३० एप्रिल २०२०

आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम.

🔰केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

🔰वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख प्रसाद यांनी यावेळी केला. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. “घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील आहोत,” असंही प्रसाद यावेळी म्हणाले. तसेच नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

🔰सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ३० एप्रिलला हा कालावधी संपणार होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे.

दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ.

🔰कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.

🔰राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दत्ता यांना पदाची शपथ दिली.राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.दत्ता यांनी 16 नोव्हेंबर 1989 रोजी वकिलीला सुरुवात केली.

🔰त्यांनी कोलकाता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण 16 वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली.तसेच घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. 22 जून 2006 रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बँकेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरविणारे ‘ते’ कलम रद्द.

🔰राज्याच्या सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांना सहकारी वा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवणारे सहकार कायद्यातील एक पोटकलम महाविकास आघाडी सरकारने रद्द केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

🔰देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी 2016 मध्ये असा निर्णय घेतला होता की, रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीवरून ज्या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले असेल त्यांच्या संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढता येणार नाही आणि हा निर्णय आधीच्या दहा वर्षांपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू  राहील.

🔰तसेच याचा अर्थ जानेवारी 2006 पासून रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीवरून वा मागणीवरून बरखास्त झालेल्या बँकांच्या संचालकांनादेखील पुढील दहा वर्षे बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. त्यासाठी सहकार कायद्याच्या कलम 73 क मध्ये पोटकलम 3-अ जोडण्यात आले.

उद्योजकांच्या मदतीसाठी सहायता कक्ष स्थापन.

🔰लॉकडाउनच्या काळात उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहायता कक्ष (मैत्री) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एका सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

🔰तर उद्योग सुरू करण्यासाठी  http:/permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करून परवानगी प्राप्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔰याशिवाय आवश्यकता भासल्यास maitri-mh@gov.in या ई-मेलही संपर्क साधता येणार आहे.

🔰तसेच संपर्कासाठी 022-22622322, किंवा 22622362 या दूरध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येणार आहे.

🔰उद्योजकांनी या सहायता कक्षाची मदत जरूर घ्यावी आणि आपला उद्योग पुन्हा सुरू करावा, असे आवाहन महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द.

🔰रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.

🔰करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔰तर खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🔰आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किटसचा वापर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. चिनी कंपन्यांकडून किट्स विकत घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील फॅक्ट शीटस सुद्धा मंत्रालयाने जारी केली आहे.

🔰तसेच काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सचे मूल्यमापन करण्यात आले. या किट्सच्या सहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला.

आधार अपडेट करणे होणार सोपे.

🔰यूआयडीएआयने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आधार अपडेशन करण्यासाठी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांतर्गत एका कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) परवानगी दिली आहे.

🔰तर सीएससीकडून 20 हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टष्ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

🔰तसेच आधार सेवा त्यांच्या निवासस्थानाजवळ आणण्यास यामुळे मदत होईल. सीएससीचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी यांनी सर्व बिझनेस करस्पाँडंट यांना सांगितले आहे की, त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण त्वरित पूर्ण करावे.न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2018 मध्ये सीएससीच्या माध्यमातून होणारे आधारचे काम बंद करण्यात आले होते.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती.

🔰गेल्या काही दिवसांत पुण्यातील प्रामुख्याने शहरात  कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

🔰पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून, त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰तर पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.राज्याच्या मुख्य सचिव कार्यालया मार्फत सोमवार रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.

🔰तर अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तर सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त व कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तीन वर्षांची बंदी.

🔰पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते.

🔰तर मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

🔰पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली आहे. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही.

प्रमुख दिन व घोष वाक्य 2018 -19

● 28 फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
विषय (थीम) - भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

● 22 मार्च:- जागतिक जल दिन
विषय (थीम) - नेचर ऑफ वाॅटर

● 24 मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
विषय (थीम) - Wanted: Leaders for a TB-Free world

● 5 एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
विषय (थीम) - हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र

● 7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
विषय (थीम) - सर्वासाठी आरोग्य

● 22 एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
विषय (थीम) - प्लास्टिक प्रदूषणचा अंत

● 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
विषय (थीम) - कुटुंब व समावेशक समाज

● 31 मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
विषय (थीम) - तंबाखू आणि हृदयविकार

● 5 जून:- जागतिक पर्यावरण दिन
विषय (थीम) - Best Plastic Pollution

● 8 जून :- जागतिक महासागर दिन
विषय (थीम) - Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean

● 11 जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
विषय (थीम) - कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

● 12 ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
विषय (थीम) - Safe Spaces For Youth

● 8 सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
विषय (थीम) - Literacy and skills Development

● 1 डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
विषय (थीम) - Know your status

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

» जागतिक वसुंधरा दिवस
International Mother Earth Day

» 22 एप्रिल
» 1970 पासून

» 2019 Theme : Protect Our Species

» 2020 Theme : Climate Action

» SDG तील 13 वा गोल Climate Action असे आहे.

» या दिवसाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

» 22 एप्रिल 2016 रोजी पॅरिस ऍग्रिमेंट वर सह्या केल्या आहेत.

जॉईन करा ​​❇️ प्रमुख दिन व घोष वाक्य 2018 -19
------------------------------------------------------

● 28 फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
विषय (थीम) - भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

● 22 मार्च:- जागतिक जल दिन
विषय (थीम) - नेचर ऑफ वाॅटर

● 24 मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
विषय (थीम) - Wanted: Leaders for a TB-Free world

● 5 एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
विषय (थीम) - हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र

● 7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
विषय (थीम) - सर्वासाठी आरोग्य

● 22 एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
विषय (थीम) - प्लास्टिक प्रदूषणचा अंत

● 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
विषय (थीम) - कुटुंब व समावेशक समाज

● 31 मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
विषय (थीम) - तंबाखू आणि हृदयविकार

● 5 जून:- जागतिक पर्यावरण दिन
विषय (थीम) - Best Plastic Pollution

● 8 जून :- जागतिक महासागर दिन
विषय (थीम) - Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean

● 11 जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
विषय (थीम) - कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

● 12 ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
विषय (थीम) - Safe Spaces For Youth

● 8 सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
विषय (थीम) - Literacy and skills Development

● 1 डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
विषय (थीम) - Know your status

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोदी सरकारचा मोठा निर्णय: इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी, कामगारांना जाता येणार घरी


◾️केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित
📌 कामगार,
📌पर्यटक आणि
📌 विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे.

◾️ केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

◾️ त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे.

🔰 आदेशात काय म्हटलं आहे ?

लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना काही नियमांतर्गंत आपल्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात येत आहे.

🔴 सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असून अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणं गरजेचं आहे.

🟠 जर एखाद्या ग्रुपला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असे तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर संमती दर्शवणं गरजेचं आहे.

🟡 प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं स्क्रिनिंग केलं जावं. ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी.

🔵  प्रवासासाठी बसचा वापर केला जावा. या बसेसचं निर्जुंतीकरण करणं तसंच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.

🟣 आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी. .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निर्देशांकाचे प्रकार

1] मूल्‍य निर्देशांक
2] विशिष्‍ट हेतू निर्देशांक
3] संख्यात्‍मक निर्देशांक
4] किंमत निर्देशांक

🔹 स्पष्टीकरण :-

       🍀 निर्देशांक 🍀

1) किंमत निर्देशांक :
हे वस्‍तूच्या किमतीतील सामान्य 
बदलाचे मापन करते. ते दोन भिन्न कालावधी दरम्‍यान किमतीच्या पातळीची तुलना करते.

2) संख्यात्‍मक निर्देशांक :
याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही 
म्‍हणतात. अर्थव्यवस्‍थेच्या उत्‍पादनातील किंवा उत्‍पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते.
उदा., कृषी उत्‍पादन व औद्योगिक उत्‍पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल.

3) मूल्‍य निर्देशांक :
वस्‍तूचे मूल्‍य म्‍हणजे किंमत व परिमाण 
यांचा गुणाकार होय.(p×q) मूल्‍य निर्देशांक हा चलाच्या मूल्‍यातील बदलाचेरुपयाच्या स्‍वरूपात मोजमाप करतो.
हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हींतील बदलाचे एकत्रीकरण करतो. त्‍यामुळेतो अधिक माहितीपूर्ण आहे.

4) विशिष्‍ट हेतू निर्देशांक :
काही विशिष्‍ट हेतूने हे निर्देशांक
तयार केलेजातात. उदा. आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्‍पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्‍यादी.

        ✍️[ संदर्भ :- शालेय पुस्तके ]
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

"नॅशनल आयुष मिशन"


🛄सुरुवात -15 सप्टेंबर 2014🛄

 
🔴ठळक वैशिष्टे:-
 
🛄सार्वजनिक आरोग्य सेवामधील त्रुटी दूर करण्यासाठी या मिशन ची सुरुवात करण्यात आली आहे.
 
🛄विशेषत: दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे मिशन राबविण्यात येणार.
 
🛄नॅशनल आयुष मिशन मध्ये:-

📛आयुर्वेद,

📛योग,

📛नॅचरोपॅथी,

📛युनानी, सिद्धा,

📛होमिओपॅथी

अशा उपचार पद्धतींचा समावेश आहे.
 
🔴उद्देश:-
 
🛄विकसित शिक्षण संस्थांमध्ये वाढ करून आयुषच्या शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणणे.
 
🛄औषध निर्मितीसाठी उच्च प्रतीचा कच्चा माल उपलब्ध करून देणे.
 
🛄आयुषच्या तत्पर सेवा उपलब्धीसाठी दवाखाने, औषधे, मनुष्यबळ वाढविणे.

महत्त्वाचे प्रश्नसंच


◾️भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते ?

A) मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ✅

B) मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अण्ड फॅमीली वेलफेअर

C) मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलप मेंट

D) एज्यूकेशन मिनिस्ट्री

◾️श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ____ होय.

A) 1977-78

B) 1987-88

C)  1989-90

D) 1990-91✅

◾️5 जून हा दिवस _ दिन म्हणून साजरा केला जातो.

A)  पर्यावरण दिन✅

B)  शिक्षक दिन

C)  साक्षरता दिन

D) महिला दिन

◾️7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A)  मुंबई

B) हेद्राबाद

C)  दिल्ली✅

D)  चंडीगढ़

◾️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेले नाही ?

A)  अजंठा लेणी

B)  एलीफंटा लेणी

C)  छत्रपती शिवाजी टर्मीनस

D) महाबळेश्वर✅

◾️डाँग फेंग 21डी' हे नाव कशाशी संबंधीत आहे ?

A) उपग्रह

B) क्षेपणास्त्र ✅

C) शस्त्रास्त्र

D) अण्वस्त्र

◾️MKCL च्या ___ शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A) DTH

B)  ETH ✅

C) STD

D)  यापैकी नाही

◾️इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A) 60

B) 65✅

C) 58

D)  55

◾️भारतीय संविधानच्या 113 व्या घटनादुरूस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A)  बिहार

B)  ओरिसा ✅

C)  मध्य प्रदेश

D) अरुणाचल प्रदेश

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...