Saturday, 4 April 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ *भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?*
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ *जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?*
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

♻️♻️....यांची जयंती म्हणून राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.
अ) सरदार वल्लभभाई पटेल✅✅
क) डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी
ब) डॉ. राजें द्र प्रसाद
ड) अटल बिहारी वाजपेयी

♻️♻️झोझो अजिंक्यपद ही स्पर्धा ....याच्याशी संबंधित आहे.
अ) गोल्फ✅✅
ब) स्नूकर
क) बिलियड्ड्स
ड) रोड सायकल रेसिंग

बारकाईने पाहणे ह्यासाठी खालील पैकी कोणता शब्द प्रयोग योग्य असेल?
दोन्हीही नाही
डोळ्यात तेल घालून पाहणे
काकदृष्टीने पाहणे
दोन्हीही✅✅

भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे
23 मार्च 1921
23 मार्च 1931✅✅
24 मार्च 1931
24 मार्च 1921

1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात________या ठिकाणी स्थापन झाले.                         
A) कोचीन
B) कांडला(गुजरात)✅✅
C) विशाखापट्टणम
D) वरीलपैकी एकही नाही

ऑपरेशन नमस्ते

🔥भारतीय लष्कराने सुरु केलं ‘ऑपरेशन नमस्ते’

🔥करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19  विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने  ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे.

🔥तर देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत.

🔥तसेच आमच्याकडे आपातकालीन योजना तयार आहे. करोना व्हायरसच्या फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असे नरवणे म्हणाले.

धोक्याचा इशारा : देशाचा विकासदर येईल ४ टक्क्यांवर

- करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत.

- आशियाई विकास बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर चार टक्क्यापर्यंत घसरण्याचे भाकीत वर्तवले आहे.

- देशात आधीपासूनच मंदीसदृश्य स्थिती असताना आता करोना व्हायसरच्या संकटामुळे त्यात आणखी भर पडली आहे. आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. करोना व्हायरसमुळे लोकांच आयुष्य विस्कळीत झालं आहे.

-  जगभरातील व्यवसाय, व्यापाराला फटका बसला आहे असे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणाले.
COVID-19 भारतात मोठया प्रमाणावर पसरलेला नाही. भारतात COVID-19 चा फैलाव झालेला नाही असेही ते यावेळी म्हणाले.

- २०२०-२१ मध्ये भारतात जीडीपी चार टक्क्यांपर्यंत घसरेल असे आशियाई विकास बँकेचे भाकीत आहे.
---------------------------------------------------

पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा

👉🏻 कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे.

👉🏻 अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे. यापूर्वी, दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.

👉🏻 कोरोनामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे.

👉🏻 ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे.

👉🏻 याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.

👉🏻 संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 7.6 टक्के घसरण झाली तरच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 1.5 डिग्री सेल्सियसची कमतरता येईल.

👉🏻 वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे.

👉🏻 पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण 2021 च्या सुरुवातीला हे पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढायला लागतील.

संविधानाच्या महत्वाच्या १० गोष्टी...

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

MSME मंत्रालय ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ राबवित आहे.

📌 पारंपारिक कारागीर आणि बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी अकृषक क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करुन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) राबवित आहे.

▪️योजनेचे स्वरूप

📌पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) याची 15 ऑगस्ट 2008 रोजी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषणा केली होती.

📌 ही भारत सरकारची पत योजना आहे. राष्‍ट्रीय पातळीवर खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) तर राज्‍य/जिल्हा पातळीवर KVIC चे राज्य कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) या योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मध्यवर्ती संस्था आहेत.

📌या योजनेच्या अंतर्गत मंत्रालयाच्या अनुदानासह KVIC केंद्रांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँका, सहकारी बँका आणि निवडक खासगी क्षेत्रातल्या काही बँकांद्वारे गरजूंना कर्ज दिले जाते.

