल , लातूर , वर्धा , अचलपूर , सातारा या 10 शहरांच्या 632 कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा व 63 कोटी रुपयांच्या रत्नागिरी नगरोत्थान योजनेचे ई -भूमिपूजन करण्यात आले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

भारतीय अर्थव्यवस्थेतील नवा अध्याय: चलनविषयक धोरण समिती (MPC).


🅾भारतीय अर्थव्यवस्थेमधील धोरणांमध्ये नव्याने स्पष्टता आणि समरूपता आणण्यासाठी स्थापन केलेल्या RBI गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee -MPC) ची पहिली बैठक 3 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू झाली आहे.

🅾या दोन दिवसीय बैठकीमध्ये सर्वव्यापक व्याज दरामध्ये सुधारणा करण्यासाठी चर्चा केली जात आहे. यामध्ये महागाई, कर्ज उचलने आणि वाढीला चालना देण्यासाठी आवश्यकता, परकीय व्यापार आणि जागतिक आर्थिक घटक यावर प्रदीर्घ चर्चा केली जात आहे.

🅾चलनविषयक धोरणाचे निर्णय एका समिती कडून घेतले जात आहेत, हे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. या आधी RBI ची आधीच एक तांत्रिक सल्लागार समिती होती. प्रत्येक RBI गव्हर्नर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक लोकांशी विचारविमर्श करत असे.

🧩सध्याच्या परिस्थितीत......

🅾ऑगस्ट रिटेल महागाई ही 5-महिन्यांच्या 5.05% इतक्या नीचांकाने सुखकारक ठरली, पण घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index –WPI) चलनवाढ ही दोन वर्षांच्या उच्चतम म्हणजेच 3.74% ने वर पोहोचली. ऑगस्ट मध्ये उतार येण्यापूर्वी, दोन्ही किरकोळ तसेच घाऊक किंमत निर्देशांकमध्ये सतत वाढा दिसत होती. याला अनुसरून, सरकारने ऑगस्ट मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकसह चलनविषयक धोरण फ्रेमवर्क कराराअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी +/-2% सह 4% महागाई लक्ष्य सूचित केले होते.

🧩चलनविषयक धोरण समिती म्हणजे काय?

🅾27 जून 2016 रोजी सरकारने RBI कायद्यामध्ये सुधारणा करून चलनविषयक धोरण बनवण्याचे काम नव्याने स्थापन चलनविषयक धोरण समिती (MPC) कडे सोपवले.

🅾या समितीत सहा सदस्य आहेत, ज्यामध्ये गव्हर्नर, एक डेप्युटी गव्हर्नर आणि दुसर्या अधिकारी असे RBI चे तीन सदस्य आणि सरकारने निवड केलेले तीन स्वतंत्र सदस्य आहेत.

🅾यासोबतचे आणखी एक समिति म्हणजे ‘शोध समिती’ असणार आहे, ज्यामध्ये अर्थशास्त्र, बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील तीन तज्ञ असलेले बाहेरील सदस्य असणार आहे. MPC ची बहुमताने चलनविषयक धोरणाचा निर्णय घेण्यासाठी वर्षातून चार वेळा बैठक होईल. आणि जर या दरम्यान हो-नाही असे समान मते पडलीत तर, त्यावर RBI गव्हर्नर यांचे मत निर्णय घेणार.

🧩MCP ची गरज आहे?

🅾या आधी RBI ची आधीच एक तांत्रिक सल्लागार समिती होती. प्रत्येक RBI गव्हर्नर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक लोकांशी विचारविमर्श करत असे.

🅾चलनविषयक निर्णय महागाई, वाढ, रोजगार, बँकिंग स्थिरता आणि एक स्थिर विनिमय दर यांची आवश्यकता लक्षात घेवून घेणे अपेक्षित असते.

🅾वाढत्या अर्थव्यवस्थेत ही सर्व सुचके एका व्यक्तीला लक्षात घेणे कठीण असते. RBI गव्हर्नर ने घेतलेल्या निर्णयामुळे यामधून येणार्‍या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असते. त्यादृष्टीने म्हणूनच, अश्या समितीची आवश्यकता जगातील सर्वाधिक वाढत्या अर्थव्यवस्थेला आज निर्माण झाली आहे.   

🧩MPC सदस्य...

🅾समितीमध्ये सहा सदस्य आहेत, त्यामध्ये प्रत्येकी सरकार आणि RBI कडून तीन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. या व्यक्तींची खालीलप्रमाणे नावे आहेत.

