Tuesday, 14 April 2020

कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड-

■देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे.

■कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

■दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांवर कुठल्याही लेखी परिक्षेशिवाय थेट भरती होणार आहे. 

■या भरतीप्रक्रियेमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या जागांचे विवरण पुढीलप्रमाणे-

■डॉक्टर्स 72 जागा, नर्सिंग स्टाफ 120 जागा, लॅब असिस्टंट 24, रेडिओग्राफर 24 पदे, हॉस्पिटल अटेंडेंट 120 जागा, हाऊस किपिंग असिस्टंट 240 जागा. 

■रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार डॉक्टर्सच्या पदांसाठी 15 एप्रिल, नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखती होतील.

■विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार 18 ते 50 ही वयोमर्यादा आहे. योग्य आणि पात्र उमेदवारांनी योग्य कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही’ वनस्पती करु शकते करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत; भारतीय संशोधकांचा दावा


- सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील औषधं आणि लस शोधण्यास वैज्ञानिक दिवसरात्र एक करत आहे. अशावेळी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

- समुद्रातील लाल शेवाळाचा यामध्ये उपयोग होऊ शकतो. तसंच यातूव काढलेल्या संयुगांचा वापर सॅनिटरी वस्तूंवरील आवरण बनवण्यासाठी केला जाईल. तसेच संसर्गविरोधी औषध बनवण्यासाठीही हे संयुग वापरलं जाऊ शकतं.

- रिलायन्स लाईफ सायन्सद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. नैसर्गिक स्त्रोत म्हणजेच वनस्पती आणि जीव, बॅक्टेरिया आणि काही मोठ्या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनात आजारांविरोधात लढण्याची अधिक ताकद असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
पॉली सॅकराइड्स, अल्गीनेट्स, फुकोडिन, कारागिनन, रमनन सल्फेटसारख्या नैसर्गिक संयुगांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल क्षमता असते. 'मरिन रेड अल्गा पोरफिरिडियम इज ए सोर्स ऑफ सल्फेटेड पॉलिसॅकाराइड्स फॉर कंबेटिंग अगेंस्ट कोविड-१९' या मथळ्याखाली हे संसोधन करण्यात आलं आहे. यामध्ये संशोधकांनी उपलब्ध आकड्यांच्या संदर्भात समुद्री शेवाळातून मिळणाऱ्या पॉलीसॅकाराइड्सच्या संभाव्य अँटी व्हायरस क्षमतेची चाचणी केली.
शेवाळाचे अनेक फायदे
पोरफाइरिडियमपासून मिळणाऱ्या सल्फेट पॉलिसेकेराइडवर करण्यात आलेल्या जगभरातील निरनिराळ्या संशोधनातून शेवाळ हे अनेक व्हायरल आजारांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरू शकतं असं नमूद करण्यात आल्याचं प्रिप्रिन्टमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनपर माहितीत म्हटलं आहे.

-  करोना व्हायरस श्वसन संसर्गाच्या नियंत्रणास विविध जैविक स्त्रोतांमधून प्राप्त केलेली कॅरीगीनची भूमिकाही स्तुत्य आहे.
---------------------------------------------------

जालियनवाला बाग हत्याकांड

👉दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

👉इतिहास👈

👉सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.

👉 त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली.

👉दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.

👉हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

👉जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला.

👉या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटना

🍀🍀(World Health Organisation)🍀🍀

📌संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करते.
- स्थापना : 7 एप्रिल 1948
- 7 एप्रिल 1948 रोजी जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पार पडली होती.
-मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
- लीग ऑफ नेशनच्या आरोग्य संघटनेची जागा घेतली.
-संयुक्त राष्ट्र विकास गटाची सदस्य संस्था

कार्ये

📌 WHO सार्स, मलेरिया, क्षयरोग, इन्फ्लूएन्झा, एड्स आणि कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी व उपचार करण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे समन्वय करते.

📌 लसीकरण विस्तारीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी लस, फार्मास्युटिकल डायग्नोस्टिक्स आणि ड्रग्सच्या विकासास आणि वितरणाला समर्थन देते.

📌 1980 मध्ये WHO ने देवीच्या रोगाचे (smallpox) निर्मुलन झाल्याचे घोषित केले. मानवाच्या प्रयत्नाने निर्मुलन झालेला हा इतिहासातील पहिला रोग आहे.

महासंचालक
- WHO चे प्रमुख महासंचालक असतात.
- नेमणूक - वर्ल्ड हेल्थ असेंब्ली करते
- सध्या महासंचालक (8 वे) - टेड्रोस अँधनॉम (जुलै 2017 पासून)

जागतिक आरोग्य दिन
- दरवर्षी 7 एप्रिल रोजी पाळला जातो.
.- WHO चा स्थापना दिवस.
- 1950 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला.
- जवाहरलाल नेहरू यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी WHO ला सल्ला दिला होता.