📌 प्रकल्पांचा कमाल खर्च कारखान्यासाठी पंचवीस लक्ष रुपये आणि सेवा क्षेत्रासाठी दहा लक्ष रुपये असू शकतो.

📌 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती कर्जासाठी अर्ज करू शकते. सर्वसाधारण वर्गातल्या लाभार्थ्यांना शहरी भागात प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के आणि ग्रामीण भागात 25 टक्के अनुदान दिले जाते.

📌 तर आरक्षित किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग लाभार्थ्यांना शहरी भागात 25 टक्के आणि ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान मिळते.

विधान परिषदेची निवडणूक

◾️ 1/3 🔜 सदस्य विधानसभेकडे निवडून दिले जातात

◾️ 1/3 🔜  सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कडून निवडून दिले जातात

◾️1/12 🔜  सदस्य पदवीधर मतदारसंघ सोडून उडून जातात

◾️ 1/12  🔜  सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिला जातो

◾️ 1/6 🔜  सदस्य राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

♻️♻️ *भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?*
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ *जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?*
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 4

खाली दिलेले चालू घडामोडी चे टॉपिक

1. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019

2. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक

3. शरद बोबडे 47 वे सरन्यायाधीश

4. नॅशनल पीपल पार्टी पार्टी 8 वा राष्ट्रीय पक्ष

5. पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल

6. 103 वी घटनादुरुस्ती

7. लोकसभा निवडणूक 2019

8. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

9. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट

10. आंध्र प्रदेश साठी 25 वे उच्च न्यायालय

11. 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

12. सरपंचांच्या मानधनात वाढ

13. कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना

14. HPCL आणि PGCIL महारत्न दर्जा

15. 15 वा वित्त आयोग

16. 10 बँकांचे विलीनीकरण

17. क्रिस्टलीना जॉर्जिया IMF च्या प्रमुख

18. मसाला बॉन्ड जाहीर करणारे पहिले राज्य केरळ

19. रेल्वेचा 18 वा विभाग

20. 2019 मधील भौगोलिक मानांकन

21. मानव विकास निर्देशांक

22. जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक

23. भारत नाविन्यता निर्देशांक

24. व्यवसाय सुलभता निर्देशांक

25. जागतिक शांतता निर्देशांक

26. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक

27. 20 वी पशुगणना 2019

28. देशातील पहिला कचरा कॅफे

29. तामिळ येओमेन तामिळनाडू चे राज्य फुलपाखरू

30. व्याघ्र गणना 2018

31. जयपूर जागतिक वारसा स्थळ

32. वन अहवाल 2019

33. ई सिगारेटवर बंदी

34. अल्जेरिया आणि अर्जेंटिना हे देश मलेरिया मुक्त

35. सौदी अरब सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश

36. लघुग्रह ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव

37. चंद्रयान 2 मोहीम

38. इस्त्रोला 50 वर्षे पूर्ण

39. 107 वी भारतीय विज्ञान काँग्रेस

40. मिशन शक्ती

41. टॉप 500 महासंगणक

42. भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण बोगदा

43. पहिले मानवी हक्क टिव्ही चैनल

44. 2019 मधील महत्त्वाचे युद्ध सराव

45. मनोज नरवणे

46. टी एन शेषन

47. अरुण जेटली

48. सुषमा स्वराज

49. मनोहर पर्रीकर

50. जॉर्ज फर्नांडिस

51. गिरीश कर्नाड

52. राम जेठमलानी

53. क्रिकेट वर्ल्ड कप 2019

54. IPL क्रीडा स्पर्धा 2019

55. जी एस लक्ष्मी ICC च्या पहिल्या सामनाधिकारी

56. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2019

57. फिफा महिला वर्ल्ड कप 2019

58. मिस वर्ल्ड स्पर्धा 2019

59. मिस युनिव्हर्स स्पर्धा 2019

60. बेलोन डी'ओर पुरस्कार

61. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019

62. पद्म पुरस्कार 2020

63. दादासाहेब फाळके पुरस्कार

64. ज्ञानपीठ पुरस्कार

65. सरस्वती सन्मान

66. व्यास सम्मान

67. पहिला गौरी लंकेश पुरस्कार

68. आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार

69. नोबेल पुरस्कार 2019

70. ऑस्कर पुरस्कार 2020

71. मॅन बुकर पुरस्कार

72. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार

73. रमण मॅगसेसे पुरस्कार

74. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार

75. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019

76. स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019

77. टाइम्स पर्सन ऑफ द ईयर

78. मलेशिया आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा सदस्य

79. इक्वेडोर हा देश OPEC मधून बाहेर

80. ब्रिक्स परिषद 2019

81. युनेस्को मधून अमेरिका इज्राइल बाहेर

82. G 20 परिषद

83. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना

84. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

85. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

86. अखिल भारतीय नाट्य संमेलन

87. लिब्रा आभासी चलन

88. आंध्रप्रदेश राज्य साठी तीन राजधान्या

89. जागतिक गुंतवणूक अहवाल

90. जागतिक लोकशाही निर्देशांक

91. जागतिक नाविन्यता निर्देशांक

92. अग्नी तीन क्षेपणास्त्राची चाचणी

93. पृथ्वी-2 ची चाचणी

94. राजनाथ सिंह ह् तेजस मधून भरारी घेणारे पहिले संरक्षण मंत्री

95. भावना कांत पहिल्या महिला लढाऊ वैमानिक

96. सौरभ गांगुली

97. श्रीराम लागू

98. शीला दीक्षित

99 कृष्णा सोबती

100. रणजी ट्रॉफी 2018-19

101. सचिन तेंडुलकर

102. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा

103. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा

104. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा

105. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा

106. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार

107. अर्जुन पुरस्कार 2019

108. द्रोणाचार्य पुरस्कार

109. ध्यानचंद पुरस्कार

110. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

111. किसान मानधन योजना

112. भारत की लक्ष्मी उपक्रम

113. प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना

114. प्लॅन बी

115. इंटरनेट साथी

116. अटल सौर कृषी पंप योजना

117. काही महत्त्वाच्या योजना व त्यांची सुरुवात व त्यांची उद्दिष्ट

118. 25 50 75 100 125 150 200.... असे वर्ष पूर्ण झालेल्या इतिहास कालीन घटना

119. महत्त्वाची चर्चित पुस्तके

120. महत्वाचे दिनविशेष व त्यांच्या थीम

121. काही राज्यातील राज्यपाल

73 वी घटनादुरूस्ती

  🔰 कलम 🔰            ❣-व्याख्या  :❣

 कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--

 कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--

 कलम 243 C -पंचायतीची रचना :--

 कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--

 कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--

 कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--

 कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--

 कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--

 कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--

 कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--

 कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-

 कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.

 कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,

 कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी. 

 कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.

_______________________________

IISc बंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर विकसित केले.

✅ बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमधल्या वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर उपकरण तयार केले आहे.
त्यासाठी लागणारे सुटे भाग वाहननिर्मिती उद्योग आणि RO वॉटर फिल्टर उद्योगांकडून घेतले गेले आहेत.

◾️कोविड-19 महामारीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने व्हेंटिलेटर उपकरणांची अत्याधिक गरज भासत आहे.
▪️ आयात केलेल्या सुटे भागांची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे.

▪️व्हेंटिलेटरमध्ये वाहनामध्ये वापरल्या जाणारे प्रेशर सेन्सर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर फिल्टर हे भाग महत्त्वाचे असतात.

◾️मोठ्या प्रमाणात उपकरणांच्या उत्पादनासाठी संस्था त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान कोणत्याही उद्योगाला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या कंपनीने यापूर्वीच प्रणालीमध्ये रस दर्शविला आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...