Tuesday, 19 May 2020

संरक्षण क्षेत्रासंबंधी सरकारचा मोठा निर्णय



✅केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’वर भर देत काही महत्वाच्या घोषणा केल्या.

✅तर हळूहळू शस्त्रास्त्रांची आयात बंद होणार, संरक्षण क्षेत्रासंबंधी सरकारचा मोठा निर्णय.

✅सरकार शस्त्रास्त्रांची एक यादी तयार करुन मुदतबद्ध पद्धतीने शस्त्रास्त्रांची आयात बंद  करणार.

✅त्याचवेळी सैन्याला लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच करण्यावर भर  देणार.

✅तसेच या उपायोजनांमुळे आयातीचे मोठे बिल कमी होईल.

✅संरक्षण क्षेत्रात स्वायत्तता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

✅संरक्षण उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआयची मर्यादा 49 वरुन 74 टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

✅मुदतीमध्ये संरक्षण खरेदी आणि वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी सरकार प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना करणार.

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

__________________________________

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?

*उत्तर* : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?

*उत्तर* : रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?

*उत्तर* : खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?

*उत्तर* : इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

*उत्तर* : व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?

*उत्तर* :  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?

*उत्तर* : उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?

*उत्तर* : जागतिक आर्थिक मंच

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची चार वर्षे पूर्ण.

☑️प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PMUY) नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

☑️कोविड-19 महामारी या संकटाच्या सुरुवातीच्या काळातच भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना तीन महिने विनामूल्य LPG टाकी पुरवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार 8,432 कोटींपेक्षा जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले.

🟣प्रधानमंत्री उज्ज्वला योजना:-

☑️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

☑️ महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

☑️घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस आल्यामुळे दैनंदिन जीवनात सोय-सुविधा निर्माण झाली इतकंच नाही, तर आता निरोगी, सुरक्षित आयुष्य जगता येत असल्याचे अनेकांनी नमूद केले. स्वयंपाकासाठी जळण, लाकूडफाटा गोळा करण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळाली. तसेच नोंदणी केल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये भरलेली टाकी मिळत आहे.

WHOमध्ये भारताला मोठे पद.

👍भारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.

👍कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

👍चीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे.

👍भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

👍भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील.

👍 विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...