१५ मे २०२०

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-


१) रामसर करार - 
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES - 
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार - 
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
 वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार - 
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC - 
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - 
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार - 
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
 वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६
________________________________

केंद्रकीय बल (Nuclear Force) :



     अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

       अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

      या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

       केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

        दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

       केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

क्षीण बल (Weak Force) :

         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

·         हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

·         निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

विविध उत्पादने वाढीसाठी झालेले प्रयत्न व त्यांना दिलेली नावे



1) हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन

2) निल क्रांती :- मत्स्य उत्पादन

3) पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन

4) सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ

5) सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन

6) कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र

7) करडी क्रांती :- खत उत्पादन

8) धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन

9)गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन

10)चंदेरी क्रांती:- अंडी

11) चंदेरी तंतू :- कापूस

12) अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प

13) लाल क्रांती :- टोमॅटो/मांस

14)तपकिरी क्रांती :- कोको

15)गोल क्रांती :- बटाटे

16) नारंगी :- युक्रेन मधील क्रांती

17)इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास


पोलीस भरती प्रश्नसंच

🟤  नागपूर जवळील..... येथे संरक्षण
साहित्याचा कारखाना आहे? -

☑️ अंबाझरी
_________________________________
⚫️ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 

☑️बोरिवली ( मुंबई)
_________________________________
🟣 गोदावरी नदीची एकूण लांबी किती? - 

☑️1465 कि.मी.
_________________________________
🟠 महाबळेश्वर, पाचगणी हे थंड हवेचे
ठिकाण कोणत्या राज्यात आहे? - 

☑️महाराष्ट्र
_________________________________
🔴 गुरुशिखर हे कोणत्या राज्यात येते?  - 

☑️ राजस्थान
_________________________________
🟤 सर्वाधिक जलसाठा कोणत्या राज्यात आहे? -

☑️ महाराष्ट्र
________________________________
🔵 महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वने आहेत? - 

☑️16.47 टक्के
_____________________________________
⚫️ महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम कधी लागू झाला? -

☑️ 1988
________________________________
🟣 देशातील सर्वात वेगवान वंदे भारत रेल्वे कोणत्या दोन स्टेशनदरम्यान सुरू करण्यात आली? - 

☑️ दिल्ली ते वाराणसी
_____________________________________
🟤 भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत 2018 मध्ये कोणत्या स्थानकांचा प्रथम क्रमांक लागतो? 

 ☑️ जोधपूर रेल्वे स्टेशन
_________________________________
🟠 भारतातील पहिले रेल्वे व वाहतूक
विद्यापीठ 2018 मध्ये कोठे स्थापन करण्यात आले? 

☑️ वडोदरा
________________________________
🔴 चीनने उभारलेला जगातील सर्वात लांब सागरी पूल हाँगकाँग -मकाऊ- झुहाईची लांबी किती किलोमीटर आहे ? -

☑️ 55 किलोमीटर

विश्व के प्रमुख संगठन और उनके मुख्यालय



1. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) - नैरोबी
2. अफ़्रीकी एकता संगठन (OAU) - आदिस-अबाबा
3. गैट (GATT) - जेनेवा
4. एशियाई विकास बैंक (ADB) - मनीला
5. नाटो (NATO) - ब्रुसेल्स
6. एमनेस्टी इंटरनेशनल - लंदन
7. अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) - वाशिंगटन डी. सी.
8. रेडक्रॉस - जेनेवा
9. सार्क (SAARC) - काठमाण्डु
10. इंटरपोल (INTERPOL) - पेरिस(लेओंस)
11. विश्व व्यापार संगठन (WTO) - जेनेवा
12. अमरीकी राज्यों का संगठन (OAS) - वाशिंगटन डी. सी.
13. यूनेस्को - पेरिस
14. परस्पर आर्थिक सहायता परिषद् (COMECON) - मास्को
15. वर्ल्ड काउंसिल ऑफ़ चर्चेज (WCC) - जेनेवा
16. यूरोपीय ऊर्जा आयोग (EEC) - जेनेवा
17. यूनिसेफ - न्यूयॉर्क
18. पश्चिमी एशिया आर्थिक आयोग (ECWA) - बगदाद
19. संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायोग (UNHCR) - जेनेवा
20. अंतर्राष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी (IAEA) - वियना

21. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संगठन (UNIDO) - वियना
22. संयुक्त राष्ट्र व्यापार एवं विकास सम्मलेन (UNCTAD) - जेनेवा
23. विश्व वन्य जीव संरक्षण कोष (WWF) - ग्लांड(स्विट्ज़रलैंड)
24. अंतर्राष्ट्रीय ओलम्पिक कमिटी (IOC) - लुसाने
25. यूरोपीय कॉमन मार्केट (ECM) - जेनेवा
26. राष्ट्रमंडलीय राष्ट्राध्यक्ष सम्मलेन (CHOGM) - स्ट्रान्सबर्ग
27. पेट्रोलियम उत्पादक देशों का संगठन (OPEC) - वियना
28. आर्थिक सहयोग और विकास संगठन (OECD) - पेरिस
29. यूरोपीय मुक्त व्यापार संघ (ECTA) - जेनेवा
30. राष्ट्रमंडल (कॉमनवेल्थ) - लंदन
31. यूरोपीय आर्थिक समुदाय (EEC) - जेनेवा
32. यूरोपीय संसद - लक्जमबर्ग
33. यूरोपियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन (ESRO) - पेरिस
34. यूरोपियन परमाणु ऊर्जा समुदाय (EURATON) - ब्रुसेल्स
35. एशिया और प्रशांत क्षेत्रों का आर्थिक और सामाजिक आयोग - बैंकाक
36. अफ़्रीकी आर्थिक आयोग (ECA) - आदिस-अबाबा
37. विश्व बैंक - वाशिंगटन डी. सी.
38. अरब लीग - काहिरा
39. दक्षिण पूर्वी एशियाई राष्ट्रों का संघ (ASEAN) - जकार्ता

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच 15/05/2020

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे 

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
 पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे 

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे 

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे 

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे 

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात 

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

​राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ऐवजी २०२३मध्ये


- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ ऐवजी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला आहे. २०२१ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेदरम्यानच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. 

- करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कारणास्तव राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली.

- ‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या संचालक मंडळाने २०२१ ऐवजी ही स्पर्धा २०२३ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती तेव्हा त्याच दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

-  या स्थितीत पुढील वर्षी स्पर्धा घेणे शक्य नाही,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

- ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार होती. 

- ‘‘२०२३ मध्ये आता ही स्पर्धा होणार असली तरी यजमान म्हणून पहिली पसंती त्रिनिदाद आणि टोबॅगोलाच असणार आहे,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले

भारतीय पोस्टाने स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ टपालाचे विशेष कव्हर..


 
🔰स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ भारतीय पोस्टाने आज एका विशेष समारंभात मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसच्या ऐतिहासिक इमारतीतील बायसेंटेनरी सभागृहात टपालाचे एक विशेष कव्हर प्रकाशित केले.

🔰या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल, हरिश चंद्र अगरवाल आणि मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाच वेगवेगळ्या विभागातील स्थलांतरित कामगारांना बोलावून त्यांच्या हस्ते हे कव्हर प्रकाशित करण्यात आले.

🔰 या स्थलांतरीत कामगारांमध्ये भारतीय टपाल विभागासाठी मास्क शिवणा-या एका शिंप्यासह दोन बांधकाम मजूर, टॅक्सीचालक, सोनारकाम करणारा कारागीर यांचा समावेश होता. देशाभरातील टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांत परतण्याच्या प्रयत्नात असतांना हा समारंभ झाला.

पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घोषणा.




🔰 पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
भारताच्या पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी दीपा मलिकने हा निर्णय घेतल्यचं कळतंय.

🔰 तर पॅरालिम्पिक खेळांमध्ये पहिलं पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिकच्या नावावर जमा आहे.

🔰 तसेच 2016 साली रिओमध्ये झालेल्या शॉटपुट प्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त IPC ओशिनीया-आशियाई अजिंक्यपद यासह अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये दीपाने पदकांची कमाई केली होती.

🔰 राष्ट्रीय क्रीडा संहीतेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचं असेल तर त्याला आधी निवृत्ती स्विकारावी लागते. या नियमाचं पालन करतानाच दीपाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आदिकेंद्रकी पेशी


◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात

◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात 

◾️या पेशीतील केंद्रकांच्या मध्ये आवरण नसते व  पेशींच्या मध्ये एकच गुणसूत्रांची जोडी असते 

◾️यामध्ये तंतुकणिका नसतात परंतु परंतु रायबोझोम चे कण असतात 

📌 उदाहरण जिवाणू ,सायानोबॅक्टरिया ,मायक्रोप्लाजमा 
______________________________________
.             🔰दृश्यकेंद्रकी पेशी 🔰
______________________________________
◾️या पेशींच्या मध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगके असतात त्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात 

◾️दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठे असतात यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र व केंद्र की द्रव असते 

◾️या पेशी मध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असतात 

◾️या पेशी अति विकसित असतात 

📌उदाहरणत आमीबा , स्पायरोगायरा, वनस्पती , प्राणी
_______________________________________

अर्जुन पुरस्कारासाठी BCCI बुमराहच्या नावाची शिफारस करण्याच्या तयारीत


🔰भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करायची असते.

🔰२०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरी पाहता बीसीसीआयचे अधिकारी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
__________________________________

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...