२६ मे २०२०

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

मुकेश अंबानी २०३३ पर्यंत होणार भारतातील पहिले ट्रिलिअनर पण त्यापूर्वी…

- रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. परंतु त्यापूर्वी २०२६ मध्ये अॅमेझॉनचे संस्थापन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे ट्रिलिअनर बनणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. कंपॅरिझननं केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

- बेझोस यांचं सध्याचं वय ५६ वर्षे आहे. तर फोर्ब्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे आता १४२.८ अब्ज डॉलर्सचं नेट वर्थ आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कंपॅरिझनच्या अहवालानुसार ते २०२६ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. तसंच २०२६ पर्यंत त्यांचं नेटवर्थ १ हजार अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यावेळी त्यांचं वय हे ६२ वर्षे असेल.

-  अहवालानुसार बेझोस यांच्या नेट वर्थमध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच त्यांच्यानंतर चीनच्या एवरग्रँडचे प्रमुख शु जियाइन हे २०२७ पर्यंत तर अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा हे २०३० पर्यंत ट्रिलिअनर बनणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- दरम्यान, कंपॅरिझनच्या अहवालानुसार रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ मध्ये ट्रिलिअनर बनतील. त्यांच्याकडे सध्या ४९.२ अब्ज डॉलर्सची नेट वर्थ आहे. कंपॅरिझनने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड सर्वाधिक व्हॅल्यू असलेल्या २५ कंपन्यांचं विश्लेषण केलं आहे. यासोबतच त्यांनी फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत २५ लोकांच्या नेट वर्थचंही विश्लेषण करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या गेल्या पाच वर्षातील नेट वर्थमधील वार्षिक वाढीच्या सरासरीच्या आधारावर हा अहवाल लागू केला आहे.
---------------------------------------------------

देशांतर्गत विमान सेवा

🔰टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद  असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज  50 विमानांची ये-जा होणार आहे.
मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी  घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

🔰केंद्र सरकारने 25 मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे.तर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत  असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

🔰देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे.तसेच विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ॲमेझॉनने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे.

🔰लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

🔰मागणी आणि पुरवठा साखळीमधील वेगवेगळ्या स्तरामधील नोकऱ्या उपलब्ध असल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. या ५० हजार नोकऱ्यांमध्ये अगदी फुलफीलमेंट सेंटर्स म्हणजेच वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांमधील नोकऱ्यांपासून ते डिलेव्हरी करण्यापर्यंत अनेक नोकऱ्यांचा समावेश आहे.

🔰लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच २५ मार्चपासून १७ मेपर्यंत देशामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तुंची डिलेव्हरी करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि किरणामालाच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या डिलेव्हरीवर घालण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली आहे. देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंची डिलेव्हरी करण्याची परवानगीही ई-कॉमर्स कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर ई-कॉमर्स साईटवरुन वस्तूंच्या ऑर्डरची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा 1 जून नंतरच.


🔰लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे.

🔰देशातील कोविड – 19 विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की 1 जून 2020 रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.

🔰तर अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.तसेच आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले  आहे.

प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण.

🅾 प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण योजनाच्या अंतर्गत महिला शक्ती केंद्रे स्थापन करण्याची उपाययोजना सन २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ तसेच आरोग्य व स्वछताविषयक मदत व मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये हक्क आणि अधिकार याबाबत जागृती निर्माण करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

🧩योजनेच्या ठळक तरतुदी व वैशिष्ट्ये

🅾योजनेअंतर्गत राज्यस्तरावर महिलांसाठी राज्य संशोधन केंद्र संबंधित राज्य सरकारच्या अधिपत्याखाली विविध योजनांचा अभ्यास करून तांत्रिक साहाय्य व सल्ला उपलब्द करून देईल.

🅾जिल्हास्तरीय महिला केंद्रे ही महिलाविषयक विविध योजनांची माहिती गोळा करून राज्य स्तरावर आणि जनतेस उपलब्द करून देतील. ही केंद्रे तालुका ग्राम पातळी आणि राज्य पातळी यामध्ये दुव्याचे कार्य करतील.

🅾महिला शक्ती केंद्रे ही तालुका पातळीवर कार्य करतील व गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देतील. गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, ANM, सामान्य सेवा केंद्रे,

🅾महिला स्वयंसहायता समूह, बँक मित्र, शिक्षा मित्र, न्याय मित्र, महिला ओकप्रतिनिधी, महिला पोलीस स्वयंसेविका या गाव पातळीवर विविध शासकीय/अशासकीय कार्यामध्ये कार्यरत व्यक्तींची मदत घेण्यात येईल.

🅾महाविद्यायातील NSS/NCC कॅडेट्स तसेच इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सहा महिन्याची समूह सेवा देता येईल. हा कालावधी २०० तास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना समूह सेवा प्रमाणपत्र देण्यात येईल.

🅾अशा प्रकारे जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना समूह सेवेमध्ये उपयोजित करून त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकांचे गुण निर्माण करण्यासही यातून हातभार लागणार आहे.

🅾 ग्रामीण महिलांना ग्रामसभा तसेच पंचायत राज संस्थांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती तसेच संसाधने उपलब्द करून देण्यात येतील.

🅾 विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेणे, त्यामध्ये सहभागी होणे, यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात येईल.

🅾 विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे बनवून घेण्यासाठी ग्रामीण महिलांना साहाय्य करण्यात येईल.

🅾 बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मदत करण्यात येईल. महिलांच्या तक्रारी, तक्रार नोंदविणे तसेच त्याबाबतचा पाठपुरवठा यामध्ये साहाय्य करणे.

🅾महिलांना एकत्र येण्यास, सामूहिक कार्ये करण्यास, समूह बनवण्यास प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी व विकास घडविणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

🅾 योजनेच्या अंमलबजावणीची प्रगती दर्शविण्यासाठी तसेच शंकाचे व समस्यांचे निराकरण करणे, आणि तक्रारी नोंदविणे यासाठी संकेतस्थळ उपलब्द करून देण्यात येणार आहे.

🅾 ही योजना नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्वात मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यामध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नंदुरबार, जळगाव, गडचिरोली व नांदेड या चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

🅾प्रत्येक जिल्ह्यातील कमाल, ८ तालुके, याप्रमाणे ९२० तालुक्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीमध्ये प्राप्त झालेल्या अनुभवावरून देशातील उर्वरित जिल्ह्यामध्ये विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल.

 🅾यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० या प्रमाणात निधी उपलब्द करून देण्यात येईल. ईशान्येकडील राज्ये व विशेष दर्जा प्राप्त राज्यामध्ये निधीचा हिस्सा ९०:१० याप्रमाणे असेल. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य.


🅾समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेत आता आमूलाग्र बदल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

🅾भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

🅾 राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.

🧩 काय होणार?

🅾 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि उदरनिर्वाहाची हमी म्हणून त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार आहे.

🅾 सुकन्या योजनेच्या धर्तीवर आंतरजातीय दाम्पत्याला जन्मलेल्या मुला-मुलींच्या नावार बँकेत एक लाख रुपये जमा केले जातील. त्यांना शिक्षणात आर्थिक सवलती देण्याचा विचार आहे.

🅾 पती सवर्ण व पत्नी मागासवर्गीय असेल तर त्यांच्या मुलांना सवलती मिळत नाहीत. अशा दाम्पत्यांच्या अपत्यांनाही त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

🅾 त्याचबरोबर आता प्रोत्साहन म्हणून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या रकेमत आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व नव्या सवलतींचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...