Tuesday, 21 April 2020

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)

गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

महत्त्वाचे प्रश्नसंच


⏯ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) द्रोनाचार्य पुरस्कार*

⏯  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) शिव छत्रपति पुरस्कार*

⏯ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
*---) रनजित सिंह*

⏯ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाला ी?
*---) भारत*

⏯ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) इजिप्त*

⏯ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) चीन*

⏯ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) अमेरिका*

⏯ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
*---) ७*

⏯ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
*---) १० वर्षांनी*

⏯ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
*---) १८७१-७२*

⏯ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
*---) रेल्वे*

⏯ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
*---) म्याकमोहन सीमारेषा*

⏯ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
*---) अरुनाचल प्रदेश*

⏯ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
*---) तेलगु व बंगाली*

⏯ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
*---) ८८४८ मिटर*

⏯ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
*---) छोटा नागपुर*

⏯ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) प.बंगाल*

⏯. ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) महाराष्ट्र*

⏯ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
*---) गुजरात व महाराष्ट्र*

⏯ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) आंध्रप्रदेश*

⏯ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) गुजरात*

⏯ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) प.बंगाल*

⏯ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
*---) चेन्नई ( १९०४ )*

⏯ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
*---) आसाम*

⏯ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
*---) अभ्रक*

⏯ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
*---) भाक्रा- नानगल*

⏯ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
*---) सिंद्री ( झारखंड )*

⏯ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
*---) महाराष्ट्र*

⏯ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
*---) २४ प्यारलल लाईन*

⏯ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
*---) दिल्ली*

⏯ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
*---) एडवर्ड जेन्नर*

⏯ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
*---) ७२*

⏯् मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
*---) ३७° से*

⏯ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
*---) डॉ.पी.के.सेन*

⏯ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
*---) २०६*

⏯ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
*---) सुमारे ६३०*

⏯ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
*---) १४०० ग्रँम*

⏯ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
*---) कार्ल लँडस्टिनर*

⏯ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
*---) डॉ.ख्रिश्चन बर्नाड*

⏯मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
*---) २४*

⏯ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
*---) ३३*

⏯ सर्वात हलका वायू कोनता?
*---) हेलियम*

⏯ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
*---) एस.विजयालक्ष्मी*

⏯ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) अर्जून पुरस्कार*

⏯ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
*---) गंगा*

⏯ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
*---) गौदावरी*

⏯ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
*---) नर्मदा*

⏯भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
*---) सिंधू*

⏯ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
*---) सियाचेन ( जम्मु काश्मिर )*

⏯ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
*---) मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )*

⏯ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
*---) मेजर ध्यानचंद*

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

महाराष्ट्राविषयी माहिती

►  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

  महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

  महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

  विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

  महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

  महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

  महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

  महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

  महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

  महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

  महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

  भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

  महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

  भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

  पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

  गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

  गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

  विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

  पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

  मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

  तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

  भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली,

मराठी व्याकरण - भाषेतील रस


रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

प्रयोग व त्याचे प्रकार

🌷वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

🌷मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग  : 
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 
       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग बदलून)
       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन बदलून)

🌷कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक कर्तरी प्रयोग 

1. सकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम आंबा खातो.
       सीता आंबा खाते. (लिंग बदलून)
       ते आंबा खातात. (वचन बदलून)

2. अकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम पडला 
       सीता पडली (लिंग बदलून)
       ते पडले (वचन बदलून)    

2. कर्मणी प्रयोग  :
 क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तेंव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग बदलून)
       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन बदलून )

🌷कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  
2. नवीन कर्मणी प्रयोग 
3. समापन कर्मणी प्रयोग 
4. शक्य कर्मणी प्रयोग 
5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : 
हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील आढळतात.                
उदा. नळे इंद्रास ऐसें बोलीजेल।
      जो - जो किजे परमार्थ लाहो।

2. नवीन कर्मणी प्रयोग :
  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतात.
उदा . रावण रामाकडून मारला गेला.
       चोर पोलीसांकडून पकडला गेला.

3. समापन कर्मणी प्रयोग : 
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो किंवा वाक्याचा शेवट संयुक्त क्रियापदाने होतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.
       रामाची गोष्ट सांगून झाली.

4. शक्य कर्मणी प्रयोग :
 जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्याने ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो,  तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . मला डोंगर चढवितो.
         रामला आंबट दही खाववते.

5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :
 कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याने काम केले. 
       तिने पत्र लिहिले.  

3. भावे प्रयोग : 
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . सुरेशने बैलाला पकडले.
       सीमाने मुलांना मारले.    

🌷भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तृक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :
 ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
      रामाने रावणास मारले.
@eMPSCKattaBhushanSir
2. अकर्मक भावे प्रयोग : 
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . मुलांनी खेळावे.
       विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :
 भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .आज सारखे गडगडते.
       तिला फार मळमळते.
       आज सारखे उकडते.

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा

1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B