प्रकाशने
-बुलेटिन ऑफ द ‘हू'
-क्रॉनिकल
-इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ
-लेजिस्लेशन
- वर्ल्ड हेल्थ
.
प्रादेशिक कार्यालये (प्रदेश व HQ)
- आफ्रिका - बॅझाव्हिल, काँगो
- अमेरिका - वॉशिंग्टन, अमेरिका
- आग्नेय आशिया - नवी दिल्ली, भारत
- यूरोप - कोपनहेगन, डेन्मार्क
- भूमध्य समुद्र - पूर्वभाग- अलेक्झांड्रिया, ईजिप्त
- पश्चिम पॅसिफिक (सागरीय) - मॅनिला, फिलिपीन्स..

उष्ण वारे


◾️ फॉन  - आल्प्स पर्वत

◾️ चिनुक - रॉकी पर्वत

◾️ सिरोको - उ.आफ्रिका

◾️ खामसिंन - इजिप्त

◾️ हरमाटन-गिनीआखात

◾️ नॉर्वेस्टर व लु-भारत

◾️ सिमुम -अरेबियन वाळवंट

◾️ बर्ग- द.आफ्रिका

◾️ ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

◾️ झोण्डा- अर्जेंटिना

◾️ सॅनटाआना-केलिफोर्नि

◾️ काराबूरण -मध्य आशिया

COVID -19 Apps Campaigns

◾️ कोरोना कवच - भारत सरकार

◾️आरोग्य सेतु - भारत सरकार

◾️ महाकवच - महाराष्ट्र

◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली

◾️ 5T - दिल्ली

◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी

◾️ COVA PUNJAB - पंजाब

◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी

◾️ क्वारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू

◾️ क्वारंटाईन वाच अँप - कर्नाटक

◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

◾️ ब्रेक द चेन - केरल

◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस

◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री

◾️ कोरोना सहायता अँप - बिहार

◾️ टीम 11- उत्तर प्रदेश

◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड

◾️ सेल्फ deceleration अॅप - नागालैंड

◾️V-सेफ टनल - तेलंगाना

◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा

◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक

______________________________

भूगोल प्रश्नसंच


🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A. 200.60 लाख हेक्टर

B. 207.60 लाख हेक्टर

C. 307.70 लाख हेक्टर✅

D. 318.60 लाख हेक्टर

🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A. 513✅

B. 213

C. 102

D. 302

🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A. तेरणा

B. प्रवरा

C. मांजरा

D. भातसा✅

🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A. कांडला✅

B. कोची

C. मांडवी

D. वरीलपैकी नाही

🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे.

A. अजंठा लेणी✅

B. कार्ले लेणी

C. पितळखोरा लेणी

D. बेडसा लेणी

🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

A. आंध्र प्रदेश✅

B. महाराष्ट्

C. मध्य प्रदेश

D. गुजरात

🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A. अकोला

B. बुलढाणा

C. धुळे✅

D. ठाणे

🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A. नाशिक

B. औरंगाबाद

C. पुणे✅

D. सोलापूर

🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A. सह्याद्रि पर्वत✅

B. सातपुडा पर्वत

C. निलगिरी पर्वत

D. अरवली पर्वत

🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.

A. सायरस

B. ध्रुव

C. पूर्णिमा

D. अप्सरा✅

🔹महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _____ जिल्ह्यात आहे.  

A. अमरावती व अकोला

B. नांदेड व परभणी

C. हिंगोली व वाशिम

D. यवतमाळ वे रत्नागिरी✅

🔹________  हा महाराष्ट्रातील पहीला पर्यटन जिल्हा आहे.

A. कोल्हापूर

B. नाशिक

C. सिंधूदुर्ग✅

D. रत्नागिरी

🔹जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत ?

(a) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद

(b) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव

(c) औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा

पर्यायी उत्तरे :

A. फक्त विधान (a) बरोबर आहे. ✅

B. फक्त विधान (b) बरोबर आहे.

C. फक्त विधान (C) बरोबर आहे.

D. वरील सर्व विधाने चूक आहेत.

🔹1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा ______ प्रवृत्ती दर्शवितो.

A. स्थिर

B. घटती ✅

C. वाढती

D. तटस्थ

🔹महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.

(a) शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग

(b) वन आणि खनिज संपत्ती

(c) कापड उद्योग

(d) मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A. फक्त (a)

B. (a) आणि (b)

C. फक्त (d)✅

D. (c) आणि (d)

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


🏝जायकवाडी         नाथसागर
🏝पानशेत              तानाजी सागर
🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🏝भाटघर                  येसाजी कंक
🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा                   निजाम सागर
🏝कोयना                   शिवाजी सागर
🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🏝माणिक डोह            शहाजी सागर
🏝चांदोली                   वसंत सागर
🏝उजनी                     यशवंत सागर
🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🏝वैतरणा                 मोडक सागर

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...