Thursday, 14 May 2020

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे 

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
 पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे 

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे 

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे 

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे 

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात 

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

​राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ऐवजी २०२३मध्ये


- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ ऐवजी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला आहे. २०२१ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेदरम्यानच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. 

- करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कारणास्तव राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली.

- ‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या संचालक मंडळाने २०२१ ऐवजी ही स्पर्धा २०२३ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती तेव्हा त्याच दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

-  या स्थितीत पुढील वर्षी स्पर्धा घेणे शक्य नाही,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

- ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार होती. 

- ‘‘२०२३ मध्ये आता ही स्पर्धा होणार असली तरी यजमान म्हणून पहिली पसंती त्रिनिदाद आणि टोबॅगोलाच असणार आहे,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले

भारतीय पोस्टाने स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ टपालाचे विशेष कव्हर..


 
🔰स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ भारतीय पोस्टाने आज एका विशेष समारंभात मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसच्या ऐतिहासिक इमारतीतील बायसेंटेनरी सभागृहात टपालाचे एक विशेष कव्हर प्रकाशित केले.

🔰या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल, हरिश चंद्र अगरवाल आणि मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाच वेगवेगळ्या विभागातील स्थलांतरित कामगारांना बोलावून त्यांच्या हस्ते हे कव्हर प्रकाशित करण्यात आले.

🔰 या स्थलांतरीत कामगारांमध्ये भारतीय टपाल विभागासाठी मास्क शिवणा-या एका शिंप्यासह दोन बांधकाम मजूर, टॅक्सीचालक, सोनारकाम करणारा कारागीर यांचा समावेश होता. देशाभरातील टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांत परतण्याच्या प्रयत्नात असतांना हा समारंभ झाला.

पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घोषणा.




🔰 पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
भारताच्या पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी दीपा मलिकने हा निर्णय घेतल्यचं कळतंय.

🔰 तर पॅरालिम्पिक खेळांमध्ये पहिलं पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिकच्या नावावर जमा आहे.

🔰 तसेच 2016 साली रिओमध्ये झालेल्या शॉटपुट प्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त IPC ओशिनीया-आशियाई अजिंक्यपद यासह अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये दीपाने पदकांची कमाई केली होती.

🔰 राष्ट्रीय क्रीडा संहीतेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचं असेल तर त्याला आधी निवृत्ती स्विकारावी लागते. या नियमाचं पालन करतानाच दीपाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आदिकेंद्रकी पेशी


◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात

◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात 

◾️या पेशीतील केंद्रकांच्या मध्ये आवरण नसते व  पेशींच्या मध्ये एकच गुणसूत्रांची जोडी असते 

◾️यामध्ये तंतुकणिका नसतात परंतु परंतु रायबोझोम चे कण असतात 

📌 उदाहरण जिवाणू ,सायानोबॅक्टरिया ,मायक्रोप्लाजमा 
______________________________________
.             🔰दृश्यकेंद्रकी पेशी 🔰
______________________________________
◾️या पेशींच्या मध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगके असतात त्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात 

◾️दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठे असतात यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र व केंद्र की द्रव असते 

◾️या पेशी मध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असतात 

◾️या पेशी अति विकसित असतात 

📌उदाहरणत आमीबा , स्पायरोगायरा, वनस्पती , प्राणी
_______________________________________

अर्जुन पुरस्कारासाठी BCCI बुमराहच्या नावाची शिफारस करण्याच्या तयारीत


🔰भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करायची असते.

🔰२०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरी पाहता बीसीसीआयचे अधिकारी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
__________________________________

वाचा :- घटना आणि देशातील पहिले राज्य

● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : *हिमाचल प्रदेश*

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : *तामिळनाडू*

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : *राजस्थान*

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : *राजस्थान* 

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : *उत्तराखंड*

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : *हरियाणा*

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : *आंध्रप्रदेश*

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : *हिमाचल प्रदेश*

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : *केरळ*

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : *पंजाब*

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : *कर्नाटक*

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : *कर्नाटक*

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : *उत्तरप्रदेश*

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : *तामिळनाडू*

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र (मुंबई)*

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र*

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : *आंध्रप्रदेश* (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : *छत्तीसगड*

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : *मध्यप्रदेश*

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका

२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार

४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२

५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान

लॉर्ड जॉन लॉरेन्स

कार्यकाळ :  (१८६३-१८६९) :

  सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला.

   १८६८ मध्ये  पंजाब अवधसाठी कूळ कायदा  लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

  दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

  सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.