Friday, 27 March 2020

राज्यघटनेतील काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या

👉 पहिली घटनादुरुस्ती - भारतीय राज्यघटनेत 1951 मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेत 31-अ आणि 31-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.

👉 7 वी घटनादुरुस्ती - भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी 1956 मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली.

👉 17 वी घटनादुरुस्ती  - 1964 मध्ये झालेली ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम 31 मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे.

👉 42 वी घटनादुरुस्ती - 1976 साली झालेली ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झाली. यामध्ये राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने समाविष्ट केले गेले.

👉 44 वी घटनादुरुस्ती - 1978 मध्ये झालेल्या या दुरुस्तीमध्ये 42 व्या घटनादुरुस्ती मधील वादग्रस्त भाग दूर करणे हा उद्देश होता.

👉 52 वी घटनादुरुस्ती - पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने घालण्याच्या दृष्टीने 1985 साली ही घटनादुरुस्ती केली.

👉 61 वी घटनादुरुस्ती - 1989 साली झालेल्या या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या 326 व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली.

👉 73 वी घटनादुरुस्ती - पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचे काम 1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत करण्यात आले.

👉 86 वी घटनादुरुस्ती - 2002 मधील या घटनादुरुस्तीने घटनेच्या 21 व्या कलमात 21-अ हे नवे कलम जोडण्यात आले.

👉 92 वी घटनादुरुस्ती - 2003 मधील या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात बदल करण्यात आला.

👉 93 वी घटनादुरुस्ती - 2006 मधील या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली.

शरद बोबडे

⏩47 वे सरन्यायाधीश म्हणून निवड

⏩शपथ:-18 नोव्हेंबर 2019

⏩निवृत्त:-23 एप्रिल 2021

✍2000:-मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश

✍2012:-मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश

✍2013:-सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश

👉सरन्यायाधीश होणारे चौथे महाराष्ट्रीयन आहेत

1)प्रल्हाद गजेंद्रगडकर(7 वे)

2)मोहम्मद हिदायतुलला(11 वे)

3)वाय व्ही चंद्रचूड(16 वे)

🎯अलीकडील सरन्यायाधीश

43:-टी यस ठाकूर

44:-जे यस खेहर

45:-दीपक मिश्रा

46:-रंजन गोगोई

👉आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही

साक्षरतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे


सेराश्चिप (मिझोराम)-------------------------97.91 टक्के 

ऐझवाल (मिझोराम)-------------------------97.89 टक्के 

माहे (पद्दूचेरी )-----------------------------97.87 टक्के 

कोट्टायम (केरळ)----------------------------97.21टक्के

पठाणमतीता(केरळ)------------------------96.55 टक्के 

चांफाइ(मिझोराम)---------------------------95.91 टक्के 

एरणाकुलम(केरळ)-------------------------95.89 टक्के 

अल्लापुझा(केरळ)---------------------------95.72 टक्के 

कानूर (केरळ)-------------------------------95.10 टक्के 

थ्रिसुर (केरळ)-------------------------------95.08 टक्के     

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमाणसी 5 किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.

संचारबंदी मोडली तर होणार २ वर्षांपर्यंतची कैद

🔰 देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवलं आहे. या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येईल.

🔰 या २१ दिवसांच्या लोकडाऊन दरम्यान राज्यात आणि केंद्रशासित प्रदेश आणि मधली सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालयबंद राहतील. तसंच खाजगी कार्यालय देखील बंद राहतील. 

🔰 मात्र नव्या सूचनांनुसार किराणामालाच दुकान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थची विक्री करणारी  दुकान, पेट्रोलपंप गॅस सिलेंडर विक्री दुकान खुली राहतील. या जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्याला जिल्हा प्रशासनानं प्रोत्साहन द्यावं असं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.

🔰 या वस्तूंचा ई-कॉमर्स द्वारे पुरवठा सुरू राहील. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था बंदच राहतील. तसंच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास मज्जाव करण्यात आला आहे. तसंच अंत्ययात्रेत वीस पेक्षा जास्त लोकांनी जमू नये, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

🔰 रुग्णालय आणि त्याच्याशी संबंधित आस्थापन खुली राहतील.  रुग्णवाहिका, वैद्यकीयसेवांशी संबंधित कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी  तसंच साफ सफाई कामगार यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना या निर्बंधतून सूट देण्यात आली आहे. 

🔰 शेअर बाजार, बँका, विमा कार्यालयं आणि एटीएम चालू राहतील. खाजगी सुरक्षा सेवा, पेट्रोल पंप, वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं, दूरसंवाद यंत्रणा, इंटरनेट इत्यादी चालू राहील मात्र त्यातही शक्यतो घरुन काम करण्यावर भर द्यायचा आहे. 

🔰 बंदीमुळे अडकलेल्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांची राहण्याची सोय असलेली किंवा विलगीकरणासाठी वापरली गेलेली वगळता सर्व हॉटेल्स बंद राहतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले

🔰कुपोषण निर्मूलनाचा एक प्रयत्न म्हणून त्यादृष्टीने चाललेल्या संशोधनामधून पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले. या गहूला ‘MACS 4028’ असे नाव देण्यात आले आहे.

🔴गव्हाची वैशिष्ट्ये

🔰या नव्या गहूमध्ये 14.7 टक्के एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्तचे प्रमाण 40.3 ppm आणि लोहचे प्रमाण 46.1 ppm एवढे आहे.

