Sunday, 17 May 2020

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार..

🔰अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

🔰तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले  आहे.

🔰“मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत.

🔰आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

🔰तर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘वर्षाच्या अखेरीस कोविड -19 वर लस उपलब्ध होईल अशी आशा आहे.’ त्यासाठी काही अधिकारी नेमण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले.


🅾संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.

🧩अहवालातल्या ठळक बाबी..

🅾गेल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🅾जंगले नष्ट होण्याचे प्रमाण कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले आहे. जंगले नष्ट होण्याचे प्रमाण वर्ष 1990 ते वर्ष 2000 या दशकात वार्षिक 7.8 दशलक्ष हेक्टर एवढे होते, तर हे प्रमाण वर्ष 2000 ते वर्ष 2010 या दशकात वार्षिक 5.2 दशलक्ष हेक्टर आणि वर्ष 2010 ते वर्ष 2020 या दशकात वार्षिक 4.7 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🅾जगातले एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर (bha) आहे, जे एकूण भूभागाच्या 31 टक्के आहे. हे क्षेत्र प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर इतके आहे.

🅾जगातल्या वनक्षेत्राचे सर्वात मोठे प्रमाण उष्णकटिबंधीय (45 टक्के) आहे आणि त्यानंतर बोरियल, समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय वनांचे प्रमाण आहे.जगातले 54 टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र केवळ रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन या पाच देशांमध्ये आहे.

🅾खंडानुसार आकडेवारीनुसार, वर्ष 2010 ते वर्ष 2020 या कालावधीत आफ्रिकेमध्ये सर्वाधिक जंगलतोड झाली, ज्याचा दर वार्षिक 3.9 दशलक्ष हेक्टर एवढा होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण अमेरिकेचा (2.6 दशलक्ष हेक्टर) क्रमांक लागतो. या काळातच आशिय, ओशनिया आणि युरोप यात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.


🅾व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🅾 भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🅾 खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🅾 बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🅾 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🅾संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🅾आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🅾खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🅾 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 🅾उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर नाही

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

अटल पेन्शन योजना

🅾  सुरुवात - 1 जून 2015
 
🅾असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजुर, दारिद्र्यरेषेखालील लोकांना वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना.
 
🅾राष्ट्रीय पेन्शन पद्धतीव्दारे संचलित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनियम आणि विकास प्राधिकरणाव्दारे नियमित केले जाते.
 
🅾पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. ही योजना कायम चालू राहील, मात्र पाच वर्षांनंतर सरकार कोणतीही रक्कम भरणार नाही.
 
🅾या योजनेत 18 ते 40 वर्षाची कोणीतीही व्यक्ति सामील होऊ शकते.
 
🅾ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे.
 
🅾वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत.
 
🅾या योजनेतून 60 वर्षाच्या आत बाहेर पडता येणार नाही, (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास.)

🧩योजनेचे फायदे:-

🅾जे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल.
 
🅾या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50% रक्कम जमा करणार आहे.
 
🅾ही रक्कम सरकार 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षासाठी खात्यावर जमा करेल.
 
🅾सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत.
 
🅾वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात 1000, 2000, 3000, 4000, 5000 रुपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षापासून मिळेल.
 
🅾अटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे.
 
🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राज्यसेवा प्रश्नसंच

1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?
   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.
   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.
   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर :- 1

2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
  
1) समभूज त्रिकोण   
2) काटकोन त्रिकोण   
3) सरळ रेषा     
4) वरीलपैकी कोणतीही  नाही
उत्तर :- 2

3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.
  
अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.   
ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.   
ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ, ब, क    2) अ, क, ड   
3) अ, ब, ड    4) फक्त क
उत्तर :- 3

4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
1) जोग             2) नायगारा   
3) कपिलधारा    4) शिवसमुद्र
उत्तर :- 1

5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
1) वाघ      2) हत्ती     
3) सिंह      4) गेंडा
उत्तर :- 3

6) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.
1) रावी       2) बियास   
3) चिनाब    4) व्यास
उत्तर :- 3

7) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.
1) महानदी       2) सोन     
3) सुवर्णरेखा    4) गंगा
उत्तर :- 3

8) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
   1) दिल्ली ते आग्रा       2) मुंबई ते ठाणे
   3) हावडा ते खडकपूर 4) चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर :- 2

9) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
1) आसाम    2) बिहार     
3) महाराष्ट्र    4) ओरिसा
उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?
   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.
   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.
   4) वरील कोणतेही नाही.
उत्तर :- 4

11) नियोजन आयोगाच्या मते, “सार्वजनिक बचतीत वाढ होऊन अत्यावश्यक सार्वजनिक गुंतवणूक अल्प राजकोषीय तुटीतून साध्य होईल की मध्यमकालीन राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट होते. सुधारणांचा हा भाग दुर्देवाने कधीच अंमलात आला नाही.” याचे कारण म्हणजे 
  
अ) मोठे सार्वजनिक कर्ज     
ब) उच्च व्याज दर
क) ऋण (उणे) सार्वजनिक बचती   
ड) जागतिकीकरण
1) अ आणि क    2) फक्त ब   
3) ब आणि ड     4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

12) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का......होता
1) सतत घसरला      2) अचल राहिला   
3) सातत्याने वाढला  4) कुठलाही स्पष्ट आलेख नाही
उत्तर :- 1

13) सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून सुरू झाले  ?
1) 1987 – 88    2) 1982 -86   
3) 1991 – 92    4) 2000 – 2001
उत्तर :- 1

14) भारतात 2009 -10 मध्ये सार्वजनिक खर्चाचे प्रमाण जी. डी. पी. च्या किती टक्के होते ?
1) 17.2 टक्के    2) 25.6 टक्के   
3) 15.3 टक्के    4) 29.1 टक्के
उत्तर :- 4

15) 1987 – 1988 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले ?
  
अ) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च     
ब) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च
क) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च     
ड) महसूली व भांडवली खर्च
         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
1) अ आणि ब    2) ब फक्त   
3) ब आणि क    4) ड फक्त
उत्तर :- 2

16) सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या.
   अ) असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो.
   ब) प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यात सहाय्य.
   क) ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत.
   ड) व्यवहारतोल सुधारण्यात सहाय्यभूत
        वरीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करतात ?
1) अ, ब आणि ड    2) ब, क आणि ड   
3) अ, ब आणि क    4) अ आणि ब फक्त
उत्तर :- 3

17) “सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत” कोणी मांडला ?
  
1) प्रो. पिकॉक व प्रो. वाईजमन   
2) प्रो. पिगु
3) डॉ. मार्शल       
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 1

18) खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत ?
  
अ) संसाधनांची वाटणी   
ब) उत्पन्न विभाजन
क) स्थिरीकरण कार्ये   
ड) खाजगी वस्तुंचा पुरवठा
        दिलेल्या पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा :
1) अ फक्त              2) ब आणि क   
3) अ, ब आणि क    4) वरील सर्व
उत्तर :- 3

19) जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात ?
  
1) राजकोषीय धोरणाचा उपाय   
2) द्रव्यविषयक धोरणाचा उपाय
3) व्यापारी धोरणाचा उपाय   
4) कर विषयक धोरणाचा उपाय
उत्तर :- 1

20) खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ?
  
1) संरक्षणावरील खर्च   
2) सामाजिक आणि सामुहिक विकासावरील खर्च
3) व्याजाचा भरणा   
4) सर्वसाधारण सुविधांवरील खर्च
उत्तर :- 3

21) मोबाईल फोन कंपनाची वारंवारता किती असते.
 
1) 130 ते 180 Hz   
2) 150 ते 200 Hz   
3) 80 ते 100 Hz   
4) 180 Hz पेक्षा जास्त
उत्तर :- 1

22) अ) जो पदार्थ दुस-या पदार्थाला प्रोटॉन देतो तो म्हणजे आम्लारी होय.
    ब) जो पदार्थ दुस-या पदार्थाकडून प्रोटॉन घेतो तो म्हणजे अम्ल होय.
          वरील विधानांपैकी अयोग्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ            2) फक्त ब   
3) दोन्ही अ व ब    4) दोन्हीही नाही
उत्तर :- 3

23) खालीलपैकी अचूक विधाने निवडा.
   अ) प्रद्रव्यपटल आणि केंद्रकामधील या तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.
   ब) अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इ. महत्त्वाच्या पदार्थांची साठवण पेशीद्रव्य करते.
   क) वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्य प्राणी पेशीमधील पेशी द्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त आणि दाट असते.
   ड) वरील सर्व विधाने अचूक आहे.
1) अ, ब    2) अ, क     
3) ड         4) ब, क
उत्तर :- 3

24) माध्यमातील ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ?
1) आयात        2) ध्वनितरंग   
3) वारंवारता    4) माध्यमाचे स्वरूप
उत्तर :- 4

25) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: विचरण होत नाही त्यांना ....................... असे म्हणतात.
1) सौम्य आम्ल        2) तीव्र आम्ल   
3) सौम्य आम्लारी    4) तीव्र आम्लारी
उत्तर  :- 3

26) वटवाघूळ आकाशात उडताना मार्गातील अडथळे कोणत्या लहरींव्दारे ओळखते ?
1) श्रव्यातील ध्वनी   
2) अश्रव्यातील ध्वनी   
3) अवश्राव्य ध्वनी   
4) यापैकी नाही
उत्तर :- 4

27) ‘मिथिल अमाईन’ हे आम्लारी असून ते आम्लारीच्या कोणत्या प्रकारात मोडते ?
  
1) तीव्र आम्लारी     
2) सौम्य आम्लारी     
3) दोन्ही तीव्र व सौम्य आम्लारी   
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1

28) खालील विधानांचा विचार करा.
   अ) गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे.
   ब) गॉल्गी संकुल मेदरेणूंची निर्मिती करतात.
   क) गॉल्गी संकुल रिक्तीका व पीटिकांची निर्मिती करते.
   ड) पेशी भित्तीका, लयकारिका यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते.
1) अ, ब, क सत्य    2) सर्व सत्य   
3) अ, क, ड सत्य    4) अ, ड सत्य
उत्तर :- 3

29) RADAR म्हणजे काय ?
  
1) Range and detection Avoid Radiowaves     
2) Radio Detection and Ranging
3) Radio And Determine Applicated Range     
4) None of the above
उत्तर :- 2

30) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: ‍विचरण होते त्यांना ........................ असे म्हणतात.
1) तीव्र आम्ल        2) सौम्य आम्ल   
3) तीव्र आम्लारी    4) सौम्य आम्लारी
उत्तर :- 1

अम्फान चक्रीवादळ

◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

◾️देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

◾️शनिवारी (१६ मे २०२०)
अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

◾️याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

◾️बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

◾️काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
_________________________________

‘इस्रो’च्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या

- अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांसाठी संरचनात्मक सुधारणांच्या रुपात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’अंतर्गत चौथ्या टप्प्यांतील घोषणा केल्या. देशाच्या आण्विक ऊर्जा क्षेत्राला नवकल्पनांद्वारे जोम धरत असलेल्या नवउद्यमी क्षेत्राशी जोडण्याच्या दिशेने पावले टाकताना, आजवर बंदीस्त असलेल्या या क्षेत्राची कवाडेही त्यांनी खासगी सहभागासाठी खुली केली.

-  त्याचप्रमाणे ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या केल्या आहेत.
अंतराळ संशोधन उपक्रमांमध्ये खासगी सहभागास चालना देण्याचा सरकारचा मानस असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

- त्यानुसार उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ मोहिमांमध्ये खासगी कंपन्यांना पुरेपूर वाव उपलब्ध करून दिला जाईल. ग्रह-ताऱ्यांचा शोध, अंतराळ यात्रा यात खासगी कंपन्यांना सहभागी होता येईल. त्या अंगाने क्षमता विकासासाठी त्यांना ‘इस्रो’ या सरकारसमर्थित अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

- नवउद्यमी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने भू-अवकाश विदा (जिओ-स्पॅशियल डेटा) धोरणाच्या उदारीकरणाची लवकरच घोषणा केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. उपग्रहांद्वारे मिळविल्या जाणाऱ्या माहितीचा तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी व नवउद्यमी उपक्रमांना वापर करण्याची अनुमती मिळेल. त्यांना आजवर यासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यासाठी मोठी किमत मोजावी लागते, असेही या नवीन धोरणाची गरज प्रतिपादित करताना सीतारामन यांनी सांगितले.

