Friday, 1 May 2020

सर्वाना पुढील वर्गात प्रवेश!

- सर्व अभ्यासक्रमांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात यावेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेची अतिरिक्त संधी देण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने केली आहे.

- यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचेही आयोगाने सुचवले आहे.
करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे कामकाज मार्चपासून बंद करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा यांबाबत अभ्यास करून उपाय सुचवण्यासाठी समित्या नेमल्या होत्या.

- या समित्यांनी त्यांचे अहवाल आयोगाला सादर केले आहेत. त्यानुसार परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी, अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील सत्रासाठी प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस या समितीने केली. मात्र, विद्यापीठ ज्यावेळी पुढील परीक्षा घेईल, त्यावेळी विद्यार्थ्यांना आधीच्या सत्राच्या राहिलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी अतिरिक्त परीक्षेची संधी देण्याचेही या समितीने सुचवले आहे.

- प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
यंदा विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात. परीक्षेपूर्वी किमान आठ दिवस विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात यावी. विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल १४ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात यावेत. परीक्षांसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात, मात्र या सर्व परीक्षा, निकाल यांसह प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.

-  गरज असल्यास तात्पुरता प्रवेश देण्याचा मार्ग अवलंबावा. त्यानंतर परीक्षांचे निकाल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात यावेत, असे समितीने सुचवले आहे.

- आता पावसाळी सुट्टी
यंदाचे शैक्षणिक वर्ष पुढे गेल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षही (२०२१-२२) उशिरा सुरू होणार आहे. साधारण एप्रिल-मे महिन्यात अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपून सुट्टी लागते.

- आता मात्र उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात शैक्षणिक वर्षांअखेरीची सुट्टी मिळणार आहे. सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षांची सुट्टी १ ते ३० जून या कालावधीत, तर येत्या शैक्षणिक वर्षांची (२०२०-२१) सुट्टी १ ते ३० जुलै २०२१ या कालावधीत देण्याची शिफारस आयोगाच्या समितीने केली आहे.

▪️वेळापत्रक कसे असेल?
- १६ ते ३१ मे - प्रकल्पाची पूर्तता
- १ ते ३० जून - वार्षिक सुट्टी (उन्हाळी सुट्टी)
- १ ते ३१ जुलै - विद्यापीठांच्या परीक्षा
- १ ऑगस्ट - जुन्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- १४ ऑगस्टपर्यंत - विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणे
- ३१ ऑगस्ट - पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत
- १ सप्टेंबर - नव्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- ३० सप्टेंबर - तात्पुरते प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत
- १ ते २५ जानेवारी २०२१ - पहिली सत्र परीक्षा
- २७ जानेवारी २०२१ - दुसऱ्या सत्राची सुरुवात
- २६ मे ते २५ जून २०२१ - दुसरी सत्र परीक्षा
- १ ते ३० जुलै २०२१ - वार्षिक सुट्टी
- २ ऑगस्ट २०२१ - नव्या शैक्षणिक वर्षांची (२०२१-२२) सुरुवात
परीक्षा कशी?

- कमीतकमी वेळेत आणि गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचवण्यात आले आहे. लघुत्तरी, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देणे, परीक्षेत पुस्तक बाळगण्याची मुभा (ओपन बुक टेस्ट), लेखी परीक्षेऐवजी सादरीकरण करण्यास सांगणे, पन्नास टक्के अंतर्गत मूल्यमापन ग्राह्य़ धरून पन्नास टक्क्य़ांसाठी प्रकल्प करण्यास सांगणे, असे पर्याय समितीने सुचवले आहेत. लेखी परीक्षा ही साधारण अडीच ते तीन तास असते, त्याऐवजी कमी वेळात परीक्षा घेण्याचे पर्याय विद्यापीठांनी शोधून काढावेत, असे आवाहनही समितीने केले आहे.

-  एमफील, पीएचडीसह इतर अभ्यासक्रमांच्याही तोंडी परीक्षा किंवा मुलाखती ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
---------------------------------------------------

आयआयटीची यंदा शैक्षणिक शुल्क वाढ नाही.

- भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांचे शैक्षणिक शुल्क २०२०-२१ या वर्षांत वाढवण्यात येणार नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

- करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून  ते म्हणाले की, आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही.

- या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असे संचालकांना सांगण्यात आले आहे.

- ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
--------------------------------------------------

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...