Saturday, 23 May 2020

घटनेतील मूलभूत कर्तव्य.


1.घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

दादासाहेब फाळके पुरस्कार.


🅾  सुरुवात -1969

🅾 स्वरूप - दहा लाख रुपये सुवर्णकमळ आणि शाल

🅾  चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो

🅾 पहिले विजेते -देविका राणी

🅾 भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

🅾 अलीकडील पुरस्कार विजेते
   1) 2014 - शशि कपूर
   2) 2015 - मनोज कुमार
   3) 2016- के विश्वनाथ
   4) 2017 विनोद खन्ना
   5) 2018 अमिताभ बच्चन

🅾 आतापर्यंत सहा महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 महिला महाराष्ट्रीयन आहेत

🧩  पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन:-

1)  दुर्गा खोटे 1983
2) वी शांताराम 1985
3) लता मंगेशकर 1989
4) भालजी पेंढारकर 1991
5) आशा भोसले 2000

🅾 अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे 50 वे मानकरी ठरले आहेत

🦋 🦋 🦋🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?

*उत्तर* : बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?

*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?

*उत्तर* : बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?

*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?

*उत्तर* : कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?

*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन

पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाबाबत अधिसूचना जाहीर करण्याची राज्यांची मागणी.

🌦 21 मे 2020 रोजी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांबाबत अधिसूचना जाहीर करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली.

🌦 या चर्चेदरम्यान पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात घेता या घाटाचे संरक्षण करण्याची गरज असल्याबाबत या सर्व राज्यांनी सहमती व्यक्त केली. पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी या राज्यांनी केली आहे.

🌑पार्श्वभूमी-

🌦 पश्चिम घाटांच्या जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली होती. या समितीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटाच्या अंतर्गत येणारे भौगोलिक क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करावे अशी शिफारस केली होती. हे भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

🌑पश्चिम घाट-

🌦 जैवविविधता, खनिज संपदा यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचे वस्तीस्थान असलेला पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिमेला आहे. पश्चिम घाटाला ‘सह्य़ाद्री’ म्हणूनही ओळखले जाते.

🌦 ही पर्वतराजी तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी सुरू होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून या पर्वतरांगा दक्षिण टोकाच्या जवळ पोचतात. या पर्वतराजीची लांबी 1600 कि.मी. असून याचा 60 टक्के भाग कर्नाटकात येतो. या पर्वतरांगांचे क्षेत्रफळ 60 हजार वर्ग कि.मी. असून पश्चिम घाटाच्या एकूण भूभागांपकी 30 टक्के भूभाग हा जंगलक्षेत्रात मोडतो. पश्चिम घाट हा जगातल्या जैवविविधतेच्या प्रमुख आठ (हॉटस्पॉट) प्रदेशांपैकी एक असून जगभरातल्या महत्त्वाच्या एकूण 34 प्रदेशांपैकी एक मानला जातो.

🌦 भारताच्या एकूण जैवविविधतेपकी 25 टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. दरवर्षी प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक नवीन प्रजाती पश्चिम घाटामध्ये सापडतात. पश्चिम घाटातल्या जंगलांमुळे या प्रदेशातल्या हवामानावर अनुकूल परिणाम होतो. यामुळे पश्चिम उतार आणि पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडतो तर पूर्व उतारावर मध्यम पाऊस पडतो. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्या हे वाहतूक व अर्थोत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

🌑टिप्पणी:

🌦 1988 साली नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ याविषयी संकल्पना मांडली होती. जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ हे धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेश असतात. हिमालय, हिंद-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार हे चारही जैवविविधतेचे क्षेत्र भारतात अंशत: वसलेले आहेत.

ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर.

🔰करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे.

🔰श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील भारतीय संघाचा प्रस्तावित टी-२० दौरा हा आयसीसीच्या नियमांनुसार नाहीये.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हा दौरा निश्चीत झाल्याचं फॉल यांनी सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सरावाची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करत आहेत.