🧩RBI कडून:

🅾ऊर्जित पटेल, RBI गव्हर्नरइतर 2 नावे अजून प्रदर्शित करण्यात आली नाहीत

🧩केंद्र सरकार कडून:

🅾चेतन घाटे, भारतीय सांख्यिकी संस्था (Indian Statistical Institute -ISI)पामी दुआ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे संचालकरवींद्र ढोलकिया, प्राध्यापक, IIM-अहमदाबाद

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर.


🅾धोरण जाहीर - 25 जाने. 2016उद्देश - अपारंपारिक ऊर्जा निर्मितीला चालना देणे तरतूद पाच वर्षात 2 हजार 682 कोटी रुपये.

🧩हे आहेत धोरण -

🅾200 मेगावॅट वीज निर्मिती करू शकणारे सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत शासकीय इमारतीपर 100% अनुदानावर 1 ते 50 किलोवॅट क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 30 मेगावॅट याप्रमाणे पुढील पाच वर्षात एकूण 150 मेगावॅट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

🅾 खासगी संस्थेच्या इमारतीवर 20 टक्के अनुदानाच्या योजनेतून 5 ते 20 किलोवॅट इतक्या क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 10 मेगावॅट याप्रमाणे एकूण 50 मेगावॅट इतक्या विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

🧩एकात्मिक ऊर्जा विकास योजना :

🅾राज्यमंत्रीमंडळाची मंजूरी - 19 जाने. 2016

🧩योजनेचा उद्देश -

🅾शहरी भागातील वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांची वाढ करणे.

🧩उद्दिष्टे -

🅾शहरी भागातील वीज ग्राहकांच्या चोवीस तास वीजपुरवठा करणे.वीज प्रणालीचे सक्षमीकरण आधुनिकरण करणे.वीज गळती रोखण्यासाठी ग्राहक तसेच फिडर पातळीपर्यंत वीजमीटर बसविणे. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राज्यात सात केंद्रीय पथके.

🅾करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या १५ राज्यांतील ५० जिल्हे आणि महापालिका शहरांमध्ये पथके पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सात केंद्रीय पथके पाठविण्यात येणार असून, प्रतिबंधित क्षेत्रांत तांत्रिक मदत पुरविणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ही पथके करणार आहेत.

🅾तमिळनाडूमध्ये 7, आसाममध्ये 6, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये प्रत्येकी 5, तेलंगण, हरयाणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी 4, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तराखंड, गुजरातमध्ये प्रत्येकी 3 केंद्रीय पथके पाठवण्यात येणार आहेत.  प्रत्येक पथकामध्ये तीन सदस्य असतील.

🅾दोन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व संयुक्त सचिव दर्जाचा नोडल अधिकारी यांचा समावेश असेल.  ही पथके संबंधित जिल्हा वा शहरामधील आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील व गरजेनुसार वैद्यकीय सल्ला देतील. स्थानिक प्रशासनाने केंद्रीय पथकाशी समन्वय साधून करोनानियंत्रणाचे उपाय व निर्णय घेणे अपेक्षित आहे.

🅾करोनासंर्भातील सर्वेक्षण, नियंत्रण, चाचणी आणि उपचार असे चार स्तरीय धोरण अवलंबले जात असून, त्यासाठी केंद्रीय पथकाची मदत घेण्यात येणार आहे.

🅾काही राज्यांमध्ये अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे केंद्राला आढळले आहे. चाचण्यांचे निष्कर्ष वेळेत न येणे, 10 लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण कमी असणे आणि रुग्णवाढीच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा कमी असलेल्या शहरांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.

🅾मृतांचे प्रमाण अधिक आणि रुग्णवाढ वेगाने होत असलेल्या भागांत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ही पथके पाठवणार आहे.अनेक जिल्हा तसेच महापालिका शहरांमध्ये करोनासंबंधित पथक अस्तित्वात आहे. त्यांच्याशी केंद्रीय स्तरावरून समन्वय साधला जात आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

प्रश्न मंजुषा

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री

2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942

3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक

5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री

7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942

8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती

9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक

10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

11)ब्रह्म समाज (Brahma Samaj) के संस्थापक कौन थे? (SSC CHSL Exam )
(a) राजा राम मोहन राय
(b) दयानंद सरस्वत
(c) महात्मा गांधी
(d) लोकमान्य तिलक

Ans: (a)

12) स्वतंत्रता काल अवधि के दौरान कांग्रेस के अध्यक्ष कौन थे?
(a) जवाहर लाल नेहरू
(b) अबुल कलाम आजाद
(c) पट्टाभि सीतारमैय्या
(d) जे.बी. कृपलानी

Ans: (d)  (SSC CGL Teir-1)

13) भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन था?
(a) रहीमतुल्ला एम सयानी
(b) नवाब सैयद मुहम्मद बहादुर
(c) बदरूद्‌दीन तैयबजी
(d) अबुल कलाम आजाद

Ans: (c) SSC CPO Tier-1

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

विज्ञान प्रश्नसंच

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

भारतीय रुपया.


