Saturday, 21 March 2020

आयएमएफ आणि जागतिकीकरण

जागतिकीकरणात तीन संस्था आहेत . जागतिक वित्तीय बाजारपेठ आणि ट्रान्सनेशनल कंपन्या , अमेरिकेच्या नेतृत्वात आर्थिक आणि लष्करी आघाड्यांमध्ये एकमेकांशी जोडलेली राष्ट्रीय सरकारे आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ), आयएमएफ आणि वर्ल्ड बँक यासारख्या वाढत्या “जागतिक सरकार” . [1990] चार्ल्स डर्बर यांनी आपल्या पीपल्स बर्फ प्रॉफिट या पुस्तकात युक्तिवाद केला आहे की , "या परस्पर संवाद करणार्‍या संस्था एक नवीन जागतिक सत्ता प्रणाली निर्माण करतात जिथे सार्वभौमत्वाचे वैश्वीकरण केले जाते, सत्ता आणि घटनात्मक अधिकार राष्ट्रांपासून दूर नेऊन जागतिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देतात".  टायटस अलेक्झांडर असा युक्तिवाद करतात की ही प्रणाली पाश्चात्य देशांमध्ये आणि बहुसंख्य वर्ल्डमधील जागतिक असमानता जागतिक वर्णभेदाच्या रूपात संस्थाभूत करते , ज्यामध्ये आयएमएफ एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

जागतिकीकरण होणारी आर्थिक संस्था स्थापन करणे ही एक लक्षण आणि प्रेरणा दोन्हीही आहे. जागतिक बँक, आयएमएफ क्षेत्रीय विकास बँक जसे की युरोपियन बँक फॉर रीस्ट्रक्शन and ण्ड डेव्हलपमेंट (ईबीआरडी), आणि डब्ल्यूटीओ सारख्या बहुपक्षीय व्यापार संस्थांचा विकास हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राथमिक अभिनेता विश्लेषित झाल्यामुळे राज्याच्या वर्चस्वापासून दूर सरकण्याचे संकेत देतो. घडामोडी. अशा प्रकारे राज्य सार्वभौमत्वाचा पुनर्विचार करण्याच्या दृष्टीने जागतिकीकरण बदलले गेले आहे .

1990  च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रशासनाच्या आक्रमक आर्थिक नोटाबंदी मोहिमेनंतर जागतिकीकरणाच्या नेत्यांनी त्यांच्या बँकांची परकीय मालकी मर्यादित करणार्‍या, चलन विनिमय नियंत्रित करणारे आणि परकीय गुंतवणूकदारांकडून पैसे किती लवकर काढून घेता येतील यावरचे निर्बंध दूर करणारे सरकारचे दीर्घकालीन निर्बंध रद्द केले.

मे 2001  च्या आयएमएफच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की जगातील सरकारे जीवाश्म इंधन कंपन्यांना वर्षाकाठी .3..3 टीएन (£.4 टन) सह अनुदान देतात. मोजमाप म्हणजे कोळसा, तेल आणि वायू पेटवून प्रदूषक सरकारांवर न भरलेल्या खर्चाची भरपाई करतात. लोकसंख्येवर जीवाश्म इंधन अनुदानाचा अंदाज परिणाम - हवामान प्रदूषण, आरोग्य समस्या, पूर, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे चालवलेले वादळ - जागतिक पातळीवरील खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च.

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

• मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

• भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

• दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

• फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

• हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

• चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

• उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

• कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

• नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

रंगनाथ मिश्रा ex-CJI चीही झाली होती राज्यसभेवर नियुक्ती

📌 न्या बहरुल इस्लाम
📌 न्या रंगनाथ मिश्रा
📌 न्या रंजन गोगोई

◾️ चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकित केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

◾️पण माजी सरन्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

◾️ यापूर्वीही काँग्रेसने माजी सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही अशीच घटना घडली होती.

🔰 कोण होते रंगनाथ मिश्रा ?

◾️रंगनाथ मिश्रा हे २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१ या काळात सरन्यायाधीश राहिले

◾️ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

◾️१९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार राहिले.

◾️बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते. इस्लाम यांनाही काँग्रेसनेच राज्यसभेवर पाठवलं होतं.

🔰 इंदिरा गांधींकडून पहिल्यांदा नियुक्ती

◾️बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती.

◾️कारण, बहरुल इस्लाम हे १९५६ पासून काँग्रेसचे सदस्य होते. १९६२ आणि १९६८ ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी १९७२ ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालँड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.

