नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
११ मे २०२०
वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून करोना व्हायरसची निर्मिती?
सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे.
- संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची निर्मिती वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून झालेली असू शकते. सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. या सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती वटवाघुळ आणि खवले मांजरामध्ये आढळणाऱ्या करोना व्हायरसच्या संमिश्रणातून झालेली असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
- या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, खवले मांजरामधून सार्स-Cov-2 विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्याची शक्यता आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
- दक्षिण चीन शेती विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या वेटरीनरी मेडिसीन कॉलेजमधील तज्ज्ञांनी हा संशोधन अहवाल जनरल नेचरमध्ये प्रसिद्ध केला आहे. खवले मांजराचा जगभरात मोठया प्रमाणावर व्यापार चालतो. या मांजरामध्ये सार्स Cov-2 सारखे विषाणू आहेत.
- वन्यजीवांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा सूचक इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.
चिनी वैज्ञानिकांनी मलायन खवल्या मांजरामधून करोना व्हायरस वेगळे काढले. त्या करोना व्हायरसच्या अॅमिनो अॅसिडमध्ये सार्स Cov-2 चे चार जीन्स आढळून आले.
- मलायन खवल्या मांजरामध्ये आढळलेला करोना व्हायरस सार्स Cov-2 सारखाच आहे.
जीनोमच्या साखळीमधून असे लक्षात आले की, खवल्या मांजरामधील Cov सार्स-Cov-2 आणि वटवाघुळामधील सार्स-Cov RaTG13 शी समान आहे. फक्त एस जीनमध्ये फरक होता. वटवाघुळामध्ये करोना व्हायरस असतो. तिथून तो खवल्या मांजरामध्ये आला असवा. त्या संमिश्रणातून सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती होऊन मानवी संक्रमण झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.
- खवल्या मांजराच्या रक्ताचा औषध निर्मितीसाठी वापर होतो तसेच दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये खवल्या मांजराच्या मांसाला मागणी आहे.
- करोना व्हायरसची निर्मिती वुहानच्या लॅबमध्ये झाली असा अमेरिकेचा आरोप आहे. लॅबमध्ये कोणाकडून तरी चूक झाली, त्यामुळे आज जगभरात या व्हायरसचा फैलाव झाला.
- करोनाचा पहिला रुग्ण त्या लॅबमध्ये आहे असे वृत्त अमेरिकेतील फॉक्स न्यूजने काही दिवसांपूर्वी दिले होते.
---------------------------------------------------
वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे
MTDC चा अर्थ काय?
A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.
A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही
पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात आहे.
A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅
भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?
A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११
भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
मानवामध्ये गुणसूत्रे असतात.
A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅
‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.
A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात
आम्ल पदार्थाची चव कशी असते?
A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ठिकाणी स्थित आहे.
A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल
भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?
A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर
I.S.I. हि गुप्तहेर संघटना देशाची आहे?
A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया
अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च
A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅
‘नांगर चषक’ खेळाशी संबधित आहे.
A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅
भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?
A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर
अंदमान – निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?
A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅
‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे
कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅
हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा
‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे
‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र यांचे आहे.
A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट
क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ठिकाणी आहे?
A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅
--------------------------------------------------------
१) माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेला मार्च २०२० रोजी किती वर्षे पूर्ण होत आहे ?
अ) ७५ वर्षे
ब) १६० वर्षे
क) १५० वर्षे
ड) १०० वर्षे ✅✅
२) २ मार्च २०२० रोजी कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने लोकायुक्त विधेयक २०२० याला मान्यता दिली आहे ?
अ) महाराष्ट्र
ब) हरियाणा
क) पंजाब ✅✅
ड) आसाम
३) जागतिक श्रवण दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ८ मार्च
ब) ५ मार्च
क) ३ मार्च ✅✅
ड) १५ मार्च
४) लेफ्टनंट जनरलपदी नियुक्त झालेल्या डॉ. माधुरी कानिटकर या महाराष्ट्रातील कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत ?
अ) पहिल्या ✅✅
ब) दुसऱ्या
क) तिसऱ्या
ड) पाचव्या
५) लेफ्टनंट जनरलपदी नियुक्त झालेल्या डॉ. माधुरी कानिटकर या देशातील कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत ?
