Wednesday, 3 June 2020

भारतातील सर्वात लांब.


🧩भारतातील सर्वात लांब नदी -
🅾 गंगा नदी (2,510 किमी.)

🧩भारतातील सर्वात लांब धरण -
🅾हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

🧩भारतातील सर्वात लांब बोगदा -
🅾जवाहर बोगदा

🧩भारतातील सर्वात लांब लेणी -
🅾 अजिंठा

🧩भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग-
🅾जम्मूतावी ते कन्याकुमारी

🧩भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल -
🅾सोन नदीवरील पूल

🧩भारतातील सर्वात लांब रस्ता -
🅾पूलगांधी सेत

🧩भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग-
🅾दिल्ली ते कलकत्ता

🧩भारतातील सर्वात लांब पूल -
🅾 हावडा ब्री

🧩भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
🅾 सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.


🅾 पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

🅾 गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

🅾गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

🅾 गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

🅾पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

🅾 पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾 पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

🅾पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

🅾 पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

🅾 गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

🅾पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🅾 राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Question bank

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.🅾

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद🅾
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 🅾

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३🅾
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 🅾
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी🅾
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 🅾
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Question bank

1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
1. व्यापार
2. शेती
3. औद्योगिकरण
4. गुंतवणूक
🅾उत्तर : शेती

2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.
1. शेती व्यवसाय
2. मत्स्य व्यवसाय
3. दुग्ध व्यवसाय
4. कुकुटपालन व्यवसाय
🅾उत्तर : दुग्ध व्यवसाय

3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
1. महाबळेश्वर
2. पंचगणी
3. लोणावळा
4. आंबोली
🅾उत्तर : आंबोली

4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
1. तहसीलदार
2. उपजिल्हाधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. महसूल आयुक्त
🅾उत्तर : महसूल आयुक्त

5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?
1. पीटर सविड्लर
2. अलेक्झांडर ग्रीशुक
3. व्हॅसिली इव्हानचूक
4. विश्वनाथ आनंद
🅾उत्तर : पीटर सविड्लर

6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?
1. सौदी अरेबिया
2. अफगाणिस्तान
3. लिबिया
4. इराक
🅾उत्तर : लिबिया

7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.
1. दहावी
2. आठवी
3. बारावी
4. स्नातकीय
🅾उत्तर : दहावी

8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
1. गगन नारंग
2. रामपाल
3. राजेंद्र सिंह
4. जहीरखान
🅾उत्तर : जहीरखान

9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका
🅾उत्तर : ब्रिटन

10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा
🅾उत्तर : न्हावा-शेवा

11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम
🅾उत्तर : जिनिव्हा

12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई
🅾उत्तर : नाशिक

13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच
🅾उत्तर : साडे पाच

14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे
🅾उत्तर : महात्मा फुले

15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस
4. डिझेल
🅾उत्तर : उस

16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू
🅾उत्तर : भात व गहू

17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
1. जगन्नाथ शंकर सेठ
2. बाळशास्त्री जांभेकर
3. भाऊ दाजी लाड
4. छत्रपती शाहू महाराज
🅾उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
🅾उत्तर : अमेरिका आणि कॅनडा

19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही
🅾उत्तर : वरील कोणतीही नाही

20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49
4. 39
🅾उत्तर : 49

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

मुंबईत सहसा चक्रीवादळ का येत नाही माहिती आहे?


तामिळनाडू केरळ आणि समुद्र किनाऱ्यावरील राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा नेहमी बसतो. मग प्रश्न पडतो महाराष्ट्रालाही किनारपट्टी लाभली आहे. मग अशी वादळं मुंबईत किंवा कोकणात का येत नाहीत?
पर्यावरणतज्ज्ञ अभिजीत घोरपडे सांगतात की समुद्रावर सतत वादळं येत राहतात. तापमान, दाब, वाऱ्याच्या वेगावरून चक्रीवादळ तयार होणार की नाही, हे ठरतं. पण प्रत्येक वादळ चक्रीवादळात रूपांतर होणारच, असं नसतं.

घोरपडे सांगतात, "आपल्याकडे चक्रीवादळ तयार होण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हावा लागतो. समुद्रातल्या तापमानवाढीमुळं समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याची गती अधिक असते."

समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी तापमानातील वाढ हा घटक सर्वाधिक कारणीभूत असतो. सागरात जेव्हा तापमानात वाढ होते तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले असतो. त्याचदरम्यान वाऱ्याचा वेगही वाढतो.

कमी दाबाचा पट्टा, उच्च तापमान आणि जोरानं वाहणारं वारं, असं त्रिकूट मिळून मग चक्रीवादळाला जन्म देतं.

पण सगळीच वादळं बंगालच्या उपसागरात तयार होत नाहीत. बहुतेक चक्रीवादळं पॅसिफिक महासागरात तयार होतात आणि विषुववृत्तीय वाऱ्यांबरोबर वाहत भारत आणि श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीवर धडक देतात.
भारताला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी लाभली असली तरी चक्रीवादळं फक्त ओडीशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूतच येतात.