◾️१९८० मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◾️ जस्टिस एम हिदायतुल्ला यांची निवृत्तीनंतर ९ वर्षांनी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

◾️ माजी सरन्यायाधीश पी सदाशिवम यांची २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विरुद्धार्थी शब्द


● एकमत     x    दुमत
● उदय        x    अस्त
● आशीर्वाद  x    शाप
● अधिक      x    उणे
● धूर्त           x    भोळा
● थोर          x     सान
● अनुयायी   x     पुढारी
● दोषी         x     निर्दोषी
● अभिमानी  x     निराभिमानी
● देशभक्त     x     देशद्रोही
● कृत्रिम       x     नैसर्गिक
● सकर्मक    x     अकर्मक  
● लोभी       x      निर्लोभी
● लाजरा     x      धीट
● हिंसा        x     अहिंसा
● राजमार्ग    x    आडमार्ग
● श्वास         x     नि:श्वास
● सुर           x     असुर
● साक्षर       x     निरक्षर
● सुरस        x     निरस
● पूर्णांक      x    अपूर्णांक
● नि:शस्त्र    x     सशस्त्र
● सुजाण     x     अजाण
● गंभीर       x     अवखळ
● सुलक्षणी  x     कुलक्षणी
● चोर         x     साव
● सुज्ञ         x     अज्ञ
● सुकाळ    x     दुष्काळ
● सगुण      x      निर्गुण
● चपळ      x      मंद
● सुबोध     x      दुर्बोध
● दुष्ट         x      सुष्ट
● स्वातंत्र्य   x     पारतंत्र्य
● साकार     x     निराकार
● स्वर्ग        x      नरक
● दिन         x      रजनी
● अध्ययन   x     अध्यापन
● स्वकीय    x      परकीय
● मनोरंजक  x     कंटाळवाणे
● सौंदर्य       x     कुरूपता
● खंडन       x     मंडन
● उघड        x     गुप्त
● अवखळ   x     गंभीर
● उथळ       x     खोल
● रणशूर      x     रणभिरू
● माजी        x     आजी
● शाप         x      वर
● अवनत     x      उन्नत
● तीव्र          x      सौम्य
● अवधान     x     अनावधान
● प्रसन्न         x     अप्रसन्न
● मर्द            x     नामर्द
● शंका          x     खात्री
● कृपा           x    अवकृपा
● गमन           x    आगमन
● कल्याण      x     अकल्याण
● ज्ञात           x     अज्ञात
● सत्कर्म       x      दुष्कर्म
● खरे           x      खोटे
● भरती        x     ओहोटी
● सुसंबद्ध     x     असंबद्ध
● हर्ष            x     खेद
● विधायक    x     विघातक
● हानी          x     लाभ
● संघटन       x     विघटन
● सुंदर          x     कुरूप
● सार्थक       x     निरर्थक
● स्वस्थ        x     अस्वस्थ
● सुसंगत      x      विसंगत
● तप्त          x      थंड
● धर्म           x      अधर्म
● सनाथ       x      अनाथ
● सशक्त       x      अशक्त
● कीर्ती        x      अपकीर्ती
● ऐच्छिक     x     अनैच्छिक
● गुण          x      अवगुण
● अनुकूल    x      प्रतिकूल
● उत्तीर्ण      x      अनुत्तीर्ण
● यश          x      अपयश
● आरंभ      x      अखेर
● रसिक      x      अरसिक
● उंच          x      सखल
● आवक     x      जावक
● कमाल     x      किमान
● उच्च        x      नीच
● आस्तिक  x     नास्तिक
● अल्पायुषी x    दीर्घायुषी
● अर्वाचीन  x     प्राचीन
● उगवती    x     मावळती
● अपराधी  x     निरपराधी
● उपद्रवी   x      निरुपद्रवी
● कृतज्ञ     x     कृतघ्न
● खरेदी     x     विक्री
● उपयोगी  x     निरुपयोगी
● उत्कर्ष    x     अपकर्ष
● उचित    x     अनुचित
● जहाल   x     मवाळ
● जमा     x     खर्च
● चढ      x     उतार
● कर्णमधुर x  कर्णकर्कश
● गोड      x    कडू
● कच्चा   x    पक्का
● चंचल   x    स्थिर
● चढाई   x    माघार
● जलद   x   सावकाश
● तीक्ष्ण   x   बोथट
● दृश्य     x   अदृश्य
● समता  x    विषमता
● सफल  x    निष्फल
● शोक   x    आनंद
● पौर्वात्य x   पाश्चिमात्य
● विधवा  x   सधवा
● अज्ञान  x   सज्ञान
● पोक्त    x   अल्लड
● लायक  x   नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव    x  निर्जीव
● सगुण     x  निर्गुण
● साक्षर    x   निरक्षर
● प्रकट     x   अप्रकट
● नफा      x   तोटा
● सुशिक्षित x  अशिक्षित
● सुलभ     x   दुर्लभ
● सदाचरण x  दुराचरण
● संकुचित  x  व्यापक
● सुधारक   x  सनातनी
● सुदिन      x  दुर्दिन
● ऋणको    x धनको
● क्षणभंगुर   x चिरकालीन
● अबोल      x वाचाळ
● आसक्त     x अनासक्त
● उत्तर        x  प्रत्युत्तर
● उपकार    x  अपकार
● घाऊक    x  किरकोळ
● अवजड   x  हलके
● उदार       x अनुदार
● उतरण     x  चढण
● तारक      x  मारक
● दयाळू     x  निर्दय
● नाशवंत   x अविनाशी
● धिटाई     x  भित्रेपणा
● पराभव   x  विजय
● राव         x रंक
● रेलचेल    x  टंचाई
● सरळ      x  वक्र
● सधन      x  निर्धन
● वियोग     x  संयोग
● राकट      x नाजुक
● लवचिक   x ताठर