🔰नवा गहू ‘डुरम गहू’ या प्रकारातला आहे, जो कोरडा प्रदेशात उगवतो. मुख्यत: पास्ता बनविण्यात वापरला जातो आणि म्हणून पास्ता गहू किंवा मकरोनी गहू म्हणून देखील ओळखला जातो.

🔰नवा गहू हे बुटक्या प्रकारातले वाण आहे आणि त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याची हेक्टरी 19.3 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे.

🔰 नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरी किडे, फोलीयर एफिडस् आणि रूट एफिडस् अश्या उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे.

🔰भारताच्या ‘व्हीजन 2022’, ‘कुपोषण मुक्त भारत’ आणि राष्ट्रीय पोषण धोरणाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK) कार्यक्रमात ‘MACS 4028’ गहू समाविष्ट करण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ATM मधून पैसे निघाले नाही तरी लागणार दंड, या बँकेने केला नवा नियम : 

जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला २५ रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील अ‌ॅक्सिस  बँकेने १ एप्रिल २०२० पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.

याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर ६५० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत ५०० रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास २५० रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत २५० रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.

अ‌ॅक्सिस  बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून १५ ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला ७५ रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता १०० रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी ६० रुपये घेतले जात होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटीएमटी स्थानकाने 2019 मध्ये 132 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तच जाणून घेऊयात लाखोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकाबद्दलच्या खास गोष्टी…

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
- सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

- 1878 मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.
- मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

- या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
- या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

- सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.
- स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला.

- हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले.
- हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.
- मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे.

- २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.
- सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.

- फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
- महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.

- २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
- रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

- स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा.वन. सिनेमामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे.
- मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे.

- मागील  वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान सीएसएमटी स्थानकात तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.
- वर्ष २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे.

- लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत २२ लाखाहून ३ लाख म्हणजे जवळपास ४ टक्के घट झाली आहे.
- या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.
- या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

(Oscar The Academy Award Winners)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट
🚦सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो
     (पॅरासाईट)
🚦सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर
     (ज्युडी)

🚥सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन
     फीनिक्स (जोकर)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा
     डर्न (मॅरेज स्टोरी)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड
     पिट (वन्स अपॉन अ टाईम इन
     हॉलिवूड)

🚦सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना
     लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
🚦सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर
     – जोकर
🚦सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
     – पॅरासाईट

🚥सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा
    – जोजो रॅबिट
🚥सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट
🚥सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा –
    बॉम्बशेल

🚦सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन
🚦सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917
🚦सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917

🚥सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस
     फरारी
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड
     व्हर्सेस फरारी

🚦सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू
🚦स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर
    अ गर्ल)
🚦सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन
     फॅक्टरी

🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर
     लव्ह
🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय
      स्टोरी 4                               सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द
     नेबर्स विंडो
-  सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स
     अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

'करोना'वर 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला


🔷करोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या 'कोविड १९' या आजाराच्या अतिगंभीर प्रकरणांत उपचारासाठी 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'द्वारे (ICMR) गठीत करण्यात आलेल्या 'नॅशनल टास्क फोर्स'नं दिलाय.

🔷 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' या औषधाचा वापर सध्या मलेरियाच्या रुग्णांसाठी औषध म्हणून केला जातो.

🔷आता, हेच औषध संशयित किंवा करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवकांना दिलं जाऊ शकतं, असं 'आयसीएमआर'नं म्हटलंय.

🔷याशिवाय करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही हे औषध दिलं जाऊ शकतं, असं सूचित करण्यात आलंय.

🔷अतिशय वेगानं संक्रमित होणाऱ्या 'करोना व्हायरस'चा प्रसार रोखण्यासाठी आत्तापर्यंत लस शोधून काढण्यात यश आलेलं नाही.

🔷याच दरम्यान, 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) हे औषध करोना व्हायरसच्या उपचारांत फायदेशीर ठरू शकतं, असं रिसर्चमधून समोर आलंय. या रिसर्चमध्ये 'क्लोरोक्वीन फॉस्फेट' आणि 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन सल्फेट' करोनाच्या उपचारांत मदत करू शकतं, असं आढळून आलं.

🔷उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील काही दिवसांपूर्वी याच औषधाचं नाव सूचवलं होतं. अमेरिकेतील 'फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन' (FDA) हे औषध मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत.

🔷चीनच्या आरोग्य विभागानंही फेब्रुवारी महिन्यात 'क्लोरोक्वीन फॉस्फेट'च्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं जाहीर केलं होतं.

पोलीस भरती प्रश्नसंच


♻️♻️दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

A) कोलकाता
B) मुंबई
C) सिकंदराबाद ✅
D) नागपूर

♻️♻️देशातील दहशदवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

A) NIA ✅✅
B) NSG
C) ATS
D) CBI

♻️♻️सापाचा खेळ करणारा?

A) दरवेशी
B) गारुडी ✅
C) मदारी
D) डोंबारी

♻️♻️मधुमेह आजार हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो?

A) व्हिटॅमिन-अ
B) कॅल्शीयम
C) फाॅस्फरस
D) इन्शुलीन ✅✅

♻️♻️निती आयोगाचे अध्यक्ष कोण?

A) प्रणव मुखर्जी
B) अरविंद पनगरीया
C) राजनाथसिंह
D) नरेंद्र मोदी ✅✅

♻️♻️राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता?

A) नाशिक
B) नागपूर ✅✅
C) पुणे
D) औरंगाबाद

♻️♻️खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

A) नागपूर -संत्री
B) कोल्हापूर -डाळींब✅✅
C) जळगांव -केळी
D) जळगांव -केळी

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...