०७ जून २०२०

विभागीय आयुक्त

     राज्याने प्रशासन योग्यरीत्या चालविले जावे यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.
प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात. विभागीय आयुक्त हा सर्वात महत्वाचा प्रादेशिक अधिकारी असतो. तो आपल्या क्षेत्रात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. लॉर्ड विल्यम बेन्गटिंकने १८२९ मध्ये महसूल आयुक्त हे पद निर्माण केले. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले.
– राजस्थान सरकारने १९६१ ला आपल्या राज्यातून विभागीय आयुक्त हे पद रिक्त ( रद्द ) केले.
– उत्तरप्रदेशमध्ये विभागीय आयुक्तांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली.

पात्रता                       पदवीधर
निवडणूक                   UPSC मधून बढतीद्वारे
नेमणूक                      राज्य शासन
दर्जा                          IAS  चा असतो.
कार्यक्षेत्रे                     महसूल आणि प्रशासकीय विभाग
वेतन व भत्ते                 राज्य शासन
कार्यकाळ                    महसूल आणि प्रशासकीय विभाग
वेतन व भत्ते                  राज्य शासन
कार्यकाल                     ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )
राजीनामा                     राज्य शासनाकडे
रजा                            राज्य शासन
बडतर्फी                       केंद्र शासनाद्वारे

विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्य

१) विभागीय महसूल प्रशासकीय अधीकारी म्हणून भूमिका पार पाडणे.
२) आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विबीभागामध्ये काही वाद झाल्यास त्यांचे निराकरण करणे.
३) पंचायतिराजसंबंधित भूमिका पार पाडणे.
४) जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार
५) गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे.
६) जमीनदारी पद्धतीवर अंकुश ठेवणे.
७) पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
८) विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
९) विभागातील विविध यंत्रणामधून माहिती, आकडेवारी, तक्ते, अहवाल मागविणे त्यांची तपासणी करणे व राज्य शासनास अहवाल देणे.
१०) शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणे.
११) विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध.


🔰पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे.

🔰तर या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.

🔰तसेच ”एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे.

🔰‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे.

🔰सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते

प्रश्न मंजुषा


________________________________

Q- ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- पाडेगाव जि. सातारा

Q- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
उत्तर- प्रतिभा पाटील

Q:- भारतीय चलन रुपयाचे चिन्ह कोणी तयार केले?
उत्तर:- Udaya Kumar Dharmalingam

Q. आधार चा लोगो कोणी तयार केला आहे?
उत्तर:- Atul S. Pande

Q:- भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
उत्तर:- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

Q:-भारतात सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-कर्नाटक 2nd-उत्तराखंड

Q. बटरफ्लाय stroke हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर:- Swimming

Q.रोफ कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
उत्तर:- जम्मू आणि काश्मीर

Q- भारतीय वन कायदा कधी लागू करण्यात आला?
उत्तर:-1878 आणि 1927

Q- गांधीजींनी पहिला सत्याग्रह कोठे केला?
उत्तर:- चंपारण्य (बिहार)- 1917

Q:-आसाम चा नृत्यप्रकार कोणता आहे?
उत्तर:-बिहू

Q- कथकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर:- केरळ

Q- शीत वाळवंट कोठे आहेत?
उत्तर  शीत वाळवंट म्हणजे गोबीचे
वाळवंट ते चीन आणि मंगोलिया दरम्यान त्याचा विस्तार झाला

Q:- चंबळ नदी कोठून उगम पावते?
उत्तर:- मालवा  पठार वर स्थित जनापाव पहाडी वरून(विंध्य पर्वताच्या दक्षिण कडून)

Q:-भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
उत्तर:- सुचेता कृपलानी(UP)

Q:-कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
उत्तर- मध्य प्रदेश

Q:- आसाम ची राजधानी कोणती आहे?
उत्तर:- दिसपूर

Q:-शांतीवन कोणाचे स्मारक आहे?
उत्तर:- पंडित नेहरू

Q- येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर:-पूर्णा (परभणी)

Q:-महाराष्ट्र मध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे?
उत्तर:- 6

Q:-घुमर नाच कोणत्या राज्याची कला आहे?
- राज्यस्थान

Q:- मुख्य निर्वाचन आयुक्तांना शपथ कोण देतो?
उत्तर- राष्ट्रपती

Q:-बुलढाणा जिल्हा कोणत्या विभागात येतो?
उत्तर:- अमरावती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्त्वाचे प्रश्नसंच

🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39

जिवाणू (bacteria)

- साधारण एक पेशीय असतात
- विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात
- जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात
- जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात
- पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होतात जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात
- जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात.
- एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे.

● फायदेशीर जिवाणू

- शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीची साठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात
- मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात.
- लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही

● घातक जीवाणू

- स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात
- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते
- जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते
- क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात
- बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो

● कॉलरा (cholera)

- जिवाणू चे नाव -   विब्रिओ कॉलरी
- प्रसार - दूषित अन्न पाणी
- मोठी अवयव - मोठी आतडे
- लक्षणे -  उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे
- उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)
- लस - हाफकिन ची लस ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट
- शिगेल्ला  बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो

● घटसर्प

- जिवाणू चे नाव -  कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.
- प्रसार -  हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात
- अवयव - श्‍वसनसंस्था
- लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे
- उपचार -  पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)

● डांग्या खोकला.

- जिवाणू चे नाव - haemophilus pertusis
- प्रसार - हवेमार्फत
- अवयव - श्वसनसंस्था
- लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे
- उपचार - DPT (त्रिगुणी लस)

● धनुर्वात (tetanus)

- जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी
- प्रसार - ओल्या जखमेतून
- अवयव -  मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना
- उपचार -  DPT लस

● न्युमोनिया

- जिवाणू चे नाव -  डीप्लोकोकस न्युमोनी
- प्रसार -  हवेमार्फत
- अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे
- लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास
- उपचार - औषध पेनिसिलीन

● कुष्ठरोग

- जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
- प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू
- अवयव -  परिघीय चेता संस्था
- लक्षणे -   बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे
- उपचार - लस उपलब्ध नाही

ॲडम स्मिथ

ॲडम स्मिथ (जन्म - १६ जून १७२३, मृत्यू - १७ जुलै  १७९०) हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या गावी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते.तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या त्याने ग्रंथात मांडली .भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला , आधीच्या व्यापारावाद्यांच्या विरोधात तो होता .

अर्थशास्त्राला पूर्वी राजकीय अर्थशास्त्र असे म्हटले जात होते ,त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता तर अर्थशास्त्र हा विषय १८ व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात होता परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ सन १७७६ मध्ये आपला अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ 'राष्ट्राची संपत्ती ' लिहून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापास

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश.

🔰देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर  आला आहे.

🔰तर या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

🔰आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं.

🔰तसेच यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब  केलं.
या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल उत्पादक केंद्र.

🔰भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र म्हणून उदयास आला आहे, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केली.

🔰तर गेल्या पाच वर्षात, देशात 200 पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु करण्यात आले  आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे.

🔰तसेच यानुसार, भारतात सन 2014 च्या तुलनेत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या युनिट्समध्ये सन 2019 मध्ये 200 टक्के वाढ झाली.

🔰इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलंय की, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना भारताला ईएसडीएम क्षेत्रातील डेस्टिनेशन म्हणून विचारात घ्यावं. कारण त्यांना जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती केंद्राचा भाग होण्याची संधी उपलब्ध होत आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...