Wednesday, 22 April 2020

Science :- घटक - ध्वनी

◆मानवी कानांची ऐकण्याची क्षमता - 20 ते 20000 Hz

◆5 वर्षाखालील बालके  - 25000 Hz पर्यंत  ऐकू शकतात

◆कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकु शकतो

🔊🎵Infrasonic Sound 🎵🔊

◆ 20 Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी

◆भूकंप तसेच व्हेल , हत्ती , गेंडा इत्यादी प्राणी Infrasonic Sound निर्माण करू शकतात.

🔊🎵Ultrasonic Sound🎵🔊

◆20000 Hz पेक्षा जास्त तीव्र ध्वनी

◆कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकू शकतो.

◆माकड , वटवाघूळ , डॉल्फिन , मांजर , चित्ता , Porpoises इत्यादी प्राणी Ultrasonic Sound ऐकू शकतात.

◆वटवाघूळ - 120 KHz पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.

◆वटवाघूळ , डॉल्फिन , Porpoises , उंदीर हे Ultrasound निर्माण करू शकतात.

〰〰〰〰〰〰〰〰〰

मराठी व्याकरण प्रश्न


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
  
1) उभयान्वयी     
2) केवलप्रयोगी   
3) क्रियाविशेषण     
4) शब्दयोगी

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
  
1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !   
2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
3) येणार असेल तर येईना बापडा !        4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
  
1) रीती भूतकाळ   
2) रीती वर्तमानकाळ
3) रीती भविष्यकाळ   
4) अपूर्ण भूतकाळ

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) ‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
  
1) गाय     
2) शेळी     
3) म्हैस     
4) कुत्री

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
    
‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
  
1) करण   
2) संप्रदान   
3) अपादान   
4) अधिकारण

उत्तर :- 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’
  
1) परवानगी घेतल्याशिवाय आत     
2) आत येण्यासाठी परवानगी लागते
3) परवानगी घ्या आणि आत या     
4) आत येताना परवानगी घ्या

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7) खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ?

     ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’
  
1) यशोदाने   
2) श्रीकृष्णाला   
3) लोणी     
4) दिले

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’

– प्रयोग प्रकार ओळखा.
  
1) समापन कर्मणी   
2) नवीन कर्मणी
3) पुराण कर्मणी     
4) यापैकी नाही

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.
  
1) कर्मधारय समास   
2) उपपद तत्पुरुष समास
3) विभक्ती तत्पुरुष समास 
4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10) पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?
  
1) कोबी   
2) इस्पितळ   
3) तबियत   
4) पॉकेट

उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...