फक्त पूर्व किनाऱ्यावरील राज्यांनाच हे वादळं का धडकतात? गोवा, कर्नाटक किंवा महाराष्ट्राला का कधी अशी धोक्याची सूचना देण्यात येत नाही?

*पश्चिम किनारपट्टीवर का नाही?*
चक्रीवादळं तयार होण्यासाठी काही ठराविक परिस्थितीची आणि भौगोलिक रचनेची गरज असते.
मुंबई किंवा महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टी लाभली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. पण विषुववृत्तीय वारं पूर्वेकडून पश्चिमेकडं, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडं वाहतं. त्यामुळं आलेलं चक्रीवादळ पुढं सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं.
"याचं कारण उत्तर गोलार्धातील वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्यामुळं अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळ मुंबईपासून दूर जातात,".
म्हणून कधीतरी गुजरातच्या किनारपट्टीवर अशी चक्रीवादळं धडकतात.

म्हणजेच बंगालच्या उपसागरात आलेली वादळं भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आदळतात तर अरबी समुद्रातील चक्रीवादळं गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर आदळतात.
वादळाच्या तीव्रतेनुसार त्यांची विभागणी केली जाते. जगातील बहुतेक चक्रीवादळं पूर्व किनारपट्ट्यांवर येत राहतात.
आणि जगाच्या ज्या भागात ते निर्माण होतात, त्यावरून त्यांची नावं आणि प्रकार ठरतात.

उत्तर अटलांटिक आणि इशान्य पॅसिफिक महासागरात आलेल्या चक्रीवादळाला 'हरिकेन' म्हणतात तर उत्तर पश्चिम किंवा वायव्य पॅसिफीक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला 'टायफून' म्हणतात. आणखी एक प्रकार म्हणजे 'सायक्लोन' जे दक्षिण पॅसिफिक आणि भारतीय महासागरात येतात.

समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना

1) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

2) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

3) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

4) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

5) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

📚 समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना  Facts

1) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

2) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

3) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज

4) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

5) सेवा सदन — 1906  -  वि.रा.शिंदे

मुंंबईजवळ घोंगावणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव दिलं कोणी?

तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे.

👉या चक्रीवादळाला बांगलादेशने निसर्ग 👈असे नाव दिले आहे. उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. २००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे.

*✅नावे कशी देतात?*
चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

✅चक्रीवादळ का तयार होते?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.

*✅चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो?*
वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती


=======================
*जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे* : 
----------------------------------------------
संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल - *बॉन की मुन*
----------------------------------------------
संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल - *आशा रोझ निगिरो*
----------------------------------------------
जागतिक बँकेचे अध्यक्ष - *जॉन यंग किम*
----------------------------------------------
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष - *ख्रिश्टेन लिग्रेड*
----------------------------------------------
यूनेस्कोचे कार्यकारी संचालक - *इरिना बोकोव्हा*
----------------------------------------------
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक - *मार्गरेट चान*
----------------------------------------------
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक - *जोज गाझियानो सिल्व्हा*
----------------------------------------------
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक - *जुआन सोमाविया*
----------------------------------------------
युनिसेफचे कार्यकारी संचालक - *अॅन्टोनी लेक*
----------------------------------------------
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक - *हेलन कार्क*
----------------------------------------------
अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल - *डॉ. सुछाई पंतचापकडी*
----------------------------------------------
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष - *एऑनी अब्राहम*
----------------------------------------------
आशियन विकास बँकेचे अध्यक्ष - *ताकेहितो नाकोवा*
----------------------------------------------
कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल - *कमलेश शर्मा*
----------------------------------------------
आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष - डोनॉलडो कुरोडा
---------------------------------------

IASST संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त ‘स्मार्ट बँडेज’ विकसित केले


केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” विकसित केले आहे, जे जखमेसाठी उपयुक्त असून औषधाचा pH टिकुन राहतो.

कापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून अतिसूक्ष्म तंत्रज्ञानावर (nanotechnology) आधारित ‘कॉटन पॅच’ विकसित करण्यात आला आहे.

ठळक बाबी

🔸डॉ. देवाशिष चौधरी यांनी केलेल्या संशोधनात, ज्युट कार्बन डॉट्ससह नॅनो कॉम्पोजिट हायड्रोजेलयुक्त कॉम्पॅक्ट कॉटन पॅच तयार केले गेले. फ्लोरोसंट कार्बन डॉट्सचे सिंथेसाइझिंग करण्यासाठी ज्यूटचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे आणि ते पसरले जावे यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. कडुलिंबाच्या पानांचा (आझादिराछताइंडिका) अर्क हे नमुना औषध अभ्यासात उदाहरण म्हणून घेतले गेले आहे.

🔸उत्तेजक-प्रतिसाद देणाऱ्या या नव्या औषध वितरण प्रणालीमध्ये, ज्युट कार्बन डॉट्स हायड्रोजेल मॅट्रिक्स-कॉटन पॅचमध्ये बंदिस्त केले असून दोन वेगळ्या pH पातळीवर प्रभावीपणे औषध पुरवठा करू शकतात.

🔸जखमेत जीवाणूचा संसर्ग वाढल्यास फॅब्रिकेटेड हायब्रिड कॉटन पॅचचा उत्तेजक-प्रतिसादात्मक गुणधर्म फायद्याचा ठरतो आणि यामुळे खालच्या pH कडे औषध जाते जे या परिस्थितीत अनुकूल असते. कॉटन पॅचचे हे pH-प्रतिसादात्मक वर्तन कार्बन डॉट तयार करताना वेगवेगळ्या मॉलेक्युलर संबंधांमुळे सिस्टममध्ये समाविष्ट केलेल्या जूट कार्बन डॉट्सच्या विशिष्ट वर्तनानुसार आहे.

🔸हायब्रीड कॉटन पॅचच्या अशा उत्तेजक-प्रतिसाद वर्तनाचा विकास जखमेसाठी ते स्मार्ट ड्रेसिंग किंवा मलमपट्टी म्हणून वापरण्याचा मार्ग सुकर झाला. पॅच तयार करण्यासाठी कॉटन आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जैव-संगत, बिन विषारी, कमी खर्चाची आणि टिकाऊ झाली आहे.

2019-2020 मधील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक

√  Let Me Say It Now : महाराष्ट्राचे
    माजी पोलीस सहआयुक्त राकेश
   मारिया

√ Unseen, Unheard, Unsaid : डॉ.
   भरत वटवानी

√ Mind Matter : विश्वनाथन आनंद

√ एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा :
    लक्ष्मीकांत देशमुख (आत्मचरित्र)

√ 40 Years of Sportstar, 40
   Sportstars : बॅडमिंटनपटू पी. व्ही.
   सिंधू

√ 'The Assassination of
   Mahatam Gandhi- Trial &
   Verdict 1948-49 ' : डॉ. एम. एस.
   स्वामीनाथन

√ 'निर्भय व्हा ! इतिहास तुमच्या प्रतीक्षेत
   आहे' : डॉ. अरुणा निगवेकर
  (आत्मचरित्र)

√ 'Kashmir's Untold Story' :
   इकबाल चंद मल्होत्रा, मरूफ रझा

√ 'With all Due Respect' : निक्की
    हॅले

√ 'The Far Field' : माधुरी विजय

√ 'Citizen Delhi : My Times, My
   lifes' : शीला दिक्षित (आत्मचरित्र)

√ 'Bridgital Nation' : एन. चंद्रशेखरन्,
    रूपा पुरुषोथ्थमन

√ 'The Diary of a Domestic
   Diva' : शिल्पा शेट्टी-कुंद्रा

√ 'Straight Task' : अभिषेक मनू
   सिंघवी

√ 'What do we need men for' : इ
   जीन कॅरॉल

√ 'Whispers of time' : डॉ. कृष्णा
   सक्सेना

√ 'Indian Fiscal Federalism' : डॉ.
   वाय. व्ही.रेड्डी व जी. आर. रेड्डी

√ 'Undaunted : Saving the Idea
   of India' : माजी वित्तमंत्री पी.
   चिदंबरम

√ 'We are Displaced' : मलाला
   युसूफझाई

√ 'The Test of my Life : From
   Cricket to Cancer and Back'
   (आत्मचरित्र) क्रिकेटपटू युवराज सिंग.

√ My Life, My Mission
   (आत्मचरित्र) योग गुरु रामदेव बाबा

√ Lessons Life Taught Me
   Unknowingly (आत्मचरित्र),
   'The Best Thing about You Is
   You !' : अभिनेते अनुपम खेर

√ 'नायन्टीन नाइन्टी' : सचिन कुंडलकर

√ 'Bad Man' : गुलशन ग्रोव्हर
   (आत्मचरित्र)

√ 'विधानगाथा' : हर्षवर्धन पाटील

√ SIX MACHINE : I Don't Like
   Cricket...... I Love It' : ख्रिस गेल
   (क्रिकेटपटू)

√ Electronic Voting Maching :
   आलोक शुक्ला

√ India Unmaid, 'Relentless : An
   Autobiography' : यशवंत सिन्हा

√ 'The Republican Ethic' , 'लोकतंत्र
   के स्वर' : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

√ 'India in Distress' : ममता बॅनर्जी

√ 'Every Vote Counts - The story
   of India's Elections : माजी
   मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला.

√ 'India After Modi : Populism
   and the Right': 3514 ustqeff

√ I do what I do', 'The Third
   Pillar' : रघुराम राजन

√ 'Law, Justic and Judicial
   Power- Justics P.N.Bagwati's
   Approach' : मूलचंद शर्मा

√ 'Healed: How Cancer Gave Me
   a New Life' : अभिनेत्री मनिषा
   कोईराला

√ 'The Becoming' : मिशेल ओबामा
   (अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक
   ओबामा यांची पत्नी

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...