अ) चौथ्या
ब) तिसऱ्या ✅✅
क) दुसऱ्या
ड) पहिल्या
महत्त्वाचे मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
1) उभयान्वयी
2) केवलप्रयोगी
3) क्रियाविशेषण
4) शब्दयोगी
उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !
2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
3) येणार असेल तर येईना बापडा ! 4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.
उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
1) रीती भूतकाळ
2) रीती वर्तमानकाळ
3) रीती भविष्यकाळ
4) अपूर्ण भूतकाळ
उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4) ‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
1) गाय
2) शेळी
3) म्हैस
4) कुत्री
उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
1) करण
2) संप्रदान
3) अपादान
4) अधिकारण
उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’
1) परवानगी घेतल्याशिवाय आत
2) आत येण्यासाठी परवानगी लागते
3) परवानगी घ्या आणि आत या
4) आत येताना परवानगी घ्या
उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7) खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ?
‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’
1) यशोदाने
2) श्रीकृष्णाला
3) लोणी
4) दिले
उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’
– प्रयोग प्रकार ओळखा.
1) समापन कर्मणी
2) नवीन कर्मणी
3) पुराण कर्मणी
4) यापैकी नाही
उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.
1) कर्मधारय समास
2) उपपद तत्पुरुष समास
3) विभक्ती तत्पुरुष समास
4) नत्र तत्पुरुष समास
उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10) पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?
1) कोबी
2) इस्पितळ
3) तबियत
4) पॉकेट
उत्तर :- 1
राज्यसेवा प्रश्नसंच
1) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?
अ) जे.व्हि.पी. समिती
ब) सरकारीया आयोग
क) इंद्रजित गुप्ता समिती
ड) राजमन्नार समिती
1) फक्त अ, ब, क
2) फक्त अ, ब, ड
3) फक्त अ, क, ड
4) फक्त ब, क, ड
उत्तर :- 2
2) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.
ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1
3) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?
अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग
ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष
क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे
ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील
1) फक्त अ, ब, क
2) फक्त अ, क, ड
3) फक्त क, ड, ब
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 4
4) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?
1) 1956
2) 1955
3) 1935
4) 1951
उत्तर :- 2
5) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?
1) भारताचा अधिवास आणि
2) भारतात जन्म किंवा
3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास
उत्तर :- 3
1) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
प्रकल्प राज्य
1) कल्पक्कम अ) तमिळनाडू
2) काक्रापार ब) गुजरात
3) रावतभाटा क) महाराष्ट्र
4) नरोरा ड) राजस्थान
इ) उत्तर प्रदेश
1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ
2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
उत्तर :- 1
2) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
1) संतृप्त हायड्रोकार्बन
2) असंतृप्त हायड्रोकार्बन
3) विवृत्त हायड्रोकार्बन
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1
3) खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
1) मोलुस्का 2) आथ्रोपोडा
3) दोन्ही 4) दोन्ही नाही
उत्तर :- 3
4) फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
1) रासायनिक ऊर्जा
2) नैसर्गिक वायू
3) विद्युतधारा
4) भू – औष्णिक ऊर्जा
उत्तर :- 1
5) खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
1) अल्केन 2) अल्कीन
3) अल्काइन 4) वरील सर्व
उत्तर :- 1
(1) अनैतिक व्यापार ( प्रतिबंध ) अधिनियम , १९५६ अनुसार सात वर्षे ते दहा वर्षे वा आजीवन तुरूंगवासाची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी दिली जाऊ शकते ?
( अ ) १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती अज्ञान व्यक्तीच्या वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर जगत असेल
( ब ) वेश्या व्यवसायासाठी व्यक्तीला फूस लावणे , घेऊन जाणे , पुरवणे ,
( क ) वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीला डांबून ठेवणे ,
( ड ) जागा कुंटणखान्यासाठी वापरणे , व्यवस्था पाहणे / मदत करणे ,
( १ ) अ फक्त
( २ ) ब फक्त
( ३ ) अ , ब , क ✅🔰✅
( ४ ) ड फक्त
=========================
(2)महाराष्ट्रात महिला धोरण २००१ अनुसार महिला सक्षमीकरण समितीचे गठण केले गेले . या समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
( १ ) मंत्री , महिला व बाल विकास
( २ ) अध्यक्ष , राज्य महिला आयोग
( ३ ) संचालक , माविम
( ४ ) मुख्यमंत्री ✅🔰✅
=========================
(3)योग्य जोड्या लावा .
संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव ------ वर्ष
(अ) महिलांचे राजकीय हक्क (य) १९६७
(ब) विवाहित महिलांचे राष्ट्रीयत्व (र) १९६२
(क) विवाह , किमान वय व नोंदणी (ल) १९५७
( ड ) महिलांविरुद्ध भेदभाव निर्मूलन (व) १९५२
( १ ) अ - य , ब - र , क - ल , ड - व
( २ ) अ - व , ब - ल , क - र , ड - य✅🔰
( ३ ) अ - र , ब - य , क - व , ड - ल
( ४ ) अ - ल , ब - व , क - य , ड - र
=========================
(4)महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात ?
( १ ) चार
( २ ) पाच
( ३ ) सहा ✅🔰✅
( ४ ) आठ
=========================
(5) संयुक्त राष्ट्रसंघाने ३ कलमी मानवी अधिकारांची घोषणा ज्या दिवशी केली तो दिवस . . .
( १ ) १२ डिसेंबर , १९४७
( २ ) १५ ऑगस्ट , १९४७
( ३ ) १० डिसेंबर , १९४८ ✅🔰✅
( ४ ) २ ऑक्टोबर , १९५१
=========================
(6)बाल न्याय अधिनियम , २००० अंतर्गत विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी राज्यात ठिकठिकाणी कोणती गृहे
उभारण्यात आली आहेत ?
( १ ) बालगृहे
( २ ) अनाथालये
( ३ ) विशेष गृहे ✅🔰✅
( ४ ) सेवा गृहे
=========================
(7) महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव दिसतो ?
( १ ) जस्टीस ऑफ पीस
( २ ) रिलीफ अॅक्ट
( ३ ) राईट्स ऑफ मॅन ✅🔰
( ४ ) हू वेअर शुद्राज
=========================
१) खालीलपैकी कोणत्या शहरात पुसा कृषी विज्ञान मेळावा २०२० आयोजित करण्यात आला ?
अ) मुंबई
ब) पुणे
क) नवी दिल्ली ✅✅
ड) हैदराबाद
२) भारतीय बॅटमिंटनचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
अ) ऍगस ड्वी सांतोसो ✅✅
ब) किम जी ह्यून
क) रवी शास्त्री
ड) यापैकी नाही
३) २०२० मध्ये विश्व उत्पादकता काॅग्रेसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?
अ) अमेरिका
ब) भारत ✅✅
क) रशिया
ड) जपान
४) जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ७ मार्च
ब) ९ मार्च
क) १० मार्च
ड) ८ मार्च ✅✅
५) ' मोदी अगेन : व्हाय मोदी इज राईट फाॅर इंडिया ' या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) शरद दत्त
ब) आभास मालदाहीयार ✅✅
क) वेद माथूर
ड) यापैकी नाही
🔹भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?
A) 1 एप्रिल 2005✅
B) 1 एप्रिल 2003
C) 1 एप्रिल 2001
D) 1 एप्रिल 2002
🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत _छापखाना सुरु केला.
A) बुद्धीसागर
B) ज्ञानसागर
C) कालनिर्णय
D) निर्णयसागर✅
🔹विजोड व्यक्ती ओळखा :
A) बॅरिस्टर जयकर
B) वासुदेव दास्ताने
C) अब्दुल सैफ
D) अण्णासाहेब भोकरकर✅
◾️मौर्य पूर्व काळात भारत ___ म्हणून ओळखला जाई.
A) द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅
B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज
C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज
D) द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी
1) विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले आहे ?
1) सरकारी खर्चात कपात
2) करआकारणीचा पाया विस्तृत करणे
3) जास्त कर दर
4) मूल्यवर्धित कर निर्मूलन
उत्तर :- 2
2) तेराव्या वित्त आयोगाने दिनांक 30 डिसेंबर 2009 रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरे आहे ?
अ) तेराव्या वित्त आयोगाने सध्याची केंद्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिय पध्दत न्याय मानली आहे. बरेच सरळ कर केंद्राने लादणे व संकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटणे.
ब) गरीब राज्यांना अन्न, खते व पेट्रोलियम या तीन मुख्य सबसिडीज (उपुदाने) मुळे फायदा होतो कारण त्यांना त्यातून पुरेसा आधार / भाग मिळतो आणि म्हणून आहे तश्या त्या चालू राहावयास हव्यात.