- या माहितीचा वापर करून, शेती, सिंचन या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक पायाभूत सुविधांसाठी ८,१०० कोटी
भारतातील रुग्णालये, प्रयोगशाळा, चिकित्सालये वगैरे सामाजिक पायाभूत सोयीसुविधांची वेगाने उभारणी केली जाणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करीत त्यांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या भागीदारीला चालना देणारी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

- केंद्र व राज्य सरकार या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण खर्चाच्या २० टक्कय़ांऐवजी ३० टक्के वाटा उचलत निधी सहाय्य करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी एकूण ८,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- संशोधन अणुभट्टीत खासगी सहभाग!
अणुऊर्जा संशोधनाच्या क्षेत्रात खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ‘संशोधन अणुभट्टी (रिसर्च रिअँक्टर)’ स्थापित करण्याची अभिनव घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी या निमित्ताने केली. भारतातील नवउद्यमी (स्टार्टअप्स) संस्कृती आणि तिच्या सृजनाने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केला आहे. या नवउद्यमी संस्कृतीचा अणुऊर्जा क्षेत्राशी मिलाफ घडवून आणून मानवतेच्या सेवेला बळ देणारे अनेक प्रकल्प राबविले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-  कर्करोगाच्या उपचारासाठी मदतकारक ठरणाऱ्या वैद्यकीय वापराच्या समस्थानिकांच्या (मेडिकल आयसोटोप्स) उत्पादनातही खासगी-सार्वजनिक भागीदारीचे उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगावरील किफायती उपचारपद्धतीच्या विकसनाची ती भारताकडून जगाला दिला जाणारा अमूल्य नजराणा असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

-शिवाय कांद्यासारख्या नाशिवंत पीक अधिक काळ साठवून ठेवता येईल अशा विकिरण केंद्रांची उभारणीही खासगी सहभागासाठी खुली करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण खासगी कंपन्यांकडे
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणेसाठी त्यांचे खासगीकरण केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

  - यातून ग्राहकांना सेवा गुणवत्तेचा लाभ मिळेल आणि प्रतिसहायता अनुदानातून होणारे सरकारचे नुकसानही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणून हे धोरण सध्या केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येईल आणि नंतर त्या यशस्वी मॉडेलची अन्य राज्यातही अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्नसंच


1️⃣
जगातील येरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राष्ट्र कोणते?

1   कॅनडा
2   ऑस्ट्रेलिया
3  कझाकिस्तान✅✅
4 रशिया

2️⃣
वनस्पती तेलाची कोणत्या घटकासह निकेल उत्प्रेकाच्या उपस्थितीत 60℃ तापमानास अभिक्रिया होताच वनस्पती तूप प्राप्त होते?

1  हायड्रोजन वायू✅✅
2 सोडियम
3 अल्युमिनीयम भुकटी
4 झिंक सल्फेट

3️⃣
भारताच्या पंतप्रधानांचे प्रधान सचीव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

1 अनुल मिश्रा
2 राजीव गौबा
3 पी. के. मिश्रा✅✅
4 संजय कोठारी

4️⃣
दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने   ........
खाणीसाठी  प्रसिद्ध आहे?

1  चांदी
2 तांबे
3 सोने✅✅
4 अभ्रक

5️⃣
सलोर हे अभयारण्य ......साठी प्रसिद्ध आहे

1  सिह
2 झेब्रा
3 हत्ती✅✅
4 हरण

6️⃣
2020 ला कोणाला 29 वा सरस्वती सन्मान दिला जाणार आहे?

1  डॉ. के. शिवा रेड्डी

2  महाबळेश्वर

3  ममता कालिया

4  वासदेव मोही✅✅

7️⃣
गोल क्रांती कशाशी संबंधित आहे

1  संत्री उत्पादन
2 आंबा उत्पादन
3 बटाटे उत्पादन✅✅
4 मोसंबी उत्पादन

8️⃣
न्यूटने गुरुत्वाकर्षण नियम मांडण्यासाठी क्लेपरच्या कितव्या नियमाची मदत घेतली होती?

1   पहिल्या
2 दुसऱ्या
3 तिसऱ्या✅✅
4 चौथ्या

9️⃣
भारतात कोणत्या शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल स्थापन केले जाणार आहे?
(मुंबई, जयपूर, अहमदाबाद, नवी दिल्ली, कानपुर, कोलकत्ता)

1   वरील सर्व
2  अ,ब,क,फ
3   अ, क,इ✅✅
4   ब,ड, इ,फ

🔟
संसदीय शासन पद्धती...... येते विकसित झाली?

1  इंग्लंड✅✅
2 अमेरिका
3 फ्रान्स
4 नेपाळ

🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉

One liner General_Knowledge

▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...