______________________________________
📌 रुपये हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो.

📌 भारतीय चलनामध्ये 
नोटा व नाणी वापरली जातात.

📌 सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे बनविल्या जातात.भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे.

📌 रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य (रुप्याचे नाणे) किंवा रौप्य (रुपे) या शब्दापासून आला आहे.

📌 (रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत.)

______________________________________

भारतीय राज्य सीमा

🌹 भूतान सीमा 🌹

🌻आसाम:-267 किमी

🌻अरुणाचल प्रदेश:-217 किमी

🌻पश्चिम बंगाल:-197 किमी

🌻सिक्कीम:-32 किमी

⚛भूतान सोबत एकूण 713 किमी लांबीची सीमा आहे

⚛एकूण वाटा 4.50% आहे

⚛एकूण 4 राज्याच्या सीमा लागून आहेत

🌹 म्यानमार सीमा 🌹

🎯अरुणाचल प्रदेश:-520 किमी

🎯मिझोराम:-510 किमी

🎯मणिपूर:-398 किमी

🎯नागालँड:-215 किमी

✍एकूण 1643 किमी लांबीची सीमा आहे

✍एकूण वाटा 10.80% आहे

✍एकूण 4 राज्याच्या सीमा लागून आहेत

🌸 नेपाळ सीमा 🌸

🍧उत्तर प्रदेश:-651 किमी

🍧बिहार:-609 किमी

🍧उत्तराखंड:-303 किमी

🍧सिक्कीम:-97.8 किमी

🍧पश्चिम बंगाल:-96 किमी

⚛नेपाळ सोबत 1751 किमी लांबीची सीमा आहे

⚛एकून वाटा 11.52% आहे

⚛एकूण 5 राज्यच्या सीमा लागून आहेत

🌚 पाकिस्तान सीमा 🌚

🌻जम्मू काश्मीर:-1222 किमी

🌻राजस्थान:-1170 किमी

🌻गुजरात:-506 किमी

🌻पंजाब:-425 किमी

✍पाकिस्तान सोबत 3323 किमी लांबीची सीमा आहे

✍एकूण वाटा 22% आहे

✍एकूण 4 राज्यच्या सीमा लागून आहेत

बांगलादेश सोबत असणारी सीमा

🍥पश्चिम बंगाल:-2217 किमी

🍥त्रिपुरा:-856 किमी

🍥मेघालय:-443 किमी

🍥आसाम:-262 किमी

🍥मिझोराम:-318 किमी

✍बांग्लादेश सोबत 4096 किमी लांबीची सीमा आहे.

✍एकूण वाटा 27% आहे

✍एकूण 5 राज्याच्या सीमा बांग्लादेश ला लागून आहेत

भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी


सुचेता कृपलानी

- गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
- 1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना

मातीगिनी हाजरा

- Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध
- चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग

लक्ष्मी सेहगल

- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या Indian National Army मध्ये कॅप्टन
- झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व
- दुसर्या महायुद्धात सहभाग

कित्तूरची राणी चनम्मा

- कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी
- वयाच्या 33 व्या वर्षी 1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव

कनकलता बारूआ

- आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध.
- चले जाव (1942) चळवळीत सक्रीय सहभाग
- वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद

कमलादेवी चटोपाध्याय

- 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग
- परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला
- कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार
- अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग

मादाम भिकाजी कामा

- लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या
- 1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला

अरूणा असफ अली

- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The Grand Old Lady म्हणून ओळख.
- भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला

पठाराची स्थानिक नावे:

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. 
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. 
पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 
समुद्री पूल आहे. 
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. 
दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. 
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने 
देखरेख केलेला हा पूल आहे. 
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. 
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 
कांडरौर गावात हा पूल आहे. 
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. 
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. 
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. 
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल. 
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. 
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.
_______________
_____________________________________