Current Affairs - 21/03/2020

1)‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ _ ह्यांना देण्यात आला.
(A) रवींद्र शेट्टी
(B) प्राची साळवे.  √
(C) पूर्णिमा सिंग
(D) यापैकी नाही

2)COVID-19 विषाणूच्या लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेच्या सिएटल या शहरात घेतली जात आहे. लसीचे नाव काय आहे?
(A) mRNA-1233
(B) mRNA-1723
(C) mRNA-1273.  √
(D) tRNA-1273

3)संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मान्य करण्यात आलेल्या 83 LCA तेजस विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. LCA तेजस विमानाची संरचना बोईंग कंपनीने केली आहे.

2. संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही.  √

4)_____ हे 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
(A) सद्गुरु पाटील आणि मायाभूषण नागवेणकर
(B) पूर्णिमा सिंग आणि रवींद्र शेट्टी
(C) तरुण विजय.  √
(D) श्रीपाद नाईक

5)_____ या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.
(A) एक्सेंचर
(B) मायक्रोसॉफ्ट.  √
(C) गूगल
(D) अॅमेझॉन

6)सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
(A) लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड. √
(B) ग्रीन अँड क्लीन लिव्हिंग: प्रीपेरींग फॉर फ्युचर
(C) सिटीज अडॅप्टेशन फॉर बेटर लाइफ
(D) अडॉप्टिंग टू क्लायमेट चेंज

7)कोणत्या व्यक्तीची भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली?
(A) सत्य नडेला
(B) सुंदर पिचाई
(C) राजीव कुमार
(D) करण बाजवा.  √

8)“माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
(A) भालचंद्र मुणगेकर.  √
(B) व्यंकय्या नायडू
(C) चेतन भगत
(D) सोमनाथ चटर्जी

9)कोणत्या दिवशी आयुध निर्माण कारखाना दिवस साजरा केला जातो?
(A) 10 मार्च
(B) 18 मार्च.  √
(C) 12 मार्च
(D) 20 मार्च

10)______ हे ऊर्जा वित्त महामंडळाचे (PFC) नवे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
(A) रवींदर सिंग ढिल्लोन.  √
(B) अरुण गुप्ता
(C) रमेश बाबू
(D) एच. शंकर

*संधी ओळखा? कवीश्वर*

A) व्यंजनसंधी
B) स्वरसंधी ✅✅
C) विशेषसंधी
D) विसर्गसंधी

*ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?*

A) गटविकास अधिकारी
B) पटवारी
C) ग्रामसेवक✅✅
D) पोलीस पाटील

*“तिलांजली देणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?*

A) हक्क सोडणे ✅✅
B)  नाहीशी करणे
C) लाखोली वाहने
D) दृष्टी आड करणे

*त्रिपुरा :अगरतला , ? : गुवाहाटी*

A) आसाम ✅✅
B) मिझोरामा
C) सिक्कीम
D) अरुणाचल प्रदेश

*कर्करोग कशामुळे होतो?*

A) जीवाणू
B) फंगस
C) पेशींचे अनियंत्रित विभाजन ✅✅
D) विषाणू

*भारताचा मध्य बिंदू झिरो माईल कुठे आहे?*

A)  नागपूर ✅✅
B) चेन्नई
C) मुंबई
D) दिल्ली

*एक किलोबाईट म्हणजे?*

A)  १०२४ बाईट ✅✅
B) १०३६ बाईट
C) १०१२ बाईट
D) १००० बाईट

*भारतातील सर्वाधिक लांब पल्याची रेल्वे कोणती?*

A) टेन जम्मू एक्सप्रेस - तीरुनोंवेली ते जम्मू
B) नवयुग एक्सप्रेस - मंगलोर ते जम्मू
C) विवेक एक्सप्रेस - दिब्रुगड ते कन्याकुमारी ✅✅
D) हिमसागर एक्सप्रेस - जम्मूतावी ते कन्याकुमारी

*“दृढ निश्चय करणे” या अर्थाची म्हण ओळखा?*

A) लहान तोंडी मोठा घास
B) शेंडी तुटो व पारंबी तुटो ✅✅
C) प्रयत्नांती परमेश्वर
D) कर नाही त्याला डर कशाला

*इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?*

A) न्यूयाॅर्क - अमेरिका
B) न्यू दिल्ली - भारत
C) लिऑन - पॅरीस✅👌
D) लंडन - ब्रिटेन

*राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?*

A) पंतप्रधान
B) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ✅✅
C) उपराष्ट्रपती
D) लोकसभा सभापती

*मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?*

A) पुणे
B) नागपूर✅✅
C) पणजी
D) औरंगाबाद

*खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?*

A) संतूर - शिवकुमार
B) शहनाई - बिसमिल्ला खान
C) तबला - झाकीर हुसेन
D) सतार - अहमद अली ✅✅

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...