1) विधान अ खरे आहे परंतु ब नाही.
2) विधान ब खरे आहे परंतु अ नाही.
3) दोन्ही विधाने अ व ब खरी आहेत.
4) दोन्ही विधाने अ व ब चुकीची आहेत.
उत्तर :- 1
3) जनरल अँटी – अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू होतील ?
1) 1 एप्रिल 2016
2) 1 एप्रिल 2015
3) 1 जानेवारी 2015
4) 1 एप्रिल 2007
उत्तर :- 1
4) खालीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?
अ) मूल्यवर्धित कर ही बहु केंद्रीय कर गोळा करणारी पध्दती आहे.
ब) अमूल्यवर्धित कर ही एक केंद्रीय कर गोळा करणारी पध्दत आहे.
क) मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल.
1) अ आणि ब 2) ब आणि क
3) फक्त क 4) वरील सर्व
उत्तर :- 4
5) भारतीय करपध्दतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाने केला होता ?
1) खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे.
2) अनुत्पादक खर्चाचे नियमन करणे.
3) कर चुकवेगिरीचे प्रमाण कठोर उपायांनी कमी करणे.
4) करांची संख्या वाढविणे.
उत्तर :- 1
6) खालील विधानांचा विचार करा.
अ) थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरूवात.
ब) कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
क) वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती.
1) अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.
2) अ फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.
3) ब फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.
4) अ आणि ब या क ने सुचविल्या नाहीत.
उत्तर :- 4
7) कर महसूलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्वाचा घटक .......................... हा आहे.
1) गेल्या पाच वर्षातील दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग
2) राज्याच्या लोकसंख्येची घनता
3) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि देशातील दरडोई उत्पन्न यामधील अंतर
4) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे उत्पन्न यातील अंतर
उत्तर :- 4
8) खालीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?
अ) 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलात 37.4 टक्के वाढ झाली, हे महसूल स्त्रोतातील सेवा कर महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे.
ब) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 सात योजनासह संपूर्ण भारतात सुरू झाली.
1) फक्त अ 2) फक्त ब
3) अ आणि ब 4) एकही नाही
उत्तर :- 1
9) करेतर महसूलात याचा समावेश होतो :
अ) व्याज प्राप्ती ब) लांभांश व नफा
क) अनुदान
1) अ फक्त. 2) अ व ब फक्त
3) अ व क फक्त 4) वरील सर्व
उत्तर :- 4
10) करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पध्दत :
अ) करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण
ब) सर्वोच्च कर दर
क) कर लागू होण्याची कमीतकमी उत्पन्न पातळी
ड) उत्पन्न वजावटीची सर्वात जास्त मर्यादा
1) ब 2) अ 3) ड 4) क
उत्तर:- 2
लॉर्ड कर्झन (1899 - 1905)
●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....
●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.
●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.
●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core ची स्थापना केली.
●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.
●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.
●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.
●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.
●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.
●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.
●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.
●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.
●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.
●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.
●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.
●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.
●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.
●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.
●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.
●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.
●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित 'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.
●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.
“२०२० संपेपर्यंत Work From Home करा”; फेसबुक, गुगलने दिली कर्मचाऱ्यांना मुभा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💮करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. या कंपन्यामध्ये अगदी गुगल आणि फेसबुकसारख्या बड्या कंपन्यांच्याही मसावेश आहे.
💮आता या दोन कंपन्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपपर्यंत घरुन काम करण्याची मुभा देणार आहेत. लवकरच दोन्ही कंपन्या यासंदर्भातील औपचारिक घोषणा करणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
💮फेसबुक ६ जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले आहे. मात्र असं असलं तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची इच्छा आहे ते घरुन काम करु शकतात अशी मुभा देण्यात येणार असल्याचे समजते.
💮यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकेरबर्ग याबद्दलची घोषणा करु शकतो.
💮‘द व्हर्ग’मधील वृत्तानुसार फेसबुकने हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कार्यलयातून काम करण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते.
💮सध्या तरी कंपनीचे अनेक कार्मचारी हे घरुनच काम करत आहेत. याआधीच फेसबुकने २०२१ पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.
Latest post
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...