Wednesday, 1 April 2020

General Knowledge

▪️ भारतातील कोणते विद्यापीठ ‘प्रोजेक्ट आयझॅक’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर

▪️ कोरोना विषाणूच्या संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने सादर केलेल्या अ‍ॅपचे नाव काय आहे?
उत्तर : कोरोना कवच

▪️ कोणत्या औषधाची विक्री आणि गैरवापर प्रतिबंधित करण्यासाठी ‘परिशिष्ट H1’ अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे?
उत्तर : हायड्रोक्सीक्लोरोक्वीन

▪️ भारतीय रेल्वेच्या नुसार कोणता कालावधी "फोर्स मॅजेअर" मानला जातो?
उत्तर : 22 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020

▪️ कोणत्या दलाने COVID-19 विषाणूचा सामना करण्यासाठी “ऑपरेशन नमस्ते” ही मोहीम राबविण्यास आरंभ केला?
उत्तर : भारतीय भुदल

▪️ कोणत्या देशाने देशाच्या स्पेस फोर्सचा भाग म्हणून हाय फ्रिक्वेन्सी प्रगत उपग्रह प्रक्षेपित केला?
उत्तर : अमेरिका

▪️ नुकतेच निधन झालेले नेमाई घोष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : छायाचित्र कला

▪️ कोणत्या संस्थेनी रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी "संक्रमण-रोधी कापड" तयार केले?
उत्तर : IIT दिल्ली

▪️ कोणत्या भारतीय राज्यात 38 वा जिल्हा म्हणून “मईलादुथुरई” याची निर्मिती करण्यात येणार?
उत्तर : तामिळनाडू

▪️ कोणत्या दिवशी जागतिक रंगमंच दिन साजरा केला जातो?
उत्तर : 27 मार्च

टोकियो ऑलिम्पिकच्या नवीन तारखा जाहीर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसला.

✴️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे.

✴️२०२१ साली होणाऱ्या या स्पर्धेच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत.

✴️२३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय.

✴️गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्या-ज्या संघटनांनी हातभार लावला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे.

✴️जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले.

✴️इतर महत्वाच्या स्पर्धांसोबत ऑलिम्पिकचं आयोजन होणार नाही याची काळजी घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

मोदी सरकारने केली 1⃣ 1⃣ विशेष गटांची स्थापना.

☑️भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत एक हजार 139 भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. तर देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30 वर पोहचला आहे.

☑️तर याच संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची (Empower Groups) स्थापना केली आहे.

☑️तसेच करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे.

☑️केंद्रीय गृह मंत्रालयाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्येच करोनाविषयक 11 गटांची स्थापना करण्यात आली. या 11 वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

☑️पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

☑️तर या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी

✍जगातील अनेक देशांचा आज करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

✍करोना व्हायरसला रोखू शकणारे प्रभावी औषध बनवण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.

✍तर या दरम्यान अमेरिकेच्या कानसास शहरातील एका डॉक्टरने करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी औषधांचे एक नवीन कॉम्बिनेशन बनवले आहे. हे औषध करोनावर प्रभावी असल्याचा या डॉक्टरचा दावा आहे.

✍दोन औषधांचे हे कॉम्बिनेशन प्रत्येक रुग्णावर लागू पडल्यास निश्चित जगासाठी ती एक आनंदाची बाब ठरेल.

✍Covid-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर  हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या दोन औषधांचा वापर करत आहेत असे डॉक्टर जेफ कोलयर यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात म्हटले आहे.

✍एझेड म्हणजे अ‍ॅझीथ्रोमायसीन हे दुसरे औषध आहे. बाजारात हे औषध झेड-पॅक म्हणून ओळखले जाते.

✍Covid-19 च्या 14 रुग्णांना फक्त हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध देण्यात आले. त्यातील सहाव्या दिवशी 57 टक्के रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला.

✍पण करोनाच्या सहा रुग्णांना हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन ही दोन्ही औषधे देण्यात आली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरला.