Wednesday, 13 May 2020

देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी.

🔰इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे ३.२ टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर ७.५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

l🔰जगभरात ४१ लाख लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्ण दगावले. भारतात २२९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰केंद्रीय आरोग्यमंत्री राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे असे नव्हे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता ३१.७० टक्क्यांवर पोहोचलेले आहे.

🔰देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५३८ रुग्ण बरे झाले. मात्र देशभरातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजाराच्या घरात गेली असून मंगळवारी ती ७०,७५६ इतकी झाली. सोमवारी एका दिवसात चार हजारहून अधिक रुग्णांची भर पडली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६०४ नवे रुग्ण आढळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

पोलीस भरती प्रश्नसंच

1] खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A) बालदिन - १४ नोव्हेंबर

B)  कामगार दिन -१ मे

C)  शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✔️

D)  बालिका दिन -३ जानेवारी

=========================

2] छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A)  तुकाराम - एकनाथ

B) रामदास -तुकाराम✔️

C) तुकाराम - नामदेव

D) रामदास - एकनाथ

=========================

3] शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A)  सर्वनाम

B)  नाम✔️

C) क्रियापद

D) विशेषण

=========================

4] मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A)  फक्त दिवस

B)  डोपरी किंवा पहाटे

C)  फक्त रात्री✔️

D) दिवस किंवा रात्री

=========================

5] खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A)  १८

B) १६

C)  १७✔️

D)  १९

=========================

6] अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A) १४

B)  ८

C)  ७✔️

D) ११

=========================

7] ३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A)  ९२०✔️

B)  २३०

C) ११५

D)  ६९०

=========================

8]    यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A) संत गाडगेबाबा✔️

B) संत तुकाराम

C)  संत चोखामेळा

D)  संत शेख महंमद

=========================
9] बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A) स्वदेशी आंदोलन

B)  चोरीचौरा आंदोलन

C) फोडा आणि तोडा आंदोलन

D)  बंग - भंग आंदोलन✔️

=========================

10] खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A) ५/६

B) ३/५

C) ७/९

D)  ४/७✔️

=========================

◾️पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे. आणी पहिल्या चार निकालांची 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A)  50✅

B)  1

C)  10

D) 12.5

◾️एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?

A)  30 मी/से. ✅

B) 96 मी/से.

C) 22.5 मी/से.

D)  45 मी/से.

◾️खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरु शकत नाही ?

2, 3, 6, 15, 45, 135, 630

A) 6

B) 15

C)  2✅

D) 45

◾️जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT = 36 तर REVIVE = ?

A) 6

B) 12

C) 15

D) 18✅

◾️दिलेल्या शब्दात अक्षरांची अदलाबदल करून योग्य शब्द तयार होतो. तयार होणा-या शब्द गटातून विसंगत शब्दगट निवडा.

NVESU, TERAH, NOMO, RASM

A) NVESU

B) TERAH

C) NOMO✅

D)  RASM

◾️जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ?

A)  MEXICO

B) ISLAND

C) HOLAND

D)  HUNGRY✅

◾️समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

A) दु. 2.30 वाजता

B) सकाळी 4.15 वाजता

C)  दु. 3.00 वाजता✅

D) दु. 2.45 वाजता

◾️जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

A) 425

B) 625

C) 75

D) 125✅

◾️एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

A) 18 वर्षे

B) 15 वर्षे✅

C)  11 वर्षे

D) 23 वर्षे

◾️खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 येते व त्या संख्यांची बेरीज 39 येते तर त्या संख्या कोणत्या ?

A)  24, 15

B) 23, 16✅

C)  22, 17

D) 20, 19

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन

▪️ निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी

▪️ कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड

▪️ कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪️ कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट

▪️ कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन

▪️ जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे

▪️ भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स

▪️ कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा

▪️ ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड

▪️ कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण

▪️ इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी

▪️ कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ

प्रश्नमंजुषा


______________________________
🟠 अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा     क) महाराष्ट्र
         4) नरोरा            ड) राजस्थान
                                  इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1✔️✔️
______________________________

🟡 ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1✔️✔️
______________________________

🟢 खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3  ✔️✔️
______________________________
🔵 फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1  ✔️✔️
______________________________
🔴 खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व

उत्तर :- 1 ✔️✔️
______________________________

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या


🔰 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🔗 चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

🔰 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🔗 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..

🔗 गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🔗 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..

🔗 हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

🔰 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🔗 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🔗 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🔗 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..

🔗 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

🔗 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..

🔗 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
_______________________________

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.
♦️ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

♦️त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.
🔹 🔹 🔹 🔹 🔹🔹 🔹 🔹 🔹

जनरल नॉलेज

▪भारतातील सर्वात मोठा धबधबा?--------- गिरसप्पा (कर्नाटक)

▪भारतातील सर्वात मोठा जिल्हा?--------- लडाख (जम्मू--------- काश्मीर)

▪भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?--------- खरगपूर (प. बंगाल)

▪भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?--------- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)

▪भारतातील सर्वात मोठी मस्जिद?--------- जामा मशीद

▪भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?--------- प्रगती मैदान (दिल्ली)

▪भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?--------- सुवर्ण मंदिर (अमृतसर)

▪भारतातील सर्वात मोठे धरण?--------- भाक्रा (७४० फूट)

▪भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?--------- राजस्थान

▪भारतातील सर्वात मोठे वाळवंट?--------- थर (राजस्थान)

यशाचा राजमार्ग चालू घडामोडी प्रश्नसंच

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच 13/05/2019

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट

▪️ कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन

▪️ जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे

▪️ भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स

▪️ कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा

▪️ ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड

▪️ कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण

▪️ इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी

▪️ कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ

▪️ कोणत्या संस्थेनी ‘डिजिटल इन इंडिया 2019’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ या कार्यक्रमाचे बोधचिन्ह चित्रित करण्याची स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : पर्यटन मंत्रालय

▪️ कोणती व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमामध्ये भारताचे सदिच्छा दूत आहे?
उत्तर : दिया मिर्झा

▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया

▪️ कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात ‘वन्स इन ए जनरेशन’ गुंतवणूक योजनेची घोषणा केली गेली?
उत्तर : ब्रिटन

▪️ 2020 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड

सानिया मिर्झा ठरली Fed Cup Heart पुरस्काराची मानकरी

__________________________________

📌 भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा Fed Cup Heart पुरस्कार पटकावला  आहे.

📌 तर हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

📌 Asia/Oceania गटात सानिया मिर्झाने 10 हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.

📌 चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे.

📌 तसेच एकूण मतांपैकी 60 टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.

📌 Fed Cup Heart पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 2 हजार अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळतं.

📌 सानिया मिर्झानेआपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचं जाहीर केलं आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील √√√
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च √√√
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का √√√

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान √√√
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण √√√
ड) कृत्रिम पाऊस

____________________________________
🔵 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
क) जावेद अशरफ ✔️✔️
ड) यापैकी नाही
____________________________________
🟢 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
ब) केरळ  ✔️✔️
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
____________________________________
🟡 अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?
अ) साहित्य
ब) शांतता
क) अर्थशास्त्र ✔️✔️
ड) भौतिकशास्त्र
____________________________________
🟠 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?
अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही
____________________________________
🔴 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु
ब) फेटा
क) लेह ✔️✔️
ड) यापैकी नाही
____________________________________

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...