Thursday, 26 March 2020

मार्गदर्शक तत्वमधील दुरुस्ती

42 वी घटनादुरुस्ती 1976
- 39F:-बालक व युवकांना विकासाच्या संधी
- 39A:-समान न्याय व कायदेशीर मोफत सल्ला
- 43A:-उद्योग व्यवस्थापन मध्ये कामगार सहभाग
- 48A:-पर्यावरण,वने व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन

44 वी घटनादुरुस्ती 1978
- 38B:-राज्य उत्पन्न ची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल

86 वी घटनादुरुस्ती 2002
- 45:-6 वर्षांखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतुद करणयाची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आली

97 वी घटनादुरुस्ती
- 43B:-राज्य सहकारी सोसायटीच्या निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील

भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला.

जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे.

करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.

सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसांमध्ये भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. याच वेगाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत राहिल्यास या आठवड्याच्या शेवटपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक असेल.

पहिल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळालं.

त्यामुळे सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस जास्तीत जास्त काळ घऱात थांबू आणि करोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

संविधानातील 12 परिशिष्ट

1. राज्य व केंद्रशासित प्रदेश
2. वेतन, भत्ते व विशेषाधिकार
3. शपथा / प्रतिज्ञांचे नमुने
4. राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व
5. अनुसूचित जाती व जमाती बाबत तरतुदी
6. आसाम, मेघालय, त्रिपूरा मिझोराममधील जनजाती
7. सूची: केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची
8. भाषा
9. विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य
10. पक्षांतरासंबंधी अपात्रता
11. पंचायती: अधिकार, कार्ये आणि जबाबदारी
12. नगरपालिका: अधिकार, कार्ये आणि जबाबदारी

'लॉकडाऊन' आणि 'कर्फ्यू'मधला नेमका फरक समजून घ्या...

🔴'लॉकडाऊन' म्हणजे काय?

1.आपात्कालीन परिस्थितीत सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद केल्या जात नाही. सध्या, बँक, दूध डेअरी, औषध, रेशनिंग, फळ-भाज्या यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू असलेली दिसतात.

2.तुम्ही जिथे असाल तिथंच थांबावं हा लॉकडाऊनचा हेतू असतो. यामध्ये नागरिकांना एखाद्या इमारतीत, भागात, राज्य किंवा देशापर्यंत सीमित केलं जातं. बऱ्याचदा नागरिकांना या नियमांत सूटही दिली जाते.

3.लॉकडाऊनमध्ये मुख्यत्वे: नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणारी कारणं बंद केली जातील यावर भर दिला जातो. खासगी कंपन्यांना लॉकडाऊन पाळावा लागल्यानं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' किंवा सुट्टी जाहीर करावी लागली.

4.लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याची आणि रस्त्यावर न फिरण्याचं आवाहन केलं जातं. केवळ आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी घराबाहेर पडणं अपेक्षित असतं.

5.लॉकडाऊन दरम्यान कोणत्या प्रकारच्या सेवांना सूट दिली जावी? हे तिथलं स्थानिक प्रशासन ठरवतं

6.सध्या, करोनाचं संक्रमण फैलावू नये यासाठी लोकांनी घरातच ठेवण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.

🔴'कर्फ्यू' म्हणजे काय?

1.अत्यंत गंभीर परिस्थिती 'कर्फ्यू'ची अंमलबजावणी केली जाते. ही स्थिती नागरिकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. कारण नागरिकांना कर्फ्यूच्या नियमांचं पालन करावंच लागतं कारण हा प्रशासनाचा 'आदेश' असतो.

2.या दरम्यान नागरिक आपल्या भागात किंवा रस्त्यांवर गर्दी करून उभे राहू शकतं नाहीत

3.मुख्य म्हणजे, कर्फ्यूच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना पोलीस अटक करू शकतात. तसंच अशा नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो

4.कर्फ्यू दरम्यान नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही

5.कर्फ्यू दरम्यान शाळा, महाविद्यालय, बाजार बंद ठेवले जातात

6.कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहील, याची काळजी प्रशासन घेतं

7.कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकसारख्या सेवाही बंद केल्या जातात

8.स्थानिक प्रशासनाकडून कर्फ्यू शिथील करण्यात आल्यानंतरच नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची परवनानगी असते

📌दरम्यान, देशभरात आत्तापर्यंत ५२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तसंच १० जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आकाशगंगा

       सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

        चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

         प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

       चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

         एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

        एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

  प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

        प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

         बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

      बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

         पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

       पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

       'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

       गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

         शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

       शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

      धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

       हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

         भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

       त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

        GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

       टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

        आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

        जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

लोकपाल

- पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष
- गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
- न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी

- लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ

- लोकपाल पात्रता
1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

- अध्यक्ष अपात्रता
- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
- संसद व विधिमंडळ सदस्य
- अपराधी दोषी

- कार्यकाल
5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो
- पगार
अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे

● लोकपाल कायदा 2013

- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
- लोकसभा:-18 डिसेंबर 2013
- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
- अंमल:-16 जानेवारी 2014

- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

घटनेतील मूलभूत कर्तव्य

1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   

“फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल; भारत जगात 83व्या क्रमांकावर

अमेरिकेच्या ‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेकडून “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वतंत्रतेचा आढावा दिला गेला आहे.

