Tuesday, 28 April 2020

स्पॅनिश फ्लूनंतर अर्थव्यवस्था कशी सावरली याचा अभ्यास करावा.

🔰नवी दिल्ली : भारताने १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ कशी हाताळली होती व त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय उपाय करण्यात आले होते याचे संशोधन विद्यापीठांनी करावे, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या शिफारशीत म्हटले आहे की, विद्यापीठांनी कोविड १९ बाबत ग्रामीण भागात किती जागरूकता आहे याचीही तपासणी संशोधनाच्या माध्यमातून करावी.

🔰मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, १९१८ मध्ये जी साथ आली होती ती स्पॅनिश फ्लूची होती त्यावेळी नेमके कोणते उपाय करण्यात आले होते व त्यावेळी अर्थव्यवस्था कशी सावरण्यात आली याचे संशोधन करण्यात यावे अशी अपेक्षा मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

🔰मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, करोना विषाणूशी लढण्यात शैक्षणिक संस्थांनी संशोधनाच्या माध्यमातून मदत करावी.
त्यात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात करोनाबाबत किती जागरूकता आहे, यावरही संशोधन करून शोधनिबंध सादर करावेत. विद्यापीठे व इतर संस्थांनी आजूबाजूची ५-६ खेडी निवडून हा अभ्यास करावा. कोविड १९ मुळे निर्माण झालेली आव्हाने लोकांनी कशाप्रकारे पेलली यावरही संशोधनातून प्रकाश पडला तर त्याचा फायदा नियोजनात होईल.

केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे.

🔰करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

🔰घर आणि कार्यालयांमध्ये AC च्या वापराबात केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी, असा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला आहे.

🔰इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडीशनर इंजिनिअर्सने (ISHRAE) सुचवलेली ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय सामाजिक बांधकाम विभागाने (CPWD) जारी केली आहेत.

🔰तर देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असेही यात सुचवण्यात आले आहे.

🔰याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, एसी सुरू नसेल तरीही घरात व्हेंटिलेशन आवश्यक आहे, असे एसी वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

🔰कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरसाठी एसीचा वापर करताना जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असावे असे देखील सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाचे संजय कोठारी नवे आयुक्त.

🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून जारी एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.देशाची भ्रष्टाचारविरोधी सर्वोच्च संस्था केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) प्रमुख के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी जूनपासून हे पद रिक्त होते.

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एका उच्चस्तरीय निवड समितीने फेब्रुवारीत कोठारी यांच्या नावाची शिफारस केली होती.त्यावेळी काँग्रेसने याचा विरोध करीत दक्षता आयुक्त नियुक्तीसाठीची प्रक्रिया बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले होते.

🔰1978च्या बॅचचे कोठारी हे हरयाणा केडरचे आयएएस अधिकारी होते. 2016 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पीईएसबीचे प्रमुख म्हणून नेमले होते.
तर जुलै 2017 मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव नियुक्त केले होते. दक्षता आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या शिफारशीवर करतात.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी ‘एडोफोक्स’ अ‍ॅपची निर्मिती.


🔰कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर  करावी लागली तसेच सर्व प्रकारच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

🔰तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन पर्याय शोधण्यात येत आहे. मात्र, तरी त्यातून आजमितीला समाधानकारक मार्ग निघाला आहे असे ठोसपणे म्हणता येणार नाही.

🔰त्याच धर्तीवर लातूर व पुणे येथील मित्रांनी एकत्र येत अतिशय सोप्या पध्दतीच्या एका ‘एडोफॉक्स’ या अ‍ॅपची निर्मिती केली असून त्याद्वारे विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना ऑनलाईन शिक्षणाचा एक सक्षम व सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

🔰तर शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून शिक्षण सुरु ठेवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. त्यात झूम, मिंट, गुगल अ‍ॅपसारख्या विविध ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करुन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येत आहे.

General Knowledge

▪️ कोणता देश ‘2020 FIFA अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक’ आयोजित करणार आहे?
उत्तर : भारत

▪️ आंतरराष्ट्रीय भूस्पोटक (माइन) जनजागृती आणि भूस्पोटक कृतीमध्ये मदत दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : टुगेदर फॉर माइन अॅक्शन

▪️ कोणत्या गटाने ‘करुणा’ या नावाने एक उपक्रम आरंभ केला?
उत्तर : केंद्रीय नागरी सेवा अधिकारी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘हॅक द क्रायसेस इन इंडिया’ नावाची ऑनलाइन हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

▪️ ‘वर्ल्ड गेम्स 2022’ या स्पर्धा कुठे खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : अल्बामा, अमेरिका

▪️ ‘ऑपरेशन संजीवनी’ अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे?
उत्तर : मालदीव

▪️ BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरूद्ध केला जातो?
उत्तर : क्षयरोग

▪️ ‘कोरोना केअर’ विमा सादर करण्यासाठी ‘फोन पे’ कंपनीने कोणत्या विमा कंपनीबरोबर भागीदारी केली?
उत्तर : बजाज अलियान्झ

▪️ कोणत्या शहरात ‘आशियाई युवा खेळ 2021’ या स्पर्धांचे आयोजन होणार?
उत्तर : शान्ताउ, चीन

▪️ जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीशपदी कोण आहे?
उत्तर : न्यायमूर्ती रजनेश ओसवाल

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘YUKTI’ संकेतस्थळ सुरू केले?
उत्तर : मनुष्यबळ व विकास मंत्रालय

▪️ ‘फोर्ब्स’ मासिकाने कोणत्या व्यक्तीला ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’चा किताब दिला?
उत्तर : जेफ बेझोस

▪️ कोणते सार्वजनिक ठिकाणी ‘फेस मास्क’ अनिवार्य करणारे पहिले शहर ठरले आहे?
उत्तर : मुंबई

▪️ वर्ष 2020 याच्या ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : सेफ मदरहूड इन टाइम्स ऑफ कोविड-१९

▪️ कोणत्या देशात ‘अनाक क्राकाताऊ’ ज्वालामुखी आहे?
उत्तर : इंडोनेशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय रोमानी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 8 एप्रिल

▪️ महिला गटात ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : एलिस पेरी

▪️ NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते?
उत्तर : अपोलो 13

▪️ कोणत्या राज्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे?
उत्तर : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र

▪️ कोणत्या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 10 एप्रिल

महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या व्यक्तीची राष्ट्रपतींसाठीचे नवे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : कपिल देव त्रिपाठी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘कोविड इंडिया सेवा’ या नावाने एका संकेतस्थळाचे उद्घाटन केले?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪️ "GetCETGo" नावाने एक ऑनलाईन व्यासपीठ कोणत्या राज्याने सुरु केले आहे?
उत्तर : कर्नाटक

▪️ कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : संजय कोठारी

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भागीदारीने टेक महिंद्रा ही कंपनी नवसंशोधन केंद्रांची स्थापना करणार आहे?
उत्तर : IBM

▪️ कोणत्या बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विशेष भांडवली मदत योजना जाहीर केली?
उत्तर : भारतीय लघू उद्योग विकास बँक

▪️ कोणत्या अंतराळ संस्थेनी 60 इंटरनेट बीमिंग उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले?
उत्तर : स्पेसएक्स

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘माय बुक माय फ्रेंड’ मोहीमेचे उद्घाटन केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो?
उत्तर : मणीपूर

भीमा नदी


भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

🔹लांबी ७२५ किमी (४५० मैल)

🔹उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)

🔹पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१

🔹उपनद्या - कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ

🔹धरणे - उजनी धरण

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.

लिंग गुणोत्तर (Sex ratio)


              हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००

काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे :-
केरळ - १०८४,

तामिळनाडू - ९९६ ,

महाराष्ट्र - ९२९ ,

  पंजाब - ८९५ ,

   दिल्ली - ८६८ .

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.

◾️नियुक्ती◾️

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.

◾️शपथ किंवा पुष्टीकरणसंपादन◾️

"मी, (नियुक्त केलेल्या व्यक्तीचे नाव), भारताचे नियामक आणि महालेखा परीक्षक नियुक्त केल्यावर मी देवाच्या नावाने शपथ घेतो / कायद्याने स्थापित केल्यानुसार मी भारतीय संविधानाविषयी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू शकतो," मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, की मी योग्य रीतीने आणि विश्वासूपणाने आणि माझ्या योग्यतेनुसार, ज्ञान व निर्णयाने माझ्या पदाचे कार्य निर्भयपणे किंवा निष्ठेने, आपुलकीने किंवा वाईट इच्छाशक्तीशिवाय करेन आणि राज्यघटनेचे समर्थन करीन. आणि कायदे.

भारताची अर्थव्यवस्था


भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्याविनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७).क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे.जागतिक बॅंकभारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते.

◾️विनिमय दर◾️

१९४६ पर्यंत भारतामध्ये स्थिर विनिमय दराची पद्धत अस्तित्वात होती. ह्या काळात रुपयाचे मूल्य ब्रिटिश पाउंड स्टर्लिंगच्या मूल्याशी जोडलेले होते, स्वातंत्र्यानंतरही भारताच्या परकीय व्यापारापैकी ३०% व्यापार पाउंड स्टर्लिंगमध्ये होत असे. १९७५ नंतर स्थिर विनिमयाची पद्धत बंद होऊन भारताने बदलत्या विनिमय दरांचे अवलंबन केले. परंतु, तेव्हासुद्धा भारतीय रुपयाचे मूल्य विशिष्ट चलनांच्या समूहाच्या मूल्यावरून ठरवले जात असे, आणि रुपयाच्या मूल्याचे रिझर्व बॅंकेकडून कडक नियमन केले जात असे. १९९१ च्या आर्थिक सुधारांनंतर रुपयाचे मूल्य पूर्ण कन्व्हर्टिबल झाले, अर्थात रुपयाचे चलन दुसऱ्या चलनांमध्ये बदलायची सर्व बंधने हटविण्यात आली. इ.स. २००५ पासुन रुपयाचे मूल्य डॉलर, युरो आणि पाउंडच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे.

'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक