२१ एप्रिल २०२०

मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट.

✍काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे.

✍माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात 11 सदस्य असतील.तर यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.

✍करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला असल्याचे समजते.

✍माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील. तर राहुल गांधी, रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, पी.चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

पोलीस भरती प्रश्नसंच

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण % आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र  येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार  पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका __ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक   महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_____ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

वूशु जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2019

📌स्थळ - शांघाय, चीन

📌विजेता - परवीन कुमार

📌उपविजेता - रस्सेल डियाझ (फिलिपाईन्स)

📌48 किलो वजनी गट

📌वूशु विजेतेपद जिंकणारा प्रथम भारतीय पुरुष खेळाडू

📌पूनम खत्री 75 किलो वजनीगटात - रौप्यपदक

📌सनथोई देवी 52 किलो वजनी गटात रौप्यपदक

📌विक्रांत बलीयन - 60 किलो वजनीगटात ब्रॉन्झपदक

📌भारतातर्फे पूजा कडीयन यांनी 75 किलो वजनी गटात 2017 साली विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला खेळाडू ठरल्या होत्या.

इबोला’चा रुग्ण सापडल्याने वीस महिन्यांची मोहीम अपयशी.

🔰‘इबोला’ या घातक विषाणूला पायबंद घालण्यात 20 महिन्यांच्या मोहिमेनंतर अपयश आले असून काँगोमध्ये या विषाणूचा एक रुग्ण सापडला आहे.

🔰तर 52 दिवसांतच ‘इबोला’चा रुग्ण सापडल्याने या विषाणूचे निर्मूलन करण्यात अपयश आल्याचे मानले जाते.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, याचा अर्थ आता काँगोचे सरकार ‘इबोला’चे उच्चाटन झाल्याचे अपेक्षेप्रमाणे सोमवारी जाहीर करू शकणार नाही.

🔰1970च्या दशकात ‘इबोला’चा पहिला रुग्ण सापडला होता. ‘इबोला’मुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो.बेल्जियन वैज्ञानिकांनी काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमखी पडल्याचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्यात ‘इबोला’चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरून या विषाणूला ‘इबोला’ हे नाव देण्यात आले होते.

🔰तसेच हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात.

🔰माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. विषाणूचे झैरे, सुदान, बुंडीबुग्यो, रेस्टन व ताइ फॉरेस्ट असे प्रकार आहेत. ताप, स्नायूदुखी, उलटय़ा, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात.

न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.

▪️न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.

▪️तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.

▪️तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी  येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारताने परकीय गुंतवणुकीच्या FDI नियमात बदल केला


भारताने परकीय गुंतवणुकीच्या नियमात बदल करताच चीनने त्यावर आक्षेप घेतला आहे. चीनला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. "काही विशिष्ट देशांमधून होणाऱ्या परकीय गुंतवणूकी संदर्भात भारताने आपले नियम बदलले आहेत. हे बदल म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वांचे उल्लंघन आहे.

✍ _ भारताने परकीय गुंतवणूकीसंदर्भात बदलले नियम म्हणजे मुक्त व्यापार आणि भेदभाव न करण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वांचे उल्लंघन आहे" असे चिनी दूतावासातील प्रवक्त्याने म्हटले आहे.
"जी २० राष्ट्रांमध्ये मुक्त, निष्पक्ष, भेदभावरहीत आणि गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण ठेवायचे यावर एकमत झाले होते. भारताचा हा निर्णय जी २० च्या बैठकीमध्ये जे ठरले होते, त्याविरोधात आहे. त्याशिवाय नव्या धोरणामुळे मार्गातील अडथळे आणखी वाढवणार आहेत" असे चीनने म्हटले आहे.
भारताने काय निर्णय घेतला
करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकानं आपल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल केला आहे. भारताच्या शेजारील देशांना आता भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारताला ज्या देशांच्या सीमा लागून आहेत अशा देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच गुंतवणूक करू शकेल असं ‘उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळा’कडून (डीपीआयआयटी) सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत.
भारताला ज्या देशांच्या सीमा लागल्या आहेत अशा देशांना आता सरकारच्या मंजुरीनंतरच भारतात गुंतवणूक करता येणार असल्याचं डीपीआयआयटीनं स्पष्ट केलं आहे. भारतात गुंतवणूक करणारी कोणतीही व्यक्ती या देशातील असतील किंवा या देशांचे नागरिक असतील तर त्यांना सरकारची परवानगी घेणं बंधनकारक असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर चीनसारख्या देशांच्या भारतातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीमध्ये आहे. अशावेळी मजबूत स्थितीमध्ये असलेल्या चिनी कंपन्या सहजतेने भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणुककरुन नियंत्रण मिळवू शकतात. हीच गोष्ट रोखण्यासाठी भारत सरकारने परकीय गुंतवणूकीच्या नियमात बदल केला आहे.

Super 30 questions

1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
✅.  - देवळाली नाशिक. 

2.  नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅.  - गोदावरी.

3.   गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - गोदावरी. 

4.   वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

5.   कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे?
✅. - द्राक्षे.

5.   नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे?
✅. - हिंदूचे. 

7.  संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

8.   देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - लष्कर छावणी. 

9.  संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे?
✅.  - प्रवरा.

10.  भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अहमदनगर. 

11. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅.  - 55 सें.मी. 

12. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्‍यात वसला आहे?
✅.  - गोदावरी. 

13.  निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे?
✅. - अहमदनगर. 

14.  केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
✅.  - जळगाव. 

15.     वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

16.  चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅. - जळगाव. 

17.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
✅.  - जळगाव. 

18.  जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅. - 74 सें.मी. 

19.   पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा?
✅.  - धुळे. 

20.  सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे?
✅.  - नंदुरबार. 

21.  कोणत्या नदीच्या खोर्‍यात नंदुरबार जिल्हा वसला आहे?
✅.  - तापी. 

22.  नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे?
✅.  - 50%.

23.  धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
✅.  - सूरत-नागपूर.

24. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

25.   जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो?
✅. - धुळे-कलकत्ता. 

26.  जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्‍यात वसला आहे?
✅. - तापी. 

27.  महाराष्ट्रात दुसर्‍यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती?
✅. - तापी. 

28.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
✅. - नाशिक. 

29.  मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते?
✅.  - नाशिक. 

30. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - विडी उद्योग. 

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...