स्वतंत्रतेच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह “स्वतंत्र लोकशाही” या श्रेणीत शेवटच्या पांच क्रमांकामध्ये आहे.

अहवलातल्या ठळक बाबी

भारत

🔸भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत.

🔸इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला "पार्टली फ्री" श्रेणीत वर्गीकृत केले.

जागतिक

🔸मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत.

🔸गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे.

🔸'फ्री' श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.

🔸अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या 'फ्री' श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.

🔸फ्रीडम हाऊसच्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते.

🔸2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली.

🔸जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली.

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)कोणत्या दोन देशांमध्ये ‘नेटिव्ह फ्यूरी’ सराव आयोजित केला जातो?
(A) अमेरिका आणि ब्रिटन
(B) संयुक्त अरब अमिरात आणि अफगाणिस्तान
(C) मालदीव आणि फ्रान्स
(D) अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात.  √

2)कोणत्या व्यक्तीने गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक जिंकला?
(A) यवेस मेयर आणि अँड्र्यू विल्स
(B) हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस.  √
(C) कॅरेन उहलेनबेक
(D) रॉबर्ट लँगलँड्स

3)'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
(A) सविता छाबरा. √
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

4)कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?
(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो.  √
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

5)‘स्वयम प्रभा’ नावाचा उपक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे?
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय.  √
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) कामगार व रोजगार मंत्रालय

6)निधन झालेले अल्बर्ट उडरझो कोणत्या कॉमिक बुक मासिकाकासाठी एक चित्रकार म्हणून कार्यरत होते?
(A) आर्ची कॉमिक्स
(B) गारफिल्ड कॉमिक्स
(C) टिनटिन कॉमिक्स
(D) अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्स.  √

7)कोणत्या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ उभारली जात आहे?
(A) तामिळनाडू आणि महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश आणि केरळ
(C) आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र
(D) यापैकी नाही.  √

8)मध्यप्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
(A) शिवराज सिंग चौहान.  √
(B) कमल नाथ
(C) एन. बीरेन सिंग
(D) त्रिवेन्द्र सिंग रावत

9)COVID-19 विषाणूला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) रणदीप गुलेरिया
(B) प्रीती सुदान
(C) डॉ. व्ही. के. पॉल.  √
(D) सुजित सिंग

10)कोणत्या व्यक्तीची इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
(A) आदित्य पुरी
(B) श्याम श्रीनिवासन
(C) सुमंत कठपलिया.  √
(D) अमिताभ चौधरी

“फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल; भारत जगात 83व्या क्रमांकावर

अमेरिकेच्या ‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेकडून “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वतंत्रतेचा आढावा दिला गेला आहे.

स्वतंत्रतेच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह “स्वतंत्र लोकशाही” या श्रेणीत शेवटच्या पांच क्रमांकामध्ये आहे.

अहवलातल्या ठळक बाबी

भारत

🔸भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत.

🔸इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला "पार्टली फ्री" श्रेणीत वर्गीकृत केले.

जागतिक

🔸मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत.

🔸गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे.

🔸'फ्री' श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.

🔸अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या 'फ्री' श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.

🔸फ्रीडम हाऊसच्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते.

🔸2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली.

🔸जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली.

“फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल; भारत जगात 83व्या क्रमांकावर

अमेरिकेच्या ‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेकडून “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वतंत्रतेचा आढावा दिला गेला आहे.

स्वतंत्रतेच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह “स्वतंत्र लोकशाही” या श्रेणीत शेवटच्या पांच क्रमांकामध्ये आहे.

अहवलातल्या ठळक बाबी

भारत

🔸भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत.

🔸इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला "पार्टली फ्री" श्रेणीत वर्गीकृत केले.

जागतिक

🔸मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत.

🔸गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे.

🔸'फ्री' श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.

🔸अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या 'फ्री' श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.

🔸फ्रीडम हाऊसच्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते.

🔸2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली.

🔸जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...