Tuesday, 10 March 2020

Current Affairs - 10/03/2020

1)COVID-19 विषाणूच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या -

1. या विषाणूच्या उद्रेकाचे मूळ चीन देशात होते.

2. इटली हा चीननंतर या विषाणूच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

2)मार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?
(A) चंदा कोचर
(B) राणा कपूर.  √
(C) गिरीश चंद्र चतुर्वेदी
(D) राकेश माखीजा

3)‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?
(A) महाराजा सवाई मान सिंग
(B) महाराजा हरी सिंग
(C) महाराजा रणजित सिंग.  √
(D) महाराजा गुलाब सिंग

4)वर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान.  √
(C) उत्तराखंड
(D) महाराष्ट्र

5)कोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?
(A) रघुराम राजन
(B) सुब्रमण्यम स्वामी
(C) उर्जित पटेल
(D) बिमल जुल्का.  √

6)पाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?
(A) अपोलो
(B) ईगल
(C) डेस्टीनी
(D) पर्सेवेरन्स.  √

7)नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत किती निधीसह एक विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) 8.3 अब्ज डॉलर.  √
(B) 6.6 अब्ज डॉलर
(C) 4.5 अब्ज डॉलर
(D) 10.1 अब्ज डॉलर

8)वर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
(A) कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स
(B) राजमाता गायत्री देवी आणि सोनिया गांधी
(C) मिताली राज आणि सानिया मिर्झा
(D) इंदिरा गांधी आणि अमृत कौर.  √

9)कोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?
(A) देहरादून
(B) गैरसैन.  √
(C) हरिद्वार
(D) नैनीताल

10)आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?
(A) नमस्ते पोर्टल.  √
(B) हेलो पोर्टल
(C) स्वागत पोर्टल
(D) आयुर्वेद पोर्टल

महत्त्वाचे प्रश्नसंच


*खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?*

A) माधवराव पेशवे
B) दुसरे बाजीराव पेशवे
C) पहिले बाजीराव पेशवे ✅✅
D) रघुनाथराव पेशवे

*पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.*

A) दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे
B) नशीब उघडणे ✅✅
C) उखळात पीठ पडणे
D) उखाळाचा रंग जाणे

*तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?*

A) सामान्यनाम ✅✅
B) विशेषनाम
C) सर्वनाम
D) भाववाचक नाम

*बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?*

A) हालचाल
B) कोंडी
C) माल ✅✅
D) रस्ते

*खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?*

A) चर्चगेट, मुंबई
B) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ✅✅
C) मुंबई सेन्ट्रल
D) लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला

*नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?*

A) के. र. शिरवाडकर
B) भा. रा. तांबे
C) विजय तेंडूलकर
D) वि. वा. शिरवाडकर✅✅

*“पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.*

A) वार्षिक
B) पाक्षिक ✅✅
C) दैनिक
D) साप्ताहिक

*सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?*

A) यापैकी नाही
B) सी. व्ही. रामण ✅✅
C) अमर्त्य सेन
D) डॉ. सुब्रमण्यम

*“अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा*

A) अमर
B) अभंग
C) आकाश ✅✅
D) परमेश्वर

: *शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?*

A) संपादक ✅✅
B) बातमी
C) लेखक
D) अग्रलेख

*“विदुषी” हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?*

A) हुशार
B) विद्वान ✅✅
C) मुर्ख
D) विदुषक

*“कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..*

A) कवयित्री
B) कवी ✅
C) राजकवी
D) महाकवी

*होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?*

A) गोपाळ आगरकर
B) अॅनी बेझंट ✅✅
C) दादाभाई नौरोजी
D) महात्मा गांधी

*खालील चार शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे ते शोधा.*

A) गाजीयाबाद
B) वाराणसी
C) भागलपूर ✅✅
D) गोरखपूर

*“शकुंतलम” हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे?*

A) वल्लभदास
B) कालिदास✅✅
C) रामदास
D) गोविंददास

करोना विषाणू म्हणजे काय

- करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.
- चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

● या आजाराची लक्षणे काय?

- मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.

● धोकादायक आहे का?

- श्वसनाशी निगडित संसर्गाप्रमाणे करोनाची लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ  शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असते. 
- ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.

● अशी काळजी घ्या

- श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे
- हात वारंवार धुणे
- शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ  नये
- फळे, भाज्या न धुता खाऊ  नये

● कोणी विशेष काळजी घ्यावी?

- श्वसनाचा त्रास असणारे.
- वरील लक्षणे कोणत्या आजारामुळे आहेत हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशातून प्रवास केला असल्यास.
- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि बाधित देशात नुकताच प्रवास केला असल्यास अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

● यावर औषध आहे का?

- करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या तरी औषध उपलब्ध नाही. रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधे दिली जात आहेत.
- रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यरत असल्यास अन्य इन्फ्लुएन्झाप्रमाणे या विषाणूशी शरीर योग्य रीतीने सामना करते आणि रुग्ण बरा होतो.
- केरळमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून ती सुधारत आहे.

● आजार पसरतो कसा?

- करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणीजगतात आहे. यापूर्वी चीन आणि सौदी अरेबियामध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू प्राण्यांमधून माणसामध्ये पसरल्याचे आढळले आहे.  मात्र प्राण्यांमध्ये आढळणारे इतर प्रकारचे करोना विषाणू अद्याप तरी माणसामध्ये पसरलेले नाहीत.
- नोवेल करोना विषाणूचा स्रोत अजून तरी सापडलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की कोणत्याही प्राण्यापासून किंवा पाळीव प्राण्यापासून याची तुम्हाला बाधा होईल.
- रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे चीनमध्ये आढळून आले आहे. या विषाणूचा प्रसार सर्वसाधारणपणे हवेतून शिंकण्या, खोकल्यावाटे पसरत असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाले आहे. 
- चीन किंवा अन्य बाधित देशातून आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा होण्याचा संभव असला तरी होईलच असे नाही.

● मास्क वापरणे गरजेचे आहे का?

- कोरोनाची भीती वाढल्याने जिकडेतिकडे व्यक्ती मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही व्यक्ती तर एन९५ प्रकारचे मास्क वापरतानाही आढळले आहेत.
- एन ९५ मास्क हे केवळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींनी वापरावेत. विषाणूबाधित व्यक्तींच्या संपर्कात अधिक काळ असल्याने त्यांच्यासाठीही हे मास्क आहेत.

● उपचाराच्या काय सुविधा आहेत?

- चीन आणि व्यतिरिक्त करोनाचे रुग्ण आढळलेल्या १२ देशांमधून प्रवासी भारतात आल्यास आणि करोनाची संभाव्य लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसासाठी ठेवले जाते.
- तपासण्या निगेटिव्ह आलेल्या आणि घरी सोडलेल्या प्रवाशांची स्थानिक आरोग्य अधिकारयामार्फत २१ दिवस दररोज पाठपुरावा केला जातो. जेणेकरून १४ दिवसानंतर कोणत्या प्रवाशाला लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार केले जावेत.

● तपासण्या आणि विलीगिकरण कक्ष कुठे आहेत?

- राज्यात मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेमध्ये करोनाची तपासणी केली जाते.
- तसेच कस्तुरबा रुग्णालयासह पुण्यातील नायडू आणि राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विलीगीकरण कक्ष कार्यरत आहेत

गालफुगी

गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.

वर्णनसंपादन करा

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

कारण आणि लक्षणेसंपादन करा

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

रेबिज

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
------------------------------------------------------

डेंग्यू ताप

लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात​.

एकदम जोराचा ताप चढणे

डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे

डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते

चव आणि भूक नष्ट होणे

छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे

मळमळणे आणि उलट्या

त्वचेवर व्रण उठणे

२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव - चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.

तीव्र, सतत पोटदुखी

त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे

नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे

रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे

झोप येणे आणि अस्वस्थता

रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते

नाडी कमकुवतपणे जलद चालते

श्वास घेताना त्रास होणे

३) डेंग्यू अतिगंभीर आजार

ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.

-लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते. -ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो.

करोना तपासणीसाठी देशात 52 प्रयोगशाळा..

🔰नवी दिल्ली : करोना रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात आणखी ५२ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५७ प्रयोगशाळा या रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत त्यामुळे तपासणी व निदानाची सुविधा वाढणार आहे. दरम्यान देशातील निश्चित रुग्णांची संख्या आता ३४ झाली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

🔰अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने आणखी  ५२  प्रयोगशाळांत नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  ५७ प्रयोगशाळांत नमुने संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे.

🔰६ मार्चअखेर एकूण ३४०४ जणांचे एकूण ४०५८ नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात वुहानमधून आलेल्या ६५४ जणांच्या १३०८ नमुन्यांचा समावेश आहे. या लोकांना आयटीबीपी छावणी, मनेसर छावणी येथे ठेवण्यात आले होते. दिवस शून्य व दिवस १४ या दोन दिवशी त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. वुहान, डायमंड प्रिन्सेस जहाज येथून आणलेल्या भारतीयांची तपासणी दिवस शून्य रोजी करण्यात आली आहे. आता १४ दिवसांनी पुढची तपासणी केली जाणार आहे.

भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाची सरकारकडून घोषणा

🔰 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल)मधील 52.98 टक्के सरकारी भांडवल विकण्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागवून तिचे खासगीकरण करण्याचा इरादा केंद्र सरकारने जाहीर केला.

🔰मात्र आसाममधील नुमलीगढ तेलशुद्दिकरण कारखाना चालविण्यासाठी स्थापलेल्या स्वतंत्र कंपनीतील ‘बीपीसीएल’चे 61.65 टक्के भांडवल विकले जाणार नाही.

🚦निविदेसाठीच्या अटी

🔰 सार्वजनिक क्षेत्रातील कोणताही कंपनी निविदा भरण्यास अपात्र.

🔰 10 अब्ज अमेरिकी डॉलर मूल्य असलेली खासगी कंपनीच पात्र.

🔰 जास्तीत जास्त चार खासगी कंपन्या एकत्रितपणे निविदा भरू शकतील.

🔰 त्यापैकी मुख्य कंपनीचा त्यात किमान ४० टक्के वाटा असायला हवा.

🔰 सुरुवातीच्या चार महिन्यांत एकत्रित निविदाकारांपैकी सहभागी कंपन्या बदलता येतील. मात्र मुख्य कंपनी तीच कायम ठेवावी लागेल.

🔰 ही निविदा प्रक्रिया दोन टप्प्यांची असेल.

🔰 पहिल्या टप्प्यात स्वारस्य व्यक्त केले जाईल.

🔰 दुसऱ्या टप्प्यात स्वारस्यदारांना स्पर्धात्मक बोली सादर करावी लागेल.

🔴 मालमत्तेचे स्वरूप

🔰 बहुसंख्य भांडवलासह बीपीसीएलचे संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रण.

🔰 मुंबई, कोची, बिना व नुमलीगढ येथील तेलशुद्धीकरण कारखाने. त्यांची क्षमता वर्षाला 249 दशलक्ष टन. देशाच्या एकूण क्षमतेच्या 15 टक्के.

🔰 देशभरातील 15,177 पेट्रोल पंप, 6.011 एलपीजी वितरक एजन्सी व 51 एलपीजीच्या टाक्या भरण्याचे कारखाने.

🔰 देशाच्या इंधन बाजारपेठेतील 21 टक्के हिस्सा व विमानांमध्ये इंधन बरण्याची 51हून अधिक केंद्रे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच



*“सजातीय” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.*

A) समजातीय
B) अजातीय
C) विजातीय ✅✅✅
D) उपजातीय

*“कोसला” या कादंबरीचे लेखक कोण?*

A) राजन गवस
B) भालचंद्र जोशी
C) भालचंद्र नेमाडे ✅✅
D) भालचंद्र मुणगेकर

*कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?*

A) ३० कि.मी. ✅✅✅
B) ३५ कि.मी.
C) २७.५ कि.मी.
D) २९.५ कि.मी.

: *पॅरा ऑलिम्पिक २०१६ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?*

A) दीपा मलिक ✅✅
B) वरूण भाटी
C) अलका ग्रेस
D) साक्षी मलिक

*“कणीक तिंबणे” या वाक्य प्रकारचा अर्थ ओळखा.*

A) कणीक भिजविणे
B) खूप मारणे ✅✅
C) सूड उगवणे
D) अंदाज करणे

: *“तेल्या” हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?*

A) काजू
B) डाळींब ✅✅
C) आंबा
D)
:
*भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे?*

A) सिमला
B) श्रीनगर
C) लेह
D) धूम (दार्जीलिंग) ✅✅

*दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?*

A) १०८० रुपये
B) ६८०० रुपये
C) ६४०० रुपये ✅✅
D) ७२०० रुपये

*“नाट्यशास्त्र” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?*

A) व्यासमुनी
B) दुर्वासमुनी
C) वाल्मिकी
D) भरतमुनी✅✅

*अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?*

A) मॅग्नीज
B) बॉक्साईड ✅✅
C) लोहखनिज
D) तांबे

*द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?*

A) २
B) ४
C) ६
D) ८ ✅✅

*21, 23, 30, 32, ?*

A) 37
B) 39 ✅✅
C) 35
D) 33

*उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे?*

A) गोदावरी
B) पैनगंगा
C) भीमा ✅✅
D) तापी

*झाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.*

A) शब्दयोगी अव्यय ✅✅
B) उभयान्वयी अव्यय
C) क्रियाविशेषण अव्यय
D) केवलप्रयोगी अव्यय

*(a + b)2= ?*

A) a2 + b2
B) a2+ b2+ ab
C) a2 + b2 + 2ab ✅✅
D) 2abc

*सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे?*

A) कोळी नृत्य
B) तमाशा
C) आदिवासी नृत्य
D) धनगर नृत्य ✅✅

*ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते?*

A) १.६२७ मी.
B) १.५५७ मी.
C) १.६७६ मी. ✅✅
D)  १.५५६ मी.

*छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?*

A) रायगड
B) तोरणा ✅✅
C) राजगड
D) सिंहगड