Saturday, 9 May 2020

12 वी स्टेट बोर्ड इतिहास शॉर्ट नोट्स

◾️4 जुलै 1776 - थॉमस जेफरसन याने अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला.

◾️पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा 1498 मध्ये कलीकत(आजचे कोझीकोडे) बंदरात पोहोचला.

◾️ पोर्तुगीज - 1510 साली आदिलशाहकडून गोवा जिंकले.

◾️1665 साली मुंबई - इंग्रजांच्या ताब्यात आली.

◾️ मुंबईस 7 बेटांचा समूह मानले जाते.
📌(सात बेट - मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव, माझगाव)

◾️1602 - डचांची 'युनायटेड ईस्ट इंडिया' कंपनी उदयास आली.

◾️डचांची पहिली वसाहत - मच्छलीपट्टणम

◾️मच्छलीपट्टणम बेटांचा उल्लेख इसवी सन पूर्व 3 ऱ्या शतकापासून, तसेच "पेरिपल्स ऑफ इरिथ्रीयन सी" या ग्रंथात मच्छलीपट्टणमचा उल्लेख 'मसालिया' असा आहे.

◾️1664 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कम्पनी स्थापन (La Compagnie des indes orientales)

◾️पहिली फ्रेंच वखार - सुरत (1668)
------------------------------------------------------

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार


______:_________:____________________

◾️वर्ष:-2019

🔰विजेते:-

◾️ बजरंग पुनिया(कुस्ती)

◾️ दीपा मलिक(पॅरा ऍथलिट)

🔰पुरस्कार बाबत🔰
______:_________:____________________

◾️सुरुवात:-1992

◾️स्वरूप:-7.5 लाख व पदक

◾️राष्ट्रीय क्रीडा दिनी प्रदान करतात

◾️1992:-विश्वनाथ आनंद

◾️सलग 4 वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो

______:_________:____________________

नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदच्या विजयामुळे भारत पाचव्या स्थानी

◾️माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नेशन्स चषकd सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली.

◾️परंतु तिसऱ्या दिवसाच्या पाचव्या फेरीत रशियाने बरोबरीत रोखले. मग सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला २.५-१.५ अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.

◾️पाचव्या फेरीत ५० वर्षीय आनंदने रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचशीला फक्त १७ चालींत पराभूत केले.

◾️मग बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी अनुक्रमे सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांना बरोबरीत रोखले.

◾️परंतु व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हने पी. हरिकृष्णाला पराभूत केल्यामुळे रशियाला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधता आली.

◾️ अमेरिकेविरुद्धच्या सहाव्या फेरीत आनंद, विदीत गुजराती आणि कोनेरू हम्पी यांनी अनुक्रमे हिकारू नाकामुरा, फॅबिओ कारूआना आणि इरिना कृश यांच्याशी बरोबरी साधली, मात्र वेस्ली सो याच्याकडून अधिबानला दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताचा पराभव झाला
______________________________________

भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के

◾️मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने आपल्या ताज्या अहवालात करोनामुळे

◾️ यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के राहिल असं भाकित वर्तवलं आहे.

◾️शुक्रवारी (८ मे २०२०) मूडीजने यासंदर्भातील अहवाल जारी केला. लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.

◾️ २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ्यवस्थेची वाढ शून्य टक्क्यांवर अडकून राहिल म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जैसे थे परिस्थितीत असेल असं मूडीजने म्हटलं आहे.

◾️मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे.

◾️ २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ६.६ टक्क्यांपर्यंत असेल असंही मूडीजने या अहवालात म्हटलं आहे.

◾️  फिच या संस्थेनेही काही दिवसांपूर्वी असाच इशारा दिला असल्याने आता मूडीजचा अहवाल नक्कीच भारताची चिंता वाढवणार आहे असं म्हटलं जातं आहे.

____________________________________

परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स

MOST IMP TOPIC

●●आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2020●●

√ अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स' (USCC) च्या 'ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर' (GIPC) ने 5 फेब्रुवारी 2020 रोजी जगातील 53 मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2020 (Intellectual Property Index 2020) जाहीर केला.

√या निर्देशांकानुसार जगातील 53 देशांच्या यादीत भारत 40 व्या स्थानी आहे.

√ 2019 च्या निर्देशांकानुसार भारत 36 व्या स्थानी होता. म्हणजेच या वर्षी भारताचे स्थान चार क्रमांकांनी घसरले आहे.

√ भारताला मिळालेले गुण : 38.46.

√ या निर्देशांकानुसार जगातील टॉप 5 देश (कंसात त्यांना प्राप्त गुण) :

◆ 1) अमेरिका (95.28)
◆ 2) युके (इंग्लंड) (93.92)
◆ 3) फ्रान्स (91.50)
◆ 4) जर्मनी (91.08)
◆ 5) स्वीडन (90.56)

√ या निर्देशांकानुसार तळातील 5 देश (कंसात त्यांना प्राप्त गुण) :

◆ 53) व्हेनेझुएला (14.22)
◆ 52) अल्जेरिया (24.06)
◆ 51) पाकिस्तान (26.50)
◆ 50) नायजेरिया(27.62)
◆ 49) कुवेत (28.02)

√ या निर्देशांकानुसार BRICS देशांचे स्थान :

◆ चीन (28)
◆ रशिया (31)
◆ ब्राझील (34)
◆ भारत (40), दक्षिण
◆ आफ्रिका (42).

√ केवळ आशियाई देशांचा विचार करता जपान अव्वलस्थानी (एकूणामध्ये सहावा क्रमांक) आहे.

√ हा निर्देशांक प्रसिद्ध होण्याचे हे आठवे वर्ष (आठवी आवृत्ती) आहे.

◆ पुढील 8 गटांमध्ये विभागलेल्या 45 निदर्शकांच्या मदतीने हा निर्देशांक काढला जातो :

√ 1) पेटंट्स
√ 2) कॉपीराईट्स
√ 3) ट्रेडमार्क
√ 4) ट्रेड सिक्रेट
√ 5) बौध्दिक संपदेचे व्यापारीकरण
√ 6) अंमलबजावणी
√ 7) पद्धतशीर कार्यक्षमता
√ 8) आंतरराष्ट्रीय करारांचे सदस्यत्व व मान्यता.

अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

MOST IMP TOPIC

परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स
(08/05/2020)

●●भारत भ्रष्टाचार सर्वेक्षण :- 2019●●

√ स्थानिक सर्कल, सोशल मेडिया फर्म आणि ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल यांनी मिळून तयार केलेले भारत भ्रष्टाचार सर्वेक्षण 2019 हे 1 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

√ सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

◆ सर्वाधिक भ्रष्टाचार आढळणारी राज्ये :

√ (1) राजस्थान,
√ (2) बिहार
√ (3) उत्तर प्रदेश
√ (4) झारखंड
√ (5) तेलंगणा
√ (6) कर्नाटक
√ (7) पंजाब
√ (8) तमिळनाडू

◆ सर्वांत कमी भ्रष्टाचार असणारी राज्ये :

√ (1) केरळ
√ (2) गोवा
√ (3) गुजरात
√ (4) ओडिशा
√ (5) पश्चिम बंगाल
√ (6) हरियाणा
√ (7) दिल्ली.

√ ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने 2018 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात (Corruption Perceptions Index) भारत 180 देशांच्या यादीत 78 व्या क्रमांकावर होता.

◆ ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल

√ ही एक बर्लिन, जर्मनीस्थित स्वयंसेवी संस्था असून 1993 मध्ये तिची स्थापना झाली.

√ भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कृती करणे व भ्रष्टाचारातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

√ या संस्थेद्वारे 'ग्लोबल करप्शन बॅरोमीटर' आणि 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' यांसारखे अनेक अहवाल प्रसिद्ध केले जातात.

अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

प्राचीनकाल की महत्वपूर्ण पुस्तकें


1-अस्टाध्यायी               पांणिनी
2-रामायण                    वाल्मीकि
3-महाभारत                  वेदव्यास
4-अर्थशास्त्र                  चाणक्य
5-महाभाष्य                  पतंजलि
6-सत्सहसारिका सूत्र      नागार्जुन
7-बुद्धचरित                  अश्वघोष
8-सौंदरानन्द                 अश्वघोष
9-महाविभाषाशास्त्र        वसुमित्र
10- स्वप्नवासवदत्ता        भास
11-कामसूत्र                  वात्स्यायन
12-कुमारसंभवम्           कालिदास
13-अभिज्ञानशकुंतलम्    कालिदास 
14-विक्रमोउर्वशियां        कालिदास
15-मेघदूत                    कालिदास
16-रघुवंशम्                  कालिदास
17-मालविकाग्निमित्रम्   कालिदास
18-नाट्यशास्त्र              भरतमुनि
19-देवीचंद्रगुप्तम           विशाखदत्त
20-मृच्छकटिकम्           शूद्रक
21-सूर्य सिद्धान्त           आर्यभट्ट
22-वृहतसिंता               बरामिहिर
23-पंचतंत्र                   विष्णु शर्मा
24-कथासरित्सागर        सोमदेव
25-अभिधम्मकोश         वसुबन्धु
26-मुद्राराक्षस               विशाखदत्त
27-रावणवध               भटिट
28-किरातार्जुनीयम्       भारवि
29-दशकुमारचरितम्     दंडी
30-हर्षचरित                वाणभट्ट
31-कादंबरी                वाणभट्ट
32-वासवदत्ता             सुबंधु
33-नागानंद                हर्षवधन
34-रत्नावली               हर्षवर्धन
35-प्रियदर्शिका            हर्षवर्धन
36-मालतीमाधव         भवभूति
37-पृथ्वीराज विजय     जयानक
38-कर्पूरमंजरी            राजशेखर
39-काव्यमीमांसा         राजशेखर
40-नवसहसांक चरित   पदम् गुप्त
41-शब्दानुशासन         राजभोज
42-वृहतकथामंजरी      क्षेमेन्द्र
43-नैषधचरितम           श्रीहर्ष
44-विक्रमांकदेवचरित   बिल्हण
45-कुमारपालचरित      हेमचन्द्र
46-गीतगोविन्द            जयदेव
47-पृथ्वीराजरासो         चंदरवरदाई
48-राजतरंगिणी           कल्हण
49-रासमाला               सोमेश्वर
50-शिशुपाल वध          माघ
51-गौडवाहो                वाकपति
52-रामचरित                सन्धयाकरनंदी
53-द्वयाश्रय काव्य         हेमचन्द्र

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास वर्षाअखेरीस आयपीएल शक्य :

देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे.

यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसतोय.

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळतायत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

एवढ्यात सुटका नाही - देशात जून-जुलैमध्ये उच्चांकावर पोहोचणार करोना रुग्णांची संख्या :

सध्या संपूर्ण देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनदरम्यान करोनाच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसला असला तरी दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांवर गेली आहे. यादरम्यान एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सध्या दोन गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहण्याची गरज आहे.

जशी जशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसं आपण चाचण्याही वाढवत आहोत. जर आपल्याला या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर चाचण्या कितीही वाढल्या तर करोनाग्रस्तांच्या केसेस कमी होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल,” असं गुलेरिया म्हणाले.

जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ रोखली जाईल किंवा ती संख्या कमी होईल. सरकारला कोविड सेंटर्स, चाचण्यांमध्ये वाढ आणि हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या ठिकाणी कठोरपणे नियमांचं पालन करणं सरकारला सुरू ठेवावं लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

लोकसत्ता वृत्तपत्र समूहाकडून वृत्तपत्र PDF/कात्रणे शेअर करण्यास मज्जाव...

"Circulating any copies of this publication or part thereof, is ILLEGAL and strict legal action will be taken against individuals."

"या प्रकाशनाच्या कोणत्याही प्रती किंवा त्यातील काही भाग प्रसारित करणे बेकायदेशीर आहे आणि व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

विद्यार्थी मित्रहो,
आपल्यासाठी एक थोडी अडचणीची बातमी आज देत आहोत, दररोज प्रमाणे आज लोकसत्ता पेपर डाउनलोड करत असताना वरील msg आजपासून दिसण्यास सुरवात झालेली आहे, त्यामुळे लोकसत्ता आणि indian Express वृत्तपत्र समूहाच्या कॉपीराईटच्या नियमांचे आदरपूर्वक पालन करून उद्यापासून आपणास लोकसत्ता पेपरचे कोणतेही कात्रण टेलिग्राम चॅनेल वर आम्हास शेअर करता येणार नाही, याची सर्व विद्यार्थीमित्रांनी नोंद घ्यावी...

मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप नाही, मग होणार गुन्हा दाखल


⛑करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि करोना संबंधित माहितीसाठी केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅप विकसित केलं आहे.

⛑या अॅपचा वापर करण्याचं आवाहनं केंद्र सरकारच्या वतीनं वारंवार केलं जात असून, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केलं आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे आरोग्य सेतू अॅप नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत.

⛑करोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य सेतू अॅप तयार केलं. हे अॅप देशभरात वापरलं जात आहे. तर अनेक जणांकडे हे अॅप नाही. दरम्यान, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये ठेवण्याची सक्ती केली आहे. “ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध पोलीस कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे ठरवतील,” असं नोएडाचं कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितलं.

⛑“पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केलं, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन अॅप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केलं नाही, पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील,” असं कुमार म्हणाले.

अग्रणी बँक योजना

‼️14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.

♾शिफारस -

‼️डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.

♾सुरुवात -

‼️1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.

♾योजना -

‼️देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

♾कार्ये -

‼️जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -

‼️जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलतसमित्या(Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली.

‼️ हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.

♾महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)

‼️स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

♾सध्यस्थिती -

‼️सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

♾उषा थोरात समिती -

‼️भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

राज्यघटना प्रश्नसंच

1) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

1) 45 वी घटना दुरुस्ती     
2) 46 वी घटना दुरुस्ती
3) 42 वी घटना दुरुस्ती     
4) 44 वी घटना दुरुस्ती

उत्तर :- 3

2) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?

1) मूलभूत कर्तव्ये   
2) मूलभूत हक्क   
3) मार्गदर्शक तत्त्वे   
4) राष्ट्रपती

उत्तर :- 1

3) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.

1) वल्लभभाई पटेल समिती 
2) कृपलानी समिती 
3) सरकारिया आयोग 
4) स्वर्ण सिंग समिती

उत्तर :- 4

4) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

1) फ्रान्स     
2) यु.एस.ए.   
3) यु.एस.एस.आर   
4) यु.के.

उत्तर :- 3

5) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.
ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.

         वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?

1) अ, क     
2) ब, ड     
3) ब, क, ड   
4) ड

उत्तर :- 4

चालू घडामोडी

📍 कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?

(A) जेसिका मीएर
(B) अ‍ॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक ___ ह्यांनी लिहिले.

(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मुजूमदार ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 02 जुलै रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ........ यांच्याविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली.

(A) बँकेची फसवणूक करणारे✅✅
(B) आयकर चुकविणारे गुन्हेगार
(C) मानव तस्करी करणारे
(D) वरील सर्व

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 38 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वाटाघाटीसह जगातला सर्वात महागडा घटस्फोट घेणार्‍या महिलेचे नाव काय आहे?

(A) मारिया मॅकेन्झी
(B) शेरल वुड्स
(C) श्रेया सिम्पसन
(D) मॅकेन्झी बेझोस✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?

(A) साऊर्थन बर्ड विंग्ज
(B) कॉमन पिकोक
(C) तामिळ योमन✅✅
(D) मलबार बॅंडेड पिकोक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (MFIN) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) विनीत छत्री
(B) हर्ष श्रीवास्तव
(C) मनोज कुमार नांबियार✅✅
(D) ग्यान mohon

१) भारताचे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे ?
अ) A - 05
✓ब) B - 05
क) C - 05
ड) D - 05

२) मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) मनीष सिसोदिया
✓ब) रतन टाटा
क) नीता अंबानी
ड) यापैकी नाही

३) खालीलपैकी कोणती व्यक्ती ' कुस्ती ' या क्रिडा प्रकाराशी संबंधित नाही ?
अ) युवराज पाटील
ब) खाशाबा जाधव
क) गणपतराव आंदळकर
✓ड) भाऊसाहेब पडसलगीकर

४) हरित अर्थसंकल्प अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
अ) महाराष्ट्र
ब) पंजाब
✓क) बिहार
ड) तेलंगणा

५) खालीलपैकी नुकतीच कोणी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?
✓अ) मोहिउद्दिन यासीन
ब) महातीर मोहंमद
क) नजीब रजाक
ड) महम्मद यासीन


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...